CMO MAHARASHTRA
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहायात भरीव वाढ आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये ---------- वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दिनांक १५: राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून वीस…
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठीच्या ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधी’ त अकरा हजारावरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या प्रोत्साहनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आकांक्षित महिला सक्षमीकरण योजने’ चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध बचत गट सदस्यांना योजनेतील लाभाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
वरळीच्या एनएससीआय येथे आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सौ. यामिनी जाधव, आयुक्त इकबालसिंह चहल आदी उपस्थित होते.

👍1
🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now
#LIVE | नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या नवीन इमारत लोकार्पण कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
https://youtube.com/live/Vaxy2c5wemA?feature=share

YouTube
#LIVE | नायर रुग्णालय दंत महाविद्यालय नवीन इमारत लोकार्पण कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#LIVE | नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या नवीन इमारत लोकार्पण कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now
#LIVE | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड डिजिटल प्रकल्पाचा शुभारंभ. या प्रकल्पासाठी देशातून फक्त दोन जिल्ह्यांची निवड, त्यात बीड जिल्ह्याचा समावेश.
https://youtube.com/live/7K-ECi6tH60?feature=share

#LIVE | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किसान क्रेडिट कार्ड डिजिटल प्रकल्प शुभारंभ
एसटीच्या बसेस आता एलएनजी इंधनावर धावणार….
------
एसटी महामंडळाच्या एलएनजी रूपांतरण वाहन प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. १५: देशातील पहिल्या एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी करण्यात आले.
कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर, महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर, वैभव वाकोडे, मे. किंग्ज गॅस प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहम्मद आजम कुरेशी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी एलएनजी रूपांतरणमुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली आणि बसचे निरीक्षण केले.
एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. या रुपांतरण प्रकल्पाचा आज शुभारंभ झाला.
एसटी महामंडळाकडे डिझेलवर चालणारे सुमारे १६००० प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो. डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने महाराष्ट्रास एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी मे. किंग्स् गॅस प्रा. लि. यांचेबरोबर सामंजस्य करार (MOU) केलेला असुन त्यामध्ये परिवहनसाठी सुध्दा एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. निश्चितच महामंडळाचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे. महामंडळाच्या सुमारे ९० आगारात एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ
------------
महिला बचत गटांना एक लक्ष रुपये अनुदान लाभ हस्तांतरण
------------
मुंबईत बचत गटाच्या महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. १५ :-- स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या प्रोत्साहनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभिनव योजनेची सुरुवात होत असून महिला बचत गटांना एक लक्ष रुपये अनुदान देणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये बचत गटांसाठी २५० कोटी रुपये तरतूद केली आहे. बचत गटाच्या महिलाना कौशल्य विकासासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रशिक्षण केंद्रांना जागा देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. वरळी येथील आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
वरळी येथील आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार श्रीमती यामिनी जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि दहा हजारांपेक्षा जास्त बचत गटांच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी दुरनियंत्रण प्रणालीद्वारे बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करून(dbt)आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रातिनिधिकरित्या 20 महिला बचत गटाच्या सदस्या व एक ट्रान्सजेंडर बचत गट सदस्यांना लाभ हस्तांतरणाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर काम करीत असून त्या कोठेही मागे नाहीत. अंतराळ क्षेत्रापासून, नौसेना पाणबुडीपर्यंत निर्भयतेने वावरत आहेत. देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु पद भूषवत आहेत. महिलांमध्ये सहनशीलता, कर्तुत्व आणि नेतृत्व सर्व काही सामावलेले आहे. राज्यात महिलांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी महिला विकास धोरणावर काम केले जात आहे. मुलींसाठी १८ व्या वर्षी एक लक्ष रुपये खात्यात जमा होणारी ‘लेक लाडकी योजना’, राज्य परिवहन महामंडळाचे बस प्रवास भाड्यामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे. वर्किंग वुमन हॉस्टेल्स तयार केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे लाभ थेट त्यांच्या खात्यात पोहोचविण्यासाठी डीबीटी सुरू केले. उज्वला योजना लागू केली. केंद्र सरकारच्या धर्तीवर काम करताना राज्य महिला भगिनींसाठी अधिकाधिक योजना राबवून न्याय देण्यासाठी काम केले जात आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आश्वस्त केले.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व काही उपाययोजना केल्या जात आहेत, अडचणीमध्ये त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी पोलीस व महानगरपालिका यांनी यंत्रणा उभी करावी. सीसीटीव्ही, रॅपिड रिस्पॉन्स टीम, ॲप्स व माहिती तंत्रज्ञान याचा सक्षम वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
कोस्टल रोड टप्पा दोन, २४८ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारांसाठी मदत, मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये झिरो प्रेस्क्रिप्शन पॉलिसीद्वारे सर्व औषधे विनामूल्य, मुंबई शहर स्वच्छ , सुंदर व धुळी पासून मुक्त करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले. मुंबई महानगरपालिका व राज्याचा कौशल्य विकास विभाग यांच्या सहयोगाने मुंबईतील बचत गट महिलांच्या सक्षमतेसाठी महिला कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात येणार आहे.
मंत्री श्री.केसरकर म्हणाले, महिलांच्या सक्षमतेसाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत मुंबईतील जोगेश्वरी येथे बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी मॉल सुरू केलेला आहे. तसेच आता राज्य शासनाकडून बचत गटांसाठी नवी मुंबई येथे देखील मोठा मॉल उभा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांचे स्वागत बचत गटांनी तयार केलेल्या "तोरण, गुढी, सुवासिक अगरबत्ती व जूटची बॅग" या भेटवस्तू देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी केले. खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांना मच्छीमार परवान्यांबाबत व त्याच्या शुल्क माफी मागणीचे निवेदन सादर केले. सुरुवातीस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या बाबतच्या 'नारीशक्ती' चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांच्या साठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच कार्यक्रम परिसरात महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शने ठेवण्यात आली होती.या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात दहा हजार तर ऑनलाईन 70 हजार पेक्षा जास्त महिला बचत गट सदस्य सहभागी होत्या.
०००००
०००००