राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषद ही देशातील सर्वात प्रतिष्ठीत विधानपरिषद आहे. अनेक नामवंत लोकप्रतिनिधी या विधानपरिषदेने दिले. राज्याला प्रगतीशील बनवण्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी या सभागृहाचे प्रतिनिधीत्व केले. या विधिमंडळात जनहिताच्या प्रश्नावर चर्चा होते. विविध समाजघटक यांच्याबद्दल येथे विचारविनिमय होतो. शेतकरी, महिला आणि युवकांच्या आशा-आकांक्षांचे हे प्रतिबिंब आहे. युवकांच्या समस्यांच्या बाबतीत अधिक संवेदनशील राहण्याची गरज आहे. या घटकांचा लोकशाहीवरील विश्वास बळकट होईल या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत. विशेषत: महिला, पर्यावरण, तापमान वाढ, शेतकरी प्रश्नांना सर्वोच्च प्राथमिकता हवी. सर्व यंत्रणा गतिशील आणि उपक्रमशील व्हायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विधिमंडळाची गौरवशाली परंपरा आहे. राष्ट्राच्या विकासात मोठी भूमिका महाराष्ट्रातील नेत्यांनी निभावली आहे. अनेक नामवंतांनी येथे प्रतिनिधीत्व केले आहे. हा लोकशाहीचा समृद्ध स्तंभ आहे. अशा ठिकाणी संसदीय लोकशाहीसाठी उपराष्ट्रपती श्री. धनखड यांचे मार्गदर्शन मोलाचे आहे. त्यांच्या अनुभव, ज्ञान यांच्या जोरावर त्यांनी उपराष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा वाढवली असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात संसदीय लोकशाही रक्षणासाठी संपूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आभार मानले. यावेळी त्यांनी विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रम – कार्यक्रमांची माहिती दिली.
000

लोकनेते स्व. शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
👍1
#LIVE | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण...
🗓️ दि. १३ जुलै २०२४
🕠 सायंकाळी ५.३० वाजता
📍 नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव (पूर्व), मुंबई
https://youtube.com/live/flbZWooiSYg?feature=share
🗓️ दि. १३ जुलै २०२४
🕠 सायंकाळी ५.३० वाजता
📍 नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव (पूर्व), मुंबई
https://youtube.com/live/flbZWooiSYg?feature=share
YouTube
#LIVE | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
❤1
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले.
🔥1