CMO MAHARASHTRA
✔
6.51K subscribers
3.44K photos
133 videos
4 files
294 links
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत चॅनल...
Download Telegram
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करकंब येथे श्री संत निळोबाराया महाराजांच्या पालखीतील पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले. त्यानंतर पालखीसोबत मुख्यमंत्री काही वेळ चालत गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री क्षेत्र पंढरपूर येथे भेट देऊन आषाढी एकादशी पूर्वतयारी आणि वारकऱ्यांकरिता केलेल्या सोयी-सुविधा तसेच शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला. वारकऱ्यांशी संवाद साधून सोयी-सुविधांची माहिती घेतली. आमदार समाधान आवताडे यांच्या दुचाकीवर बसून मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर परिसरातील सोयी-सुविधा आणि स्वच्छतेची पाहणी केली.
👍1
श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन तिथे उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधला, तिथे औषधे आणि पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.