CMO MAHARASHTRA
✔
6.5K subscribers
3.44K photos
133 videos
4 files
294 links
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत चॅनल...
Download Telegram
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले.
👍1
📍#मंत्रालय | भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक यावेळी उपस्थित होते.
👍2
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी #कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे केला. शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत तयार केलेल्या पथदर्शी प्रकल्पाव्दारे निश्चितच हाईल. या पथदर्शी प्रकल्पाचे अनुकरण करुन राज्यातील इतर जिल्ह्यातही हा प्रकल्प राबविण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या मंगलदिनी आपण एका लोकाभिमुख, राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मभूमीतून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात करत आहोत. हा अधिनियम 2015 मध्ये सुरू झाला असून, या अंतर्गत शासनाच्या हजारो योजनांचा समावेश करून नागरिकांना तात्काळ व सुलभ सेवा देण्याचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. तथापि, या कायद्याची अजूनही लोकांना तितकीशी माहिती नाही. सेवांचा प्रभावी वापर होवून कायदा लोकापर्यंत पोहचला पाहिजे असे सांगून पथदर्शी प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात सुरु केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार प्रकाश आबिटकर तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व राज्य उत्पादक शुल्क मंत्री, शंभूराज देसाई यांचेही त्यांनी अभिनंदन केले.


कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते तर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव आणि मान्यवर दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.
👍1