दाते पंचांग (Date Panchang)
3.35K subscribers
2.49K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
22-02-2024 रोजी गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून दुपारी ४:४३ पर्यंत आहे.
गुरुवार आणि पुष्यनक्षत्राच्या योगाने होणारा हा अमृत योग अतिशय शुभ मानला जातो. या योगावर सोने खरेदी करण्यास प्रारंभ करून पुढे येणाऱ्या प्रत्येक पुष्य नक्षत्रावर थोडे थोडे सोने खरेदी करून त्या सोन्यापासून बनवलेली अंगठी विधीपूर्वक धारण केली असता ती वैभव, समृद्धी देणारी ठरते. म्हणून या योगावर विशेषत्वाने सोने खरेदी केली जाते. सोने खरेदी बरोबरच रोजच्या आयुष्यातील व्यवहारांसाठी सुद्धा हा दिवस शुभ मानला जातो.
2024 मधील पुढील गुरुपुष्यामृत योग खालील प्रमाणे –
26 सप्टेंबर रोजी रात्री ११:३४ पासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत
24 अक्टोबर रोजी संपूर्ण दिवसभर
21 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून दुपारी ३:३६ पर्यंत

दाते पंचांगाच्या विविध ऑनलाईन सेवांकरिता भेट द्या.
www.datepanchang.com
👍9❤4