दाते पंचांग (Date Panchang)
3.38K subscribers
2.46K photos
77 videos
14 files
166 links
Download Telegram
उद्या गोपाळकाला व दहीहंडी — शनिवार, ५ सप्टेंबर २०२६.

आज श्रीकृष्ण जयंती, उद्या गोपाळकाला — दोन वेगळे दिवस. जन्म मध्यरात्री साजरा होतो; काला दुसऱ्या दिवशी.

नवमी तिथी रात्री ९:५४ पर्यंत.

संपूर्ण पंचांग — datepanchang.com
👏2🙏1
🙏2❤1👏1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
गोविंदा आला रे! — गोपाळकाला व दहीहंडी, आज शनिवार ५ सप्टेंबर २०२६.

काल श्रीकृष्ण जयंती, आज गोपाळकाला — दोन वेगळे दिवस. जन्म मध्यरात्री साजरा होतो; काला दुसऱ्या दिवशी.

नवमी तिथी रात्री ९:५४ पर्यंत. विवरण — चांगला दिवस.

दाते पंचांग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा! 🙏

संपूर्ण पंचांग — datepanchang.com
❤1🙏1
🙏8❤1👏1
🙏8👏2❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🌺 हरितालिका आणि गणेश चतुर्थीचे पूजन १४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 🌺— यंदा १४ सप्टेंबर रोजी हरितालिका तृतीया आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत.या दिवशी तृतीया सकाळी ७:०७ वाजता समाप्त होत असली, तरी हरितालिका पूजन ७:०७ पूर्वीच करणे आवश्यक नाही. तसेच गणेश चतुर्थीचे पार्थिव गणेश पूजनही ७:०७ नंतरच करावे, असे नाही.🔸 हरितालिकेसाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया आवश्यक असते.🔸 गणेश चतुर्थीसाठी मध्याह्नव्यापिनी चतुर्थी आवश्यक असते.🔸 १४ सप्टेंबर रोजी सूर्योदयाला तृतीया व मध्याह्नी चतुर्थी असल्याने दोन्ही व्रते याच दिवशी आहेत.👉 उषःकालापासून मध्याह्न समाप्तीपर्यंत पूजनाचा मुख्यकाल आहे. त्यामुळे सोयीनुसार हरितालिका किंवा गणेशपूजन आधी-नंतर करता येईल.🙏 हरितालिकेचा उपवास १४ सप्टेंबर रोजी दिवसभर करून १५ सप्टेंबर रोजी सोडावा.यापूर्वी २००६ आणि २००९ मध्येही हरितालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या.— मोहन दाते | दाते पंचांग
🙏3
🙏4❤2👏2👍1
🙏7❤2👏1
🙏8👏2❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
बैलपोळा — आज, गुरुवार १० सप्टेंबर २०२६.

वर्षभर राबणाऱ्या बैलाला आजचा दिवस विश्रांतीचा. वृषभपूजन व पिठोरी अमावास्या.

आज मातृदिन देखील.
🙏5👏3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
यंदा गणेश चतुर्थी व हरितालिका एकाच दिवशी — सोमवार, १४ सप्टेंबर २०२६.

पूजा कोणती आधी, कोणती नंतर? आणि हरितालिकेपाठोपाठ येणाऱ्या ऋषिपंचमीचे दोन उपवास कसे सोडायचे?

मोहन दाते यांचे मार्गदर्शन.
❤6🙏2
❤6🙏4👏1
🙏7❤2🥰1👏1
🙏7❤1
🙏3❤2👏2
👏4🙏3❤2
❤3👏2🙏2
गणेशोत्सवाचे दरम्यान येणारे गौरीपूजनाचे दिवस -
गौरी आवाहन - दिनांक 17 सप्टेंबर रोजी गुरुवारी अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यत कधीही गौरी आवाहन करता येईल.
गौरी पूजन - ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने दिनांक 18 सप्टेंबर रोजी शुक्रवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे.
गौरी विसर्जन - मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक 19 सप्टेंबर रोजी शनिवारी दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करता येईल.
❤6
❤4🙏3👍1