दाते पंचांग (Date Panchang)
3.36K subscribers
2.48K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
22 ऑक्टोबर ला विचारलेल्या प्रशांची उत्तरे!
👍8
नमस्कार,

दाते पंचांगाने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेला आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे हा उपक्रम खूप छान पार पडला. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

टीप - कोजागरीच्या दिवशी या प्रश्नमंजुषेतील विजेत्यांची नावे प्रसिद्ध केली जातील.

दाते पंचांगाच्या विविध सेवांसाठी अवश्य भेट द्या.
https://datepanchang.com/
👍10👏8
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!🥳
आधिक माहिती साठी भेट द्या - datepanchang.com
👍13👏3
कोजागरी आणि ग्रहण

यावर्षी दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असून रात्री १:०५ ते २:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. त्यापूर्वी दुपारी ३:१४ पासून सुरु होणाऱ्या वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल. मात्र प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल. तसेच देवतांची सायंकाळची पूजा, आरती, पालखी, इत्यादि सर्व वेधकाळात करता येते. कोजागरीचे दिवशी मुलांना औक्षण केले जाते, ते वेधकाळात सुध्दा करता येईल. यापूर्वी 17 ऑक्टोबर 1986 रोजी कोजागरीचे दिवशी चंद्रग्रहण आलेले होते.

खंडग्रास चंद्रग्रहण

आश्विन शु. १५, 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार
ग्रहणस्पर्श - रात्री १:०५
ग्रहणमध्य - रात्री १:४४
ग्रहणमोक्ष - रात्री २:२३

28 ऑक्टोबर 2023, शनिवारी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल. हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.

ग्रहणाचा वेध - शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी दु. ३:१४ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं. ७:४१ पासून वेध पाळावेत. वेधकाळामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इत्यादी करता येतील तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहकाळात म्हणजे रात्री १:०५ ते २:२३ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग हे करू नयेत.

ग्रहणातील कृत्ये - ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पन, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे. ग्रहण काळामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन हे कर्म करू नये. सूतक असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापूर्वी शुद्धी असते.

मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभफल. सिंह, तुला, धनु, मीन या राशींना मिश्रफल. मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
👍26❤9😁3