दाते पंचांग (Date Panchang)
3.36K subscribers
2.47K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
नमस्कार,
गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गणेशोत्सव फोटो स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि आवडलेल्या फोटोंना लाईक केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. या स्पर्धेदरम्यान आमच्याकडे अक्षरशः शेकडो फोटो आले त्यातील निवडक फोटो शेअर करणे हे खरोखरच आव्हानात्मक काम होते. या कामाची जबाबदारी घेतलेल्या आमच्या निवड समितीचे देखील आम्ही आभार मानतो. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 22 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत ज्या फोटोंना सर्वाधिक लाईक मिळालेले आहेत, अशा 3 विजेत्यांची नावे आम्ही 25 तारखेला जाहीर करणार होतो. मात्र मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे 3 ऐवजी 5 विजेते जाहीर करण्याचा निर्णय दाते पंचांग परिवाराने घेतलेला आहे. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

दाते पंचांगाच्या भविष्यातील उपक्रमांना देखील आपण असाच भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणा सर्वांचे पुनःश्च आभार मानतो, धन्यवाद !

विजेत्यांची नावे आणि गणेशमूर्तींचे फोटो खालील प्रमाणे -
👍2❤1
नवरात्रारंभ/घटस्थापना: 3 ऑक्टोबर 2024, गुरुवार. ब्राह्म मुहूर्त ते दुपारी 1:45 पर्यंत पूजन. यंदा तृतीयेची वृद्धी असल्याने नवरात्र 10 दिवसांचे आहे.

मुख्य तिथी:

1. ललिता पंचमी: 7 ऑक्टोबर
2. महालक्ष्मी पूजन: 10 ऑक्टोबर (घागरी फुंकणे)
3. महाष्टमी व नवमी उपवास: 11 ऑक्टोबर
4. नवरात्रोत्थापन/दसरा: 12 ऑक्टोबर, शनिवार

ज्यांना पूर्ण 9 दिवस उपवास शक्य नसेल, त्यांनी पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. ते शक्य नसेल तर किमान अष्टमीचा उपवास करावा.
❤15👍12🙏2👏1
नवरात्रोत्सव 2024🌺

देवीची 9 रूपे: नव दुर्गा !!

1. शैलपुत्री:

शैलपुत्री ही नवरात्रीतील पहिली देवी आहे. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. देवीच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. ती पर्वतराज हिमालयाची कन्या असून तिचे वाहन वृषभ आहे. शैलपुत्री देवीची पूजा शांती, स्थैर्य, आणि पवित्रता प्राप्त करण्यासाठी केली जाते.
🙏16👍12👏9❤7
नवरात्रोत्सव 2024🌺

देवीची 9 रूपे: नव दुर्गा !!

2. ब्रह्मचारिणी:

ब्रह्मचारिणी ही नवरात्रीतील दुसरी देवी आहे. ती तपश्चर्या आणि संयमाचे प्रतीक आहे. ब्रह्मचारिणी देवीने अनेक वर्षे तपस्या करून भगवान शिवास पती म्हणून प्राप्त केले. ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने संयम, धैर्य, आणि साधनेत प्रगती मिळते. तिच्या आशीर्वादाने मानसिक शांती आणि दृढता प्राप्त होते.
❤12👍8🙏8👏2
नवरात्रोत्सव 2024🌺
देवीची 9 रूपे: नव दुर्गा !!
3. चन्द्रघंटा:
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या “चंद्रघंटा” या रुपाची आराधना केली जाते. तिच्या कपाळावर अर्धचंद्र असल्याने तिला "चन्द्रघंटा" असे नाव आहे. तिच्या दहा हातांमध्ये विविध शस्त्रे असतात, जी तिच्या पराक्रमी आणि युद्ध कौशल्याचे प्रतीक आहेत. चन्द्रघंटा देवीची पूजा केल्याने साधकाला शौर्य, धैर्य, आणि निर्भयता प्राप्त होते.
🙏12❤10👍4
नवरात्रोत्सव 2024🌺

देवीची 9 रूपे: नव दुर्गा !!

4. कूष्माण्डा:

कूष्मांडा देवी नवरात्रीतील चौथी देवी आहे. दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ' कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते.
🙏13❤6👍4
नवरात्रोत्सव 2024🌺

देवीची 9 रूपे: नव दुर्गा !!

5. स्कंदमाता:

स्कंदमाता ही नवरात्रीतील पाचवी देवी आहे. ती भगवान स्कंद (कुमार कार्तिकेय) यांची माता आहे, म्हणूनच तिला स्कंदमाता म्हणतात. ती सिंहावर बसलेली असून तिच्या चार हातांमध्ये दोन कमळ, एक हातात स्कंद, आणि एक हात वरद मुद्रा धारण केलेला आहे. तिची पूजा केल्याने भक्तांना शांती, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो.
🙏12❤5👍2