Olympic Day 7
Recap 30/07/2021
संमिश्र परंतु चांगला दिवस..
दिवसाच्या सुरुवातीला मनु भाकर आणि राही सरनौबत यापैकी मनु काल 5 व्या स्थानावर असल्यान अंतिम फेरीत जाईल अशी खात्री वाटत होती पण दोघी अंतिम फेरीत जाऊ शकल्या नाहीत, पिस्तुल शूटिंग मध्ये एक तरी मेडल भेटल ही अपेक्षा होती पण मेडलची पाटी या भरवश्याच्या प्रकारात कोरी राहिली.
दीपिका कुमारी रशियन तिरंदाजाला हरवत QF मध्ये पोचली पण तिथं तिची गाठ कोरियन तिरंदाजसोबत पडली (हुह्ह ..पुन्हा कोरिया) आणि आपल्या दोन्ही सांघिक टीम प्रमाणे कोरिया कडून आजही दणका बसला, पहिल्याच सेट मध्ये सलग तिन्ही arrow परफेक्ट टेन मारून कोरियन तिरंदाजान आपला दर्जा दाखवत तो दबाव कायम ठेवला. आता वैयक्तिक तिरंदाजीत फक्त अतनू दास ही आपली आशा उरलीय.(त्यानं एकट्यानच आपल्यातर्फे कोरियन तिरंदाजला हरवलं आहे)
आजचा दिवस गाजवला तो लवलीना बोर्गोहेन न ! पहिल्या राउंड मध्ये जिंकून पण शांत शांत वाटणारी लवलीना या राउंड मध्ये बरीच आक्रमक वाटली ..सामना जिंकल्यावर तिचा आवेश बघण्यासारखा होता! आज तीन ज्या बॉक्सरला हरवलंय त्या बॉक्सर न लोवलीना ला याआधी जागतिक स्तरावर 4 वेळा हरवलं होत म्हणून आज तिलाच हरवणं हे मानसिकदृष्ट्या पण खूप आव्हानात्मक होत ते तीन पेललं आणि कांस्य पदक फिक्स झालं असल तरी मला गोल्ड जिंकल्याशिवाय थांबायचं नाहीय ही जिद्द बोलुन दाखवली. प्रामाणिकपणे सांगायचं तर भारताचं हे मेडल बऱ्यापैकी अनपेक्षित होत.
बॉक्सिंग मध्ये सिमरनजीत कौर ला मात्र पहिला टप्पा ओलांडता आला नाही.
बाकी सिंधू बद्दल तर सगळ्याला माहीतच असल..आज ची तिची स्पर्धक 4th seed होती (सिंधू 6th seed आहे) तर उद्या तिची सेमी फायनल ही 2nd seed खेळाडू सोबत आहे...आव्हान तगड असणारच आहे पण एकही गेम न हरता इथवर आलेली सिंधू ते पण पेलेल अस वाटत.
आज तिची मॅच ज्या जपानी सुबक ठेंगणी सोबत होती ती प्रतिस्पर्ध्याला long rallies खेळून थकवण्यात माहीर आहे/होती, दोघींच्या उंचीत लै फरक होता म्हणून playing style मध्ये लै फरक जाणवत होता. सिंधू न सुरुवात जरा निवांत केली तरी नंतर मात्र जपानी खेळाडून सिंधूच्या थकवायच्या नादात सलग बऱ्याच unforced error केल्या अन सिंधू पहिला गेम सहज जिंकली.
दुसऱ्या गेम मध्ये पण ती 6 पॉईंट्स न आघाडीवर होती म्हणून आता झाल..पोचली सेमी ला अस वाटत असतानाच जपानी खेळाडून ती लीड तर तोडलीच उलट 2 पॉईंट ची आघाडी पण घेतली, 20-18 अशी पिछाडीवर पडून पण सिंधू न आपला अनुभव दाखवत दुसरा पण गेम अन सामना जिंकला ...बाकी उद्याच्या मॅच मध्ये मजा येणाराय!
हॉकी मध्ये आपल्या टीमनं जलवा कायम ठेवत अखेरच्या ग्रुप मॅच मध्ये जपानचा high scoring मॅच मध्ये पराभव केला. (5-3)
आपली सेमी फायनल इंग्लंड सोबत रविवारी संध्याकाळी आहे.
महिला हॉकी टीम न खात उघडत आयरिश संघाचा 1-0 न पराभव केला आणि आश्चर्य म्हणजे 4 पैकी अजून एकच सामना जिंकला असला तरी अखेरचा सामना जिंकला तर अजूनही QF मध्ये जाण्याची संधीय!
Athletics च्या (track and field ) प्रकारांना आज सुरुवात झाली पण आपला कोणताही athlete आज पुढं जाऊ शकला नाही, पण अविनाश साबळे न steeplechase 3000m या प्रकारात पुढं जाता आलं नाही तरी आपलं नॅशनल रेकॉर्ड तोडलं , सगळ्यात मोठ्या स्टेज वर आपलं सर्वोत्तम देणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे.
नौकानयन मधल्या rowing आणि sailing मध्ये जवळपास सर्व प्रकारात आपलं आव्हान संपुष्टात आलय.
गोल्फ मध्ये अनिर्बन लाहिरी आणि Equestrian (घोडेस्वारी) त फौवाद मिर्झा या आपल्या प्लेयर्स नी आज आपला खेळ सुरू केला {अशाही खेळात आपले खेळाडू पात्र झाले आहेत हे कळावं म्हणून ही माहिती}
उद्या अतनू दास, पुजाराणी आणि सिंधू च्या सामन्यावर विशेष लक्ष असेल...
#Olympic

Olympic
Recap Day 8 (31.07.2021)
अपेक्षा होत्या तिथं अपेक्षाभंग करणारा आणि नव्हत्या तिथं अपेक्षा जागवणारा दिवस...
दिवसाची सुरुवात सीमा पुनिया (थाळीफेक) या 4 वेळच्या ऑलिम्पियन च्या अंतिम फेरीसाठी पात्र न ठरण्याच्या शक्यतेने झाली, कारण सीमा 60 मिटर च्या आसपासच थाळी फेकू शकली (थेट अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी महिला थालिफेकमध्ये किमान 64 मीटर चा थ्रो करावा लागतो ) त्यामुळ टॉप 12 प्लेयर पात्र ठरतात अशावेळी ती 16 व्या स्थानावर राहिली.
मात्र दुसऱ्या गटातल्या आपल्या पहिलच ऑलम्पिक खेळणाऱ्या कमलप्रीत कौर न कमाल केली ! 63.97 आणि 64 मिटर चे थ्रो करून ती चक्क दुसऱ्या क्रमांकान अंतिम फेरीसाठी पात्र ठरली !
(आजवर भारताच्या कोणत्याच प्लेयर न track म्हणजेच धावण्याच्या आणि Field म्हणजे थाळी/गोळा/भाला फेक मध्ये एकही मेडल जिंकलेल नाहीय...कमलप्रीत हा इतिहास घडवू शकते !
अंजु बेबी जॉर्ज चा अपवाद सोडला तर आपण अशा प्रकारात अंतिम फेरी पण सहसा गाठत नाही)
तिरंदाजीत अतनू दास मात्र जपानी तिरंदाजाच आव्हान पेलू शकला नाही, 5 व्या म्हणजे शेवटच्या सेट पर्यंत चाललेल्या सामन्यात अतनू न एक 8 पॉइंटर मारल्याने घोळ झाला.
धक्कादायक निकाल म्हणलं तर flyweight गटातल्या अनिल पांघल चा बॉक्सिंग मधला पराभव ठरला , कारण त्याच्या वजनी गटात तो वर्ल्ड नंबर 1 आहे (क्रिकेट सोडून आपल्या प्लेयर बद्दल अस काही असण्याची आपल्याला सवय नसते) ..पहिला राउंड आक्रमपणे खेळून पण अखेरच्या 2 राउंड मध्ये काय झालं काय माहीत..अमित कदाचित big match प्रेशर हाताळू शकला नाही,(अर्थात त्याला हरवणारा बॉक्सर मागच्या वेळचा मेडलिस्ट आहे) हीच गोष्ट पुजाराणी बद्दल पण जाणवली , 1ल्या सामन्यात अत्यंत सकारात्मक वाटलेली ती आज खूप दबावात दिसली, असो अनुभवासोबत पुढच्या वेळी ते उत्तम कामगिरी करतील ही अपेक्षा.
बाकी महिला हॉकी टीमन द आफ्रिकेच्या टीमला 4-3 न हरवत QF च्या आशा जिवंत ठेवल्या.
मागच्या मॅच मध्ये तब्बल 14 penalty corner वाया घालण्याची कामगिरी करणाऱ्या आपल्या टीमनं या मॅच मध्ये मात्र दोन गोल कॉर्नर वर केले. वंदना कटारिया महिला हॉकी ऑलम्पिक मध्ये हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय ठरली ! पण बचाव अजून बराच कच्चा वाटला, सामन्यात तीन वेळा 1 गोल ची बढत घेऊन पण आपण आफ्रिकेला बरोबरी करण्याची संधी दिली होती.
यानंतर आपलं नशीब ब्रिटन विरुद्ध ireland मॅच च्या निकालावर ठरणार होत, म्हणून आयुष्यात कधी नाय ते ब्रिटिश संघ जिंकावा म्हणून सपोर्ट करावा लागला. अखेर ब्रिटिश संघानं सामना जिंकून आपला QF चा मार्ग मोकळा केला. आपली QF परवा दिग्गज ऑस्ट्रेलिया बरोबर आहे ! (चक् दे इंडिया सारखा चमत्कार घडवला तर बरय )
पुरुष हॉकी मध्ये QF उद्या ब्रिटिश संघासोबत होईल.
सिंधू च्या मॅच बद्दल सगळ्यांना माहीतच असेल, याआधी पण आज सिंधूच्या हरवणार्या Tai Tzu न तिला 18 पैकी 13 दा हरवलं होत. सिंधू हरताना बघवत नव्हतं पण Tai Tzu was better player today ही स्पष्टपणे मान्यच करावं लागेल. असो..उद्या सिंधू कांस्य पदक तरी नक्की करेल ही अपेक्षाय.
Rifle शूटिंग मध्ये तेजस्वीनी सावंत आणि अंजुम या दोघीही अंतिम फेरी गाठू शकल्या नाहीत म्हणजेच अत्यंत जास्त आशा असणाऱ्या शूटिंग प्रकारात सौरभ चौधरीच्या अंतिम फेरीत प्रवेशाच्या व्यतिरिक्त कोणीही अंतिम फेरीत पण पोचू शकलं नाही !
बाकी..गोल्फ मध्ये आपल्या खेळाडूंचे राऊंड चालुयत, नौकानयन मध्ये आव्हान संपलय, लांब उडीत पण श्रीशंकर अंतिम फेरीत उडी मारू शकला नाही (पात्र झाला नाही)
अशा प्रकारे आज अपेक्षा असणाऱ्या बॉक्सिंग,शूटिंग, बॅडमिंटन मध्ये अपेक्षाभंग झाला खरा पण अपेक्षा नसलेल्या थाळीफेक आणि महिला हॉकीत नवीन आशा निर्माण झालीय.
बाकी उद्या उद्या सतीश कुमारची QF बॉक्सिंग मॅच, सिंधुची कांस्य पदकाची मॅच आणि हॉकी ची QF सोडलं तर फार काही नाही.

*भारतीय महिला हॉकी टिमने आज हॉकी विश्वात खळबळ उडवुन दिली राव !!*
ऑस्ट्रेलियाला 1-0 ने हरवत Semi-Final मधे जागा पक्की केली !! मी तर ही Match पहायची नाही अस ठरवल होते कारण, Group stages मधे एकही match न हारलेला व 13 Goal करुन फक्त एकच Goal स्विकारलेल्या Table Topper ऑस्ट्रेलिया कडुन आपला धुव्वा उडणार हे ठरलेलच होत !! परंतु सगळे गणिते चुकिचे ठरवत आपल्या या मुलींनी अद्बभुत जादुच केली राव !! यापुढे मेडल मिळो ना मिळो तुम्ही असंख्य हॉकीप्रेमी भारतीयांची मन जिंकलीत !! देशाला तुमच्यावर प्रचंड अभिमान आहे !!

*पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी !*
*MPSC- UPSC व इतरही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यभरातील परीक्षार्थींसाठी खूशखबर !*
पुणे दि. ८ ऑगस्ट (प्रतिनिधी)
MPSC- UPSC अथवा तत्सम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये कोचिंग क्लासेस (Coaching Classes) सुरु राहणार आहेत.
पुण्यात असलेल्या आणि राज्यभरातून पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. पुण्यातील स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ते सर्व दिवस रात्री ८ वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील व सदर ठिकाणी प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांचे (किमान एक डोस) लसीकरण होणे आवश्यक आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, श्री. विक्रम कुमार यांनी आज सुधारित आदेशाद्वारे प्रसिद्ध केले आहे. दरम्यान MPSC मार्फत होणाऱ्या काही परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत शिवाय सरळसेवा अंतर्गत काही परीक्षाही जाहीर झालेल्या आहेत त्यातच राज्यभरातून नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नव्यानेच तयारी करण्यासाठी पुण्यात येण्यासाठी आतुर आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत विद्यार्थी करत असून विद्यार्त्यांच्यात उत्साह संचारला आहे.

MPSC MES FREE COACHING.pdf
1.1 MB
📌 मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:
🏆 MPSC-MES ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र शासनाच्या 'सारथी' या संस्थेतर्फे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी- मराठा समाजातील इंजिनिअरिंगच्या पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
आयोजित 'महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा' (MPSC-MES) या स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता नामवंत 'क्लास-कोचिंग' विनामूल्य उपलब्ध होणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. कृपया प्रशासन सेवेत आपले करियर करू इच्छिणाऱ्या मराठा समाजातील ध्येयवादी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हि माहिती जरूर पोहचवा.
➡️ कोचिंग :
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा
➡️ Online अर्ज करण्यासाठी लिंक :
कोचिंग करीता प्रायोजित होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
http://surl.li/acbuu
➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2021
➡️ अधिक माहिती साठी सारथीच्या संकेत स्थळाला भेट द्या
http://sarthi-maharashtragov.in/