LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
*टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या*

LetsUpp | Bulletin
● आर्यन खानची तुरुंगातून सुटका; अखेर २६ दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला; क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती
● समीर वानखेडेंना अटकेच्या तीन दिवस आधी नोटीस द्या; राज्य सरकारला न्यायालयाचा आदेश; समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा
● नवाब मलिकांचा मोठा आरोप, पार्टीचा आयोजक वानखेडेंचा मित्र! त्याला अटक का केली नाही? कॉर्डिलियावरची पार्टी एफ टीव्हीचे इंडिया हेड काशिफ खान यांनी आयोजित केली होती
● दौंड, जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मामेभावाच्या घरी ईडीची धाड; साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केला
● केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, येत्या आठ दिवसात आक्रमक होणार : राजू शेट्टी
● तब्बल १२ वर्षानंतर कार्तिकीच्या घोडेबाजारात दर्जेदार अश्व दाखल; प्रशासनाच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष
● संवेदनशील माहिती फडणवीसांनी नाही, तर नवाब मलिक आणि आव्हाडांनी उघड केली; रश्मी शुक्लांचा दावा
● अभ्यास करणं आमचं काम नाही, तसं असतं तर राजकारणात आलोच नसतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे;
● 'पुढील अनेक दशकं BJP भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असेल' प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
● सेन्सेक्स कोसळला, निफ्टीच्याही गटांगळ्या! मुंबई शेअर बाजारात सहा महिन्यातली सर्वात मोठी घसरण

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/FPfuO7VOIkb
*टॉप 10 हेडलाईन्स! संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या*

LetsUpp | Bulletin
● बॉम्ब फोडा, आवाज येऊ द्यात; नुसता धूर काढू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोमणा
● देगलूर विधानसभा पोटनिवडणूक : काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला
● मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी; देशमुखांची दिवाळी तुरुंगात जाणार
● दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी
● मुंबईत NCB ची पुन्हा मोठी कारवाई, मुंबईतील विलेपार्ले या भागातून जप्त केले कोट्यवधींचे हेरॉइन
● राज्यातील 75 टक्के शाळा सौरऊर्जेवर; सोलरच्या दरात वाढ झाल्याने उपक्रमावर होणार परिणाम
● मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक’ करणार; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची घोषणा
● महावितरणाकडून शेतकऱ्यांना मोठा शॉक, आता 10 तासांची लाईट फक्त आठ तास मिळणार!
● हिमाचलमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला झटका, चारही जागांवर काँग्रेस विजयी, तर भाजपचा दणदणीत पराभव
● काबूल पुन्हा एकदा आत्मघातकी स्फोट आणि गोळीबारानं थरारलं, यामध्ये जीवितहानी झाली किंवा नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही.

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/ahhJvZN6Qkb
*जिल्हा रुग्णालय अग्नितांडव; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा निलंबित*

*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/nk6dpkql1kb
मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जण जखमी

LetsUpp | Mumbai
⚡ मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक मजली घर कोसळल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
👉 सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून मदत व बचावकार्य सुरू आहे.
🗣️ आतापर्यंत सात जणांची सुटका करण्यात आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं आसपासच्या रहिवाशांमध्येही घबराट पसरली आहे.
📍 दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळं घडली हे कळू शकलेलं नाही. अँटॉप हिल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/wfcqTBkj2kb
टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या

LetsUpp | Bulletin
● कोरोना, महागाईनं याआधीच सर्वसामान्यांचे हाल झालेले असताना आता रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणं देखील महागणार
● पुण्यातील पिसोळीच्या फर्निचर गोदामाला भीषण आग; ३ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
● पीयूसी नसेल तर होऊ शकतो १० हजारांचा दंड; वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन वाहनांसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी
● १९९३ मुंबई बाँबस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचा मलिकांवर गंभीर आरोप
● मुंबईत हालचाली वाढल्या, शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक; तर्क-वितर्कांना उधाण!
● २६६ दिवसांनंतर देशात करोनाच्या सर्वात कमी रुग्णांची नोंद; गेल्या २४ तासांत १०,१२६ नविन बाधित
● ‘अनलॉक’नंतर महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ; दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच!
● उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपाच्या मदतीसाठी आरएसएस मैदानात; संपूर्ण राज्यात काढणार तिरंगा यात्रा
● कोळसा साठ्यात मोठी वाढ; वीज कपातीचे संकट टळले, काही उद्योगांना करावा लागतोय टंचाईचा सामना
● तमिळनाडूत मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांत चार जणांचा मृत्यू ओढवला असून ६० हून अधिक घरांचे नुकसान झाल्याची माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/kIwa89Rr2kb