मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
9.48K subscribers
65 photos
35 videos
14 files
86 links
मराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके

इतर अपडेट्स

Promotion: @dappu
Download Telegram
मुंबई झोन मध्ये GST विभागात थेट इन्स्पेक्टर म्हणून भरती झालेली लिस्ट बघा.
ह्यात ३९७ पैकी जेमतेम १० मराठी नावे आहेत...आणि ही टक्केवारीसुध्दा गेल्या दहा वर्षांतील सर्वोत्तम असावी इतकी वाईट अवस्था आहे..

ह्यात केवळ मीणा आडनावाची किंवा अभिषेक नावाची मुलेसुध्दा एकूण मराठी मुलांपेक्षा जास्त आहेत !

काय परिस्थिती आहे बघा ही आपल्या मुंबईमध्ये..
ह्याकडे कोणाचेही लक्ष नाही, नेते शेण खाण्यात व्यस्त आहेत, जनता मंदिरात खुश आहे आणि तरुणाई आरक्षणाच्या मृगजळ मागे धावतेय..

कसला मराठी बाणा आणि कसले काय..!

अत्यंत वेदनादायक चित्र आहे....!!
👍34🤯6🔥2⚡1👏1
वर्धा वरुन नागपुरला येतांनी ट्रँवल्समध्ये माझ्या सिटवर एक मुलगी बसलिय, दिसायला लै भारी होती ,ब्लँक जिन्स अन् ग्रिन कलरचं स्टाँप-टि शर्ट तिनं घातलं होतं ,तिच्या खांद्यावर शोभेल असं रंगिबिरंगी स्काँर्फ पण होतं.ती बिनधास्त अन् मन मोकळं बोलायची .मी आपला बुध्दू खिडकिला डोकं ठेकून गार वारा घेत तिचं नुसतं ऐकत बसायचो..

लोकं टकमक बघायचे आम्हाला का तर ? ती मला चिपकूनच इतकी बसली होती कि, जसं काही मि तिचा बॉयफ्रेंड वगैरे असावा.माझ्या तर अंगाचे नुसते काटेच उभे व्हायचे , मला वेगळच फिल होत- होतं, असं वाटायचं कि- ती आता मला खाते कि काय?...

तिने मला हसत-हसत विचारलंय कि, तू परफ्युम-बाडी स्प्रे कुठलं वापरतेय,,? मला कसंतरी वाटलं ,कारण- पहिल्यांदाच एखादी मुलगी असं विचारतेय,
मी एकदम निःशब्द झालोय... ती मात्र तिचा स्टाँप येई पर्यंत माझी अन् माझ्या परफ्युमची तारिफ करणं विसरली नाही...
उतरतांनी एक गोड स्माईल, डोळे उंचावत नजरेचा इशारा,अन् हात हलवित बाँय म्हणून गोड आवाज देऊन गेली. त्याचवेळी दिल खल्लास झालाय

च्या मायला तिला मी आवडलोय कि, माझा तो परफ्युम / बाँडी स्प्रे मला कळेनासं झालंय? 😔😔😔

#_ट्रँवल्समधल्या_गोष्टी_

#_premdip_🌿🍂❣️
👍18🔥5👌3❤1🤯1
गेला एक महिना प्रतिपश्चंद्र हे पुस्तक कुठेच उपलब्ध नव्हते. मी मुद्दामच वेळ लावला कारण याआधीच्या सगळ्या प्रती संपणं आवश्यक होतं... आणि संपल्याही!
आजपासून 'एलोरा पब्लिकेशन्स' कडून छापलेलं प्रतिपश्चंद्र सगळीकडे उपलब्ध होत आहे!
अजूनही या पुस्तकाच्या पायरेटेड कॉपी रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर दिसतातच. लोगो बदललेला आहे, कृपया बघून पुस्तक घेतलं तर फसवणूक होणार नाही.
किंमत चार वर्षापूर्वी होती आजही तीच आहे. वाचक ३९० रुपये मोजतात म्हणून तेवढा दर्जा सांभाळूनच पुस्तक छापलेलं आहे.

(मधल्या काळात पुस्तक विक्रेते, डिस्ट्रिब्युटर्स यांचे पुस्तकांसाठी फोन यायचे, त्या सर्वांना कळावे म्हणून ही पोस्ट.)

आणखी एक गोष्ट इथे सांगावी वाटतेय की, प्रतिपश्चंद्र लवकरच हिंदी भाषेत छापून येत आहे... काम अंतिम टप्प्यात आहे. आपल्याच चौकटी तोडून कक्षा मोठ्या करूयात... महाराष्ट्रातील वाचक सोबत आहेच आता भारतभरातील वाचक जोडूयात 😍😍

केदारनाथ आणि प्रतिपश्चंद्र या दोन्ही पुस्तकांसाठी संपर्क...
एलोरा पब्लिकेशन्स: 9209846299

- Dr Prakash Koyade
👍7👏3❤2🙏1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
नांदेडच्या सीईओ मीनल मॅडम, परराज्यातील असूनही किती स्पष्ट आणि अचूक मराठी मधून बोलत आहेत, टॅलेंट म्हणावे ते हेच.
स्पर्धा परीक्षा देत असाल तर नक्की बघा.

मराठी राज्यात जन्म घेणाऱ्यांनी, ज्यांना अधूनमधून हिंदीचे झटके येतात त्यांनी ह्यावरुन तरी काही धडा नक्कीच घ्यायला पाहिजेत.

सर्वांना शेअर करा 🙏🙏
❤11👏2🙏2👌2👍1
एकटेच हसणारे,
एकतर.....


प्रेमात पडलेले असतात....,,


किंवा


डोक्यावर पडलेले असतात.....


नाहीतर


या आपल्या चॅनल चे सदस्य तरी असतात!!

😝😜😨🤪😜😬😄
👍17
Golden Hours
ही पोस्ट आपल्या प्रत्येकासाठी फार महत्त्वाची आहे...वाचा!

चार दिवसांपूर्वी रात्री अपघात झालेले दोन तरूण आले, अगदी शेवटच्या परिस्थितीत! इंटर्नने सांगितले की, एक महाराज त्यांच्या सोबत आहेत. जाऊन बघितलं तर रक्तानं भरलेले दोन पोरं स्टेचरवर पडून होते. एक बेशुद्ध तर दुसरा थोडी हालचाल करत होता पण डोक्यातून रक्त भळभळत होतं. बाजूला आमचे जुने मित्र, वारकरी सचिन पवार उभे होते. नेमकंच किर्तन करून परत आल्याचं अंगावरील वेशभूषेवरून कळत होतं.
चार वर्षांनंतर आमची अशा परिस्थितीत भेट झाली होती. एका बाजूला ते वारकरी, समोर मी डॉक्टर... आणि दोघांच्या मध्ये ते दोन गंभीर तरूण! त्या दोघांना ते अपघात स्थळावरून उचलून घेऊन आले होते!
अपघात विभागात काम करत असताना एक डॉक्टर म्हणून मला सर्वात जास्त आदर जर कोणाबद्दल वाटत असेल तर तो म्हणजे, जे लोक अपघातात जखमी झालेल्या लोकांना दवाखान्यात घेऊन येतात! ते खरेखुरे हिरो असतात!
आपल्या प्रत्येकाच्या जवळच्या-दूरच्या कुटुंबात, ओळखीत किमान‌ एकतरी व्यक्ती अपघातात कधीतरी गेलेली असते. अपघातात जागेवरच मृत्यू झाला तर कोणाच्याच हाती काही राहात नाही पण काही जणांना दुसरी संधी मिळते! अपघात आणि दवाखाना यांच्यामध्ये असणारी ती संधी म्हणजे 'वेळ'!
सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती वाचूनच हे लिहीतोय की, गेल्या दहा वर्षांत भारतात १३ लाखांपेक्षा जास्त लोकांचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झालेला आहे. यांपैकी ५० टक्के मृत्यू कदाचित झाले नसते जर त्यांना योग्य वेळेत दवाखाना आणि उपचार मिळाले असते! उगाच त्या काळाला 'Golden Hours' म्हणत नाहीत!
अपघातानंतरचा एकेक क्षण म्हत्वाचा असतो. दुर्दैवाने अशा रुग्णांची मदत करण्याबद्दल आपल्याकडे प्रचंड अनास्था आहे. स्वतःलाच विचारून बघा की, कधी अपघात झाला आहे आणि आपण जवळ जाऊन अपघातग्रस्ताची कधी मदत केलीय? एखादाच कोणीतरी 'हिरो' असतो जो पुढे येत अपघातग्रस्तांना दवाखान्यात घेऊन येतो.
एक सहज निरीक्षण असं की, आपण फार स्वतःला मोठं वगैरे समजून ज्यांना छोटं समजतो ते ऑटोवाले, पान टपरीवाले, पंक्चरवाले, हातगाडी चालवणारे, मजूर, छोटे दुकानदार ज्यांच्या आसपास अपघात झाला आहे ते लोक गोल्डन आवरमध्ये पेशंटला घेऊन येतात. अलिशान कारमध्ये एखाद्या अनोळखी अपघातग्रस्ताला कधी कोणी घेऊन आलं असं कधी आठवत नाही!
हे सहज निरीक्षण असलं तरी मी कोणावर आरोप करत नाही. हे सगळं होण्याचं कारण म्हणजे या पाठीमागची भीती! लीगल मॅटरमध्ये, पोलिसांच्या भानगडीत कोण पडणार? उद्या माझं नाव कुठं आलं तर? मी सरकारी नोकरीत आहे, माझं नाव कोणी घेतलं तर नोकरी जायची? कोणी मलाच अपघाताला दोषी ठरवलं तर? यांचे पैसे कोण भरणार?
कधीकधी या गोष्टींच्या भीतीमुळे, खरंतर आपल्या अज्ञानामुळे एखाद्याला मदत करण्याची इच्छा असूनही लोक पाऊल मागे घेतात! या भीतीपोटी लोक रात्री अपरात्री १०८ नंबर ऍम्बुलन्सलासुद्धा फोन करत नाहीत. बघून पटकन निघून जातात, पेशंट तसाच रस्त्यावर तडफडून अंधारात कधीतरी जीव सोडून देतो.
२०१२ मध्ये एक केस दाखल झाली होती त्यावरून सुप्रीम कोर्टाने एक कायदा आणला Good Samaritan Law, ज्यामध्ये अपघातात मदत करणाऱ्या व्यक्तीला पूर्ण सुरक्षा दिलेली आहे. जास्त टेक्निकल गोष्टी सांगून अवघड शब्दात न अडकता त्या कायद्यातील काही फार महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत सांगतो...

कोणतीही रस्त्यावरून जाणारी व्यक्ती किंवा प्रत्यक्षदर्शी अपघातग्रस्त रुग्णाला जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊ शकते.
ती व्यक्ती रुग्णाला ऍडमिट केल्यानंतर दवाखान्यातून ताबडतोब निघून जाऊ शकते तसेच त्याची वयक्तिक माहिती सांगण्यासाठी त्याला कोणीही जबरदस्ती करू शकत नाही.
अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्या त्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही.
त्या व्यक्तीकडून रुग्णाच्या उपचाराचे पैसे मागता येत नाहीत.
एखाद्या हॉस्पिटलने अशा रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला तर पोलिसांना कळवून योग्य ती कारवाई करता येते.
फोन करून जर पोलिस किंवा कंट्रोल रुमला कोणी अपघाताबद्दल कळवलं तर त्या व्यक्तीची माहिती गुप्त राहाते, पोलिस ती कुठेही उघड करू शकत नाहीत.
परिस्थितीनुसार पोलिस किंवा दवाखाना प्रशासन मदत करणाऱ्या व्यक्तीला गरज वाटत असेल तर त्याच्या परवानगीने आवश्यक ती माहिती विचारू शकतात.
डॉक्टर, पोलिस त्या व्यक्तीला आदराने वागवतात.
एखाद्या अपघाताच्या घटनेत साक्ष देण्यासाठी पोलिस त्याला बोलावू शकतात पण त्याला साक्ष देण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाहीत.
त्या मदत करणाऱ्या व्यक्तीला योग्य ते बक्षीस राज्य शासन देऊ शकते.
👍22❤1
ज्यांच्या घरातील कोणीतरी अपघातात गेलं आहे त्यांना या वेळेची किंमत किती मोठी असते हे माहीत असतं. एका जरी अपघातग्रस्ताला मदत केली तरी ते एक कुटुंब आपण उध्वस्त होण्यापासून रोखू शकतो.
Sachin Pawar सर त्या दोघांना घेऊन आले. गर्दी जमली होती पण कोणी उचलायला तयार नव्हतं. ताबडतोब ते दोघांना घेऊन आले. अर्धा तास जरी उशीर झाला असता तर तो उशीर फार महाग ठरला असता! एकजण व्हेंटिलेटरवर गेला पण आता ठीक आहे. दुसरा एखाददोन दिवसांत चालायला लागेल... गोल्डन आवर मध्ये आले म्हणून ते वाचले! सरांच्या परवानगीनेच त्यांचं नाव इथे घेतलं आहे.
डॉक्टरांना देव म्हणण्यापेक्षा अशा खऱ्या हिरोंना देवदूत म्हटलं पाहिजे! ही पोस्ट वाचून एक व्यक्ती जरी जागरूक झाली...‌ आपण एका व्यक्तीला जरी दवाखान्यापर्यंत वेळेत घेऊन गेलो... एक व्यक्ती जरी आपल्यामुळे वाचली, एक कुटुंब उध्वस्त होण्यापूर्वीच सावरलं तरी हे लिखाण सार्थक झालं!

मी कधी असं लिहीत नाही पण आज मात्र नक्कीच म्हणतोय की, हा लेख आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहचवा. एक जीव तुम्हीसुद्धा वाचवू शकता! कोणाला सिद्ध करण्यासाठी नाही तर स्वतःसाठी एका अपघातग्रस्ताला मदत करा... यातून मिळणारं मानसिक समाधान तुम्हाला आयुष्यभर सुखानं झोपू देईल!

धन्यवाद 🙏🏼
डॉ. प्रकाश कोयाडे
👍18❤5🙏2🔥1
वर्ल्ड रेकॉर्ड 🙏 💐 🚩
🙏16👍5❤2
अशी ही बनवाबनवी

कोणीतरी एक भला माणूस आहे जो लोकांना हे सांगून फसवतोय की, त्याच्याकडे प्रतिप्रश्चंद्र या कादंबरीचा दुसरा भाग आहे. पठ्ठ्याने चार- पाच लोकांकडून भाग दोनचे पैसे घेतल्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आले आहेत.
(9307693*** सचिन सावंत/ विजय आसोलकर/ रोहित चाळके/ बोर्डे अशी वेगवेगळी नावं सांगून फसवणूक सुरू आहे. तरुण पोरगा आहे, मराठी आहे, एखाद्याचं नुकसान नको म्हणून म्हणून पूर्ण नंबर सध्या तरी नाही टाकत.)

त्याची पद्धत फार सोपी आहे. आमच्या फेसबुक पेज वरून मोबाईल नंबर घ्यायचे, पुस्तक पाठवतो म्हणून पैसे घ्यायचे आणि मोबाईल नंबर ब्लॉग करायचा.‌ उत्तरेकडच्या फ्रॉड करण्याच्या पद्धती महाराष्ट्रात सहज घुसल्या आहेत.

ही काही पहिली वेळ नाही माझ्या पुस्तकाबाबत अशा गोष्टी घडायची त्यामुळे कसं हॅण्डल करायचं ते माहीत आहे.
आता टेन्शन या गोष्टीचं नाही की तो फसवणूक करतोय, या गोष्टीचं आहे की, त्याच्यामुळे मला दुसरा भाग लिहावा लागतो की काय?
आधी लिहू तर द्या... मग फ्रॉड करा🙏🏼

महत्त्वाची टीप: मी स्वतः त्याच्याशी एक वाचक म्हणून फोनवर बोललो तर म्हणे, सर 'प्रतिपश्चंद्र पार्ट २' तीन ते चार दिवसांत घरपोच येईल कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे😅😅

डॉ. प्रकाश कोयाडे

टीप: प्रतिपश्चंद्र पार्ट २ अजून खुद्द लेखकांनीच लिहिलेला नाही किंवा तशी काही घोषणाही नाही, अश्या भामट्यापासून सावध रहा
👍14😱4🔥3🤯2
तुम्हाला आणखी कोणकोणत्या विषयावरील अपडेट्स इथे टाकलेले आवडतील आम्हाला कमेंट्स मधे कळवा.

आम्ही मराठी साहित्य विश्वातील जास्तीत जास्त अपडेट्स टाकायचा प्रयत्न चालूच ठेवू.

तुमच्या आवडत्या साहित्यिक लोकांची नावे द्या जेणेकरून त्यांचीही अपडेट्स आम्हाला इथे टाकता येईल.
❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रचना रानडे ह्यांचे एक अतिशय महत्वाचे अपडेट, पूर्ण बघा आणि नक्कीच सर्वांसोबत शेअर करा
👍8