मराठी व्हिजन (Marathi Vision)
779 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
5_6192764265787557328.pdf
138.8 KB
▫️ 7231 पोलीस शिपाई पदांची भरती लवकरच सुरु होणार.

▫️ पोलीस भरतीची लेखी परीक्षा जिल्ह्यानुसार ऑफलाईन (OMR) होणार.

▫️ 28 जून 2022 चे परिपत्रक GR.

अधिक महितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
https://shetkaribrand.com/police-bharti-maharashtra-2022-new-update/
5_6192557128104805797.pdf
872.4 KB
वैयक्तिक लाभाच्या योजनापात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना GR 👆
5_6192557128104805801.pdf
401.5 KB
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (अनुसूचित जमाती उपयोजना) अंतर्गत सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सन 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षाकरिताच्या उद्दिष्टांकरिता केंद्र शासनाच्या हिश्याचा पहिल्या हप्त्याचा 25 टक्के निधी रू. 338,92,71,000- व राज्य शासनाच्या हिश्याचा निधी रू. 225,95,14,000- वितरीत करणेबाबत GR 👆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📡 मॉर्निंग न्यूज अपडेट | ०१ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▫️ मुख्यमंत्री शिंदेच्या शपथविधीचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण होते , पण माजी मुख्यमंत्र्यांनी सोहळ्यापासून दूर राहणायचे ठरवले.

▫️ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले - दरम्यान यांना शनिवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार.

▫️ अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्याचा झाला - शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची प्रतिक्रिया.

▫️ कॉटनच्या किमतीत 20 टक्के घसरण झाल्यामुळे - रेडिमेड कपडे स्वस्त होणार असा अंदाज वरिष्ठाकडून लावण्यात येत आहे.

▫️ शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस आली - आता 2004 ते 20 पर्यंतची लोकसभा-राज्यसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रे रडारवर.

▫️ पुढच्या 48 तासांत कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा - सविस्तर हवामान अपडेट - आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌾
▫️आज पासून शासनाने सर्व प्रकारच्या प्लास्टिक वापरावर कायद्याने बंदी घातली आहे, पर्यावरणाला घातक ठरलेल्या आणि मनुष्य, प्राणी, पशु , पक्षी, निसर्ग यासर्वांच्या आरोग्याला घातक असलेल्या या प्लॅस्टिकला आपणही हद्दपार करूया, शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करून आपणही आपला खारीचा वाटा उचलूया.

▫️ यापुढे बाहेर खरेदीसाठी जाताना घरातील कापडी, सुती पिशवी घेऊनच बाहेर जाऊया आणि वस्तू घेताना प्लास्टिक पिशवी, कॅरी बॅग यांना विरोध करूया आणि शासनाच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यास आपण सर्व मदत करूया.

▫️ एक सुज्ञान नागरिक म्हणून पर्यावरण वाचविण्यास आपणही हातभार लावूया आणि जगाचा निरोप घेण्याअगोदर आपल्या भावी पिढीला एक प्रदूषण मुक्त पर्यावरणाची भेट देऊन जाऊया.
👍1
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर नक्की क्लिक करा 👇
https://shetkaribrand.com/pradhan-mantri-matsya-sampada-yojana-in-marathi/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📡 मॉर्निंग न्यूज अपडेट | ०२ जुलै २०२२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

▫️ रेल्वेतील आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वेत गॅस वापरास बंदी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला - प्रशासनाने याबाबतचे आदेश दिलेत.

▫️ इंधनावरील निर्यात शुल्क वाढल्याने - रिलायन्स इंडस्ट्रीजला शुक्रवारी मोठा फटका - शेअर 8.7 टक्क्यांनी घसरले तर 1.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

▫️ मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली - उध्दव ठाकरे यांनी याबाबतचे पत्र जारी केले.

▫️ उद्धव ठाकरें पत्रकार परिषद मध्ये म्हणाले- हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही, शहांनी शब्द पाळला असता तर हे सर्व सन्मानाने झालं असतं!

▫️ संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 18 जुलैपासून सुरुवात, लोकसभा सचिवालायाने प्रसिद्धीपत्रक जारी करत ,अधिवेशनाची तारीख केली जाहीर.

▫️ सोने पुन्हा महागणार , बेसिक कस्टम ड्युटी 10.75% वरून 15% पर्यंत वाढली - यामुळे सोन्याच्या दरात कितीने वाढ होणार - ते आपण पुढील मॅसेज मध्ये जाणून घेऊ.


-----------------------------------------------------------------------------
अशीच महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चैनल जॉईन करा 👇
https://telegram.me/marathi_updates
-----------------------------------------------------------------------------
👍1
202207011732453801.pdf
2.3 MB
🌾 पीकविमा योजना 2022-23 करिता नवीन शासन निर्णय.

🔰 अर्ज भरणे लवकरच सुरू होईल...

❗Update देण्यात येईल.❗
5_6197124817234167444.pdf
729.8 KB
आपले सरकार सेवा केंद्र निवड यादी वर्धा जिल्हा 👆
खरीप हंगामातील पीक विमा तारीख शासनाने जाहीर केली. अंतिम मुदत ही घोषित केली. शेतकऱ्यांना मोठा आधार ठरत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजने (PMFBY) बाबतीत शासनाचा खरीप हंगाम २०२२ चा निर्णय जाहीर करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा वेळेत भरता यावा म्हणून आज कृषी दिनाचे औचित्य साधून अंतीम मुदत जाहीर करण्यात आली. पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै २०२२ ही शेवटची तारीख आहे. या तारखे नुसार शेतकऱ्यांकडे पिकांचा विमा उतरविण्यासाठी ३० दिवसांची वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसांची वाट न पाहाता सर्व्हर सुरू झाले की पीक विमा भरून घ्यावा. जेणे करून शेवटी सर्व्हर डाऊन, लोडवर चालतो या समस्या जाणवतात. यामुळे शेतकऱ्यांनी त्या अगोदर आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

घरबसल्या आपल्या मोबाईलवरून, लॅपटॉपवरून, कॉम्प्युटरवरून पीकविमा कश्याप्रकारे भरावा यासंदर्भात लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल

सूचना: शेतकरी मित्रांनो, तुम्हाला स्वतः पिकविमा भरते वेळेस अडचणी येत असतील, तर कृपया स्वतः पिकविमा भरण्याचा प्रयत्न करू नका, त्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचा पिक विमा भरून घेऊ शकता.
IMG_20220704_071214_147.jpg
107.8 KB
आयटीआर ( ITR ) भरत असेल तर हे नक्की वाचा...👆