मराठी व्हिजन (Marathi Vision)
780 subscribers
626 photos
3 videos
642 files
657 links
मराठीमध्ये सर्व नवीन अपडेट्स जसे शेतकरी योजना,आपले सरकार ,शासन निर्णय ,ऑनलाईन फॉर्म भरणे,बँक अपडेट्स इत्यादी.
#marathi_updates
#online_form
#sarkari_yojana
#bank_updates
#government_gr

🌐 website : https://maharashtraschemes.com
Download Telegram
राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबीयांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आली. या सवलतीसाठी पात्र उमेदवारांनी https://mahatet.in/ वरील माजी सैनिक आरक्षणांतर्गत १० ऑगस्ट पर्यंत आवश्यक बदल करावेत- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आवाहन
अकरावी प्रवेश प्रक्रिया , पहिली गुणवत्ता यादी आज लागणार
गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत योजना 👆
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार अनुदान अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://shetkaribrand.com/regular-karj-mafi-yojana-maharashtra/
👍1
सर्वांना नमस्कार,

ई पिक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन 2 आपण गुगल प्लेस्टोरवर शुक्रवारी रात्री टाकले आहे, तथापि अद्याप गुगलकडून त्याला मान्यता दिली गेली नसल्याने सद्यस्थितीत गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येत नाही. शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे कदाचित ही अडचण निर्माण झालेली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत हे ॲप गुगल प्लेस्टोअरवर कार्यान्वित होईल. तथापि जमाबंदी आयुक्त महोदयांनी बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे ई-पिक पाहणी ०१ ऑगस्ट पासून सुरू करण्याची असल्याने ई पिक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन 2 ची लिंक epeek.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. उद्या महसूल दिनानिमित्त या ॲपचा शुभारंभ करण्यासाठी आपण या लिंकवरून ई पिक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून वापरू शकता.

लिंक. 👇🏻

https://epeek.mahabhumi.gov.in/pun/android_app/app-release_1.apk

👆🏻या लिंकवरून देखील आपण मोबाईल ॲप व्हर्जन 2 डाउनलोड करू शकता. हे ॲप डाऊनलोड होण्यासाठी अगोदरचे पिक पाहण्याचे ॲप मोबाईलमधून डिलीट करणे आवश्यक आहे.

हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर कार्यान्वित झाल्यावर सर्वांना त्याबाबत अवगत केले जाईल. धन्यवाद

सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी करावी ही विनंती.

टीम ई-पीक पाहणी
👍1
Mahajyoti MPSC CET 2023 Result (Merit List).pdf
2.5 MB
Mahajyoti MPSC CET 2023 Result 👇

RESULT OF ENTRANCE TEST CONDUCTED FOR MPSC TRAINING 2022-23 (AS PER MERIT)
Cabinet Descision_Dt.03-08-2022.pdf
114.1 KB
मंत्रीमंडळ निर्णय 3 ऑगस्ट २०२२ ( एकूण १० निर्णय ) 👆
महाप्रितकडून सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन 👇

▫️ निर्धुर चूलीचे मोफत वाटप महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) कडून राज्यात करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील पात्र रहिवाशांनी मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करण्याचे आवाहन महाप्रितने केले आहे.

▫️ पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूल मोफत वाटपासाठी निकष योग्य पात्र रहिवाश्यांनी अर्ज करावेत.

▫️ रहिवाशी अनुसूचित जातीचा असावा, गरिबी रेषेखाली असावा आणि एलपीजी गॅस कनेक्शन नसावे.

▫️ सर्व जिल्ह्यातील इच्छूक रहिवाश्यांनी दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हानिहाय RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा.

▫️अधिक माहितीसाठी https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

▫️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :- https://maha-diwa.vercel.app/
👍1
Maharashtra_DV_List3 (1).pdf
200.3 KB
पोस्ट ऑफिस प्रतीक्षा यादी प्रसिद्ध 👆
202208031637020903.pdf
137.1 KB
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजेनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. ०३/०८/२०२२ चा महत्वपूर्ण निर्णय 👆 GR
मिशन_वात्सल्य_या_केंद्र_पुरस्कृत_योजनेच्या_मार्गदर्शक_सुचना_राज्यात.pdf
2.4 MB
मिशन वात्सल्य या केंद्र पुरस्कृत योजनेच्या मार्गदर्शक सुचना राज्यात लागू करण्याबाबत. GR 👆
Media is too big
VIEW IN TELEGRAM
#स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

राज्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरीतिरंगा अभियान साजरे होणार आहे. हे अभियान का राबविले जात आहे?, यात सामील कसे व्हावे?, झेंडा कुठे मिळणार?, तो कसा उभारावा? आणि कोणकोणती काळजी घ्यावी?, याबाबतची माहिती देणारा लघुपट पाहा...👇

#हरघरतिरंगा
🔸 शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कारवाईचे आदेश; 293 उमेदवारावर कारवाई; 7880 उमेदवार परीक्षेतील घोटाळ्यात सहभागी

🔸 शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतिम निकाल 28 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 16705 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी काही उमेदवार गैरप्रकारात समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते.


🔸 पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणातील 293 उमेदवारावर कारवाई (293 Candidate Action) केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2019 (दि. 19 जानेवारी 2020) च्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यानुसार आता गैरप्रकारामध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांची निवड रद्द (Selection Cancel) करण व शास्ती करणेबाबत. 2019-2020 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील गैरव्यवहारामात सायबर स्टेशन पुण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

🔸 त्यानुसार त्याच्या तपासादरम्यान परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता 7880 उमेदवार परीक्षेतील गैरप्रकारात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच परीक्षार्थी परीक्षेला बसूनही त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

🔸 काही उमेदवार गैरप्रकारात सहभागी
शिक्षक पात्रता परीक्षा 2019 चा अंतिम निकाल 28 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 16705 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी काही उमेदवार गैरप्रकारात समाविष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते.

🔸ब नावट प्रमाणपत्र प्राप्त
293 उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे तर उर्वरित 87 उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.

🔸 निश्चित केलेले आदेश
गैरप्रकारमध्ये सहभागी असलेले परीक्षार्थींच्या विरुद्ध परीक्षा परिषदेने निश्चित केलेली आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mahatet.in या स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. शिक्षण खात्याच्या कारवाईमुळे अनेक जणांवर या कारवाईचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंधरा जिल्ह्यातील १०० टक्के शेतकऱ्यांचा पिक विम्यावर विश्वास 👆🏻
2022072886.pdf
692.8 KB
प्रेस नोट : आपले सरकार सेवा केंद्र वर्धा
2022072866.pdf
1.2 MB
Re-Advertisement- Regarding filling up the vacancies of Anganwadi Sevika/Helper (Female Candidate). Amravati District
2022080162.pdf
167 KB
District Skill Development, Employment and Entrepreneurship, Guidance Center Akola.
“Pandit Deendayal Upadhyay Job Fair”
202208041556221601.pdf
149.8 KB
राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी माहे जून ते ऑगस्ट 2022 करिता रु. 84 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.....GR