मराठी व्याकरण IMP
53.5K subscribers
2.39K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
"अपचळ " या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.
Anonymous Quiz
7%
प्रचंड धावणारे
15%
पळ काढणारे
58%
न पकडता येणारे
20%
चपळ नसलेले
❤7
Q. गैरहजर' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
53%
अनुपस्थित
17%
उपस्थित
12%
हजर
17%
अनुउपस्थित
❤6🤔1
'अश्व' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
10%
वाजी
29%
वारू
36%
धव
24%
तुरुंग
❤5🥰1
'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा.
Anonymous Quiz
65%
मिलिंद
17%
मृगेंद्र
13%
समीरण
5%
भानू
❤6
पुणे_जिल्हा_मध्यवर्ती_शिपाई_२०२६.pdf
203.4 KB
♦️आज झालेला जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई २०२६ चा पेपर..
❤3
खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडा.
मनात घर करणे -
Anonymous Quiz
6%
राग येईल असे बोलणे
4%
राग येणे
81%
मनात कायमचे राहणे
9%
मनाप्रमाणे वागणे
❤6
कीर्तिलता हा अप्रभंश भाषेतील ग्रंथ लिहिला ?
Anonymous Quiz
10%
जयवल्लभ
49%
विद्यापती
36%
पुष्पदंत
5%
उद्योतन सुरी
❤11
दिगंतर’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधीविग्रह ओळखा.
Anonymous Quiz
56%
दिक + अंतर
28%
दिक + गंतर
6%
दि + अंतर
10%
दिग + अंतर
❤8
कोणत्या कवीने ' गझल ' हा प्रकार मराठीत रूढ केला ?
Anonymous Quiz
6%
शांताराम नांदगावकर
14%
महात्मा जोतिबा फुले
74%
सुरेश भट्ट
5%
जगदीश खेबुडकर
❤9👎3
🔹मराठी व्याकरण - भाषेतील रस

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !
❤15
🔖भरतीला वारंवार विचारलेले समानार्थी शब्द 📚

1) आनंद = हर्ष, मोद, संतोष
2) दिवस = वार, वासर, अहन
3) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण
4) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन
5) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
6) पान = पर्ण, पत्र, पल्लव
7) नदी = सरिता, तटिनी, तरंगिणी
8) अंगण = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
9) तोंड = आनन, मुख, वदन
10) दैत्य = दानव, राक्षस, असुर
❤9
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
3%
उंटनी
4%
उनटीन
89%
सांडणी
4%
सर्वच बरोबर
❤9
परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा
Anonymous Quiz
8%
स्वार्थ
12%
आज्ञार्थ
74%
विध्यर्थ
6%
संकेतार्थ
❤7
Forwarded from combine_expres
♦️Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding interviews (Phase 4)

जॉईन https://t.me/combine_expres
🔴दिनांक २६/०४/२०२६ रोजी 'शिपाई/हमल/फराश' पदासाठीच्या चाळणी परीक्षेला बसलेले खालील उमेदवार परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळले. त्यामुळे, माननीय समितीने असा आदेश दिला आहे की, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान आसन आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठांद्वारे, तसेच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयांद्वारे सुरू असलेल्या किंवा भविष्यात सुरू होणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेत भाग घेण्यास खाली नमूद केलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात येत आहे.

एक चूक पूर्ण भविष्य उध्वस्त करून जाते.
त्यामुळे अश्या चुका कधीच करू नका. 🙏

📱 https://t.me/Ganitonline
🔘शिपाई पदाचा प्रश्नपत्रिका मधील एक प्रश्न डिलीट केला होता त्याचा मार्क कोणालाही दिलेला दिसत नाही. 29 पैकी निकाल लावला पहिल्या बॅच चा.. दुसरी बॅच 30 पैकी.