⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.6K subscribers
11.3K photos
210 videos
7.28K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Anonymous Quiz
65%
पौरुषत्व
25%
श्रीमंत
7%
सोमवार
3%
पाटील
👍4
साखर (कारखाना) या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे?
Anonymous Quiz
4%
कारखान्याने
23%
कारखान्यासाठी
62%
कारखान्यामुळे
11%
कारखान्यात
🥰1😁1
⭕️💠संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द💠⭕️


● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️❇️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द❇️⭕️

● उपयोगी x निरुपयोगी
● उत्कर्ष x अपकर्ष
● उचित x अनुचित
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य
● समता x विषमता
● सफल x निष्फल
● शोक x आनंद
● पौर्वात्य x पाश्चिमात्य
● विधवा x सधवा
● अज्ञान x सज्ञान
● पोक्त x अल्लड
● लायक x नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव x निर्जीव
● सगुण x निर्गुण
● साक्षर x निरक्षर
● प्रकट x अप्रकट
● नफा x तोटा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️⚜संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⚜⭕️

1) ‘निर्वासित’ या शब्दाचा अर्थ लिहा.

1) परदेशात राहणारा 2) देश सोडून गेलेला
3) घरादारासय व देशास पारखा झालेला 4) देशात राहणारा

उत्तर :- 3

2) शुध्द शब्द ओळखा.

1) शरदचंद्र 2) शारिरीक 3) शारीरीय 4) शारदिय

उत्तर :- 3

3) ‘ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे ?

1) संयुक्त 2) –हस्व 3) दीर्घ 4) स्वरादी

उत्तर :- 3

4) ‘पुनस् + स्थापन’ हा शब्द कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?

1) पुर्नस्थापना 2) पुन:स्थापना 3) पुनर्स्थापना 4) पुनर्रस्थापना

उत्तर :- 2

5) खालील विधाने पहा :

अ) सामान्यनामांची अनेक वचने होत नाहीत. ब) विशेषनामांची अनेकवचने होतात.
पर्यायी उत्तरांतून योग्य पर्यायी उत्तर सांगा.

1) फक्त अ बरोबर 2) फक्त ब बरोबर 3) अ व ब बरोबर 4) अ व ब चूक

उत्तर :- 4

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
महाराष्ट्र_जमीन_महसूल_संहिता_नोट्स.pdf
4.8 MB
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सन_2021_पोलीस_शिपाई_चालक_भरतीमध्ये_अंतिम_निवड_यादी_तपासणेबाबत.pdf
1.2 MB
सन - 2021 पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये अंतिम निवड यादी तपासणेबाबत.

दोन जिल्ह्यामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Forwarded from TEAM TB
उन्हाळयात Goa ला जायचं Plan करताय ? ✈MPSC Live बॅचमध्ये नोंदणी करण्यासाठी Best Discounted Price

MPSC Prelim 2023 संपताच Goa फिरून या FREE madhe 🏝

Use code " GETMPSC "
👇👇👇आजच खरीदी करा 👇👇👇- https://link.testbook.com/Rp1797AxNyb
⭕️🔰संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न🔰⭕️

1) नदी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

1) नद 2) नद्या 3) नदी 4) नदू

उत्तर :- 2

2) विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रूपाला ............... म्हणतात.

1) साधित शब्द 2) संयुक्त व्यंजन 3) सामान्यरूप 4) संधी

उत्तर :- 3

3) ‘देवाने’ या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे ?

1) प्रथम 2) व्दितीया 3) तृतीया 4) चतुर्थी

उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणते वाक्य ‍विधानार्थी नव्हे ?

1) मुलांनो, शांतता पाळा 2) मुलांनो, किती गोंधळ घालत आहात
3) मुलांनो, गोंधळ घालू नका 4) मुलांनो थोडे गप्प बसा

उत्तर :- 2

5) केवल वाक्याचे पृथक्करण करा. – शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

1) शरदाच्या चांदण्यात – विधेय विस्तार, गुलमोहर – उद्देश, मोहक – विधानपुरक, दिसतो – क्रियापद
2) शरदाच्या चांदण्यात – उद्देश्य विस्तार, गुलमोहर – विधानपूरक, मोहक – उद्देश, दिसतो -‍ कर्म विस्तार
3) शरदाच्या चांदण्यात – कर्म विस्तार, गुलमोहर – क्रियापद, मोहक – विधानपूरक,दिसतो – क्रियापद

4) शरदाच्या चांदण्यात – उद्देश,
गुलमोहर – विधानपूरक, मोहक – क्रियापद, दिसतो – विधेय

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️🔱संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न🔱⭕️

1) पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘मांजर उंदिर पकडते.’

1) कर्मणी 2) कर्तरी 3) भावे 4) संकर

उत्तर :- 2

2) ‘गजाननाच्या कृपेने कार्यसिध्दी होवो’ – या वाक्यातील सामासिक शब्द कोणता ?

1) गजानन 2) कृपेने 3) कार्यसिध्दी 4) होवो

उत्तर :- 1

3) खालीलपैकी विरामचिन्हांचा योग्य वापर केलेले वाक्य ओळखा.

1) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी, गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”
2) याज्ञवल्क्य म्हणाले : मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून, मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे !
3) याज्ञवलक्य म्हणाले, मैत्रेयी ! गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे ?
4) याज्ञवल्क्य म्हणाले, “मैत्रेयी गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी आता ; वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करणार आहे.”
उत्तर :- 1

4) अलंकार ओळखा.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक I
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
रंगावरून तुजला गणतील काक II
1) अप्रस्तुत प्रशंसा 2) उपमा 3) श्लेष 4) प्रतीप

उत्तर :- 1

5) तत्सम शब्द निवडा.

1) धरती 2) पृथ्वी 3) जमीन 4) धरा

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ ❇️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ❇️⭕️


1) सहज एकदाच येई सांजवेळी II या काव्यातील रस ओळखा.

1) करूण 2) श्रृंगार 3) वीर 4) शांत

उत्तर :- 2

2) खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

वारुणी

1) वायुरूपी 2) तट्टाणी 3) मद्य 4) तरूणी

उत्तर :- 3

3) ‘इत्थंभूत’ या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा.

1) त्रोटक 2) सारखा 3) निराळा 4) समान

उत्तर :- 1

4) म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. – ‘धर्म करता कर्म उभे राहते.’

1) दुस-याचा अनुभव घेऊन चुका टाळाव्यात 2) आपले काम सोडून नको ती चौकशी करणे
3) जे आपल्या येथे आहे तेच सर्व जगात असते 4) चांगले करताना नको ते निष्पन्न होणे

उत्तर :- 4

5) खालील वाक्यप्रकार ओळखा.
‘केवढी उंच इमारत ही ..........!’

1) विधानार्थी 2) उद्गारार्थी 3) होकारार्थी 4) संकेतार्थी

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5
⭕️🟢 संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न 🟢⭕️

1) ‘मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला’ – या वाक्यातील कर्ता ओळखा.

1) मी 2) संकष्टी चतुर्थी 3) चंद्र 4) दिसणे

उत्तर :- 3

2) खालील अधोरेखित शब्दाला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

‘पाणी गटागट पिऊ नकोस’
1) परिणाम दर्शक क्रियाविशेषण अव्यय 2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

3) शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशी विभक्तीप्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा.

1) हे संपूर्ण विधान चूक आहे 2) विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
3) विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे 4) हे संपूर्ण विधान बरोबर आहे

उत्तर :- 2

4) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – ‘आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे ?’

1) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय 2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
3) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

5) उंहू ! या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो.

1) विरोध 2) तिरस्कार 3) शोक 4) यापैकी नाही

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️ 🔰संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न 🔰⭕️

1) ‘सुरेखा चित्र काढत असे’ – काळ ओळखा.

1) साधा भूतकाळ 2) रीती भूतकाळ 3) अपूर्ण भूतकाळ 4) पूर्ण भूतकाळ

उत्तर :- 2

2) ‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

1) भ्रतार 2) सुतारीण 3) लोहार 4) होलार

उत्तर :- 2

3) सोने – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

1) सोन्य 2) सोनं 3) सोने 4) सोनी

उत्तर :- 3

4) पुढील विधाने वाचा.

अ) ईकारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप याकारान्त होते.
ब) ऊ – कारान्त पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते.
क) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ओकारान्तच राहते.

1) अ व ब बरोबर 2) ब व क बरोबर 3) अ बरोबर 4) सर्व बरोबर

उत्तर :- 4

5) कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

1) षष्ठी 2) संबोधन 3) प्रथमा 4) तृतीया

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️ 🔰संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न 🔰⭕️

1) ‘तु फार चतुर आहेस’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

1) आज्ञार्थी 2) उद्गारार्थी 3) विधानार्थी 4) प्रश्नार्थी

उत्तर :- 3

2) ‘विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला.’ या वाक्यातील ‘अंत’ या शब्दाला वाक्य पृथक्करणात .............. म्हणतात.

1) उद्देश्य 2) उद्देश्य विस्तार 3) क्रियापद 4) विधानपूरक

उत्तर :- 1

3) रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा : भावे प्रयोगात क्रियापद नेहमी ............. असते.

1) नपुंसकलिंगी 2) पुल्लिंगी 3) स्त्रीलिंगी 4) अनेकलिंगी

उत्तर :- 1

4) अव्ययीभाव समासात

1) पहिले पद महत्त्वाचे असते 2) दुसरे पद महत्त्वाचे असते
3) दोन्ही पदे महत्त्वाची असतात 4) दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असते

उत्तर :- 1

5) वाक्‍यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर .............. हे विरामचिन्ह वापरतात.

1) पूर्णविराम 2) प्रश्नचिन्ह 3) उद्गारचिन्ह 4) विचारचिन्हविराम

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
भारताचा_भूगोल_प्राकृतिक_compressed.pdf
12.7 MB
#Notes #Geography

भारताचा प्राकृतिक भूगोल 
NCERT Printed Notes

By श्रीकांत जाधव सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous Quiz
3%
कड्यावरून
14%
कड्यावर
23%
कड्याला
60%
कड्या
👍1
'भुंगा' या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा.
Anonymous Quiz
67%
मिलिंद
16%
मृगेंद्र
11%
समीरण
6%
भानू
👍1
येता का आपण शिकारीला?’ वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Anonymous Quiz
8%
शिकारीला
8%
का
80%
आपण
4%
येता
👍2