नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
@natemanache

आयुष्यात दोन गोष्टी तुम्हाला गुलाम बनवतात, एक वेळ आणि दुसरा माणूस.., माणसांचे गुलाम होण्यापेक्षा वेळेचे गुलाम व्हा कारण जर आपण गुलाम होण्याची इतपत वेळच येऊन दिली नाही, तर तुम्ही माणसाचे गुलाम कधीच होणार नाही... 😊
स्वतः ला ओळखा, तुम्ही ही अशी गोष्ट आहे, ज्याची कल्पना कोणच करु शकत नाही... [ तुमच्या मधील - 'मी' म्हणजे = मी हे करू शकतो हा जेव्हा जागा होईल, तेव्हा तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.. ]
❤10
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा✍️..
   पाऊस हा सर्वांसाठीच रोमँटिक नसतो🥹ह्या पावसाने तोंडाला आलेले अनेकांचे उदरनिर्वाहाचा घास तोंडापासून काढून नेला🥲त्यांची स्वप्ने वाहून गेली,घरातील गुरेढोरेही वाहून गेले🥹काय दिवस आले बळीराजावर काय सांगाव काय बोलाव सगळ निशब्दच🥲अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले,लहान मुलांच्या मनात पाण्याची भीती निर्माण झाली,शैक्षणिक साहित्य वाहून गेले..शेतकऱ्याच्या पोरांची परीक्षा तोंडावर येऊन ठेवपल्यात त्याच्या घरात पाणी शिरलंय,त्याने अभ्यास कसा करायचा ते सोडा त्याने कसं जगायचं हा प्रश्न निर्माण झालाय..सगळं होत्याच नव्हतं झालंय देवा,असे नकोस करू रे परमेश्वरा🥲..प्रशासन मदत करण्याचा प्रयत्न करतेच आहे पण आपणही इतरांना शक्य असेल तिथं आधार देऊ शकतो..फुल बनता नाही आले तर फुलांची पाकळी बनता येते..त्यांच्या कुटांबाला आपण जेवण देऊ शकतो,त्यांच्या मुलांचा होईल एवढी शैक्षणिक मदत करू शकतो..आपला काही दिवसाचा पगार त्यांना देऊ शकतो,गाडी असेल तर गरजेचे सामान,औषधे आणु शकतो,त्यांना दवाखान्यात नेहु शकतो..काहीच देता येत नसेल तर आधार देता येतो..देवा बळीराजाला बळ दे,बळीराजा जगाला नेहमी जगवतो आज त्याच्यासमोर जगायचा प्रश्न उभा आहे त्यांना मदत करणेही कर्तव्य आहे,social media द्वारे त्यांच्यापर्यंत आपण माहिती पोहचवू शकतो🙏🏻हे संकट टळू दे..सर्वांचे भले कर👍🏻
........🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Cont-
7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
नकारात्मकतेपासून दूर...🖤
✍️ "माझा मोबाईल दिवसातले 7 व रात्रीतले 7 तास असा एकूण 14तास बंद असतो.. दिवसा 7 तास मोबाईल जवळपास स्विच ऑफच असतो..ते 7 तास मला दिवसातले सर्वात सुंदर तास वाटतात..कारण तो वेळ मला सर्व नकारात्मक गोष्टीपासून दूर घेवून जातो आणि स्वतः साठी व विद्यार्थ्यांसाठी मनसोक्त आपला वेळ खर्च करण्याची संधी देतो.. खरंतर मोबाईल सारख्या साधनापासून काही काळ तरी माणसाने दूर जावं.. कारण मोबाईल जवळ असला की, माणूस स्वतः कडे पण लक्ष देत नाही.. त्यामुळे स्वतः ला विकसित करण्याची संधी आपल्याला मिळतं नाही.. कधी काळ असं वाटतं की ते दिवस खूप सुंदर होते जेव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हता.. कारण मोबाईलने जितकं आपलं आयुष्य सुंदर केलं,तितकीच सोसिअल मीडियाने आपल्या आयुष्यात नकारात्मकता भरली.. त्यामुळे कुठेतरी ह्या नकारात्मकतेपासून काही काळ दूर जाण आवश्यक आहे, जेणेकरून मनाला विश्रांती मिळेल आणि मन पुन्हा ताजेतवाने होईल.."
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लिखाण दी. 26सप्टेंबर 2025
लेख कसा वाटला?याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -8806379959
✍️संपर्क -
@ABCs1432
❤3
Forwarded from B K
"इंकलाब जिंदाबाद"असे स्वातंत्र्यासाठी नारा लावणारे भगतसिंह हे फक्त क्रांतिकारक नसून एक उत्तम लेखक,पुस्तकप्रेमीही होते🇮🇳..त्यांच्या शेवटच्या प्रवासात जेल मध्ये असताना त्यांनी अनेक पुस्तके वाचली,लेखनही केले✍त्यांच्या सारख्या विचारवंतांची आज गरज आहे✍,त्यांचे वर्तमानपत्रातील लेखन ब्रिटिशांना वटणीवर आणणारे होते,मनात जे क्रांतिकारक विचार येतात ते कागदावर आणि लोकाच्या मनावर बिंबवण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला,त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून अनेक क्रांत्या घडल्या✍त्यांच्या आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारे युवक,"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ हैं मेरी कलम,मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनक़लाब लिखा जाता हैं !असे ठाम विचार मांडणारे,स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर क्रांतिकारक,शहीद भगत सिंह यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏जय हिंद,वंदे मातरम्🇮🇳
........🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
👍6
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
अशोक
विजयादशमी...🧡💙
✍️"हजारो वर्षांपूर्वी यांच भारत भूमीवर एक युद्ध लढल्या गेलं,त्या युद्धाच नाव होत कलिंग युद्ध भीषण रक्तपात या युद्धामध्ये झाला.दीड लाख सैन्य कैद करण्यात आलं तर लाखोच्या कत्तली करण्यात आल्या. लाखो मुलांबायकाचा आक्रोश कानात गुंजत होता आणि या महान युद्धाचा नायक होता चक्रवती सम्राट अशोक, सम्राट म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4ही दिशांना ज्याच साम्राज्य असतं त्यालाच सम्राट म्हणतात..आणि भारतासारख्या देशात इतकं विशाल साम्राज्य फक्त एकच होत.. ते म्हणजे मौर्य साम्राज्य त्यामुळे सम्राट ही पदवी फक्त अशोकालाच लागते.. आणि यांच सम्राट अशोकाने आजच्या दिवशी विजयादशमीला बौध्द धम्म स्वीकारला..आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा यांच दिवशी बौध्द धम्म स्वीकारला त्यामुळे बौध्द धर्मात हा खूप महत्वपूर्ण सण आहे.. हिंदू धर्मात सुद्धा राम रावण युद्धातला हा विजय दिवस आहे.. त्यामुळे आजच्या या सुंदर दिवशी समस्त देशवाशियांना विजयादशमी दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!"💙🧡
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा
✍️संपर्क -:
@ABCs1432
❤5👏1
Forwarded from ओम sm शेळके
आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येक लोकांचे स्वप्न असते तरी आपण स्वतःला खूप दुःखी समजत असतो आणि बाहेर जगात काय सुरू आहे हे बघत सुद्धा नाही मुळात आपली ना एक चूक होतं आहे राव आपण ना आपल्यापेक्षा परिस्थितीने चांगल्या असलेल्या लोकांचा विचार करतो माञ खालच्या लोकांकडे बघत पण नाही तुलना करायची असेल समाधानाशीं करा कारण आपण सुखी दिसण्यापेक्षा समाधानी असणं खूप महत्वाच असतं!,,,✍🏻☝🏻💯

एकमन#लेखक
@Ommshelke
👌2❤1👍1
Forwarded from ओम sm शेळके
आपल्या धर्मांमध्ये सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे...
खर तर सण उत्सव यांचे उद्देशच हा आहे आपण आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी वेळ काढावा, तसेच सामाजिक एकता जपल्या जावी...
आनंद घेण्यासोबतच आनंद वाटल्या जावा... या दृष्टीतून आपल्या धर्मांमध्ये प्रत्येक सण हा विशिष्ट कारणाने आपण साजरा करतो..

त्यामध्ये दिवाळी म्हणजे चैतन्याचे स्वरूप म्हणून याचे विशेष महत्व आहे
सुख-समृद्धी वैभवाचे प्रतीक म्हणून आपण  दरवर्षी दिवाळी साजरी करतो
मोठा व्यापारी असो की मोलमजुरी करणारे कामगार असो प्रत्येक जण आपल्या परीने.. आपली दिवाळी ही गोड व्हावी हा प्रयत्न करत असतो....



घडलेल्या घटनेनुसार आपण त्या सणाला महत्त्व देतो त्याचप्रमाणे दिवाळीचे पण विशेष महत्त्व म्हणजे
प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासातून  अयोध्यामद्ये  परत येतात याचा आनंद उत्सव म्हणून दिवाळी हा दिवस साजरा करण्यात येतो ..असा आपण मानतो...
घरोघरी दीप प्रज्वलित करून श्रीरामाचे स्वागत केले होते...
म्हणून आपण दिवाळीच्या लख्ख उजेडामध्ये   महालक्ष्मीच्या पूजन करून सुख समृद्धी धनधान्याची प्रार्थना करतो...

ह्याच परंपरा, प्रत्येक  सणामागच्या गोष्टी  पालकांनी येणाऱ्या पिढीला ही सांगायला हव्या ,जेणेकरून आपल्या समोरच्या पिढीला आपल्या धर्माबद्दल  ओढ ,आदर निर्माण होईल..

आनंद घेण्यासोबतच आनंद इतरांनाही वाटायला लावणारी  दिवाळी साजरी करायला हवी...
दिवाळी सामान अश्या लोकांकडून घ्या  जेणेकरून त्याची दिवाळी ही गोड होईल..
आपले उत्सव साजरे करण्यासोबतच दुसऱ्यांच्या आयुष्याचा उत्साह ही  वाढवूया.
आपले सण, परंपरा येणाऱ्या पिढीसोबत टिकवूया🙏🏻🙏🏻🙏🏻
Komal rane..✍🙂
👏2❤1
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा...महत्वपूर्ण रचना करण्याचा छोटासा प्रयत्न ✍

राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असूनही त्यांनी केला नाही अहंकार
श्वासाचा शेवटच्या क्षणापर्यंत केला भविष्याचा(विद्यार्थ्यांचा) विचार..
त्यांचा यशस्वी होण्यापर्यंतचा संघर्ष अतिशय खडतर.
येणार्‍या पिढीसाठी महान कार्य करून भविष्य बनवले सोयीस्कर..
विविध क्षेत्रात (शिक्षण,क्षेपणास्त्र,लेखन इ)दिले मोलाचे योगदान.
त्यांच्या थोर कार्याला1997ला दिला "भारतरत्न"सर्वोच्च सन्मान🇮🇳
देशाच्या संरक्षणासाठी अनेक क्षेपणास्त्रे बनवून केले देशाला सशक्त.
त्यांचा देशासाठी केलेल्या कार्याला नेहमी रहायला हवे नतमस्तक👍


15 ऑक्‍टोबर ही त्यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जाते.त्यांच्या कार्याला आणि देशभक्तीला सलाम,जय हिंद🇮🇳
.......🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
👍3❤1
Forwarded from ओम sm शेळके
आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव आपल्याला काही तरी शिकवून जातो मग तो चांगला असो किंवा वाईट मात्र आपण त्यातून काय घेतो यावरून आपलं व्यक्तीमहत्त्व ठरत असतं बाकी आपलं जगणं प्रामाणिक असलं की जग पण आपल्याकडे तितक्याच चांगल्या दुष्ठीकोणातून बघतं परिस्थिती कितीही का बदलो ना आपण स्वतःला बदलु द्यायचं नाही शेवटी काही झालं तरी माणसाच्या कर्माचा हिशोब देवचं ठेवतं असतो,,,✍🏻
बरोबर ना!💯🙏🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤4👍3
Forwarded from ओम sm शेळके
प्रेमापेक्षा भारी राव मैत्री आहे त्यात आयुष्यभराची साथ लाभेल हीच महत्वपूर्ण खात्री आहे कारण त्यात न येत कधी हवे दावे ना कधी होत रुसवे फुगवे फक्त बसतो गप्पांचा मेळ मग होते विचारांची सुंदर अशी भेळ यांच्यात कधीच केल्या नाही कोणाच्या भावनांचा खेळ ही असते आपल्या जीवनातील एक आनंददायी वेळ!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤7👌2
Forwarded from B K
एक दिवा कुणासाठी?नक्की पूर्ण वाचा..✍

दिवाळीचा एक दिवा त्या शूर सैनिकांसाठी🇮🇳 ज्याच्यामुळे आपण शांततेत सण साजरी करू शकतो.एक दिवा बळीराजासाठी ज्यामुळे जगाचे पोट भरते.एक दिवा घरातील कर्त्यासाठी जो जिवाचे रान करून कुटुंबासाठी जगतो,एक दिवा विद्यार्थ्यांसाठी जे आपल्या जीवाचे रान करून येणार्‍या भविष्यासाठी लढत असतात,एक दिवा आपल्या घरातील आईवडील,भाऊ बहीण,आजीआजोबा इ साठी,एक दिवा त्यांच्यासाठी जे घर सोडून बाहेरगावी नौकरी,शिक्षण करतात.एक दिवा त्या मित्रांसाठी,माणसांसाठी जे तुमची साथ वाईट वेळ पाहून सोडत नाहीत🤗.त्या थोर पुरुषांसाठी,क्रांतिकारकासाठी ज्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्यात आहोत..एक दिवा त्या सर्वांसाठी पडद्यामागील कलाकारांसाठी, व्यक्तींसाठी ज्यामुळे ह्या देशाची,समाजाची थोडीतरी प्रगती होते पण काही समाजातील काही घटक,जवळचेच व्यक्ति इ खाली खेचण्याचा प्रयत्न करतात.आज एकमेकांच्या प्रगतीवर जळण्यापेक्षा दिव्याप्रमाणे एकत्र जळून प्रकाशमय होण्याची गरज भासत आहे👍माणूस जीवनभर पैसा,पद, प्रतिष्ठा आणि स्वार्थासाठी धावत असतो परंतु आपल्या जवळील काही माणसे जे वेळेला मदतीला येतात,मित्र,घरचे मंडळी हेच आपले खरे सोने आणि लक्ष्मी होय.वेळेनुसार लोक बदलू शकतात पण कर्तुत्व नाही😇
ही दिवाळी सर्वांचे आयुष्य प्रकाशमय करो,सर्वांच्या कष्टाला फळ मिळो हीच देवाकडे प्रार्थना,सर्वांना शुभेच्छा,शुभ दिपावली🎆✨🪔
......🦋🌺😇💞......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
👌4
जिवंत आहात...तो पर्यंत आयुष्यात सर्वांसोबत आनंदाने जगुन घ्या...!

अंत निश्चित आहे, मृत्यू अटळ आहे...फक्त, वेळ काळ आणि निमित्त निश्चित नसतं...!

Life चा पद्धतशीरपणे,
माणुसकीने रॉयल कारभार
झाला पाहिजे...


💢 Good Morning 💢
❤6👍4
जंक्शन
घर हरवलेली माणसं
व.पु. काळे.

तिन पातळांची पसंती झाल्यवर चौथं पातळ रेवतीनं मला पसंद करायला सांगीतल. एका पाठोपाठ एक असा तिचा पातळं निवडण्याचा सपाटा पाहून मी चकित झालो होतो. किंमतीत घासाघीस नाही. रंगात,पोताच्या बाबतीत, कशाकशात चर्चा न करता तीनं पाच पातळं खरेदी केली. माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहायला तिला सवड नव्हती. पाच पातळांची किंमत दुकानदारानं एकशे दोन रूपये सांगितल्यावर ती शांतपणे म्हणाली,  'मी फक्त पंच्याण्णव रूपये देणार आहे'
'माझी खरेदीची पद्धत तुला कशी काय वाटली ?'
'चकित करण्यासारखी आहे.'
'तू' चकित झालास ?'
'छे-छे, दुकानदार चकित झाला!'
'चल !'
'खोटं नाही. त्यानं उगीचच सात रूपये कमी केले वाटतं ? शंभर पातळ पाहायची, रंगाला नावं ठेवायची, पोत वाईट म्हणून कुरकुर करायची, किंमत दहा-दहा वेळा विचारायची आणि शेवटी काहीच घ्यायचं नाही, अशा बायका पहाण्याची त्याला सवय झालेली. हे सगळ टाळून तू त्याचा वेळ व डोकेदुखी वाचवलीस म्हणून त्यानं सात रूपये कमी केले.'      
रेवती मनापासून हसली.
'बरं तुला काही ड्रिंक वगैरे घ्यायचंय ?'
हातातलं पातळांचं बोचकं वर धरत मी विचारलं, 'टिप म्हणून की हमाली म्हणून ?'
'असं म्हणणार असलास तर पुन्हा फोन करते बघ.'
'मला वाटलं होतं की माझा वेळ मजेत गेल्याबद्दल एन्टरटेनमेंट टॅक्स म्हणून तूच माझ्याकडून काही तरी वसूल करशील.
'आज चेष्टा बस. खरं सांग काही हवंय का ?' .. 'आज नको. पुन्हा केव्हातरी साठी आजचे पैसे रिझर्व ठेव.'
तिला तो करार पटला. बसमध्ये बसल्यावर मीच तीला विचारलं,
'ही एवढी पातळं कुणासाठी ?'
'मलाच.'
'एवढी ?'
'हो ! सबंधवर्षाची बेगमी आणि गेल्या वर्षाचा सूड !'
'स्पष्टीकरणाची गरज आहे.'
'काय करणार आहेस तू स्पष्टीकरण ऐकून ?'
'अर्ध बोलून तू काय मिळवणार   आहेस ?'
'जाऊ दे रे ! मिळवत्या बायकांची दुःखं नाही  कुणाला कळायची.'
'आता सगळं सांगावं लागेल.'
'बायका मिळवायल्या लागल्या की नवरे-लोक त्यांच्या कपडयांची विचारपूससुद्धा करत नाहीत. सासूबाई तसल्याच. घरात वन्संसाठी पातळं आणून झाली. स्वतःसाठी झाली. एक-दोघांना आहेर झाले मोठाले. त्यांनाही पातळं झाली. माझी चौकशी सुद्धा नाही.आम्हीच आमचे कपडे आणायचे. गेल्या सबंध वर्षात आपण होऊन कुणी चौकशी केली नाही. आता मीही कुणाची पर्वा करायची नाही असं ठरवलं आहे.'
'तुझ्या रागात मी भर घालतो असं समजू नकोस. पण मला एक सांग, तू नोकरी किती वर्ष करीत आहेस ?'
'हे आठव वर्ष.'
'मग ह्या गोष्टीची जाणीव तुला आजच झाली ?'
'अन्यायाची जाणीव तुलना करायला मिळाली म्हणजे होते. गेले चार महिने वन्संही नोकरी करीत आहेत. गेले चार महिने सतत कौतूक चाललं आहे-नोकरी करते, बिचारी दमते ! मी काय गेली आठ वर्ष रमी खेळायला जाते आॅफिसात ? तिच्यासाठी न सांगता पातळं आणली. एवढी वागण्यात तफावत लेकीसुनेमध्ये ?'
'आता तू पंच्याण्णव रूपये कमी दिल्यावर काय   होईल ?'
'घरात हायड्रोजन बाॅम्ब पडेल.'
'असं ?'
'होय. ह्या स्टेप्स घेण्याची माझी इच्छा नव्हती. ह्याच लोकांनी माझ्यवर तशी पाळी आणली.'
'तुला ती भलतीच गोष्ट लागलेली दिसते
आणि लागणं स्वाभाविक आहे म्हणा.'
'ही एकच गोष्ट लागलेली नाही. रोज लागण्यासारख्या गोष्टीअसंख्य होतात दुर्लक्ष मीच करते. आता मी बंड करणार आहे. एकत्र कुटूंबपद्धतीचे गोडवे गायचे एकीकडे आणि मग पिळवणूक करायची दुसरीकडे ! स्वतःची मुलगी कामावरून परतली की तिला सक्तीनं अर्धा-पाऊण तास विश्रांती. आणि मला कपडे बदलायला, तोंड धुवायला दहा मिनिटं जरी उशीर झाला तरी त्यांच्या कपाळावर आठी.
चहाचा आयता कप तर गेल्या आठ वर्षात मला एकदाही मिळालेला नाही.
ऐकणाऱ्याला ह्या गोष्टी बारीकसारीक आणि क्षुल्लक वाटतील. सांगणाऱ्या माणसालाच ह्या बाबतीत कमी लेखलं जाईलं. पण नुसती कल्पना कर, कामावरून माणूस अगदी दमून यावं, एकच कप चहाची तल्लफ यावी-आणि स्वतः केल्याशिवाय चहा मिळू नये, सांग काय वाटेल अशावेळी ?'

रविवारी राजा सकाळचाच आला.
'केव्हा आलास ?'
'कालच आलो. रेवतीची तार आली होती.'
'राजा, तू एवढा शांत कसा ?'
'हे सारं अपेक्षित होतं.'
'तू ते होऊन देऊ नकोस. रेवतीला परावृत्त कर.'मी अस्वस्थ होत म्हणालो 'मी आत्ताच तिकीटं रिझर्व करून आलो.'
'राजा....'
'त्याला इलाज नाही. केव्हा तरी होणार होतं हे. मला ह्यात नवीन नाही. घरातल्या बाईनं आपलं क्षेत्र बदललं की त्यापोटी दुसरं काय होणार ? संसार कशासाठी करायचा ? संसार म्हणजे काय याच्या व्याख्या जिथं बदलायला लागल्या तिथं एकमेकांच्या नात्याबद्दलचा प्रश्न उद़्भवतोच कुठं ? जेवढ्या जिद्दीनं रेवती नोकरी करते, तेवढी जिद्द तिनं घरात वापरली असती आणि मिळवला तर चांगुलपणा ह्याच लोकांकडून मिळवून दाखवीन असं म्हटलं असतं तर ती तेवढीच कर्तबगार ठरली असती.'
👌1
*माणसं मनातली.....*

*मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....*

*काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...*

*चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....*

*शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....*

*शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....*

*म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो....*

*आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं !!*

*आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई....*

*ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.*

*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत....*

*कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?*

~~ श्री व. पु. काळे !
❤3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
आई वडील नावाची सुरक्षा व्यवस्था 😍
❤3👏1
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना सखे,
तुझ्या हास्याने तर
रात्रही उजळून निघते,
तुझ्या डोळ्यांत बघितलं की
मन हरवून जातं कुठेतरी

सखे,
तुझं नाव घेतास
चेहऱ्यावर smile येते माझ्या,
तू जवळ असलीस की
हृदयाची धडधड वाढते
अन् वेळच थांबते

सखे,
तुझ्या पैंजनाच्या नादात
माझं मन हरवून जातं,
तु चाललीस की
माझं आयुष्यच तुझ्या
त्या पावलांत गुंतून जातं

सखे,
तुझ्या प्रेमात इतका गुंतलोय मी
की स्वतःलाच विसरलोय आता,
तूच माझं जग,
तूच माझं स्वप्न,
तूच माझी कविता आहेस
तुच माझ्यासाठी सर्वकाही आहेस सखे… 💞

✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक,मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤4👌2