नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from B K
(वेळ काढून पूर्ण वाचा,विराट प्रेरणादायक संघर्षगाथा मांडली आहे)
आज यशाच्या उंच शिखरावर पोहचलेले अनेक व्यक्ती दिसतात.आजच success जगाला दिसतो,परंतु कालचा संघर्ष कुणाला दिसत नाही😔.हे जगाचा नियमच आहे जग तुमच फक्त output पाहत असतं,त्यासाठी तुम्ही सोसलेल्या वेदना,यातना नाहीत😒.यशस्वी होण्याचा प्रवास हा काट्यानिंच भरलेला असतो मग तो प्रवास अंबानींचा असो की विराटचा  जोपर्यंत संघर्षाच्या त्या वेदना आपल्याला जाणवत नाहीत तोपर्यंत स्वतःवर असणारा विश्वास आणि आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा अंदाजही येत नाही👍म्हणून कोणतेही परस्थिती असो,आपल्याला चुकीचं समजणारी,टीका करणारी,टोमणे मारणाऱ्या व्यक्ती ह्याकडे जास्त लक्ष दिले नाही तरच कुठे काहितरी मिळेल.
  विराट कोहलीचाही संघर्ष हाही अतिशय कसोटीचा.वाईट दिवस पहिल्याशिवाय चांग्याल्या दिवसांची किंमत समजत नसते.अनुभव हाच मोठा गुरू आहे,आणि त्यातूनच शिकत विराट न डगमगता पुढे गेला म्हणूनच आजही विराटचे वेगवेगळे रेकॉर्डस् बनतात.2006 साली फक्त 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने खेळ सोडला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याने शतकी धावा केल्या.त्याच्या हे देश,संघाप्रती असलेल्या समर्पणाने त्याचे किती मजबूत व्यक्तिमत्व आहे,हे दाखवले.स्वतचं फिटनेस जपण्यासाठी तो आजही आवडीचे पदार्थ खाणे टाळतो ह्यावरून त्याचा त्याग दिसतो. क्रिकेटच्या क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.प्रत्येक वेदनादायक प्रवासाचा सुखदायक शेवट होतोच आणि त्याचे उदाहरण म्हणजे 👑 किंग कोहली..
.........🦋🌺✍🙏.........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
👍5
Forwarded from ओम m शेळके
आपलें विचार सकारात्मक असले की पूर्ण जग सकारात्मकतेने भरलेलं दिसतं कारण आपल्या जगाचा सुंदर असा नियम आहे की जे आपण पेरतो तेच उगवतं मग ती माती मनाची असो की शेतातली!,,

✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👌1
Forwarded from Mayur
Photo From ✍✍@moremayur_B
❤5👍1👌1
Forwarded from Mayur
सांग मला हे प्रेम आहे का...?



अस कस ग तुझं हे सौंदर्य..?
बघताच तुला तहान वाढत जाते या देहाची,
घेतला जरी मी समुद्र कवेत
ही तहान माझी कधीच नाही भागायची.

वाटलं या माझ्या डोळ्यांना,
तुला बघण्याची ही तहान बघण्यापुरतीच मर्यादित राहील.
पण तुझा नकळत झालेल्या ओझरत्या स्पर्शामुळे,
ओढ तुझ्या स्पर्शाची आता मात्र लागून राहील.

डोळे झाले, स्पर्श झाला,
आता या नाकाचं मध्ये काय उणे?
तुझ्यात दडलेल्या कस्तुरीचा शोध घ्यायचा म्हणे.
अगं, सांग ना काहीतरी या माझ्या ओठांना,
ओठ तुझे ओठांत घेतल्यानंतरच तहान माझी भागेल म्हणे.

असा कसा ग तुझा देह आहे इतका खास..?
तुझ्या शरीराशी एकरूप होण्याचा, माझ्या शरीराने घेतलाय ध्यास.
जरी झाली आपली पंचेंद्रिये एकमेकांशी एकरूप ,
कळेल का ग आपल्याला, मनुष्य प्राण्याचं खरं रूप..?

सखे, सांग ना मला,
एकमेकांची कधीच न भागणारी
ही तहान भागवण्याचा केलेला प्रयत्न, म्हणजेच आहे का आपलं हे प्रेम..?

की निसर्गाने मनुष्य प्रजाती टिकवून
ठेवण्यासाठी चालवला आहे
आपला हा गेम...?

– मयूर मोरे ( ✍️✍️@moremayur_B )
१९/१०/२०२४
👍3❤1
Forwarded from Swati Chavan
*नाते समजूतीचे.....*

"वाह राधा ,काय छान चहा केलास.....!"

"खरच सुनबाई खूप छान चहा केलास!"

राधा मनोमन खूप खुश झाली. सौरभ आणि सासऱ्यांच्या कौतुकाने तिला आनंद झाला.

"पण मी करते तसा नाही! ठीक आहे चहा!"

सासुबाईंचे असे बोलणे राधाला मात्र जरा खटकले. पण तिने तो विषय तिथेच सोडून दिला.

दुसऱ्या दिवशी,
"सुनबाई आज आपल्या गावाकडील पाहुणे येणार आहेत. त्यांच्यासाठी विविध जेवणाचे पदार्थ बनवावे लागतील. तसंही तुला स्वयंपाकातील सर्वच येतं त्यामुळे ही जबाबदारी तुझी. ही घे लिस्ट!"

सासुबाई सारी जबाबदारी तिच्यावर सोपवून मंदिरात निघून गेल्या. इकडे पाहुणे मंडळी आली सुद्धा आणि त्यांची जेवणे देखील आटोपली.

थोड्या वेळात सासुबाई आल्या,
" वाह रमाबाई! काय छान बनवलं होतं तुझ्या सुनेने जेवण! मन अगदी तृप्त झालं!"

सासुबाई किंचित हसल्या व तिरक्या नजरेने राधाकडे बघत खोलीत निघून गेल्या.

राधाचे सासरे व सौरभ दोन-तीन दिवसापासून आईचे बदललेले वागणे बघत होते. सौरभ चे नुकतेच लग्न झाले होते.राधा मात्र आपले काम चोख करत होती.

दुसऱ्या दिवशी,

" राधा, ए राधा.."

" आले बाबा!"

" हे इलेक्ट्रिसिटी बिल, पाणी बिल भर आणि हो गॅस चा नंबर ऑनलाईन लावतेस का?"

"हो बाबा, ही सारी कामे ऑनलाईन होतील. लगेच करते मी."

" वाह! छान!"

सासूबाई दुरूनच हे सारे बघत होत्या, राधाच्या सासऱ्यांनी ते पाहिले.

थोड्या वेळाने,

" राधा ए राधा!"

" आले बाबा."

" हे घे बेटा घरातील कपाटाच्या चाव्या. आज पासून ही जबाबदारी तुझी."

" अहो बाबा, पण..."

तेवढ्यात सासूबाई धावतच आल्या आणि राधाचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाल्या,
" कपाटाच्या चाव्यांचा मान हा माझा आहे. तसेही दोन दिवस झाले नाहीत हिला येऊन पण काय सगळ्यांची कौतुकं कमावतीये! हेच तर साध्य करायचं होतं हिला. माझा मान हिला असाच हिसकावून घेऊन स्वतःच्या ताब्यात घ्यायचा होता म्हणून हे सारं करत होती ती!"

" नाही हो आई असे काही नाही."

"अच्छा तर ही समस्या होती होय! हा हा हा..."

"अहो तुम्ही हसता काय?"

तिकडून सौरभ ही हसत हसत टाळ्या वाजवत आला.
"हे बघ रमा, चाव्यांचा मान राधाला देणे हे केवळ नाटक होतं. अगं आज पंचवीस वर्षे झाली तू आपला संसार किती छान सांभाळलास. चाव्यांचा मान तुझाच आहे. फक्त दोन-तीन दिवसापासून जे तू वागत होती त्यासाठी मी असे नाटक केले."

"काय हे नाटक होतं ?आणि सौरभलाही हे माहीत होतं!"
"अगं माय डियर आई, राधा आल्यापासून तुझं वागणं किती बदलले आहे. तुला तिचा चांगुलपणा, परफेक्शनिस्ट असणे खटकतय. अग राधा एकदम साधी आहे. तिला तुझा मान हिसकावण्याच्या अजिबात हव्यास नाही."

"खरच आई. मला तुमचा मान कधीही नकोय. नव्हे तो तुमचाच हक्क आहे आणि कायम राहणार आहे. खर तर माझी वहिनी माझ्या आईला नेहमी हिडीसफिडिस करते, काहीही काम करत नाही, म्हणून आईने मला लग्नाआधीच सांगितले होते, की तुझ्या भावी सासूला आपल्या कामांनी खुश ठेव, त्यांचा तसेच इतरांचा मान कायम ठेव. माझ्यासारखी वेळ कोणावरही नको. म्हणून मी माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होते. घरातील कामे तर बाहेरील कामे करून मी आधीपासून करते."

रमाबाई सर्वांचे ऐकून शरमल्या.
"मला माफ करा तुम्ही सर्व. विशेषतः राधा मला खरंच माफ कर. खरंतर सौरभच लग्न ठरलं तेव्हा माझ्या मैत्रिणी नवीन सुनेला तुला सर्वच शिकवावं लागेल, ती थोडी एवढी परफेक्शनिस्ट असणार आहे? आणि जर भेटलीच परफेक्शनिस्ट तर ती कदाचित घराचा ताबा तसेच मान देखील तुला धुडकावून मिळवू शकते, असे म्हणाल्या होत्या. त्यामुळे मी तेच डोक्यात ठेवले होते."

"बरं आमच्या सौभाग्यवती आता झालं का सगळ्या शंकांचं समाधान? राधाचं चांगुलपणा आता तरी समजला की अजूनही शंका आहे?"

"नाही मला आता कुणाविषयी काहीच शंका नाही किंवा तक्रारही नाही.

त्या दिवशीपासून राधा व रमाताई, एक होऊन राहू लागल्या. तसेच घरात आनंदी आनंद रोजच साजरा होऊ लागला.

वाचकहो, द्वेष, कलह, मत्सर, मान, अपमान हे सारे सासु - सुन यांच्या फुलणाऱ्या नात्यातील वर्षानुवर्षे उहापोह करणारे कट्टर विरोधक. मग सासूने किंवा सुनेने सुद्धा बाहेरच्या लोकांचे ऐकून घरात वागणे एकदम चुकीचे आहे. केवळ यामुळे हसत्या खेळत्या घराचे वाटोळे होऊ शकते. म्हणून चाव्यांचा मान असो नाहीतर इतर कुठला मान तो आपोआप टिकवून ठेवणे किंवा कमावणे हे सासू अन् सून यांच्या आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या नात्यावर अवलंबून असते. एकोप्याने राहत सासूने नव्या सुनेला समजून घेवून आणि सुनेने देखील एवढी वर्षे राब राब राबणाऱ्या सासुला समजून घेवून नवा आदर्श निर्माण करावा, एवढीच माफक अपेक्षा मी या कथेतून बोध घेवून सर्वांकडून करते. बरोबर बोलतोय ना मी?

*सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.*
👍9👌2
Forwarded from ओम m शेळके
आपल्या डोळ्यातील अश्रू प्रत्येकाला दिसतात हे मात्र खरं तर ते मनातील साठलेलं दुःखं शांतपणे बाहेर काढण्याचा एक मार्ग असतो ते ओळखणं सर्वांना जमतं नसतं म्हणून तर मनातीळ वेदना कमी करण्यासाठी कधी कधी एकांत हवा असतो कारण त्यांना समजून घ्यायला कोणीच तयार नसतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍8
Forwarded from Amol More ( Am )
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
संयम..💯🔜🔝✌️🏻
09/11/2024

पर्याय हाच
शेवटचा पर्याय बनण्याची ताकद
ठेवत असतो..,
फक्त संयम आणि
स्वतःचा चांगुलपणा हा कधीच
विसरायचा नसतो..
वेळ ही प्रत्येकाची येते,
फक्त फरक एवढाच की ती
वेळेवरच येते..
म्हणुस स्वतःवर विश्वास ठेवा
वेळ नक्की बदलते..😍🙏🏻


लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm
👍7❤3🔥1
Forwarded from ओम m शेळके
तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता..!!
शिवरायांनी अन्यायी प्रवृत्तीचा अंत केला होता.. .!!
युक्तीच्या जोरावर शक्तीच्या बळावर आत्मविश्वासाचा प्रमाणावर 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजलखान नांवाचा राक्षसाचं उभा फाडला होता.. .!!
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

सर्वाना शिवप्रताप दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🚩🙏🏻


@Ommshelke
❤2👍2
Forwarded from Amol More ( Am )
जीवनाची खरी परिक्षा..✨
11/11/2024

नात्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विश्वास
जसा जगण्यासाठी महत्वाचा असतो तो श्वास..
नसते काही मोठे मागणे कोणाचे,
असते हवी ती आयुष्यभर साथ..
तरीही का बदलतात लोकं नात्यामध्ये,
का मिळत नाही प्रत्येकाला प्रेमात काठ..
का झुरणं हे शेवटपर्यंत राहतं,
जर माहीत आहे कधी ना कधी मरणं..
प्रत्येकजन जर जर बदलणारच आहे वेळोवेळी,
तरीही का त्याच्यासाठीच जगणं..
जिंदगी ही अमोल आहे,
कधी कळेल त्याचे मोल..
मृत्युलोकी हे जग सारे,
रहस्य जन्म मृत्यू सखोल..

लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm
👍2🙏2🔥1
Forwarded from Swati Chavan
🪴🏵️🦚🌻🌸💠🌹☘️🍁♻️🌺🪴

*🎭 बोधकथा : आपण दुःखी का होतो 🎭*

*🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,*
*⊱━━━━━✥⊰༺☬༒☬༻⊱✥━━━━━⊱*
एकदा शिक्षिकेंनी तिच्या विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीतून काही टोमॅटो शाळेमध्ये आणावयास सांगितले. प्रत्येक टोमॅटोवर त्या मुलांनी, ते ज्या व्यक्तीचा द्वेष करत असतील त्याचे नांव लिहून आणावयाचे होते. अशा रीतीने जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टोमॅटो त्यांनी आणावयाचे होते.

ठरलेल्या दिवशी सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टोमॅटो आणले. काहींनी दोन, काहींनी तीन, काहींनी पाच तर काहींनी वीस टोमॅटो, ते द्वेष करीत असलेल्या संख्येबरहुकूम आणले.

शिक्षिकेने नंतर सर्वांना सांगितले की, त्यांना ते टोमॅटो ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे आहेत. जसजसे दिवस उलटू लागले, तसतसे मुले टोमॅटोंच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले. ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येने जास्त टोमॅटो होते त्यांनी तक्रार केली की त्यांच्याकडची ओझी वाहून नेण्यास अतिशय जड असून दुर्गंधही फारच सुटलेला आहे.

आठवड्यानंतर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न केला, "तुम्हाला या आठवडाभर कसे वाटले? "

मुलांनी घाणेरड्या वासाबद्दल आणि टोमॅटोंच्या जडपणाबद्दल तक्रारी केल्या. विशेषत: ज्यांनी अनेक टोमॅटो आणले होते.

शिक्षिका म्हणाल्या, "हे अगदी तुम्ही, आपल्या अंत:करणात, तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तिंबद्दल द्वेष बाळगता त्याप्रमाणेच तंतोतंत आहे." द्वेषामुळे अंत:करण रोगट बनते आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे बरोबर घेऊन जाता. "जर तुम्ही टोमॅटोंचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल तर कल्पना करा, तुम्ही रोज वागवत असलेल्या कडवटपणाचा तुमच्या अंत:करणावर किती परिणाम होत असेल"

आपल्या दुःखाचे कारण हेच आहे नको त्या वाईट गोष्टी मनात साठवून ठेवतो. अंत:करण ही एक सुंदर बाग आहे. अनावश्यक तण काढून टाकून त्याची नियमीत मशागत करण्याची गरज असते. तुम्हाला क्रोध दिलेल्यांना क्षमा करा. त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंत:करणात जागा तयार होईल.

*📍तात्पर्य :*
आपण सर्वजण चांगल्या व्यक्तींबरोबर, चांगल्या विषयांसाठी (कायम) एकत्रित काम करू या. कटुता नव्हे तर काही चांगलं मिळवण्यासाठीच.
*▣▬▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▬▣*
👍11
Forwarded from Amol More ( Am )
काय चुकते कळते सर्व..💔
( वळत कसे नाही.. )
12/11/2024


माणूस हवेत जातो कसा,
का राहत नाही नात्यात भरवसा..
हळव्या मनाला लागते
जेव्हा चाहुल प्रेमाची,
तरीही नाती का
बदलत असतील हक्काची..
टोचते, बोचते मनी
घाव विरहाचे,
सोबत असतानाही का दिसत नाही
प्रेम पाऊल आपुलकीचे..
एवढंही का बदलावं
माणसाने आपल्याच नात्यात,
का तोडावा विश्वास आणि
घालावा कसा काळजावर घाव..
मिळवुन मिळणार तरी काय असते
माणसाला असे करुन,
मरते ते अमोल नाते
स्वप्ने जातात जळुन..
उरुन काय उरते हातात
मग राख होती ती भावनांची,
अनुभव कोरला जातो काळजावर
उरते कहाणी ती जीवनाची..
शेवटी अनुभव कोरला जातो काळजावर
अन् उरते कहाणी ती जीवनाची..
❤️‍🔥

लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm
👍6🔥1👌1
Forwarded from ओम m शेळके
आयुभरासाठी माझी प्रिय,राणी, एक मैत्रीण म्हणून साथ मला देशील ना।।जीवनरुपी प्रवासाच्या प्रत्येक वळणावर येऊन मला भेटशील ना।।माझ्या संकटाच्या रात्री मनाला आधार देणारा संवाद तू माझ्याशी साधणशील ना।।मला माहिती आहे ग,या जन्मात आपण एक नाही होऊ शकतं पण मात्र पुढील जन्मात माझी जीवनसाथी बनून येशील का?!,,,✍🏻

. . .I like you.. Dk. . .♥️🦋
चित्र रेखाटन ✍शेवाळे दीप्ती. गोपाळ

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍3👌2
Forwarded from B K
भारतीयांचा परदेशी शिक्षण,व्यसायाकडे कल वाढतोय का✍??(स्वदेशासाठी🇮🇳फक्त पूर्ण वाचू नका त्यावर विचार करा,तेव्हा खरा सार्थ समजेल,सर्व बाजू विचारात घेवून स्वमत मांडले आहे)

एकेकाळी आपल्या देशास सोने की चिडिया असणारा देश संबोधतले जायचे कारण ह्या पवित्र देशात सर्व गोष्टींची भरभराट होती मग ती शिक्षणाची असो की व्यवसायाची.आपलं प्राचीन ज्ञान मानवी जीवनासाठी किती उपयोगाचे आहे हे फक्त चार वेदांचा अभ्यास केला तरीही समजते.आर्यभट्ट,चाणक्य,स्वामी विवेकानंद ह्यांच्यासारखे थोर अभ्यासक येथे होऊन गेले आणि त्यांनीच भारतीय ज्ञानाचा पाया ह्या मातीत पेरला व त्या विचारातूनच देशात आमूलाग्र बदल,चळवळी घडल्या.नालंदा,तक्षशिला ही प्रसिद्ध विद्यापीठे होती,जिथे जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत अशी ही अभिमानास्पद शिक्षणपद्धती पुढे चालत राहिली.
   परंतु आताची परिस्थिती आणि लोकमत सांगण्यास दुःख होते की,बहुतांश भारतीय लोक/विद्यार्थी ह्यांना विदेशी शिक्षण/व्यवसाय सोयीस्कर वाटतोय कारण विदेशात अनेक संधी,कमी पैशात शिक्षण,रोजगार मिळेल असा त्यांचा समज असतो.आपण विदेशात जाऊन शिक्षण घेतो इथपर्यंत ठीक आहे परंतु स्वभुमित येऊन त्याच शिक्षणाच्या उपयोग येथील समाजासाठी करतो का?ह्यांचे उत्तर बहुतांश नाही असे असेल अपवादही असतील काही परंतु जेव्हा शिक्षणासाठी,व्यवसायासाठी विदेशात जातो तेव्हा विदेशी लोक,कंपन्या आपल्याला अश्या ऑफर्स दाखवतात की  तिथलेच कायमस्वरुपी रहिवाशी होते आणि एक स्वदेशी माणूस आपले कष्ट,बुध्दिमत्ता विदेशाच्या प्रगतीसाठी फक्त काही पैशाच्या मोबदल्यासाठी गहाण ठेवतो.पैसे भेटतात परंतु प्रगती विदेशची होते.ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपण सुंदर अश्या भारतराष्ट्रास,इथील परिवरास विसरतो.
  हेच सगळे व्यवसायिक स्वदेशात जे विदेशात काम करणार आहोत तेच केलं तर देशाची किती प्रगती होईल आणि ज्या काही अडचणी असतील त्या एकमेकांमध्ये सोडवल्या जातील,परंतु त्यासाठी स्वदेशात एकत्र काम करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे त्याशिवाय राष्ट्रउन्नत्ती होणे कठीण आहे.ज्या राष्ट्राने,स्वराज्याच्या कुशीत वाढलो इथिल अन्न खाऊन मोठे झालो,मग ह्या देशात काम करायला कसली लाज?व्यवसायाच्या संधी कदाचित नसतील तर आपण त्याचे क्षेत्र आणि ठिकाण बदलू शकतो. कदाचित थोडे पैसे कमी मिळतील परंतु समाधान तर नक्की मिळू शकते ना.इतर देशातलं वातावरण , संस्कृती,भोजन आणि हवमान आपल्याला पचल का आणि मूळ प्रश्न येतो सुरक्षेचा आणि युक्रेनरशिया युध्याच्या काळात कितीतरी लोक स्वदेशात परतले हे तर जगाने पाहिलच आहे.शिक्षण विदेशात झाल परंतु त्याचा उपयोग स्वदेशत होवा.विदेशी शिक्षण,नोकरी विरोध नाही परंतु प्रत्येक गोष्टीस नाण्याप्रमाने असणाऱ्या दोन्हीही बाजू पडताळणे गरजेचे आहे,शेवटी निर्णय हा व्यक्तिकच असतो......🦋🌺✍🙏.....शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
👍9❤1
Forwarded from ओम m शेळके
प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी येतोचं तो म्हणजे एवढ दुःखं माझ्याच वाट्याला का येत तो येणं स्वाभाविक आहे कारण जीवन म्हटलं सुखदुःखं हे आलंच हे वास्तविक सत्य कोणीच नाकारू शकतं नाही हा नियम सर्वांनाचं लागू होत असेल जी परिस्थिती आपल्या पुढे निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करून आनंदाने जगायला काय हरकत आहे उलट त्या गोष्टींचा त्रास आपल्यालाच कमी होतो हे मी स्वतःलाचं अनुभवत आहे !,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke
👍6
Forwarded from B K
जोपर्यंत हातावरील भविष्य सांगणाऱ्या रेघांना, कष्टामुळे होणाऱ्या भेगांची झळ लागत नाही आणि पोटातल्या आतड्यांना भुकेमुळे होणारी कळ लागत नाही🥺व इतरांचे दुःख बघूनही स्वतःला हळहळ होत नाही🙁 तोपर्यंत आयुष्याच्या खऱ्या संघर्षाचा अर्थ समजतच नाही..🔥🙏🏻
...........🦋🌺✍🙏...........
लेखन✍️-B.S Kendre(Stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
👍7❤1
भावनेशी खेळ झाला की व्यक्ती एकांत पसंत करतो....
😢4
हो” आणि “नाही” हे दोन*
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो…
आपण जीवनात
बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि,
“हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!
👍9👌3
Forwarded from Vinayak Bhise
हम वह बदनसीब
इंसान है जो आपसे
बेइंतहा मोहब्बत करके भी

आपकी एक कॉल के
इंतजार में आपको
हर पल बेपनाह याद करके
आपके खयालों में
गुमशुदा रहते है

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
👍3