नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
कोमेजलेली कळी हा लेख नक्की वाचा. ❤️💔
👍2
Forwarded from ओम sm शेळके
मैत्री म्हणजे एक दुसऱ्याचा श्वास।।मैत्री म्हणजे एकमेकांवर निस्वार्थपणे टाकलेला विश्वास।।मैत्री म्हणजे एकमेकांना लागलेली अनोळखीपणाची आस।। मैत्री म्हणजे मी देवाला तुझ्यासाठी केलेली आरास।। मैत्री म्हणजे तू व्यक्ती म्हणून माझ्यासाठी खूपच खास!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤5👍2
Forwarded from Vinayak Bhise
मावशी म्हणजे आईच
निस्वार्थ प्रेम करणारी
मायेचा महासागरच

मावशी म्हणजे आईच
लाड, प्रेम, हट्ट ,काळजी
सारं अमर्यादित

आई मरो पण मावशी जगो,
या म्हणीच अर्थ कधी
मला समजला नाही,

कारण
मला माय-मावशी यातील
फरक दिसला नाही.

ती केवळ नात्याने मावशी नाही,
तर ती आईच  आहे

जगणं शिकवते, बळ देते,
पाउलो पाऊली साथ देते
प्रत्येक संकटात आधार देते
सदैव खंबीरपणे उभा राहते

तिच्या डोळ्यात मी पाहिली,
आईचीच ती माया.
कधी कठोर झाली नाही,
केवळ दिली प्रेमाची छाया.

मावशी म्हणजे आईच
वात्सल्याचा झरा
प्रेमाचा महासागर
मायेचं आभाळ

मावशी म्हणजे आईच
तिच्याविना आयुष्य सारं अपुरे
जन्मोजनमी आई
म्हुणूनी तूच मिळावी
हे मागणं मागतो मी देवाला

✍विनायक भिसे, बारामती
  Mo. 7798150143

आवडल्यास प्रतिक्रिया कळवा व शेअर करा
❤11
वेळ आणि आवयशकतेनुसार माणसाची किंमत कमी जास्त होते,

माशी चहात पडली तर चहा फेकून दिला जातो आणि माशी तुपात पडली तर माशी फेकून दिल्या जाते.

🌸आपली किंमत स्वतःला असू द्या लोक वेळेनुसार आणि गरजेनुसार तुमची किंमत ठरवणार पण त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडायला नको, लोकांच्यामनाप्रमाणे जगायला गेलो तर कुणालाच आनंदी करू शकणार नाही आपण🌸

✨ Good Night ✨
❤9👌3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
आषाढी एकादशी
"सत्कर्म करुनी नाम घ्यावे विठ्ठलाचे..
डोळे भरूनी रूपं पहावें माझ्या देवाचे..
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल..चरणी शतशः नमन....
व समस्त जनतेला आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
✍️ ABC'S Diaries
🙏🙏🚩🚩🚩
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
पंढरीची वारी हा माझा लेख आज या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाला नक्की वाचा...
❤1
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा..✍आपला भारत देश हा कृषिप्रधान देश,त्यामुळे सर्वसामान्य माणूस शेती ह्या व्यवसायांवर अवलंबून असतो,म्हणजेच आपली थेट मातीशी नाळ टिकून असणारी आपली संस्कृती आपल्या परंपरा🚩🙏..त्यात महाराष्ट्र म्हणजे जगतविख्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,तुकाराम महाराज अशा अनेक संतांची भूमी तसेच छ.शिवाजी महाराज छ.संभाजी महाराज अशा अनेक वीरांची भूमी लाभेलली पवित्र माती..ह्याच महाराष्ट्राने जगाला सांप्रदायची,भक्तीची ओळख जगाला करून दिली..✍😇
  आषाढ एकादशीचा,वारीचा सोहळा पाहण्यासाठी भारतातूनच नाहीतर परदेशतूनही अनेक लोक येतात आणि ह्या इथल्या संस्कृतीचा आदर्श घेतात,सोहळ्यात दंगून जातात,हीच आपल्या संस्कृतीची,सांप्रद्याची ओळख..🚩ह्या सोहळ्यात लिंग,लहानमोठा जात,धर्मभेद असा कोणताही भेदभाव नसतो.. सर्वांनाच पांडुरंगाच्या पावलांचे दर्शन घेण्याची संधी मिळते म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात'सकळाशी येथे आहे अधिकार|🚩 कलियुगी उद्धार हरीच्या नामे॥आपल्या संस्कृतीची,परंपरेची जपवणूक आपणच करणे ही काळाची गरज आहे..व्यसनांपासून,वाईट गोष्टींपासून,प्राणीमात्रांवर दया करायला शिकवणारी,मत्सर,भेदभाव निर्मुलन करायला शिकवणारी ही सांप्रदायाची शिकवण🙏😇तरुणांनी चुकीच्या गोष्टींचा नाद करण्यापेक्षा योग्य दिशा दाखवणारी आपली परंपरा, संस्कृती.तरुणपणी परमार्थाची शिकवण अंगी लागलेली कधीच वाया जात नाही..✍असे म्हणले जाते जिथे विज्ञान शेवट होतो तिथे अध्यात्माची सुरवात होते.आयुष्यात शिक्षण,विज्ञान आणि आध्यात्म ह्या गोष्टींची सांगड घालता आली तर नक्कीच आयुष्य आनंदी,समाधानी बनते..😇पांडुरंग सर्वांना सुखी,आरोग्यदायी आयुष्य देवो बळीराजाच्या,विद्यार्थ्यांच्या कष्टाला नक्की फळ देवो,भेदभाव संपून जावो हीच परमेश्वरास प्रार्थना🙏😇
........ 😇🌺✍🙏.......
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Wha)
Insid- bharat_53_
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
❤2👍1
Forwarded from ओम sm शेळके
मला माहिती नाही राव देव आहे की नाही पण मात्र संतांच्या भक्तीत तो दिसतो वीरांच्या शक्तीत तोच असतो शेतकऱ्यांच्या कष्ठतात तो मदतीला बसतो परिस्थितीला तोंड देण्याऱ्या व्यक्तीच्या सुखात तो हसतो असं म्हणतात की चांगल्या वाईट कर्माचं फळ योग्य प्रकारे तोच देतो मग का बरं माणूस वाईट कृत्य करून चांगुलपणाचा आव आणत असतो.🙏🏻.नक्कीच विचार करा!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
👍5
Forwarded from ओम sm शेळके
जीवनात ना सर्वांसमोर मनसोक्त हसायचं मात्र एकांतात मन हलकं होईस तोवर रडायचं कारण आता जग उलट झालेलं आहे म्हणजे जेव्हा आपल्याला आधाराची खूप गरज असते तेव्हा साथ द्यायला कोणीचं तयार होतं नाही पण एकदा आपण यश प्राप्त केलं की शकंडो जण सोबतीला उभे राहतात म्हणूनचं आयुष्यात एक अशी व्यक्ती मिळवा की तिच्याकडे मन मोकळं करून रडता येईल कारण सुखात तर सर्वचं सहभागी होतात मात्र आपलं दुःख व्यक्त करायला कोणी तरी आपलंसं आसवं लागतं,,बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
गुरु
✍️"मातीच्या मडक्यासारख्या नाजूक आयुष्याला आकार देवून माणूस नावाची सुंदर कलाकृती घडवणाऱ्या प्रत्येक शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!"
✍️ABCs Diaries📚
सुप्रभात 💙
🙏6❤3👍1
🌹🌸गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌹
❤2🙏1
*"वेळ नाही..... ?*

बारा तासाचा प्रवास चार तासांवर आला, तरी माणूस म्हणतो –
*वेळ नाही*

बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं, तरी माणूस म्हणतो –
*वेळ नाही*

चार आठवड्यांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदांत मिळतो, तरी माणूस म्हणतो–

*वेळ नाही*

कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला वर्ष लागायची,
आज तो सेकंदात दिसतो –
तरी माणूस म्हणतो –

*वेळ नाही*

घरात वरखाली जायला लागणारा वेळ आणि श्रम, आता लिफ्टने सेकंदात संपतोय,
तरी माणूस म्हणतो –

*वेळ नाही*

बँकेच्या रांगेत तासनतास थांबणारा माणूस, आता मोबाईलवर काही सेकंदांत व्यवहार करतो,
तरी माणूस म्हणतो –

*वेळ नाही*

एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या, आता काही तासांत होतात, तरी माणूस म्हणतो –

*वेळ नाही*

अ‍ॅक्टिवा चालवताना एका हातात हँडल, दुसऱ्या हातात मोबाईल, कारण थांबून बोलायला

*वेळ नाही*

ट्रॅफिक जाम झाला की दोन लेन ओलांडून तिसरी तयार करतो, कारण

*वेळ नाही*

पुस्तक वाचायला

*वेळ नाही*

आई-वडिलांना फोन करायला

*वेळ नाही*

निसर्गात रमायला

*वेळ नाही*

पण –
आयपीएलसाठी *वेळ आहे*

नेटफ्लिक्ससाठी *वेळ आहे*

सटरफटर रील्ससाठी
*वेळ आहे*

राजकारणावर चर्चा करायला
*वेळ आहे*

पण स्वतःसाठी *वेळ नाही*

जग सोपं झालं, गती वाढली,
तंत्रज्ञान जवळ आलं, अंतरं संपली, सोयी वाढल्या, संधी वाढल्या…
पण माणूस *वेळ नाही* म्हणत स्वतःपासून दूर गेला.

शांत बसून स्वतःशी बोलायला,
स्वतःला समजून घ्यायला,
किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला…

*वेळ नाही*

आणि मग एक दिवस वेळच निघून जातो.
शेवटच्या क्षणी कळतं –

*वेळ होता…*

पण आपणच *वेळ नाही* असं म्हणत जगायला विसरलो होतो.

म्हणून आजच ठरवा –

स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा, नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा, मनासाठी, शांतीसाठी, आयुष्याच्या गाभ्यासाठी थोडा वेळ जगून बघा.

कारण *वेळ नाही* हे सत्य नाही.

*ती फक्त एक सवय झाली आहे…आणि ती बदलायला हवी.*

Copied content
Credit goes to writer ✨
👌8❤1👍1👏1
एकदा फूल फांदीवरून गळून पडले की, ते पुन्हा फांदीवर चिटकत नाही....पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फूलं पुन्हा फुलत राहतात.... तसेच आपल्या आयुष्यातील हरवलेले क्षण पुन्हा कधीच येत नाहीत.... परंतु उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो.....!
👍8❤3
Forwarded from B K
आयुष्य असो किंवा खेळाचे मैदान असो जिंकलो नाही तरीही मैदान गाजवाता आले पाहिजे..🔥शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यायला जमली पाहिजे..ह्या प्रवासात तुम्हाला हिणवणारे,तुम्हाला ध्येयापासून दूर नेण्याचा अनेक लोक प्रयत्न करतील,तुमच्यावर जळतील परंतु अशा गोष्टींचा कानाडोळा करून स्वतःवर आणि आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित केले तर त्या गोष्टींचा काहीच फरक पडत नसतोच..😇आयुष्यात तुम्ही जिंका किंवा हरा जे तुम्हाला नावबोट ठेवणारे,कमी लेखणारे,जळणारे लोक,नातेवाईक,मित्र थोडेफार का होईना समाजात असतातच..😇आयुष्यात अनेक प्रसंग येतील जेथे बुमराहसारखे चांगला गोलंदाजी सारखी फलंदाजीही करावी लागेल, सिराज सारखे अनेक बाऊंसर दुखापती सहन करून मैदानात टिकून राहवे लागेल..💪शेवटी कोणताही खेळ असो किंवा जीवन हार-जीत हे आपल्या हातात नसते,ती चालतच असते.हारलो कसे ह्याचा विचार करण्यापेक्षा जिंकू कसे ह्याचा विचार करायला हवा.नशिबाच्या पुढे जिंकणे किंवा हारणे आपल्या हातात नसते,हातात असत ते लढण व मैदानात टिकून राहण फक्त..🔥
........ 😇🌺✍🙏.......
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Wha)
Insid- bharat_53_
प्रतिक्रिया कळवा व आवडल्यास शेयर करा
❤9👍4
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
शिस्त म्हणजे बंधने की चांगल्या सवयी..? हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला...
नक्की वाचा... 🎯
❤4
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे. अण्णाभाऊ साठे, ज्यांना साहित्यरत्न आणि लोकशाहीर म्हणून ओळखले जाते, यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला आणि १८ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी मराठी साहित्याला नवी दिशा दिली.
अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांनी दलित आणि वंचित घटकांच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि येथील सामाजिक विषमतेवर आवाज उठवला. त्यांच्या कार्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीलाही बळ मिळाले.अण्णाभाऊंनी 'फकिरा', 'वैजयंती ', 'चिखलातील कमळ', 'वारणेचा वाघ' अशा अनेक प्रसिद्ध आणि महत्वाच्या साहित्यकृती मराठी साहित्याला दिल्या. त्यांच्या कार्यामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी 'माझी मैना' सारखी लोकगीतेही लिहिली, जी आजही खूप प्रसिद्ध आहेत.
अण्णाभाऊ साठे यांचे कार्य केवळ साहित्यकृतींपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी समाजसुधारणेसाठीही मोलाचे योगदान दिले. त्यांनी दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला.
आज, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांचे स्मरण करतो आणि त्यांच्या कार्याला आदराने वंदन करतो... "
🙏🙏🙏
❤1
Forwarded from ओम sm शेळके
पंचांग म्हणतं की आपल्या नशिबात जे काही लिहिले आहे तेच आपल्यासोबत घडते मात्र आपली भगवतगीता सांगते की माणसाचं नशीब बदलण्याची ताकद त्यांच्यात कर्ममात असते फक्त या कर्माला प्रामाणिकपणाची जोड असावी लागते कारण आपलं नशीब जरी सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं असलं तरी त्याला सत्यात उतवण्यासाठी आपल्याचं कर्मालाच साक्ष द्यावी लागते म्हणूनचं म्हटलं जातं स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेववा कारण जगातील सर्व गोष्टी बदलू शकतात पण आपण केलेल्या कर्माचं फळं नाही हा नियम लक्षात घेऊन जगण्याचा प्रयत्न करा नक्कीच येणार आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤7
Forwarded from B K
😇✍..बदलत्या जीवनाची सत्ये..✍😇(नक्की वाचा ही विनंती🙏)
संघर्ष,अपयश हे अनाथ पोरके असते पण यश,समृद्धी ह्याचे भागीदार अनेक जण असतात.काहींना आयुष्यभर माणसे ओळखता जमत नाही आपल्यासाठी योग्य कोणती आणि कोणती माणसे फक्त दिखावा करतात हेही दुर्दैव😔..वेळ निघून गेल्यास किंवा दूर गेल्यास एखाद्या मित्राला/मैत्रिणीला त्याच्या खरा मित्राची,शिक्षकाला विद्यार्थ्याची,नात्यांना नात्यांची आणि मुळात म्हणजे माणसांना माणसांची खरी किंमत कळते💯..आयुष्यात समोरच्या व्यक्तीला serious बनवणे खूप सोपे असते परंतु माणुसकीच्या तत्वांवर चालणे अवघड असते...अभ्यासाचे चार पाने वाचून बाजूला करणे वेगळे आणि त्या अभ्यासाच्या पानांवर स्वतःच अस्तित्व निर्माण करणे वेगळे..✍नाव पुसायला(cut करायला)एक क्षण लागतो परंतु नाव कमवायला संबंध आयुष्य कमी पडतं अनेक गोष्टींचा त्याग लागतो..परक्या लोकांमध्ये आपली लोक असतात आणि आपल्यामध्येही परकी लोक असतात..
काही लोक कामापुरती फक्त गोड गोड बोलतात आणि स्वतःचा फायदा झाला की ओळखही बुडवतात.. काहींच्या कठोर स्वभावाताही आपल्यासाठी काळजी,सांत्वन असते,कसोटी पण पारख करण्याची असते..दोन चांगले शब्द,आधाराचे शब्द इतरांना प्रेरणा देऊ शकते😇माणुसकी जागवू शकते आणि तेच दोन चुकीचे शब्द,वागणे वाद निर्माण करू शकतात..इतरांबद्दल टिपणी करायला,negetive बोलायला,जळायला, काने भरायला काही लागत नाही,परंतु तेच आधार द्यायला,मदत करायला,कौतुक करायला मन मात्र खूप मोठं लागतं..🤗आज चांगल केलं लोक प्रशंसा करतील आणि वाईट वेळ आल्यास तेही बदलून जातील काही शुल्लक अपवादही रहातील. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा आयुष्यात जास्त फरक पडायला नको..कारण सत्याने वागत असतो त्याच्या वाट्याला नेहमी दुःखच येते कारण बदल हा नेहमी होतच राहणार वेळ बदलतच जाते आणि वेळेप्रमाणे मित्र,जग,संघर्ष,समाजाचे तुमच्याप्रती विचारही नक्की बदलणारच💯शेवटी श्रृंगारापेक्षा सुविचार आणि सुविचारांपेक्षा संघर्ष माणसाला सुंदर बनवतो..(विचार मांडताना चुकून भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏)
..............🦋🌺😇💞..............
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-
@Bskendre55
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास शेअर करा..🙏✍
👍6❤3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
आठवणीतला झोपळा 🌿
✍️"आमच्या लहानपणी नागपंचमी येण्याच्या 15/20दिवस अगोदरच माझ्या घरासमोर असणाऱ्या लिंबाच्या झाडाला एक सुंदर झोपाळा टांगलेला असायचा.. पंचमीच्या दिवस तर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत फक्त झोपळ्यावर आयुष्य झुलत राहायचं. पंचमी संपली तरी झोका लवकर सुटतं नव्हता.झोका इतका उंच चढवायचा कि, झाडाच्या फांदीचा पाला तोंडात पकडून आणता आला पाहिजे..पण हळूहळू काळ बदलला, घर बांधण्यासाठी लिंबाच झाडं तोडल्या गेलं.त्यासोबत आमचा झोकाही तुटला तो कायमचा,नंतर मात्र कधी झोपळ्यावर बसून उंच उंच झोके घेण्याचा योग कधी आला नाही.. आता फक्त त्या आठवणी मनात आहे... "
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लिखाण दी. 9ऑगस्ट 2024
प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -:
@ABCs1432
मो. नं -8806379959
❤4👌1