नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from ओम sm शेळके
आमचाही एक जमाना होता
बालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे ,  सायकलने/ बसने  पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी
भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.
     🤪 
पास / नापास हेच
आम्हाला  कळत होतं...
टक्केचा आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.
😛

शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण  "ढ" असं
हीणवलं जायचं...

🤣🤣🤣

पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता...

☺️☺️
कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं.

😁

दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव असायचा...

🤗

वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि  विकत घेण्यात  आम्हाला काहीही लाज वाटत नसे.

🤪
आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.  

😞

कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...

🥸😎

सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन
उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा
'ईगो' कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला 'ईगो' काय असतो हेच माहीत नव्हतं...

🧐😝

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, 'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून......

😜

बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने  वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.

😁

आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे. सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो.
दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.

😁

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला
#आय_लव_यू' म्हणणं माहीतच नव्हतं...

😌

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही 'काय माहीत....?'
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले ते मित्र,
कुठे हरवलेत ते...!

😇

आम्ही जगात कुठेही  असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो........

🙃

भाकरी आणि कालवनाशिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला  जगायला मदत करतायत.

जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी  काहीच तुलना होणार नाही.,,,,,,,,

😌

आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही
एक
#जमाना' होता.....👍🏻

कोणी लिहलं माहिती नाही पण खरंच खूप छान लिहिले राव👍🏻💯☝🏻
❤10👍2👌1
Forwarded from ओम sm शेळके
आपलं आयुष्य पूर्ण का?? संकटाने भरलेलं आहे असं प्रत्येकाला वाटतं मात्र तो जो या आलेल्या संकटाकडे एक संधी म्हणून बघतो त्यालाच खरं जीवनाचं महत्त्व प्राप्त होतं बाकी आपल्याकडे सर्व काही असून पण आपण निराश होऊन बसतो आणि तो आपली परिस्थिती मान्य करतो त्या व्यक्तीकडे खूप काही कमी असून पण तो सुखानं जगू शकतो कारण त्याला चांगलंच माहिती असतं की जे आहे त्यात समाधान मानलं की जे आपल्या जवळ नाही त्याच दुःख अजिबात होत नाही,,,💯 बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke
❤3🎉1
Forwarded from B K
प्रत्येकांनी वेळ काढून नक्की पूर्ण वाचा✍..ज्यांना तुम्ही पटत नाहीत तुमचे विचार पटत नाही तुम्ही कितीही काहीही चांगले वागा,यश मिळवा ते चार लोक,मित्र नातेवाईक नाव ठेवणारच कौतुक करायचे सोडून ते इतरांचे कान भरतील..मग भले तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी होवो🤗चांगले वागा शेवटी तुम्हालाच चुकीचे ठरवणारच,त्यामुळे तुमच्या गुणांची तुमची खरी किंमत करणारे लोक खूप कमी असतात😇अशी मंडळी सहसा भेटत नाहीत,पण दुर्दैव भेटली तरी ती लक्षात येत नाही..कारण आजकाल लोक कामापुरता मामा वागतात.स्वतःची गरज, फायदा असेल तेव्हाच समोरच्याशी माणुसकीने वागतात,गोड बोलून काम काढतात गरज संपली की मोबाईल मधला संपर्कही डिलिट करतात,संपर्क तोडतात,मदतीला टाळाटाळ करतात तेही ज्यांनी तुम्हाला वेळेला आधार दिला त्यांनाच लोक तोंडपुढे गोड आणि मागे खोड काढत असतात.काळाच्या ओघात माणसांचा विचारांत मोठा बदल दिसून येतोय.वेळूनुसार अनेक जण बदलतात,पण खरे तुमचे हितचिंतक वेळेनुसार बदलत नाही ते वाईट वेळेला तुमच्यासोबत उभे राहतात(भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏)
....🦋🌺😇💞....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
👍
👍5
*Bad Patch (कठीण काळ) - एक संघर्ष...* 🔥📈✔️

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,

व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,

पैशांची बिकट  वाट लागते...नड येते

आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो,
काय करतो,
काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते.  हा वाईट काळ प्रत्येकाला   काही शिकवून जातो.

यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

संघर्षातून  जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!! *तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही*. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
*तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो* तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः  "कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
              
मी गरीब आहे. पैसा नाही,हे नाही, ते नाही म्हणत *जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.* स्वतःला मजबुत करा,मजबुर नाही.
             
ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण *ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते.....*
              
चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.मान, सन्मान, इगो,मोठेपणा,अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच
             
संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका....
स्वताच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा..

Credit goes to Writer 🌼🙏
❤17👌4🎉1
@natemanache

      नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला... कारण सतत मागच्या गोष्टींचा विचार करत राहिलात, तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असतो...
      लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही... कारण पाठीमागे लोकं तर राजाला सुध्दा शिव्या देत असतात...
     प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच... काळाच्या ओघात सगळ्या गोष्टींवर उपाय सापडतो... त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो...
     स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरांविषयीचे मत बनवू नका... कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटांची तुम्हाला कल्पना नसते...
     अतिविचार करीत बसू नका... काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात... कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील...
     तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात... आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका... पोट दुखेपर्यंत हसा... लक्षात ठेवा, जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला (ठेवलेला) नाही....
      सुंदर डोळ्यांसाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टींकडेच पहा... सुंदर ओठांसाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा... कधीही आपण एकटे नाही, याची जाणीव ठेवा... आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंदाने जगा...
     कधीकधी केराचा डबाही आपल्याला मनापेक्षा बरा वाटतो... कारण तो दिवसातून एकदा का होईना निदान रिकामा तरी होतो...
     आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो... काय मिळवतो यातून आपण?... आपणच स्वतःचे दुःख वाढवत राहतो... घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो... त्या ज्या गोष्टीमुळे घडल्या त्यांचा पुढे आपणच तिरस्कार करतो...
     आता केराच्या डब्यासारखंच दररोज आपलं मनही साफ करायचं... जुने दु:ख विसरून सारे नवीन स्वीकारायचे... नव्या सुखांना त्यात आनंदाने भरायचं...
      सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं... स्वतः नेहमीच आनंदी रहायचं... आणि दुसर्‍यांनाही आनंदी ठेवायचं...

      *एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा... आपलं मन साफ ठेवा, कुणाबद्दल राग, द्वेष, सुडबुद्धी, तिटकारा, आकस, ठेऊ नका मग पहा आयुष्यात काहीच चुकीचं घडणार नाही, आणि आयुष्य देखील सुंदर होईल.*
👌11❤3
आपुलकीचे चार शब्द,
मनापासुन बोलता आले की,
आयुष्यात हितचिंतकांची,
कमतरता भासत नाही.

घड्याळाच्या गजरापेक्षा,
ज्यांना जबाबदारी जागं करते,
ती माणसे आयुष्यात,
योग्य दिशेने पावलं टाकत असतात.

सुखाच्या शोधात,
लोक आयुष्यभर वणवण फिरतात.
दमल्यावर जाणीव होते,
समाधानातच सुख आहे...

Good Night 🌃
❤3👏3
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा✍..अनेक वर्षाचा संघर्ष संतुष्टात आला,आपण विश्वविजेता झालो🇮🇳अनेक खेळाडूंची मेहनतीला फळ आले..जगाला भारतीय महिलांनी दाखवून दिले"भारत की नारी सबसे भारी"🔥संघाने खूप चढउतार पाहिले, अनेकांकडून टीकाही करण्यात आली😳टीकांकडे लक्ष न देता मेहनत करणे,एक दिवस आपलाही येतो हे संघाने दाखवून दिले💪ह्या विजयाने क्रिकेट क्षेत्रात आमूलाग्र बदल घडेल,महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार🫡आपले कर्म करत रहायचे God's plan ने कधी नशीब साथ देतील सांगता येत नाही😇ह्याचे उदाहरण म्हणजे शेफाली वर्मा..संघामध्ये नसून एका दुखपतीपमुळे ती अनवधानाने संघात आली आणि अंतिम सामन्यात उत्तम फलंदाजी आणि मोक्याच्या वेळी उत्तम गोलंदाजीही करत विजयचा शिल्पकार बनली🤗नशीब,वेळ बदलतात फक्त संयम लागतो..हा विजय फक्त एक संघाचा नसून पूर्ण देशाच्या स्वप्नांचा जीवाचे रान करणाऱ्या प्रशिक्षक अमोल मजुमदार सरांचा🇮🇳पडदा माघील कलाकारांनाही विसरून चालणार नाही त्यांचे योगदानही महत्वाचे..एक स्वप्नपूर्ती☺️सर्व संघाला व देशाला हार्दिक शुभेच्छा🇮🇳
.....🦋🌺😇💞.....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
👍
👏4❤3
🎊🍥🎊🍥🍥🎊🍥🍥🎊🍥🎊
*जगायचं कुणासाठी...?*

माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो?, कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी  ६०/७० वर्षांचे आयुष्य जगायचा, आता ७०/८० वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं...आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १५/२० दिवसांपुरतीच असते...  कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं..

*सर्वांनी आवश्य वाचावे धन्यवाद* . 
*मग...जगावं तरी कुणासाठी? ..*

तर...जगावं तर ते समाजासाठी...  तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमच करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात... करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा... समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय...

*खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो.  पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत... यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी, आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.*.


आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही... पण समाजासाठी झटणारे साधुसंत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचच झाल तर आताच दोन दिवसांपूर्वी आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केले ते संत  गाडगेबाबा... काय होतं त्यांच्याकडे...  *फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा...पैश्याचा तर विषयच नव्हता...चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं*. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. *पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.*

आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तुत्ववान व्हावं प्रत्येकाने


*एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका.* 
ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय...तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही... म्हातारे झाल्यावर आई-बाप काम काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं...

बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील... या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?....

*समाजासाठी जगा...*
*दान-धर्म करा, भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या... फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही.*

      *येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे...*

Credit goes to Writer 🌼 🙏
❤3👌3👍2
Forwarded from ओम sm शेळके
प्रेम हे प्रेम असतं मात्र प्रत्येकासाठी ते सेम नसतं काहींसाठी तो एका बाजूने धरलेला नेम असतो तर काहींना तो फक्त एक स्वतःच्या करमणुकीसाठी खेळला जाणारा गेम वाटतो,,माझं काही चुकलं असेल piz🙏🏻माफ करा पण आपली परिस्थिती ओळखून प्रेम करा कारण प्रेमात यशस्वी होण्यासाठी फक्त मनाची नाही तर बाकी सर्व गोष्टीची आवश्यकता असते म्हणूनचं आपल्या एयपतीत राहून प्रेम करा नाही तर त्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from ओम sm शेळके
देवा तू खरचं ही सुंदर सुष्ठी निर्माण केली पण माझ्यामते तू एका ठिकाणी चुकला ते म्हणजे परिस्थिती नसलेल्या व्यक्तीला पण तू एक मन दिलं कारण ज्याची परिस्थिती नाही त्याच्या मनाला समाजात काडी मात्र किंमत नाही आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे कारण माणसाच्या मनापेक्षा त्याच्याकडे असलेल्या धनाला खूप जास्त महत्त्व दिले जाते आहे आणि हीच गोष्ट माणसातील माणुसकी मारायला कारणीभूत ठरत आहे सुंदर दिसण्यापेक्षा मनाने छान असणं खूप उत्तम पर्याय असतो कारण हल्ली माणूस सर्वात उत्तम दिसण्याच्या नांदतात स्वतःचं अस्तित्व धोक्यात घालत आहे राव!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
👍6
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
विद्यार्थी दिवस...🎯🎖️
"7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस यानिमित्त जगातील एक आदर्श विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन... व समस्त विद्यार्थ्यांना विद्यार्थी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..."🎖️🎯
👍6🔥1👏1
Forwarded from ओम sm शेळके
देव ना सतत आपली परीक्षा घेत राहतो आपण आताचे उत्तर कसे देतो यावरून तो पुढचा प्रश्न निर्माण करत असतो मात्र या परीक्षेचा निकाल सरतेशेवटी लागतं असतो म्हणूनचं आलेल्या प्रश्नांच उत्तर सुटसुटीत लिहिले की येणारा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतो बाकी आयुष्य खूपचं सुंदर आहे राव फक्त ते तितक्याच सुंदररित्या जगता यायला हवं बस!,,,

एकमन#लेखक
@Ommshelke
👌4❤3
आज क्षणभर
का कुणास ठाऊक ?
आज क्षणभर थांबावसं वाटतं.
हरवलं मन,
पुन्हा शोधावसं वाटतं.
अशांत हे मन, शांत करावसं वाटतं.
होऊन अपेक्षाशुन्य, चिंतामुक्त व्हावस वाटतं.
थांबवून धडपड सारी,
आज स्तब्ध व्हावस वाटतं.
भरल्यापोटी,
शांत निजावसं वाटतं.
आज जन्म आणि मृत्यु, अंतर विसरावसं वाटतं.
का कुणास ठाऊक ?
थोडसं प्रेम, आज स्वतः वर करावसं वाटतं !

©विलास नि. खंडाळे
❤8
@natemanache

आयुष्याचे प्रश्न सुटता सुटत नाही
दुसऱ्यांना शोधता शोधता
स्वतःला कधी विसरले
हेच आठवतच नाही
जाणारे निघून गेले आयुष्यातुन
मी मात्र तिथेच आहे
माझ्या ओळखीची ती पहाट सापडत नाही
रस्ता दिसतो आहे पण वाट सापडत नाही...
❤7👍2👌1
Forwarded from Rajvardhan Yadav
*जपानी लोक भारतीयांना घरी का बोलावत नाहीत?- "एका अभ्यासू परदेशी राहणाऱ्या व्यक्तीच्या लेखणीतुन..🇯🇵🇮🇳*

जपानमध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ राहणाऱ्या एका भारतीयाने एक गोष्ट पाहिली..
त्याचे जपानी मित्र अतिशय नम्र, सभ्य आणि मदत करणारे होते,
पण त्यातील एकानेही त्याला कधी घरी बोलावले नाही..
ना चहासाठी, ना साध्या भेटीसाठी.
तो भारतीय थोडा आश्चर्यचकित झाला आणि दुखावला गेला.
एके दिवशी त्याने आपल्या एका जपानी मित्राला विचारले,
“तुम्ही इतके चांगले, प्रेमळ आहात… तरीही मला का कधीच घरी बोलावत नाही?”

त्या जपानी मित्राने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं –
“आम्हाला भारतीय इतिहास शिकवला जातो पण प्रेरणा म्हणून नाही,
तर सजगता म्हणून.”
तो भारतीय थक्क झाला..
“सजगता? भारतीय इतिहास सावधानतेसाठी शिकवला जातो? का?”
जपानी मित्र म्हणाला,
“सांग बरं, इंग्रज जेव्हा भारतात राज्य करत होते, तेव्हा किती इंग्रज असतील?”
भारतीय म्हणाला, “कदाचित... दहा हजार?”
जपानीने गंभीर चेहऱ्याने मान हलवली,
आणि विचारलं “आणि त्या वेळी भारतात किती भारतीयांची संख्या किती होती?”
“सुमारे ३० कोटी,” भारतीय म्हणाला.
जपानी शांतपणे म्हणाला
“मग सांगा, अत्याचार कोणी केला?
भारतीयांवर चाबकाचे फटके कोणी मारले?
गोळ्या कोणी झाडल्या?”
तो पुढे म्हणाला
“जेव्हा जनरल डायरने जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश दिला,
ट्रिगर कोणी दाबला? इंग्रज सैनिकांनी?
नाही.. ते भारतीय सैनिकच होते.”

“कोणत्याही भारतीयाने जनरल डायरकडे बंदूक का उगारली नाही? एकाने पण का नाही?”

“तुम्ही ज्याला गुलामी म्हणता,
ती शरीराची नव्हती,ती आत्म्याची होती.”
भारतीय गप्प उभा राहिला, डोळ्यात पाणी.
जपानी मित्र पुढे म्हणाला
“मध्य आशियातून आलेले मुगल किती होते? काही हजार?
आणि तरी त्यांनी शतकानुशतके राज्य केलं.
ते बलाच्या जोरावर नव्हे,
तर तुमच्याच लोकांच्या नम्रतेवर, त्यांच्या विश्वासघातावर.”
“तुमच्याच लोकांनी धर्म बदलला,
तुमच्याच लोकांनी आपल्या बहिणींचं, मुलींचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं.
तुमच्याच लोकांनी तुमचे नायक इंग्रजांच्या हाती दिले.

चंद्रशेखर आझाद कुठे लपले आहेत हे इंग्रजांना कोणी सांगितलं?
भगतसिंहांना फाशी देणं इतकं सोपं होते का? पण तुमच्याच लोकांनी पाठ फिरवली"
---
“तुम्हाला बाहेरून शत्रूंची गरजच नाही.
तुमचे स्वतःचे लोकच सत्तेसाठी, पदासाठी,
थोड्याशा फायद्यासाठी तुम्हाला वारंवार धोका देतात.
म्हणूनच आम्ही भारतीयांपासून थोडं अंतर ठेवतो.”

“जेव्हा इंग्रज हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आले,
तेव्हा एकाही स्थानिकाने त्यांच्या सैन्यात प्रवेश केला नाही.
पण भारतात?
तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती झालात,त्यांची सेवा केली,
त्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्याच लोकांना मारलं.”

“आणि आजही तुम्ही बदलले नाही. थोडीशी मोफत वीज,
एक बाटली दारू, एक चादर दिली की..
तुमचा मत, तुमची आत्मा,
सगळं विकत घेता येतं.”
“तुमची निष्ठा देशाशी नाही,
तर तुमच्या पोटाशी आहे.”
“तुम्ही घोषणा देता, आंदोलन करता,पण जेव्हा देशाला तुमच्या त्यागाची गरज असते,
तेव्हा तुम्ही कुठे असता?

तुमची पहिली निष्ठा अजूनही
तुमचे घर, कुटुंब आणि पैशाशीच आहे देश आणि धर्म नंतर.”
इतकं बोलून तो जपानी शांतपणे निघून गेला,
आणि तो भारतीय तिथेच उभा राहिला..
डोळ्यांत लाज, मनात वेदना आणि विचारांचा समुद्र.*- 😔🇮🇳
(वेळ काढून नक्की वाचा स्वतःला स्वतःची लाज नक्की वाटेल). #copy write Rajvardhan yadav-patil
👌11❤5👍2
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा..✍️जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो,तेव्हा आपल्यासाठीही नियती काहीतरी कळतनकळत चांगले लिहित असते💯..फक्त विश्वास ठेवायला हवा..आपण कुणाचे वाकडे केले नाही तर आपलेही वाईट होणार नाही..कर्माचा हिशोब आणि सिद्धांताला कोणीही अपवाद नाही..हिरण्यकशाप ह्यांनी स्वतःच्या मुलाला त्रास दिला,देवाचे नाव राज्यात घ्यायला बंदी केली..आपल्या शक्तीचा,वरदानचा गैरवापर करू लागला..भगवान विष्णूने नृसिंह चा अवतार घेऊन भक्त प्रल्हादाला वाचवले🙏..आपण सच्चे असलो आपली भक्ती निष्ठावान असली की आपले वाईट होत नाही अशा वेळेस बहुधा नशिबाचे पारडेही आपल्याकडे झुकते असते..आपण आज जे इतरांसोबत वागतो,टोचून बोलतो, खाली खेचतो,इतरांवर जळतो भविष्यात आपल्यासोबतही तसे घडण्याची शक्यता असते..कर्म कुणालाही चुकत नाही हे त्रिकाल सत्य नाकारता येत नाही..
.....🦋🌺😇💞.....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
👌5❤1👍1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे…

प्रेम म्हणजे फक्त
भेटणं, बोलणं,
कॉल-मेसेज करणं नाही गं…
ते बंधन नाही,
ते तर एक अदृश्य धागा आहे —
जिथं शब्द संपतात,
पण भावना अजूनही श्वास घेत राहतात…

कसं सांगू तुला सखे,
प्रेम म्हणजे उपस्थिती नव्हे,
ती एक अंतःकरणातली शांत स्पंदनं असतात,
जिचा स्पर्श होत नाही,
पण ती मनाच्या खोल कप्प्यात ऊब देते…

सखे, तू समोर नसलीस तरी,
मनाच्या प्रत्येक धडधडीत तू आहेस,
तुझ्या हसण्यात माझं आभाळ उजळतं,
आणि तुझ्या शांततेत माझं जग निवांत होतं…

प्रेम म्हणजे नेहमी मिळणं नसतं,
कधी कधी हरवूनही
एकमेकांत राहणं असतं…

आणि तसंच मी जगतो सखे —
तुझ्या आठवणीत,
तुझ्या नावात,
तुझ्या न बोललेल्या भावनांत…

सखे, शब्दांविना… अपेक्षांविना…
फक्त मनापासून,
मी आजही, सदैव,
तुझाच आहे… ❤️

✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
📞 Mo. 7798150143
❤3