Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
बाबासाहेब.. 💙
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार इथल्या प्रत्येक समाजासाठी आहेतं आणि त्यांच कार्य सुद्धा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.. पण दुर्दैव हेच आहे की,आपण महापुरुषांना सुद्धा जातीत वाटून टाकलं,त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बौध्द समाज सोडून इतरांनी फारसे वाचले नाही.. ते इतरांपर्यंत पोहोचण खूप आवश्यक आहे..बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका!संघटित व्हा!!संघर्ष करा!!!हा मुलमंत्र प्रत्येकाने ध्यानी घेतला तर नक्कीच प्रत्येक समाज प्रगती करेल..."
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दि. 1जानेवारी 2026
फोटो -शौर्य दिवस रुईखेड (मा )ता. जि. बुलढाणा
✍️संपर्क - @ABCs1432

👏1
Forwarded from Vinayak Bhise
सखे,
मी भांडखोर आहे ना गं…
थोडा हट्टी,
थोडा जास्तच रागीट…
हे मान्य करायला
मलाच फार उशीर झाला
कळत–नकळत,
अगदी क्षुल्लक गोष्टींवर
तुझ्याशी शब्द उगारतो मी,
जणू राग माझा नाही
आणि त्याचं कारण
तूच आहेस, असंभासवतो
वेळ पाहत नाही,
काळ पाहत नाही,
तुझ्या डोळ्यांतली शांतता
माझ्या चढलेल्या
आवाजाखाली
मीच चिरडतो
सखे,
मी भांडखोर आहे ना गं…
पण ऐक ना,
हे भांडण तुझ्याशी नाही,
माझ्या आतल्या
असहाय्य,
थकलेल्या मनाशी आहे
तू गप्प बसतेस
तेव्हाच कळतं मला,
मी जिंकलो नाही
मी हरलोय…
कारण रागाच्या भरात
मी तुलाच दुखावतो,
सखे…
मी तुलाच रडवतो
माफ कर सखे,
माझ्या शब्दांना नाही,
माझ्या मनाला शिकव
तुझ्याशी भांडायचं नसतं,
तुला जपायचं असतं
कारण
तू माझा राग नाहीस,
तू माझं शांत होणं आहेस
सखे,
तू फक्त प्रेम नाहीस
माझा जीव आहेस गं…
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#सखे
#VinayakBhise
#Baramati
#मराठीलेखक
#मराठीकविता
#PoetLife
#WriterMarathi
मी भांडखोर आहे ना गं…
थोडा हट्टी,
थोडा जास्तच रागीट…
हे मान्य करायला
मलाच फार उशीर झाला
कळत–नकळत,
अगदी क्षुल्लक गोष्टींवर
तुझ्याशी शब्द उगारतो मी,
जणू राग माझा नाही
आणि त्याचं कारण
तूच आहेस, असंभासवतो
वेळ पाहत नाही,
काळ पाहत नाही,
तुझ्या डोळ्यांतली शांतता
माझ्या चढलेल्या
आवाजाखाली
मीच चिरडतो
सखे,
मी भांडखोर आहे ना गं…
पण ऐक ना,
हे भांडण तुझ्याशी नाही,
माझ्या आतल्या
असहाय्य,
थकलेल्या मनाशी आहे
तू गप्प बसतेस
तेव्हाच कळतं मला,
मी जिंकलो नाही
मी हरलोय…
कारण रागाच्या भरात
मी तुलाच दुखावतो,
सखे…
मी तुलाच रडवतो
माफ कर सखे,
माझ्या शब्दांना नाही,
माझ्या मनाला शिकव
तुझ्याशी भांडायचं नसतं,
तुला जपायचं असतं
कारण
तू माझा राग नाहीस,
तू माझं शांत होणं आहेस
सखे,
तू फक्त प्रेम नाहीस
माझा जीव आहेस गं…
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#सखे
#VinayakBhise
#Baramati
#मराठीलेखक
#मराठीकविता
#PoetLife
#WriterMarathi
❤6
Forwarded from ओम sm शेळके
दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून स्वतःकडे कधीच बघण्याचा प्रयत्न करू नका कारण तसा केला तर स्वतःचं जगणं कुठं तरी राहून जाईल म्हणजे प्रत्येकाच्या दुष्टीने आपण कुठं ना कुठं तरी चुकतं असतो म्हणून स्वतःमध्ये एवढं गुंतून जा की कोण काय म्हणतं याकडे लक्ष पण जाणार नाही कारण तुमच्या चुकीत तुम्हाला सल्ला द्यायला खूप लोक उभे राहतात पण तुमच्या कडून चूक का झाली हे समजून घ्यायला कोणीच पुढे येत नाही ही खरी वस्तूस्थिती मान्य करा आणि स्वतः मध्ये खुश राहा बाकी जग तुम्हाला दुःखी करायला आहेस की!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌2
Forwarded from Vinayak Bhise
बाप म्हणजे देवांचा देव असतो…
पण
या देशात
देवांना मान आहे,
आणि
बापाला किंमत नाही
हा देव
तुझ्या सणात नाही,
तुझ्या पोस्टरात नाही,
तो आहे
कामाच्या रांगेत,
फाटलेल्या चपलेत,
कर्जाच्या ओझ्यातच असतो
देवासाठी
घंटा वाजतो,
बापासाठी
घड्याळाचा काटा वाजतो
“उशीर झाला तर पगार कापला जातो”
देवाला प्रसाद,
बापाला उरलेलं…
देवाला चूक माफ,
बापाला
चूक करायचीही
परवानगी नाही
फक्त शिक्षा
त्याच्या अंगावरचा घाम
तुला असभ्य वाटतो,
पण
त्याच घामातून
तू माणूस बनलास, रे
देव कधी
स्वतःची स्वप्नं
गळा दाबून मारतो का
देव कधी म्हणतो का
“माझं आयुष्य संपलं तरी चालेल,
पण पोराचं भल व्हायला हवं”
माझा बाप म्हणतो…
आणि तरीही
तो देव नाही म्हणे?
अरे समाजा,
तू देवासाठी
हात जोडतोस,
आणि
बापासाठी
हात उगारतोस
म्हणून जीव तोडून सांगतो
बाप म्हणजे देवांचा देव असतो
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#बाप
#बापम्हणजेदेव
#बापासाठी
#वडील
#मराठीकविता
#मराठीलेखन
#मराठीकविता
#VinayakBhise
पण
या देशात
देवांना मान आहे,
आणि
बापाला किंमत नाही
हा देव
तुझ्या सणात नाही,
तुझ्या पोस्टरात नाही,
तो आहे
कामाच्या रांगेत,
फाटलेल्या चपलेत,
कर्जाच्या ओझ्यातच असतो
देवासाठी
घंटा वाजतो,
बापासाठी
घड्याळाचा काटा वाजतो
“उशीर झाला तर पगार कापला जातो”
देवाला प्रसाद,
बापाला उरलेलं…
देवाला चूक माफ,
बापाला
चूक करायचीही
परवानगी नाही
फक्त शिक्षा
त्याच्या अंगावरचा घाम
तुला असभ्य वाटतो,
पण
त्याच घामातून
तू माणूस बनलास, रे
देव कधी
स्वतःची स्वप्नं
गळा दाबून मारतो का
देव कधी म्हणतो का
“माझं आयुष्य संपलं तरी चालेल,
पण पोराचं भल व्हायला हवं”
माझा बाप म्हणतो…
आणि तरीही
तो देव नाही म्हणे?
अरे समाजा,
तू देवासाठी
हात जोडतोस,
आणि
बापासाठी
हात उगारतोस
म्हणून जीव तोडून सांगतो
बाप म्हणजे देवांचा देव असतो
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#बाप
#बापम्हणजेदेव
#बापासाठी
#वडील
#मराठीकविता
#मराठीलेखन
#मराठीकविता
#VinayakBhise
❤11🔥2
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे…
श्रावणबाळ होऊनी
मला आई-बापाची
सेवा करायची आहे,
त्यांच्या थकलेल्या श्वासांना
माझा श्वास आधार व्हावा म्हणून
ऐक ना सखे…
आई जेव्हा
डोळे पुसत हसते,
ते हसू माझ्या आयुष्याचं
सगळ्यात मोठं यश असावं
ऐक ना सखे…
प्रभू श्रीरामासारखं
आज्ञाधारी पुत्र बनायचं आहे,
जो बापाच्या एका शब्दावर
स्वतःचं सुख, स्वप्न,
सगळं बाजूला ठेवेल,
कर्तव्य म्हणून
कधीही तक्रार न करणारा
ऐक ना सखे…
रावणासारखा बहिणीसाठी
सर्वस्व पणाला लावणारा व्हायचं आहे,
जग विरुद्ध उभं राहिलं तरी
तिच्या अश्रूंना
एकटं पडू देणार नाही असा
ऐक ना सखे…
आणि लक्ष्मणासारखा
प्रभू श्रीरामासोबत
भाऊ म्हणून
कायम सोबत राहणारा,
सावलीसारखा
दिसत नसला तरी
कधीही दूर न जाणारा
देव व्हायचं नाही मला सखे,
फक्त
आई-बापासाठी
श्रावणबाळ,
बहिणीसाठी
रावण,
आणि भावासाठी
लक्ष्मण
म्हणून
माणूस राहायचं आहे…
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मराठीकविता
#मराठीलेखन
#viralpost
#विनायकभिसे
श्रावणबाळ होऊनी
मला आई-बापाची
सेवा करायची आहे,
त्यांच्या थकलेल्या श्वासांना
माझा श्वास आधार व्हावा म्हणून
ऐक ना सखे…
आई जेव्हा
डोळे पुसत हसते,
ते हसू माझ्या आयुष्याचं
सगळ्यात मोठं यश असावं
ऐक ना सखे…
प्रभू श्रीरामासारखं
आज्ञाधारी पुत्र बनायचं आहे,
जो बापाच्या एका शब्दावर
स्वतःचं सुख, स्वप्न,
सगळं बाजूला ठेवेल,
कर्तव्य म्हणून
कधीही तक्रार न करणारा
ऐक ना सखे…
रावणासारखा बहिणीसाठी
सर्वस्व पणाला लावणारा व्हायचं आहे,
जग विरुद्ध उभं राहिलं तरी
तिच्या अश्रूंना
एकटं पडू देणार नाही असा
ऐक ना सखे…
आणि लक्ष्मणासारखा
प्रभू श्रीरामासोबत
भाऊ म्हणून
कायम सोबत राहणारा,
सावलीसारखा
दिसत नसला तरी
कधीही दूर न जाणारा
देव व्हायचं नाही मला सखे,
फक्त
आई-बापासाठी
श्रावणबाळ,
बहिणीसाठी
रावण,
आणि भावासाठी
लक्ष्मण
म्हणून
माणूस राहायचं आहे…
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मराठीकविता
#मराठीलेखन
#viralpost
#विनायकभिसे
❤4
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
फातिमा शेख यांची आज १९५ वी जयंती आहे.
सावित्रीमाई फुले यांच्या खांद्याला खांदा देत या माऊलीने स्त्री शिक्षणाचा पाया या देशात रचला.फातिमा शेख यांच्या बंधूंनी म्हणजेच उस्मान शेख यांनी,महात्मा फुले यांना शाळेसाठी सर्वात प्रथम आपली जागा दिली,आणि या देशात स्त्री शिक्षणाचं नव युग सुरू झाले.
सावित्रीमाईंच्या सोबत फातिमा शेख यांनी देखील शेणगोळे खात या देशात स्त्री मुक्तीच्या पहाटेसाठी स्वतःला झोकून दिले होते.
सावित्रीमाई फुले आणि फातिमा शेख ही जोडी मला हिंदू मुस्लिम एकतेचे,या देशाच्या संस्कृतीची ओळख वाटते.सावित्रीमाई यांच्या इतकेच फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा,अस माझं मत आहे.
फातिमा शेख यांच्या प्रेरक स्मृतीस विनम्र अभिवादन..!

❤1
Forwarded from ओम sm शेळके
आपण जसं जीवन जगतो ना तसं जीवन जगण्याचं कित्येकाच स्वप्न असतं मात्र
कोणाला आपल्या परिस्थिती मुळे जगता येत नाही तर कोणाला जबाबदारी मुळे पण आपण आपल्या जीवनाबद्दल खूप उदास असतो जे आपल्याकडे आहे त्यात सुख न मानता मात्र जे आपल्याकडे नाही त्याच उगाच टेन्शन घेत फिरतो आणि याचं एका चुकीमुळे आयुष्यातील सर्व आनंद गमावून बसतो बरोबर ना!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
कोणाला आपल्या परिस्थिती मुळे जगता येत नाही तर कोणाला जबाबदारी मुळे पण आपण आपल्या जीवनाबद्दल खूप उदास असतो जे आपल्याकडे आहे त्यात सुख न मानता मात्र जे आपल्याकडे नाही त्याच उगाच टेन्शन घेत फिरतो आणि याचं एका चुकीमुळे आयुष्यातील सर्व आनंद गमावून बसतो बरोबर ना!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे…
सारा खेळ या मनाचा आहे गं,
मन माझं आता माझं नाही गं…
सारं तुझंच ऐकतं,
कसं सांगू तुला
क्षणात हसवतं,
क्षणात रडवतं
कधी तुझ्या आठवणींवर
हसत–हसत जगायला शिकवतं,
तर कधी त्याच
आठवणींच्या ओझ्याखाली
डोळ्यांत पाणी आणून
गप्प बसवतं
मन आहे गं सखे,
ना त्याला नियम कळतात,
ना कारणांची गरज असते
फक्त तू जवळ नाहीस,
एवढंच त्याला पुरेसं असतं
वेदना व्हायला
आणि तरीही गं सखे,
हाच मनाचा खेळ
तुझ्या एका हसण्यात
सगळं विसरून
पुन्हा…
पुन्हा जगायला शिकवत
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#सखे
#VinayakBhise
#Baramati
#मराठीलेखक
#मराठीकविता
#PoetLife
#WriterMarathi
सारा खेळ या मनाचा आहे गं,
मन माझं आता माझं नाही गं…
सारं तुझंच ऐकतं,
कसं सांगू तुला
क्षणात हसवतं,
क्षणात रडवतं
कधी तुझ्या आठवणींवर
हसत–हसत जगायला शिकवतं,
तर कधी त्याच
आठवणींच्या ओझ्याखाली
डोळ्यांत पाणी आणून
गप्प बसवतं
मन आहे गं सखे,
ना त्याला नियम कळतात,
ना कारणांची गरज असते
फक्त तू जवळ नाहीस,
एवढंच त्याला पुरेसं असतं
वेदना व्हायला
आणि तरीही गं सखे,
हाच मनाचा खेळ
तुझ्या एका हसण्यात
सगळं विसरून
पुन्हा…
पुन्हा जगायला शिकवत
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#सखे
#VinayakBhise
#Baramati
#मराठीलेखक
#मराठीकविता
#PoetLife
#WriterMarathi
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
दुर्मिळ झाडं..
"काळाच्या ओघात अनेक झाडं, पक्षी, प्राणी दुर्मिळ होतं आहे.. उन्हाळ्यात ज्याची मधुर फळ खाल्ली जातात आणि ज्याच्या गोडंब्या /चारोळ्या फोडून मुलं खातात ती चाराची झाडं आता दिसेनासे झाले आहे.. नुकतच शिशिर ऋतूतं फुलून गेलेलं हे चोरोळीच झाडं बघून आनंद वाटला..."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
फोटो -चारोळीच झाडं
✍️संपर्क-@ABCs1432

🥰3👍2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
राष्ट्रमाता...
✍️ "महाराष्ट्राच्या भूमीत ज्यांनी स्वराज्याचा बिजरोपण केलं...
लाख मुलखाचा हा प्रदेश ज्यांनी एकत्र आणत मराठी माणसाच्या रक्तात स्वाभिमान जागवला....
त्या स्वराज्यनिर्मात्या, राजमाता जिजाऊ माँसाहेब,याच्या पावन स्मुर्तीस त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...!
कोटी कोटी प्रणाम...
🙏🙏🙏💐💐💐💐
✍️ *ABCs Diaries 📚

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा..✍
आपण सर्व भारतीय खरंच खूप धन्य आहोत ज्या पवित्र मातीत अनेक शुरवीर जन्म घेतात.त्यापैकी एक म्हणजे राजमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद होय.ह्या दोन्हीही महापुरुषांशिवाय भारताचा इतिहास नेहमी अपूर्णच असेल🫡माता जिजाऊ ह्यांनी शिवबा ह्यांना घडवून स्वराज्य तर निर्माण केलेच परंतु वेळ प्रसंगी हातात तलवार घेऊन त्या स्वतःही लढल्या आणि आई कशी असावी ह्याचा आदर्श जगासमोर निर्माण केला.त्यांचाच जडघडणीतून छ.शिवाजी महाराजांनी व छ.संभाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना झाली.स्वामी विवेकानंद ह्यांनी जीवनभर आपले राष्ट्र,संस्कृती🚩ह्यांचा प्रसार जगविख्यात केला.त्यांचे विचार घेऊन आजही अनेक युवक प्रेरित होतात. भारतमातेचा पुत्र कसा असावा आणि राष्ट्रासाठी संबंध जीवन कसे खर्चावे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद..ह्या दोन्हीही महापुरुषांच्या योगदानामुळे आपली संस्कृती आजही जीवंत आहे अशा थोर राष्ट्रपुरुषांना विनम्र अभिवादन🙏💐आजचा दिवस म्हणजे भारतीयांसाठी सुवर्णदिवस होय.
....🦋🌺😇💞....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा

❤3
माणसांसाठी वेळ देणं हे नुसतं कर्तव्य नाही, तर आयुष्याची गुंतवणूक असते. आपण त्यांना दिलेले काही क्षण त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी ऊब निर्माण करतात. कारण नाती हे बोलण्याने नव्हे, तर साथ देण्याने टिकतात. कितीही कामं असली, कितीही धावपळ असली, तरी आपल्या लोकांसाठी थोडं थांबणं गरजेचं असतं—नाहीतर एक दिवस असा येतो की कामं तर असतात, पण ज्यांच्यासाठी करतो ती माणसंच हातातून निसटतात. आणि मग उरते फक्त वेळ… पण त्याला देण्यासाठी कोणीच नसतं. म्हणूनच—ज्यांना आपल्या मनात स्थान आहे, त्यांना आपल्या दिवसातून थोडं स्थान देणं विसरू नका. नाती जपली तर वेळ आपोआप सुंदर होतो, आणि माणसं जपली तर आयुष्य...
Good Night ✨
Good Night ✨
❤7
Forwarded from ओम sm शेळके
हल्ली ना माणसांची ओळख त्याच्यांकडे असलेल्या पैशांवरून होते ना की त्यांच्या स्वभावावरून व हीच आजच्या काळाची सर्वात मोठी शोकांतिका आहे आणि यामुळे लोकांची एकमेकांकडे पाहण्याची मानसिकता बदलून गेली आहे हे कुठं तरी थांबायला हवं माणसाने माणसाकडे एक माणूस म्हणुच बघायला हवं कारण तुमच्याकडे असलेला पैसा फक्त तुम्हाला सुख देऊ शकतो मात्र तुमचं दुःख ऐकून घ्यायला कोणीतरी आपलं असावं लागतं,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
❤4🥰1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
डॉ. बाबासाहेब...आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर...
✍️ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः च एक विद्यापीठ होते, कारण एका विद्यापीठाचे सर्व अभ्यासक्रम होतील इतकं शिक्षण एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनीच घेतलं होतं..म्हणून अश्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव एखाद्या विद्यापीठाला दिल्या गेलं असेल तर ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...!
सप्रेम जयभीम🙏🙏 💙
✍️ ABCs Diaries 📚
14जानेवारी नामविस्तार दिवस
💙💙💙💙💙

@natemanache
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल...
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल...
👍8👌3