Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना गं सखे…
आज म्हणे महिलादिन आहे…
रस्त्यावर पोस्टर लागलेत,
मोठमोठी भाषणं चाललीत,
आणि मंचावर
तुझ्या सन्मानाच्या टाळ्या वाजतायत…
एवढंच नाही सखे
फेसबुकवर पोस्ट टाकतील,
इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपला स्टेटस लावतील,
तुझ्यासोबत फोटो काढून
सोशल मीडियावर टाकतील
आणि म्हणतील
“महिला दिनाच्या शुभेच्छा”
पण सखे…
त्या टाळ्यांचा आवाज
तुझ्या अंतर्मनापर्यंत
खरंच पोहोचतो का गं?
कारण तिथं अजूनही
तुझ्या पावलांवर
परंपरेची बेडी आहे…
तुझ्या आवाजावर
“लोक काय म्हणतील?”
याचं कुलूप आहे…
ऐक ना सखे…
आज म्हणे
“स्त्री शक्ती”चा जयघोष आहे,
पण कालच
एका मुलीचं स्वप्न
हुंड्याच्या जाळात जळून गेलं…
कालच
एखाद्या आईने
तिच्या पोटच्या लेकरासाठी
स्वतःचं आयुष्य गहाण ठेवलं…
आणि कालच
एखाद्या बहिणीने
रस्त्यावरच्या नजरा सहन करत
डोळ्यातली भीती
ओठांवर लपवली…
सखे…
इथं अजूनही
तुझं आयुष्य
फक्त दोन शब्दांत मोजलं जातं
“इज्जत” आणि “संस्कार”…
आणि हे दोन्ही शब्द
नेहमीच
तुझ्या गळ्यातील
फास बनतात…
ऐक ना गं सखे…
आज महिलादिन म्हणून
फुलं देतील तुला,
फोटो काढतील,
स्टेटस टाकतील…
पण उद्या
तू आवाज उठवलास तर
तेच लोक म्हणतील
“बाईने एवढं बोलायचं नसतं…”
हीच तर सखे
या समाजाची
सगळ्यात मोठी विडंबना आहे…
म्हणून आज
महिलादिनाच्या शुभेच्छा
देणार नाही मी…
आज फक्त एवढंच म्हणेन
ज्या दिवशी
तुझ्या भीतीचा शेवट होईल…
ज्या दिवशी
तुझ्या स्वप्नांना परवानगी लागणार नाही…
आणि ज्या दिवशी
तुझ्या अश्रूंना लाज मानलं जाणार नाही…
त्या दिवशीच
खरं महिलादिन उगवेल सखे…
✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#महिलादिन2026 #स्त्रीशक्ती #स्त्रीस्वातंत्र्य #नारीशक्ती #स्त्रीमान #महिलाअधिकार #ऐकनासखे#मनविद्रोही
#विद्रोहीकविता #मराठीकविता
#मराठीलेखन #मराठीकवी
#सामाजिककविता #कडूसत्य
#वेदनाआणिविद्रोह #सामाजिकजाणीव
#Vinayakbhise

❤4
Forwarded from B K
नक्की पुर्ण वाचा...✍😇
महिला म्हणजे नेमके काय..
'म' म्हणजे महान असे कर्तृत्व,
'ही' हिम्मतवान असे नेतृत्व व
'ला'म्हणजे लाखात एक असणारे मायेचे मातृत्व(आई)
स्त्री म्हणजे आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व..राष्ट्रमाता जिजाऊ पासून ते ऑपरेशन सिंदुर🇮🇳मधील सक्रीय सहभाग घेतल्याला आजच्या पिढीतील स्त्रीयांनी जगाला दाखवून दिले आहे आजची स्त्री कुठेही मागे नाही💪🏻वेळप्रसंगी ज्या हाताने ती अन्न बनवते त्याच हातात तलवार घेऊन झाशीची राणी बनते,छ शिवाजी महाराज घडवणारी जिजामाता होते..सावित्रीबाई बनून समाजाला साक्षर बनवते,सिंधुताई बनून अनाथांची माय बनते❤🔥चागलं शिक्षण घेऊन मोठी अधिकारी बनते,उत्तम खेळाडू बनते🫡मुक्ताई बनून भावाला साथ देते,राधा बनून जगाला मैत्रीचा अर्थ सांगते..तीला कमी समजून तिच्या क्षमता बंदिस्त करू शकत नाही,गरज असते ती फक्त तिच्या पंखांना बळ देण्याची,तिला आधार देण्याची कारण ती अनेक पिढ्या घडवते🔥
Happy women's day😇👍महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा✍
........🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा

❤3👍2👏1
Forwarded from B K
नक्की शेवटपर्यंत पुर्ण वाचा....😇✍️👉🏻
जे मोजके का असेना असे लोक जे आपली किंमत करतात,निस्वार्थपणे आपल्या सोबत उभे असतात,वेळ देतात त्यांना किंमत दिली नाहीतर "एकदा गळाले की रत्न गळाले,त्यासम दुसरे मिळत नाही..!"आयुष्यात खुप मोठी किंमत चुकवावी लागते कारण कर्म कुणालाच चुकत नसतात..💯कोणी वेळेला लगेच हजर राहत असेल,माणुसकी दाखवत असेल तो त्याचा दुबळेपणा नसून त्याचे वैशिष्ट्यही असू शकते😊..म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला बाकी कामे नाहीत किंवा रिकामटेकडा असेल,फरक एवढाच की तो तुमच्या चांगुलपणाला,तुमच्या व्यक्तिमत्वाला प्राधान्य देतो..😇कारण तो व्यक्ती त्या वाईट वेळेची किंमत जाणतो आणि कदाचित त्याला हेही माहीत असते आयुष्यात कोणताही चांगली गोष्ट,मित्र,व्यक्ती मिळविण्यापेक्षा गमावण्याची भीती जास्त असते,कारण कोणत्याही चांगल्या गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत व त्या गमावल्यास परत कधीच मिळू शकत नाहीत..!💯(भावना दुखवल्यास क्षमस्व🙏)
.....🦋🌺😇💞.....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा

❤12
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
"प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक दृष्टिकोनाने आणि कृतज्ञ मनाने करावी..........!
प्रत्येक माणुस हा त्याच्या --त्याच्या जागेवर योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थिती मुळे बदललेली मनस्थिती..........!
अहंकार हा तुमचा शत्रू आहे त्यामुळे तुमची लोकप्रियता आणि विवेकबुद्धी नष्ट करते..........!
ज्ञानाचं मुल्य तेंव्हाच कळते जेंव्हा ते अहंकाराविना वापरले जाते.........!
आपल्या मधे ""करूणा"" असु द्या
""आवेश"" नाही
कारण
ढगांच्या पावसाने""फुल"" उमलतात त्याच्या ""गर्जनेने"" नाही...
तुमचा आणि तुमच्या
परिवाराचा आजचा
दिवस प्रसन्नतेने भरलेला
आणि मंगलमय राहो......."
☘️🍁☘️🍁☘️

❤4👌2👏1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
गुढीपाडवा... 🚩🚩
" मराठी नववर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना आजपासून सुरु होतोय आजपासून मराठी नववर्ष सुरु होतंय.खरतरं गुढीपाडवा हा वसंत ऋतूतल्या चैतन्याचा उत्सव आहे चैत्र महिन्यात झाडाला नवी पालवी फुटते व निसर्गात एक नावीन्य येतं.. गुढी हे विजयाच प्रतिक आहे.. इ. सं. 78मध्ये शक राजाचा विजयाच ते प्रतिक मानल्या जातं.. मराठी संत साहित्यातहीं गुढीपाडव्याचा उल्लेख आढळतो.. अनेक लोकं संभाजी राजेच्या हत्येशी ह्या सणाला जोडतात पण त्याला पुरेसे संदर्भ नाही.. संभाजी राजाच्या जन्माच्या शेकडो वर्षअगोदर पासून महाराष्ट्रभर गुढी उभारली गेली आहे..आणि गुढीपाडवा साजरा होतं आहे.. समस्त मराठी जनास गुढीपाडव्याच्या व मराठी नवंवर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. हे मराठी नवंवर्ष आपणास आनंद, सुख, आणि भरभराटीच जावो हिच सदिच्छा...!" 🚩🚩🚩
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक,कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
✍️संपर्क - @ABCs1432

👏4❤1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे…
आज गुढीपाडवा…
दारात गुढी उभी, कापड फडकतंय,
लोक म्हणतात “नवं वर्ष आलं”
आणि आनंदाचा गजर करतात…
पण सखे…
माझ्या घरात आजही
त्या गुढीपेक्षा उंच एक सावली उभी आहे
माझा बाप…
हातात डब्याची तीच जुनी पिशवी,
पायात घासलेली चप्पल,
आणि चेहऱ्यावर जबाबदाऱ्यांचा थकवा…
तो आजही कामावर निघालाय गं…
ना त्याला सण,
ना त्याला उत्सव…
त्याच्यासाठी प्रत्येक दिवस
फक्त “पोटासाठीची लढाई” असतो…
जग म्हणतं “नवं वर्ष”
पण त्याचं वर्ष कधी बदलतच नाही सखे…
काल जसं कष्ट केलं,
आजही तेच…
आणि उद्याही तेच…
गुढी उभी करतात लोक
विजयाचं प्रतीक म्हणून…
पण सखे…
खरा विजय तर तो रोज मिळवतो
भूक हरवून, थकवा गिळून,
आयुष्याशी दोन हात करून…
त्याच्या घामाच्या वासात
आपल्या सणांचा सुगंध दडलेला असतो…
आणि त्याच्या फाटलेल्या हातात
आपल्या स्वप्नांची श्रीमंती…
सखे…
दारातली गुढी उंच असेल,
पण माझ्यासाठी खरी गुढी
माझा बापच आहे गं…
कारण ती गुढी
फक्त एक दिवस उभी राहते…
पण माझा बाप
उनातान्हात , वादळात, पावसात
खंबीरपणे आयुष्यभर उभाच असतो…
✍️ विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#ऐकनासखे #गुढीपाडवा #बाप #बापलेक #मराठीकविता #मनविद्रोही #विनायकभिसे #मराठीलेखन #मराठीशब्द #मराठीमन #कष्टकरी #शेतकरी #कामगार #बापाचंप्रेम #मराठीसंस्कृती #मराठीविचार #भावनिक #काळजालाभिडणार #सत्यकथा #जीवनसंघर्ष

❤1🔥1