कधी कधी वाटतं, जर शेवटी दूरच जायचं होतं तर इतकं जवळ यायची गरजच काय होती...
उगाच कोणाच्या आयुष्यात येऊन त्याला आपल्या बोलण्याची, आपल्या मेसेजची, आपल्या उपस्थितीची सवय लावायची आणि मग हळूहळू दूर व्हायचं... हे खूप दुखतं.
कारण प्रेमापेक्षा सवय जास्त त्रास देते. प्रेमात माणूस रडतो, पण सवयीत माणूस रोज थोडा थोडा तुटत जातो. दिवसात हजार कामं असली तरी मन त्या एका मेसेजची वाट बघत राहतं. फोन वाजला की क्षणभर वाटतं, "कदाचित त्यांचा मेसेज असेल..." आणि पुन्हा निराशा पदरात पडते.
आणि खरंच, कोणी इतकं busy नसतं की त्याच्याकडे ५ मिनिटंसुद्धा नसतात. शेवटी वेळ नसतो असं नाही, फक्त आपल्यासाठी वेळ नसतो. कारण वेळेपेक्षा priority जास्त महत्त्वाची असते.
सगळ्यात जास्त वेदना तेव्हा होतात, जेव्हा आपण कोणासाठी दिवसातील काही क्षण जपून ठेवतो, पण त्यांच्या दिवसात आपल्यासाठी एक क्षणही राखून ठेवलेला नसतो.
मग हळूहळू बोलणं कमी होतं, सवयी बदलतात, आणि नातं तिथेच राहतं... फक्त त्यातली माणसं बदलून जातात.
काही जखमा शब्दांनी होत नाहीत, त्या दुर्लक्षाने होतात. आणि त्या इतक्या खोल असतात की समोरची व्यक्ती सोबत नसतानाही तिची आठवण रोज आपल्यासोबत जगत राहते.
Fwd from A.H.Patil✨

👌4😢1
आधी तासनतास बोलायचो आपण... वेळ कसा जायचा तेही कळायचं नाही. दिवसाची सुरुवात आणि शेवट एकमेकांच्या बोलण्याने व्हायचा. एक मेसेज आला नाही तरी काळजी वाटायची. एक कॉल झाला नाही तर दिवस अपुरा वाटायचा.
पण मग हळूहळू सगळं बदलत गेलं...
आधी रिप्लाय यायला काही सेकंद लागायचे, आता तास लागतात. आधी कारण नसतानाही कॉल यायचे, आता कारण असूनही होत नाहीत. आधी "झोपलीस का?" विचारणारी व्यक्ती, आता पूर्ण दिवस गेला तरी "कशी आहेस?" हेही विचारत नाही.
आणि सगळ्यात जास्त वेदना कशाची होते माहीत आहे?
दूर जाण्याची नाही...
तर हे पाहण्याची की ज्या व्यक्तीला एकेकाळी आपल्याशिवाय दिवस पूर्ण होत नव्हता, तीच व्यक्ती आता आपल्याशिवाय अगदी व्यवस्थित जगते आहे.
जर शेवटी असंच अनोळखी व्हायचं होतं, तर इतकं जवळ यायची गरज काय होती?
उगाच कोणाच्या आयुष्यात येऊन त्याला आपल्या सवयीचा कैदी बनवू नका. कारण तुम्ही पुढे निघून जाता, पण मागे राहिलेली व्यक्ती रोज तुमच्या आठवणींसोबत जगत असते.
जिथे कोणीतरी तुमच्या एका मेसेजसाठी फोनकडे बघत बसतं... प्रत्येक notification ला तुमचं नाव शोधतं... रात्री झोपण्यापूर्वी शेवटचा विचार तुमचाच करतं... आणि सकाळी उठल्यावर पहिली अपेक्षा तुमच्याच मेसेजची ठेवतं...
हे माहिती असूनही जर तुम्ही शांत राहत असाल, तर ती फक्त व्यस्तता नसते... तो निर्णय असतो.
कारण खरंच, कोणी इतकं busy नसतं की त्याच्याकडे ५ मिनिटं नसतात. शेवटी वेळ नसतो असं नाही, फक्त त्या वेळेत आपली जागा उरलेली नसते.
आणि एक दिवस...
ती व्यक्तीही वाट बघणं सोडून देते. मेसेज तपासणं सोडून देते. अपेक्षा करणं सोडून देते.
पण त्या दिवशी नातं संपत नाही...
त्या दिवशी मरते ती आशा, की "कदाचित उद्या सगळं पूर्वीसारखं होईल."
आणि जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवणं बंद करते ना, तेव्हा समजून घ्या की तिचं प्रेम नाही संपलेलं...
ती फक्त आतून पूर्णपणे तुटलेली असते.
मग एक दिवस ती खरंच निघून जाते...
भांडून नाही, रागाने नाही, तक्रार करून नाही...
तर शांतपणे.
कारण काही लोकांना आपली किंमत आपण त्यांच्या आयुष्यात असताना कधीच कळत नाही... ती त्यांना तेव्हा कळते, जेव्हा आपण कायमचे नसतो.
Fwd from Kavya K✨

😢4❤1
परत येण्याची वेळ
आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास परत फिरण्याची तयारी सुरू करा आपल्याकडे असलेल्या जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉल्स्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते परत येणे कधीच सोपे नसते एक माणूस राजाकडे गेला म्हणाला मी गरीब आहे माझ्याकडे काहीही नाही मला मदतीची आवश्यकता आहे राजा दयाळू होता त्याने विचारले तुला कोणत्या मदतीची आवश्यकता आहे माणूस म्हणाला कसायला थोडी जमीन द्या राजा म्हणाला उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये तु चालु शकशील धावु शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल परंतु लक्षात ठेव जिथुन धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल अन्यथा काहीही मिळणार नाही माणूस खुष झाला तो सूर्योदय होताच पळायला लागला पळत राहीला सूर्य माथ्यावर चढला होता पण माणूस धावयचं थांबला नाही अजून थोडी मेहनत मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती
संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं त्याला परत यावं लागेल नाहीतर त्याला काही मिळणार नाही त्याने पाहिले की तो खुप दूर आला आहे आता परत यायचे होते सूर्य पश्चिमेकडे वळला होता तो थकला होता. परत पोहोचायचे होते पण वेळ वेगाने निघुन जात होती अजून थोडी मेहनत न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला पण आता श्वास घेणं कठिण झालं होतं तो खाली पडला आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला राजा हे सर्व पहात होता तो त्याच्या सहकार्यांसह तिथे पोहोचला त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला याला फक्त सात फुट जमीन हवी होती बिचारा काही कारण नसताना इतका पळत होता आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत ला ठेवून विचार करा आपण तीच चूक करीत नाही ना आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत
आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही आणि जेव्हा आम्ही परत येण्याची तयारी करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो आजपर्यंत मी कुठे पोहचलो मला कुठे जायचे आहे मला किती दिवसात पोहोचायचे आहे जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे हे माहित नाही थोडं थांबा आजुबाजुला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचं राहुन गेलाय
किमान आज या एका क्षणापुरतं खुष व्हा...

❤7👌2
Forwarded from B K
"आयुष्याच्या चित्रपटातील खरे हिरो"(नक्की पूर्ण वाचा✍)
आजही हातावर मोजण्या एवढी का असेना समाजासाठी,राष्ट्राच्या प्रगतीसाठी,विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणारे माणसे आहेत जे सर्वस्व पणाला लाऊन झगडत असतात,पण दुर्दैव हेच की त्याचे महत्व वेळेत उमगत नाही.देशाचे भविष्य म्हणजे युवा पिढी व त्यांचे शैक्षणिक क्षेत्र..ह्याच युवापिढीचे प्रश्न,समस्यांची कैफियत जर कोणी मांडत असेल तर ते आपल्यासाठी चित्रपटातील हिरोपेक्षा कमी नाहीत✍अशा खऱ्याखुऱ्या हिरोच्या कार्याला कशी दाद द्यायची?हे स्वतः ठरवण्याची वेळ आली आहे..कोणतेही सकारात्मक बदल घडून आणायचे झाल्यास मतभेद,राजकीय मुद्दे बाजूला ठेवून,सुरवात जरी व्यक्तिक असली तरी त्याचा समर्थनासाठी एकजुटीची गरज असते.तेव्हा कुठे ह्या देशातील जनसामान्यांचे,युवापिढीचे प्रश्न सोडवले जातील,तेव्हाच खऱ्या अर्थाने भारताची विकसित देश म्हणून वाटचाल होईल.सोनम वांगचुक सरांचा लढा हा गरीब विद्यार्थ्यांसाठी,देशाच्या भविष्यासाठी,त्यांच्या न्यायासाठी आहे.कार्याला सलाम🇮🇳
.......🦋🌺✍🙏.......
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

❤4
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
पुस्तकाची किंमत..
“अलीकडच्या काळात एका विद्यार्थ्यांने मला ही दोन पुस्तकं दिली. खरतर ही पुस्तकं जुनी आहेत त्या विद्यार्थ्यांने ही वाचली पण त्याला यातलं काही समजलं नसावं.. त्याला एका मुलाने सांगितलं की, “ही पुस्तकं तूझ्या काही कामी नाही तू हे चव्हाण सरला दे!”आणि त्याने ही पुस्तकं माझ्याकडे दिली.. खरं सांगायचं तर ह्या पुस्तकाची माझ्या पेक्षा अधिक कोणीच जाणू शकतं नाही.. कधी काळ असा होता की, अशी पुस्तकं घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे,असे पुस्तकं मला विकत घ्यावं वाटतं होते पण पैसेच नसल्याने ते विकत घेता आले नाही.. पर्यायाने कधी कधी मला स्पर्धा परीक्षेत अपयशाला समोर जावं लागलं.. पण आता वेळ अशी आली की,कधीकाळ पुस्तकं घेण्यासाठी पैसे नसणारा मी माझी स्वतः ची स्वालिखित चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालीत आणि माझी पुस्तकं आता लोकं विकत घेत आहे.. आता पाचवे पुस्तकं सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आलं आहे.. खरच पुस्तकाची किंमत त्यालाच समजू शकते जो ज्ञान आणि शिक्षणाच मूल्य जाणतो.. ही पुस्तकं माझ्यासाठी खूप किंमती आहे.. मला ही पुस्तकं देणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचे आभार.”
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक )

❤3😢2
Forwarded from B K
"लॉर्डचा राजाची यशोगाथा"(नक्की पूर्ण वाचा✍)
जेव्हा तुमच्या अस्तित्वावर प्रश्न,शंका उपस्थित केल्या जातात तेव्हा त्याला कसे टोलवायचे हे रोहित शर्माने आपल्या खेळातून दर्शवले🔥संघर्षाच्या काळात कसे मैदानावर खंबीर उभे राहायचे व बाहेर चालू असलेल्या तुमच्याबद्दलच्या चर्चेला स्वकार्यातून कसे शांततेत उत्तर द्यायचे हे शिकवले💪दडपणाखाली तर सर्वच व्यक्ती(खेळाडू)जातात पण त्यातून जो स्वतःचा मार्ग तयार करून पुढे जातो तोच खरा खेळाड🫡इतरांना लाजवेल अशी त्यांची खेळी.सोपे नसते बाहेर एवढ्या तुफान चर्चा चालू असताना स्वतःला त्या गोष्टींपासून दूर ठेवून आपल्या कार्यावर लक्ष बिंबवून चालणे✍हे कार्य कठीण आहे पण अशक्यही नाही हे दाखवून दिली आणि लॉर्डच्या मैदानावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये शतका झळकवण्याच्या पहिला मानही मिळवला..संघर्षात दम असेल तर इतिहासालाही आपली नोंद घ्यावी लागते🔥हे दिमाखात यश मिळवल्यासारखेच..हेच खरे प्रतिउत्तर त्या सर्व शंकांचे जे ध्येयापासून दूर करतात..खरंच हा प्रवास खूप काही शिकवून जातो!
......🦋🌺✍🙏.....
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
जेव्हा तुमच्या अस्तित्वावर प्रश्न,शंका उपस्थित केल्या जातात तेव्हा त्याला कसे टोलवायचे हे रोहित शर्माने आपल्या खेळातून दर्शवले🔥संघर्षाच्या काळात कसे मैदानावर खंबीर उभे राहायचे व बाहेर चालू असलेल्या तुमच्याबद्दलच्या चर्चेला स्वकार्यातून कसे शांततेत उत्तर द्यायचे हे शिकवले💪दडपणाखाली तर सर्वच व्यक्ती(खेळाडू)जातात पण त्यातून जो स्वतःचा मार्ग तयार करून पुढे जातो तोच खरा खेळाड🫡इतरांना लाजवेल अशी त्यांची खेळी.सोपे नसते बाहेर एवढ्या तुफान चर्चा चालू असताना स्वतःला त्या गोष्टींपासून दूर ठेवून आपल्या कार्यावर लक्ष बिंबवून चालणे✍हे कार्य कठीण आहे पण अशक्यही नाही हे दाखवून दिली आणि लॉर्डच्या मैदानावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये शतका झळकवण्याच्या पहिला मानही मिळवला..संघर्षात दम असेल तर इतिहासालाही आपली नोंद घ्यावी लागते🔥हे दिमाखात यश मिळवल्यासारखेच..हेच खरे प्रतिउत्तर त्या सर्व शंकांचे जे ध्येयापासून दूर करतात..खरंच हा प्रवास खूप काही शिकवून जातो!
......🦋🌺✍🙏.....
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
🔥3
# भावना – मनाचा निःशब्द आवाज
"भावना" हा शब्द जरी लहान असला, तरी त्याचा अर्थ संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारा आहे. माणूस हा फक्त विचार करणारा प्राणी नाही, तर तो भावना जगणारा प्राणी आहे. प्रत्येक हसू, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक शब्दामागे एखादी भावना दडलेली असते. भावना दिसत नाहीत, पण त्या प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देतात.
आनंद, दुःख, प्रेम, राग, भीती, आशा, निराशा, मत्सर, अभिमान, कृतज्ञता – या सर्व भावना मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. प्रत्येक भावना आपल्याला काहीतरी शिकवून जाते. आनंद आपल्याला जगण्याची उमेद देतो, दुःख आपल्याला मजबूत बनवते, अपयश संयम शिकवते, तर प्रेम निःस्वार्थपणे जगण्याचा अर्थ समजावते.
काही भावना शब्दांत व्यक्त होतात, तर काही डोळ्यांतून वाहतात. काही भावना हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या असतात, तर काही शांततेतही स्पष्ट ऐकू येतात. अनेकदा माणूस "मी ठीक आहे" असे म्हणतो, पण त्याच्या मनात भावनांचं मोठं वादळ सुरू असतं. म्हणूनच एखाद्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या भावनांना समजून घेणे अधिक महत्त्वाचे असते.
आजच्या धावपळीच्या जगात माणूस यशाच्या मागे धावताना स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करू लागला आहे. भावना दाबून ठेवण्याची सवय वाढत चालली आहे. परंतु दडपलेल्या भावना एका दिवसात नाहीशा होत नाहीत; त्या मनात साचत राहतात आणि हळूहळू मानसिक ताण, एकटेपणा आणि अस्वस्थतेचे कारण बनतात. त्यामुळे आपल्या भावना स्वीकारणे, त्या योग्य प्रकारे व्यक्त करणे आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे ही मानसिक आरोग्याची पहिली पायरी आहे.
खऱ्या अर्थाने मजबूत तोच असतो जो स्वतःच्या भावना ओळखतो, त्यांना स्वीकारतो आणि त्यांच्यावर संयमाने मात करतो. भावना कमकुवतपणाचे नव्हे, तर माणूसपणाचे प्रतीक आहेत. ज्याच्या मनात भावना जिवंत असतात, त्याच्यात माणुसकी जिवंत असते.
शेवटी, जीवन हे फक्त श्वास घेण्याचे नाव नाही; तर प्रत्येक भावना मनापासून अनुभवत जगण्याचे नाव आहे. कारण भावना नसतील, तर आयुष्य जगता येईल कदाचित... पण ते कधीच अनुभवता येणार नाही...

❤2👌1
भावना महत्त्वाच्या की सत्यस्थितीला महत्त्व द्यावे?
माणसाच्या आयुष्यात भावना आणि सत्यस्थिती या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भावना आपल्या मनाला दिशा देतात, तर सत्यस्थिती आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. अनेकदा आपण या दोन्हींच्या संघर्षात अडकतो. अशा वेळी प्रश्न पडतो—भावनांना महत्त्व द्यावे की सत्यस्थितीला?
भावना माणसाला माणूस बनवतात. प्रेम, माया, जिव्हाळा, विश्वास आणि सहानुभूती यांमुळे नाती टिकून राहतात. जर आयुष्यात फक्त तर्क आणि वास्तव असेल, पण भावना नसतील, तर नात्यांमध्ये उब राहणार नाही. एखाद्याच्या वेदना समजून घेण्यासाठी केवळ सत्य पुरेसे नसते; त्यासाठी संवेदनशील मनही आवश्यक असते.
परंतु प्रत्येक निर्णय फक्त भावनांच्या आधारावर घेतला, तर त्याचे परिणाम नेहमीच योग्य असतील असे नाही. भावना क्षणभंगुर असू शकतात. रागाच्या भरात घेतलेला निर्णय, अती प्रेमापोटी केलेला त्याग किंवा भीतीमुळे सोडून दिलेली संधी—हे सर्व पुढे पश्चात्तापाचे कारण ठरू शकते. म्हणूनच सत्यस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.
सत्यस्थिती कधीकधी कठोर असते, पण ती वास्तव असते. वास्तवाकडे दुर्लक्ष करून फक्त भावनांमध्ये जगल्यास आपण स्वतःलाच फसवू शकतो. उदाहरणार्थ, एखादे नाते केवळ भावनिक जडणघडणीमुळे टिकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात सतत अपमान, अविश्वास किंवा अन्याय असेल, तर वास्तव स्वीकारणेच योग्य ठरते. सत्य कडू असले तरी तेच पुढे जाण्याचा मार्ग दाखवते.
याचा अर्थ भावना निरर्थक आहेत, असा नाही. भावना आणि सत्यस्थिती यांचा समतोल साधणे हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. भावना आपल्याला मानवता शिकवतात, तर सत्यस्थिती आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. भावना हृदयाचा आवाज असतात आणि सत्यस्थिती विवेकाचा. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना हृदय आणि बुद्धी यांचा संवाद होणे आवश्यक आहे; संघर्ष नव्हे.
शेवटी, भावना आणि सत्यस्थिती यांपैकी एकाची निवड करण्यापेक्षा, सत्याचा स्वीकार करताना भावनांचा आदर करणे आणि भावना जपत वास्तवाचा स्वीकार करणे अधिक योग्य आहे. कारण केवळ भावनांवर जगता येत नाही आणि केवळ वास्तवावरही आनंदी राहता येत नाही. संतुलनातच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे.

❤7
Forwarded from B K
"आपल्या भारतमातेची गाथा🇮🇳🫡"
(नक्की पूर्ण वाचा,स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटासा प्रयत्न✍🇮🇳)
नाही मिळाले हो,आपल्या राष्ट्रास हे स्वातंत्र्यचे दिवस सहजासहज..
क्रांतिकारकांच्या शौर्यापुढे अवघे नतमस्तक झाले इंग्रज!🫡
राष्ट्रासाठी,देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लावली प्राणांची बाजी..
असे ते भारतमातेचे शुरपुत्र मरणाला तोंड दयालाही झाले राजी!😢
असा अनेक धर्मांचा,पंथाचा विविधतेत एकता असलेला देश..
आपण सर्व भारतीयच फक्त प्रांतानुसार वेगळे अन्न,भाषा,वेश!🥰
इतिहासाची अनेक साक्ष,शूरवीरांची,विद्वानांची ही भारतभूमी..
जगात,भारतीय सर्व क्षेत्रात पुढे,कुठेही नाही कमी!🔥
अनेकांच्या अथक प्रयत्नांमुळे,शौर्यामुळे आहुतीमुळे मिळाले आज स्वातंत्र्य..
नेहमी असावी ही देशभक्ती,राष्ट्राला मोठे करण्यासाठी सर्वांमध्ये आणखी असावे ऐक्य!🙏🇮🇳
क्रांतिकारकांच्या शौर्याला,तसेच कृषिक🌿,सैनिकांच्या त्यागाला व प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे देशाचे नाव उंचावणाऱ्या सर्वांना धन्यवाद🇮🇳🙏😇Happy independence day🇮🇳🥰जय हिंद🫡🇮🇳
......🦋🌺✍🙏......
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Cont-7218160575(what's)

❤3👍1
Forwarded from B K
"इंकलाब जिंदाबाद"असे स्वातंत्र्यासाठी नारा लावणारे भगतसिंह हे फक्त क्रांतिकारक नसून एक उत्तम पुस्तकप्रेमीही होते🇮🇳..त्यांच्या शेवटच्या प्रवासात जेल मध्ये असताना त्यांनी अनेक पुस्तके वाचली,लेखनही केले✍त्यांच्या सारख्या विचारवंतांची आज गरज आहे✍,त्यांचे वर्तमानपत्रातील लेखन ब्रिटिशांना वटणीवर आणणारे होते,मनात जे क्रांतिकारक विचार येतात ते कागदावर आणि लोकाच्या मनावर बिंबवण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला,त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून अनेक क्रांत्या घडल्या✍स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारे युवक,"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ हैं मेरी कलम,मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनक़लाब लिखा जाता हैं !असे ठाम विचार मांडणारे,स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर क्रांतिकारक,शहीद भगत सिंह यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏जय हिंद,वंदे मातरम्🇮🇳
........🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा

👍1
Forwarded from B K
"सामन्यांतील असामान्य असे नटसम्राट"..(नक्की पूर्ण वाचा..✍️)
काही व्यक्ति ह्या फक्त पडद्यापुरते कलाकार किंवा हीरो नसून ते आपल्या आयुष्यातही असामान्य हीरो अथवा हिरेच असतात,असे म्हणलं तरीही त्यात काही वावगं ठरणार नाही..!त्या हिर्यांच्या खाणीतील,आपल्या मराठी मातीतील महाराष्ट्रातील एक कोहिनूर हिरे म्हणजे नाना पाटेकर सर हे व्यक्तिमत्त्व हे आपल्याला लाभले होते हे आपलेच सौभाग्य..!🙂
देशसेवेसाठी आपले प्राण पणाला लावणारे नाना ज्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान प्रत्यक्ष सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांसोबत सेवा केली होती.चित्रपटातील एखाद्या देशसेवेच्या पात्राला दाद देण्यासाठी कसे झगडावे हे नानांकडून शिकण्याजोगे..'प्रहार' या चित्रपटातील लष्करी अधिकाऱ्याची (मेजरची) भूमिका साकारण्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराच्या मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये सुमारे ३ वर्षे खडतर लष्करी प्रशिक्षण घेतले होते,ह्यातून त्यांची कर्तव्यदक्ष आणि समर्पणता दिसून येते..🫡
देशसेवेसोबतच त्यांची सामाजिक बांधिलकी,समाजाप्रती असणारी आपुलकी,शेतकर्यांच्या आत्महत्याग्रस्थ कुटुंबांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़े..त्यांच्या सामाजिक विचारांतून एक पेरलेले बीज म्हणजे"नाम फाऊंडेशन"ज्याच्या शाखा दुष्काळी भागातील लोकांना,शेतकर्यांना,महिलांना आजही कठीण काळात उभे राहायला अनेकांना आधार देत असते🫡
हेच त्यांचे वेगळेपण त्यांना सामान्यतून असामान्य बनवत होते,भलेही मग ते कार्य कोणत्याही क्षेत्रातील पडद्यावरील असो की पडद्यामागील किंबहुना त्यांचा खाजगी जीवनातील खूप काही शिकवून जाते..आजच्या दुष्काळी काळात त्यांच्यासारख्या माणसांची गरज होतीच पण काळाचा घाला,नेहेमी उणीव भासेल..भलेही आज ते शरीराने आपल्यात नसतील परंतु त्यांच्या विचारांनी,सामाजिक कार्यांनी जिवंत असणारे,त्यांचे कार्य खरच खूप असामान्य होते म्हणूनच खरेखुरे आपल्यातील असे "नटसम्राट"पुन्हा मिळणे दुर्मीळच....त्यांच्या कार्याला सलाम व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!🫡🙏
.......🦋🌺✍🙏........

भारताचे 'मिसाईल मॅन'🇮🇳...(नक्की पूर्ण वाचा..✍️)
डॉ अब्दुल कलाम ह्यांनी,देशासाठी अर्पण केले स्वतःचे संपूर्ण जीवन..
त्यांचे कार्य राष्ट्रोन्नतीसाठी एवढे की शेवटच्या श्वासापर्यंत दिले समर्पण..!
गरिबीतून,बेताच्या परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी स्वतःला घडवले..
नशीबवान आपण भारतीय,त्यांच्या रुपी आपणास एक राष्ट्रपती मिळाले..!
भारताच्या संशोधन,संरक्षण,अंतराळ,शिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांचे नेतृत्व..
एक महान वैज्ञानिक व 'मिसाईल मॅन' म्हणुन जगभरात त्यांचे महान कर्तुत्व..!
युवकांसाठी ते नेहमी असणार प्रेरणास्थान,कला,साहित्यातही त्यांचे मोलाचे असे योगदान..
त्यांचा राष्ट्रकार्याचा गौरव म्हणून दिला "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान,उंचावली देशानी मान..!
15 ऑक्टोबर ही त्यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरी केली जाते.त्यांच्या कार्याला आणि देशभक्तीला सलाम,जय हिंद..!🇮🇳
.......🦋🌺😇💞.......
शब्दांकन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)

❤2