NEET आणि JEE या परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधल्या कोटा येथे गेलेल्या मुलांपैकी अनेक मुलं कमी मार्क्स घेऊन येतात. तेव्हा त्यांना आपण जणू काय आपल्या पालकांचे गुन्हेगार आहोत, असा अपराधगंड छळत असतो. कोटा शहरात मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या गंभीर चिंतेचा विषय असूनही अनेक मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय पालक मुलांना या चरकात आपणहून ढकलताहेत. या चरकात अडकलेल्या अनेक मुलांमधला जीवनरस संपून त्यांचं पार चिपाड होऊन जातं. दिवसेंदिवस ही समस्या आणखीन उग्ररूप धारण करते आहे. मुलांच्या यशात स्वतःचे यश शोधणारे पालक आपल्या पोटच्या पोरांशी क्रूर वागू लागलेत. आयआयटीमधून शिक्षण लाखांचे पॅकेज किंवा डॉक्टर होऊन दवाखाना थाटणार आणि मग सोंगाढोंगात लग्न कार्य... कथित सामाजिक प्रतिष्ठेपायी आईवडील कसे बहकत चाललेत, याचं प्रत्यंतर सांगलीसारख्या मन विदीर्ण करणाऱ्या विदारक घटनांनी येतं.
जेईई, नीट या पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले तर आणि तरच आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य आहे असे बहुसंख्य पालकांना वाटू लागले आहे. यातूनच तुलना केली जाते. ताण असह्य होऊन किंवा कथित अपयशाची भीती वाटल्याने, मनावर प्रचंड दडपण आल्यामुळे 'आई बाबा मला माफ करा...' अशी नोट लिहून मुलं आत्महत्या करतात अशा बातम्या यायच्या. आता तर पालकच मुलांच्या हत्या करायला लागलेत. करिअरच्या अत्यंत ठोकळेबाज कल्पना अंगी भिनलेले पालक धोकादायक बनले आहेत. हे पालक मुलांच्या जीवनातला आनंद हिरावून घेत राहणार.
मातापित्यांच्या लैंगिक सुखाच्या प्रेरणेतून, नैसर्गिक गरजेतून मुलांचा जन्म होतो. पालकत्व ही जबाबदारी आहे. ती समजून उमजून विचारपूर्वक करायची कृती आहे हे किती पालक लक्षात घेतात? पालक व्हायच्या आधी हे सगळं लग्न झालेल्या दाम्पत्याला नीट समजून सांगितले पाहिजे. आपल्या समाजात पालकत्वाचे कोणतेही शिक्षण नाही. पहिल्या वर्गात प्रवेश घेताना शाळा आणि माध्यम निवडण्यापासून करिअरच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेपर्यंत निर्णय पालक घेतात. पालकांच्या मनातला गोंधळ, संभ्रम नजरेस पडत राहतो. मुलांच्या भविष्याची प्रामाणिक काळजी पालकांना वाटते हे वास्तव नजरेआड करता येत नाही. आपल्या मुलांचं काय होईल? अशी असुरक्षितता पालकांच्या मनात असते. काहीशी ती स्वाभाविकही आहे. अलीकडे मात्र पालकांचं ताळतंत्र सुटत चाललं आहे. या गोंधळाचे वाईट परिणाम मुलांवर होताहेत. याबाबत समाजात जाणीवजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
शासकीय पातळीवर काही होईल अशा अपेक्षा करणे गैर आहे. वाढत चाललेला स्क्रीन टाईम, अकॅडमीक ओव्हरलोड, आकर्षणातून निर्माण होणाऱ्या लैंगिक समस्या, हिंसा आणि व्यसनांचे आकर्षण अशा अनेक गोष्टी आहेत. मुलं ताणात आणि त्रासात आहेत. प्रत्येक माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करण्याची मागणी करूनही सरकार दुर्लक्ष करत आले आहे. कारण अकरावी बारावीचे वर्ग ओस पडलेले आहेत आणि क्लासेस ओसंडून वाहत आहेत. प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना मुलांच्या मनावर मेंदूवर किती ताण येतो, त्यांची मनःस्थिती कशी असते? एकूण शिक्षण, करियर आणि एकूण मानसिक आरोग्याबाबत एखादा अभ्यास केल्यास यातलं भीषण वास्तव समोर येईल.
खलिल जिब्रान म्हणतो "तुमची मुलं तुमच्या पोटी जन्माला आलेली असली तरी ती काळ प्रवाहाची अपत्ये आहेत. तुमचे विचार तुमच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत." वास्तविक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मुलांचा आदर पालकांनी करायला हवा. मात्र अलीकडे पालक मुलांचे मालक झाल्यासारखे वागताना दिसतात.
- भाऊ चासकर
#पालकत्व #समुपदेशन #स्ट्रेस #मानसिक_आरोग्य #शिक्षण #करिअर
(हा मजकूर आपण नावासह शेअर करू शकता.)

InterimAnswerKey_June2025_PI_C.pdf
43.1 KB
InterimAnswerKey_June2025_PI_C.pdf
InterimAnswerKey_June2025_PI_D.pdf
43.5 KB
InterimAnswerKey_June2025_PI_D.pdf
InterimAnswerKey_June2025_PII.pdf
996.6 KB
InterimAnswerKey_June2025_PII.pdf
InterimAnswerKey_June2025_PI_A.pdf
43.1 KB
InterimAnswerKey_June2025_PI_A.pdf
e-Prospectus 2025-26 for Ph.D. programme.pdf
2.6 MB
e-Prospectus 2025-26 for Ph.D. programme.pdf
https://youtu.be/xqwgb3e-h2w
🍀Dear Friends,
🏆Especially for CTET,TET, BEd, MEd, SET, NET, TAIT, All Competative Exams & Good Life Aspirants 🏆
🏆Tops-Personally & Factors Affecting on them 🎉*व्यक्तिमत्त्व व त्यावर परिणाम करणारे घटक* 🍀
🏆Share, Subscribe, Click on 🔔For New Notifications 🙏
©️ Educator's Academy

YouTube
| CTET & TET Guidance Series :- 6 | Personality | व्यक्तिमत्व | Live | Dr Avinash Bhandarkar |
व्याख्याते :-
प्रा. डॉ . अविनाश भांडारकर
M.Sc., Ph.D.(Chem.), M.A.(Hist.), M.Ed., Ph.D., SET (Edu.)

NFSU Ph.D flyer 2025-26 admission.pdf
154.2 KB
NFSU Ph.D flyer 2025-26 admission.pdf