SET/NET/TAIT 2026
8.07K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
*फक्त साधनव्यक्ती असणाऱ्यांसाठी परीक्षा आहे, सर्व शिक्षण सेवक यांना परीक्षा नाही.*

TET ,CTET ,TAIT, PET, NET-SET परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन

https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)
शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचेच🖊️

TET ,CTET ,TAIT, PET, NET-SET परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन

https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)
TET ,CTET ,TAIT, PET, NET-SET परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन

https://whatsapp.com/channel/0029VaC85QkKrWR22mKcFi0e
(# सदर शैक्षणिक चॅनेलच्या माहितीची लिंक आपल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना पाठवावी ही विनंती.)
📌 10%,रिक्त,अपात्र ,गैरहजर या दुसऱ्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जाहिरात अंदाजित 7ते8 हजार होण्याची शक्यता आहे, तसेच 3री टेट 7ते8 हजार स्थानिक स्वराज्य संस्था जागा असतील तसेच खासगी अनुदानित च्या वेगळ्या असण्याची शक्यता आहे

📌 3री टेट डिसेंबर महिन्यात नियोजित

विट्ठल सरगर

@pavitraportal
📌 10%,रिक्त,अपात्र ,गैरहजर या दुसऱ्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जाहिरात अंदाजित 7ते8 हजार होण्याची शक्यता आहे, तसेच 3री टेट 7ते8 हजार स्थानिक स्वराज्य संस्था जागा असतील तसेच खासगी अनुदानित च्या वेगळ्या असण्याची शक्यता आहे

📌 3री टेट डिसेंबर महिन्यात नियोजित



@pavitraportal
Photo from Patineeta
PET-2024_EXEMPTED-DATA-14-09-2024.pdf
1.6 MB
PET-2024_EXEMPTED-DATA-14-09-2024.pdf
🙏 *राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अवलिया शिक्षक : सागर बगाडे* - (व्यक्तिवेध)

*लेखक : विश्वास सुतार

एखाद्या माणसाचे आयुष्य किती संघर्षमय, वेगवान आणि तरीही उन्नतशील असते हे पाहायचे असेल, तर अशा माणसांच्या शोधात राहायला हवं. अशा माणसांना अंतर्बाह्य समजून घ्यायला हवं. कोल्हापुरात असा एक माणूस सापडतो. असाधारण परिस्थितीत जन्माला आलेला हा अवलिया आहे कलाशिक्षक सागर बगाडे. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले आणि सागर बगाडे एकदम प्रकाशझोतात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी साधलेला संवाद पाहून कोल्हापूरकरांसह महाराष्ट्राचा ऊर भरून आला.

*व्यक्तिगत नव्हे; सार्वजनिक जीवन :*
कोल्हापूरकरांसाठी सागर बगाडेंना राष्ट्रपती पुरस्कार मिळणे, हा गौरवाचा आणि आनंदाचा क्षण ठरला. परंतु छपन्न वर्षांच्या आयुष्यभराचा प्रवास या माणसाने कसा केला आहे, हेही समजून घ्यायला हवे. हिमनगाचे टोक आपणास दिसत असते, परंतु तो दिसणारा भाग एक अष्टमांश असतो. अजून सात अष्टमांश भाग समुद्राखाली असतो, जो आपण समजून घ्यायला हवा. असामान्य व्यक्ती अचानक एरंडासारख्या वाढत नसतात. वटवृक्षासारख्या त्या ऊन-पाऊस झेलत वर वाढतात आणि खोलवरही रुजतात. सागर बगाडे हे आता वटवृक्ष झाले आहेत. स्वतः समृद्ध आणि उन्नत होत यशस्वी विद्यार्थ्यांच्या रूपाने अनेक पारंब्या या वटवृक्षाला लागलेल्या दिसतात. राष्ट्रपती पुरस्काराच्या निमित्ताने सागर बगाडे यांचे जीवन आणि कार्य अधोरेखित झाले आहे. त्यांचे संघर्षमय जीवन, कलेची साधना, विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ आणि समाजाप्रतीचे त्यांचे कृतिशील योगदान या सर्वांचे फलित म्हणजे त्यांना मिळालेला राष्ट्रपती पुरस्कार होय. आता सागर बगाडे यांचे जीवन व्यक्तिगत नव्हे; सार्वजनिक झालंय. शुभेच्छा आणि अभिनंदनाच्या वर्षावांनी ते न्हाऊन जात आहेत. या निमित्ताने अनेक चेहऱ्यांचे मुखवटे त्यांच्या समोर येत आहेत. ज्यांनी त्यांना रोखले, टोकले आणि अव्हेरले; असे लोक त्यांना फोन करून त्यांचे कौतुक करत आहेत, गटागटांनी सत्कार करत आहेत. पण सर्वकाही पोटात घेऊन सागर पुढे जात आहेत. शून्य घेऊन आलेल्या सागर यांच्यापुढे येऊन अनेक शून्यांनी त्यांना श्रीमंत केलंय.

*जडण-घडण :*
सागर बगाडे यांचा जन्म सोलापूर रेल्वे स्टेशनच्या फलाटावर झाला. पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात त्यांना व्यवस्थेने दाखल केले. कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा जन्म याच बालकाश्रमात झाला. दोघेही पंढरपुरात नवरंगे आश्रमात वाढले. त्यांचे बालपण तिथे गेले. आपले आई-बाप कोण? असा भंडावणारा प्रश्न त्यांना पडला. पंढरपूर ही जन्मभूमी असली तरी त्यांची कर्मभूमी कोल्हापूर ठरली. दोघेही लोकसंचिताने समृद्ध झाले आणि अनाथांचे नाथ झाले. डॉ. लवटे यांना सागर बगाडे वडीलच मानतात. त्यांना 'दादा' असे संबोधत त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू ठेवण्याचा त्यांचा संकल्प आहे. आज पती-पत्नी आणि मुलासह त्यांचा संसार सुखावह आहे. परंतु ते वंचितांचा संसार उभा करू पाहत आहेत. कलेच्या माध्यमातून एक निरोगी आणि संस्कारशील समाज घडविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील तहसीलदार चित्तरंजन बगाडे आणि सुमन बगाडे या दाम्पत्यानी सागरला दत्तक घेतले. त्याला आपले नाव दिले. बाळ सागर त्यांच्या कुटुंबात रमला. परंतु बगाडे दाम्पत्याचे निधन झाले आणि सागर पुन्हा पोरके झाले. बगाडे कुटुंबातील अन्य सदस्य पालनपोषणाची जबाबदारी टाळू लागले. तो काळ खूपच वेदनादायी आणि मनाला सल देणारा ठरला. कुमार वयात भटकणे सुरू झाले. अनाथपणाचे चटके बसू लागले. सांगलीत अशा वस्तीत राहणे झाले की बिघडण्याचीच संधी अधिक होती. पण शिक्षण घेण्याच्या ओढीने तारले. शालेय अभ्यासात कच्चेपण होते, पण चित्रकलेत गोडी होती. पाटी आणि कागदावर रेषा-रेघोट्या ओढायला आवडायचे. शिक्षकांनी सागर यांचा शिकण्याचा कल ओळखला आणि प्रोत्साहन दिले.

पन्हाळा, चंदगड, कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण सांगलीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये; तर महाविद्यालयीन शिक्षण शांतिनिकेतन, कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात पूर्ण झाले. सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयातून सागर बगाडे यांनी फाईन आर्टचे शिक्षण घेतले आणि सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्स, सावर्डे येथून आर्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला. हे करताना त्यांनी साधी साधी कामे करत पैसे जमा केले. प्रसंगी हॉटेलमध्ये वेटरचेही काम केले.

चित्रकलेबरोबर नृत्यामध्ये त्यांनी खूप गती घेतली. चपळ आणि लवचिक शरीराच्या माध्यमातून ते रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये विजेते होत राहिले. या स्पर्धेमुळे त्यांना मोठा आर्थिक हातभार लागत राहिला. यथावकाश सागर नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. नृत्याचे मोठमोठे प्रकल्प त्यांनी साकारले.
गणेशोत्सवात अनेक कलाकारांना एकत्र आणत वेगवेगळ्या थीम्स त्यांनी यशस्वीपणे सादर केल्या. शिक्षक (मास्तर) म्हणून काम करत असलेल्या सरस्वतीबाई मदनमोहन लोहिया या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन सागर यांनी सामूहिक नृत्याविष्काराचे दोन विश्वविक्रमी उपक्रम सादर केले. सागर यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळा आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या संस्थेचा नावलौकिक झाला.

*'वेडा शिक्षक' नि 'मुलांचा 'मास्तर' :*
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल स्कूल, कोल्हापूर या शाळेत ते कलाशिक्षक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांची स्वतःचीच घडण अधिक झाली, असे ते मानतात. शिक्षकाची विद्यार्थ्यांसोबत स्वतःची घडण होण्यात समृद्धता आणि प्रगल्भता आहे, असे सागर यांच्या विचारांवरून स्पष्ट होते. विद्यार्थी चांगल्या आणि उच्चभ्रू घरातील होते. संस्थेच्या व्यवस्थापनाने त्यांना मोकळीक दिली आणि सागर यांचे कामकाज उत्तम सुरू झाले. परंतु पुढे न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेत अनुदानित पदावर त्यांची निवड झाली आणि ते संस्थेच्या न्यू हायस्कूल या शाखेत कलाशिक्षक म्हणून काम करू लागले. इथे येणारे अधिकतर विद्यार्थी हे सामान्य परिवारातील होते. त्यातच 'बालकल्याण संकुल' या बालकाश्रमातील विद्यार्थीही या शाळेत शिकत होते. ज्यांच्यावर आपल्याला निष्ठेने काम करायचे आहे, असेच विद्यार्थी आपल्या समोर आहेत, हे पाहून सागर पूर्ण क्षमतेने तन, मन अर्पण काम करू लागले. प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी पैसाही खर्चू लागले. विद्यार्थ्यांना रंगसाहित्य पुरवू लागले. कलाशिक्षक असल्याने त्यांना काही मर्यादाही येत होत्या. परंतु या मर्यादा सांभाळत त्यांनी मुलांसाठी काम केले. 'वेडा शिक्षक' म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होऊ लागली.

समूहात काम करीत असताना तुम्ही चाकोरीबाहेर जात वेगळे काही करू पाहाल; तर विशिष्ट समूह तुम्हाला टोकतो. तुमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो. याचा अनुभव चाकोरीबाहेर जात काम करणाऱ्या माणसांना पदोपदी येतो. सागर बगाडे याला अपवाद कसे राहतील? त्यांनाही अडचणी येत राहिल्या. त्या अडचणींवर मात करत ते आपले काम करत राहिले. संस्थेचे व्यवस्थापन त्यांच्या पाठीशी राहिले. समरसून काम करत असलेल्या माणसाला समाज 'वेडा' म्हणतो तेव्हा त्याने समजून जावे की आपले काम योग्य मार्गाने चालू आहे.

सागर यांनी मुलांना आपलेसे करत त्यांच्यातील सुप्त कलागुणांना आविष्कारित केले. त्यांच्यासाठी रात्र अभ्यासिका, टाकाऊ गोष्टींपासून सुंदर सुंदर कलाकृती, पर्यावरण पूरक वस्तूंची निर्मिती अशा विविध उपक्रमांवर भर देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विद्यार्थी सागर यांना 'सर' म्हणण्याऐवजी उत्स्फूर्तपणे 'मास्तर' म्हणू लागले. हे संबोधन सागर यांना आवडते. त्यात त्यांना आपलेपणा वाटतो. आज त्यांचे अनेक विद्यार्थी चित्रकार, शिल्पकार, कॅमेरामन, नृत्य दिग्दर्शक, लेखक, संकलक, वादक म्हणून घडले आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांची चित्र प्रदर्शने आणि नाट्य, नृत्य कार्यशाळा निरनिराळ्या शहरांत होत आहेत. विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन लघुपटांची निर्मिती, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर मोफत व्याख्याने, गडकिल्ले संवर्धन, पदभ्रमंती मोहीम, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम अशा कामांमध्ये सागर बगाडे यांचा सातत्याने पुढाकार राहिला आहे.

*वंचितांसाठी उपक्रम :*
स्वतःच्या अनाथ आयुष्याची सागर बगाडे कधीही ढाल करीत नाहीत. जे काही मिळवायचे ते स्वतःच्या कर्तृत्वावर असा त्यांचा निर्धार आहे. अनाथपण भोगलेल्या सागर यांनी अनाथांप्रती केलेले कृतिशील कार्य लक्षणीय आहे. त्यांनी स्वतः अकरा अनाथ मुलामुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रम, एचआयव्ही बाधित मुले आणि वृद्धाश्रमातील वृद्ध यांना घेऊन गेली चौदा वर्षें ते 'मामाचा गाव' हा रचनात्मक उपक्रम राबवित आहेत. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम सागर बगाडे पुढे नेत आहेत. याचबरोबर कुष्ठरोगी, दिव्यांग, झोपडपट्टी आणि दुर्गम धनगर वाड्यातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही त्यांची नित्य धडपड सुरू असते.

कार्याच्या परिपूर्तीचा आनंद आणि समाधान सागर बगाडे यांना मिळत आहे. ते निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. परंतु त्यांची निवृत्ती ही शासकीय सेवेतील तांत्रिक गोष्ट असणार आहे. कार्यशीलता ही त्यांची उपजत अंत:प्रवृत्ती आहे. त्यामुळे सर्जनशीलतेने ते कार्यरत राहतीलच. कला क्षेत्रात काही करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व कलांची साधना करता यावी, यासाठी निसर्गरम्य परिसरात नवा प्रकल्प सुरू करण्याचा त्यांचा प्राथमिक आराखडा तयार आहे. समाजातील दातृत्वशील व्यक्ती, संस्था आणि शासनाने त्यांच्या प्रकल्पात सहयोग देण्याची अपेक्षा आहे. मुलखावेगळ्या माणसासाठी एवढे करणे सर्वांचे कर्तव्यच ठरावे.
✍️ *विश्वास सुतार, कोल्हापूर*
(RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती

Total: 8113 जागा

पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736
2 स्टेशन मास्टर 994
3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 732

Total 8113

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]