#शापित_सौंदर्य
#भाग_१६
बेंगलोर ला परतलेली आभा प्रचंड ताणतणावात होती . ममा ला इत्यंभूत रिपोर्ट देत होती ...तन्मय , स्मिता ची मदत , आधार ! प्रणव , नयना ची भेट ! रोहिताई नाराजीने हे सगळे ऐकत होत्या ...जेंव्हा अभि ची मैत्रीण मिताबद्दल कळले तेंव्हा त्यांना हुंदका आवरला नाही ...कसं असतं ना एका पुरुषाचं जीणं ...तो अश्या घटनांतून पर्याय शोधू शकतो पण ....एका जीवन उध्वस्त झालेल्या स्त्री च्या आयुष्याचं मोल काय ? आभा च्या बाबतीत व्यथा पाठशिवणीचा खेळ बनलाय . काहीही असो ह्या प्रसंगात एक आईचे कर्तव्य निभावायला आपण तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे.
म्हणतात ना जीवन जगण्यासाठी आधारकार्ड ची नाही तर आधार , धीर देणाऱ्या माणसांची गरज असते ...उठ ! आभा आवर ऑफिसला निघ . तुझे रोजचे रुटीन चालू ठेव . करिअर चा मार्ग उंचीवर ने , सोबतीला समाजसेवा आहेच . जेणेकरून झाल्या गोष्टी विसरायला मदत होईल .
आभा भांडणे , अपमान झाला तरी वेळप्रसंगी गप्प राहावे ... अभिनव ला तुझ्या कार्याची दखल घ्यायला भाग पाड . एक दिवस त्याच्यापेक्षा तू नक्कीच जास्त यशस्वी बनशील .
...आभा ऑफिसच्या
कामात रुळून गेली म्हणता म्हणता दिवस सरत होते . फॅमिली कोर्टात तारखा पडत होत्या . लवकरच घटस्फोटाचा मार्ग मोकळा होईल , मग आपण आपल्या उर्वरित आयुष्याचा विचार करूया
मध्यंतरच्या काळात विशाल , श्वेता चा साखरपुडा पार पडला . लग्नाला एक च महिना शिल्लक होता . जोशी सर व संपूर्ण स्टाफ आनंदात होता . कंपनीतील लोक व मोजक्या नातेवाईकासमवेत हा विवाह सोहळा पार पडणार होता . विशाल ला आनंदात बघून संपूर्ण भट फॅमिली खुशीत होती
आज एका निवांत क्षणी भट फॅमिली बऱ्याच दिवसांनी डिनरला बाहेर पडली . सोबत श्वेता होतीच . सासऱ्यांची बुद्धिमत्ता , आभा चे कर्तृत्व , सासूबाईंचा समजूतदारपणा पाहून ती प्रचंड भारावली होती . विशाल सारखा समंजस पती मिळाला ह्यात ती जाम खुश होती . बोलता बोलता ...अभिनव चा विषय निघाला तसे विजय
भट चिडले ...आभा च्या लग्नात त्या वेळी किती धार्मिकपणा दाखवत होते ती लोक जणू काय आपल्यावर संस्कारच नाहीत . आभा खाली मान घालून ऐकत होती निःशब्दपणे !
नाहीतरी हाती आता बोलण्यासारखे काही उरलेच नव्हते . आयुष्यात
कोणाला रडवून , कमी लेखून ...कितीही पाठ पूजा , होमहवन केले तरी
त्याचा काय उपयोग ! म्हणतात ना , रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तरी साधी अगरबत्ती सुद्धा लावायची
गरज भासणार नाही .
आणि जशी पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही तसेच आयुष्यात जो कठीण प्रसंगाचा सामना
करतो , त्यांना उर्वरित जीवनात चांगले दिवस दिसतात .
आभा बेटा ! रिलॅक्स हो ! पप्पा अहो तुम्हीच सावरा आता ...मी मस्त मजेत आहे . आभा वरवर
कितीही मजेत असल्याचं भासवत असली तरी ... कितीतरी रात्री तिने जागून काढल्या होत्या .
विचाराने , रडण्याने तिचे मन सुन्न होऊन जाई . पण विशाल , मम्मी , पप्पांसाठी तिला खुशीत राहणे भाग होते . कंपनीतील जबाबदाऱ्या वाढत होत्या . आभा ची कष्ट करण्याची तयारी , वक्तृत्व कौशल्य , सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळे कंपनीचा आलेख वाढत होता...आभा ला " Best Achievement Award " जाहीर झाला .
आणि ह्या पुरस्काराने सर्व
पातळीवर तिच्या कामाची दखल घेतली गेली .
मुंबईत कार्यक्रमाकरिता
सर्व कंपन्यातील उच्च अधिकारी , मंत्री , कर्मचारी जमले होते . आभा ...विशाल , जोशी सर व इतर सहकारी यांच्या बरोबर कार्यक्रमाला उपस्थित होती ...पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला आणि आभा ला धडधडू लागलं.
तेवढ्यात भट अँड इन्फोटेक कंपनी चे नाव घेतले गेले ....त्यांच्या कंपनीचा वाढता आलेख ,
देशपातळीवर त्यांच्या कार्याची घेतली गेलेली दखल !...मिस्टर विजय भट यांचे कौतुक सगळेच
भारावून गेले होते . सोबत असलेले रेवती , अर्णब , विशाल , जोशी सर यांनी टाळ्याच्या गजरात आभा चे स्वागत केले . And Best Female Achievement Award Goes to Miss Abha ...!!
...आभा आपला घेरदार सिल्वर कलर चा गाऊन सावरत ...स्टेजवर गेली आणि तिच्या सौंदर्याने सर्वजण भारावून गेले ...संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा गजरात , Wow , How Pretty !
...अशा अनेक कॉमेंट्स येत राहिल्या . आज कितीतरी दिवसानंतर तिच्या पदरी असे कौतुकाचे बोल ऐकावयास मिळाले होते
पण खरी दाद जेंव्हा प्रोग्रॅम संपल्यावर अभिनव च्या बॉस नी दिली , तेंव्हा सगळेच मंत्रमुग्ध झाले . कार्यक्रमाला अभिनव मिता सह उपस्थित होता.
आभा ला पाहून तो सैरभर झाला आणि त्याने पटकन काढता पाया घेतला . प्रणव , तन्मय , स्मिता सगळेच एकवार आभा चे कौतुक करत होते . रोहीताई आपले पती विजय भट यांच्या समवेत टिव्हीवर हा कौतुक सोहळा पाहात होते ...रोही ...आभा आली आणि आपल्या कंपनीचे नशीब फळफळले बघ ! पोरीने नाव काढले , दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाश हा तिचा परिचय , ओळख देतो . तसेच आभा चे आहे . स्वतःबद्दल न बोलता तिने आपल्या उत्तम कामातून लोकांना

तिची दखल घ्यायला लावली .
बेंगलोर ला परतून चार पाच दिवस होत आले तरी मिडीयात तिच्या नावाची चर्चा होत होती . तिच्यासाठी हीच योग्य वेळ होती , अजून उत्तुंग भरारी घ्यायची !
जगाने तिच्या सौन्दर्याची , दखल घेतली होतीच त्याच बरोबर...तिच्या कार्याचीही ! एका पुरस्काराने तिच्या जीवनाचा बराच कायापालट झाला होता .
नंतर विशाल , श्वेताचे लग्न ही धुमधडाक्यात पार पडले ...घटस्फोटाचा मार्ग मोकळा झाल्याने आभा ही आता मोकळी झालेली होती . जीवनातील एका अध्यायावर संपूर्णपणे पडदा पडला होता . ही एक घटना सोडली तर एका पाठोपाठ एक चांगली शुभकार्ये , कंपनी ची उत्तुंग भरारी ह्याची देशपातळीवर दखल घेतली गेली होती . व लवकरच आता कंपनी ची एक ब्रँच जर्मनी ला ओपन होणार होती . साहजिकच
आभा ला ह्याची उत्सुकता होतीच . फायनल बोलणी फक्त बाकी होती ...माणसांनी नेहमी उच्च ध्येय घेऊन कार्य करावे . एक दिवस यश नक्कीच पायाशी लोळण घालते .
असे म्हटले जाते की जर स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर डोक्यावरचं ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे....!!
क्रमशः
©️ सौ राजश्री भावार्थी
पुणे

#भाग_१७
हॅलो , तन्मय !
कंपनी चे ऑडिटिंग काम
कुठपर्यंत आलेय . आता ह्या बाबी तुलाच सांभाळायला हव्यात . तू असं कर ना , आता बेंगलोरलाच शिफ्ट हो लवकरच !....आभा , आनंदाच्या भरात बडबडत सुटली ...हो हो
आभा अगं किती बोलतेस
...आणि तिकडे येऊन काय करू , स्मिता ला सोडून देऊ ! 😆 तेवढ्यात ...अंकित ओरडला .. ममा ...पपा
बघ काय म्हणतात ..?
एकटेच भुर्र चाललेत !
स्मिता हसतच बाहेर आली , हे वादळ पुन्हा तन्मय चे डोके खातेय हे तिने ओळखले , खरेच !
अशीच असावी मैत्री निष्पाप ! सुकले फुल तरी त्याचा सुगंध दरवळत राहणारी . स्मिताशी गप्पा
मारून आभाचे मन मोकळे झाले . ती नव्या उत्साहाने कामाला लागली ...येत्या दोन महिन्यात जर्मनीच्या ब्रँच चे काम झाले की आभा सहा महिन्यासाठी तिकडे जाणार होती . विशाल व श्वेता नवदाम्पत्य अगदी मजेत होते . श्वेताच्या येण्याने घरात प्रसन्न वातावरण होते .
आभा ने कंपनी सहकारी अर्णब च्या मदतीने अनाथ आश्रम , वृद्धाश्रम यासाठी अनेक योजना राबविल्या . कंपनीतील इतर लोकांची पण आभाला साथ होती .
सोमवार ते शुक्रवार झपाटूून कंपनी ची कामे ,
शनिवारी NGO चा एखादा कार्यक्रम , संडे ला घरात ...असा भरगच्च आठवडा असे . रोहिताई
व भट .. आभा च्या बाबतीत आता निर्धास्त होते . आभा सावरतेय , तसेच विशाल , श्वेता ....
कंपनीतील कर्मचारी सगळेच तिच्या पाठीशी भक्कम उभे होते . नुसती कोट्यावधी संपत्ती असून सुखाचे क्षण विकत घेता येत नसतात , तर त्यासाठी लागते माणुसकी आणि ती मिळवण्यासाठी माणसं जोडावी लागतात ! आणि हीच गोष्ट आभा ने हेरली होती .
कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार
त्यांच्या अडीअडचणी ह्यात ती आपले पप्पा व भाऊ विशाल यांच्याबरोबर चर्चा करत .
त्यांचे प्रश्न सोडवले की लोक मनापासून काम करतात . स्वतःच्या पप्पांच्या पावलावर पाऊल टाकून तिने आपुलकी जपली होती .
मिस्टर विजय भट ही हळूहळू सावरत होते . ड्रायव्हर च्या मदतीने आठवड्यातून एकदा तरी कंपनीत येऊन मिटींग वगैरे आढावा घेत होते .
जर्मनी ला आभा बरोबर जोशी सर तसेच अजून दोन ज्येष्ठ अधिकारी अशी चौघे जाणार होते .
श्रावणाची लगबग सुरू झाली तशी घरी सणांची रेलचेल , श्वेता ची मंगळागौर , सणवार ह्याची धांदल उडत होती .
रोहीताई ...सुधा मावशी व पक्या च्या मदतीने घरची आघाडी सांभाळत होत्या . एकदा त्या चिडूनच श्वेता व आभा ला बडबडल्या ...मी घरात एकटीच रिकामी का ?
जरा वेळ काढा बघू पोरींनो ! ...विजय भट बायकोचा लटका राग बघून ह्या पोरींना मदत करा आता तुमच्या मॉम ला म्हणत होते . आणि विशाल तू रे काय काम करतोस ? ...अहो ! बस्स
करा हा तुमची नाटकं ....
उगाच माझ्यासमोर हा देखावा नको . तुम्ही सगळे म्हणजे तू हास मी रडतो ...असा प्रकार .....
सगळे सारखेच !
बरं ममा ! मी आज सुट्टी घेऊ का , श्वेता ला बाहेरच्या ऑर्डर्स खूप आहेत . नको ...नको , तू
तर घरात थांबू नकोस , नाहीतरी घरात बसून तुमचा उपयोग काय ?
अखंड ते मोबाइलचं डबडं वाजणार ! आणि तुम्ही कंपनीत सूचना देत बसणार . आभा ने ओ ममा , कुल ..कुल करत रोहिताईंना मिठी मारली .
तेवढ्यात , विशाल सांगत आला , पप्पा ...
नेक्स्ट वीक ला जर्मनी ब्रँच चे गेस्ट येणार आहेत.
सगळ्यांचा आनंद ओसंडून वहात होता . खूप वर्षांपासून चे हे स्वप्न सत्यात उतरणार होते .
'आभा इन्फोटेक' ची ब्रँच
परदेशी उघडणार होती .
कंपनी ची उत्तरोत्तर प्रगती पाहून व मीडिया ने घेतलेली भट फॅमिली ची दखल ! विशेष म्हणजे आभा चे कर्तृत्व पाहून अभिनव चा जळफळाट होत होता . स्वतःच्या हाताने आपण लक्ष्मी ला लाथाडले , ह्या गोष्टीने अतिशय पश्चाताप दग्ध होत होता . मिताशी रजिस्टर लग्न केले असले तरी भूतकाळातील काही घटना त्याच्या मनात पक्क्या रुजल्या होत्या .
मिता ..अभि ला जीवापाड जपत होती . अभि चे मम्मी पप्पा , मिस्टर सुर्वे पती - पत्नी ही आपला मुलगा अभिनव साठी मुंबईत शिफ्ट झाले . संसाराचा एक सारीपाटाचा डाव उधळाला तरी दुसरा डाव सावरायला त्यांना अभिनव कडे यावेच लागले . सर्व काही सुरळीत चालू असले तरी
मनाच्या कोपऱ्यात काही खंत दडली होतीच . काही क्षण हातातून अलगद निसटून जातात .
राहतो तो फक्त एक देखाव्याचा आभास !
आभा आयुष्यातून निघून गेली असली तरी तिच्या आठवणी , भास मनाच्या कप्प्यात साठल्या होत्याच ! अभिनव ची होणारी चिडचिड त्याच्या मम्मी ,
पप्पांबरोबर ...मिता ला पण जाणवत होतीच . पण तिला हे ही कळत होते ...अभि चा स्वभावच
ह्याला कारणीभूत आहे .
सहवासाने नाती फुलतात
पण अभि ने फक्त स्वतःचा स्वार्थ साधला , पुन्हा ही चूक त्याच्याकडून घडू नये म्हणून रमाताई धडपडत होत्या . मिता ही समंजस असल्याने सगळ्या गोष्टी तिने पटकन आत्मसात केल्या . लग्नापूर्वीची अवखळ मिता , आता एक टिपिकल पत्नी बनली होती . घराला सावरण्यासाठी त्याच्या भिंतीरुपी नाती भक्कम करण्यासाठी सदैव धडपडत होती . कुठून आलं हे इतकं शहाणपण तिच्यात ? ...जुन्या प्

रियकराची आठवण ......
संसाराची सुरुवात करण्यापूर्वी होणारा त्याचा अपघात , मृत्यू ! ह्या गोष्टीने तिचे डोळे पाणावत होते .
आपल्या सासूबाईंशी
ती लेकीच्या नात्याने बऱ्याच गोष्टी शेअर करत असे . एकदा बोलण्याच्या
ओघात ती म्हणूनही गेली, आई जर मी माझ्या जीवनातील ह्या गोष्टी , क्लिअर केल्या नसत्या
तर तुम्हाला माझ्या बाबतीत कधीच मायेचा ओलावा वाटला नसता . माणूस एक खोटं बोलला की त्याला दहा खोटं बोलावं लागतं त्यातून एक
खोट्या मुखवट्याची शृंखला तयार होते ...... म्हणूनच मी अभि ला तसेच तुम्हाला ही माझ्या भूतकाळातील प्रसंग ह्याची इत्यंभूत माहिती दिली ...आई अहो ! मन
पाणावले असले तरी ....
आयुष्यात सोबतीला उरल्यात त्या फक्त आठवणी व काही आनंद,
दुःखाचे क्षण....!!
क्रमशः
©️ सौ राजश्री भावार्थी
पुणे
💐🌹💐🌹💐🌹💐🌹

#भाग_१८
आभा , सगळं व्यवस्थित आवरलं ना !
पासपोर्ट , व्हिसा हे सारं नीट ठेव , तू प्रथमच एकटी कंपनी टीम बरोबर जातेस . त्यांचे नेतृत्व करायला तू खंबीर आहेस पण मला तुझी काळजी वाटते ...काहीही झाले तरी दिवसातून तीन ते चार वेळा मेसेज करायचा तुझ्या वेळेनुसार आपण फोनवर बोलूच ! आभा चे पप्पा तिला हजार सूचना करत होते . रोहिताईंच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता . आधी तर आभाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांतून आता कुठे ती सावरतेय . मुलीला लांब पाठवायला त्यांचं मन धजावत नव्हतं .
घरच्यांचा निरोप घेऊन
आभा ने विमानात पाऊल ठेवले , सोबत कंपनीची टीम होतीचं ! ...आभा विचारांच्या तंद्रीत असतानाच ...Excuse Me Mam ! ...आभा ने मान वर केली आणि ती त्याच्याकडे पहातच राहिली ....कोण हा ? कुठे तरी पहिल्यासारखे वाटतं ह्याला ! तिने थोडे सरकून बसत हॅलो म्हणून स्माईल दिले . विमानाने उड्डाण केले आणि जो तो आपल्या विश्वात गुंग झाला . कोणी बाहेरचे निसर्ग सौंदर्य न्याहाळत होते तर कोणी वाचन ...!!
आभा चे मन मात्र उद्याच्या मिटींग चा आढावा घेत होतं .
किरण डोळ्याच्या कोपऱ्यातून आभा चे निरीक्षण करत होता , द्यावी का हिला ओळख ! नको ...नको , ही
आपल्याला काय समजेल ....एक दोनदा नजरानजर होताच त्याने मान खाली घातली . तेवढ्यात एअर होस्टेस ने ड्रिंक्स , ब्रेकफास्ट बद्दल विचारणा केली . किरण कुलकर्णी नाव ऐकून आभा ला क्लीक झाले . अरे हाच तो ! किती बदल
झालाय ह्याच्यात ..किरण
तू ...तू !! आभा " आ " वासून त्याच्याकडे पहात होती . तुम्ही आभा भट ना ! अहो मी तुम्हाला कधीच ओळखले पण आम्हा गरीब पामरांना तुम्ही आता ओळख द्याल
का ? म्हणून गप्प बसलो आणि परवाच्या मँगेझीन ,
पेपर्स मध्ये तुमची कंपनी
वगैरे बद्दल कळले आणि मुख्य म्हणजे....! किरण बोलता बोलता गप्प बसला ...आणि काय ?
आभा ने विचारले तसे किरण ने पुढचे वाक्य अर्धवट सोडले . मिस्टर किरण आपण खूप बदलला आहात . अरे ..हे
काय किरण , आपण एकमेकांना मगापासून अहो जाहो करतोय ....!
म्हणून आभा ने संवादातील अडसर दूर केला ...कॉलेजमध्ये असतानाचा किरण व आत्ताचा तू किती फरक रे तो ! ...काय करतोस , कुठे असतोस आणि तू एकटाच ! ...ह्या शेवटच्या
प्रश्नावर मात्र किरणचे डोळे पाणावले ...काय झाले किरण , माझे काही चुकले का ? सॉरी ,सॉरी!
माझा स्वभावच असा आहे रे आपलं माणूस भेटलं की भान रहात नाही बोलायला !
नाही आभा अगं मी एकटाच कामानिमित्त निघालोय जर्मनीत ! .....
घरी छोटा मुलगा व माझी
आई असते . आभा गोंधळात पडली म्हणजे ह्याची बायको ? ...आभा
पाडगांवकर म्हणतात तसं
..." आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं ! रिकामं तर रिकामं ...तसं माझं आहे!
किरण सृष्टीच्या आठवणीने भावूक झाला आणि आभा ला सांगू लागला त्याचा जीवनपट !
आभा , तुला माहितेय की
मी लहान असतानाच बाबा गेले . आईने बऱ्याच
कष्टाने मला लहानाचे मोठे केले . कॉलेजशिक्षण
पूर्ण करत असताना मी पार्ट टाईम नोकरी करत होतो . कॉलेजचा खर्च ही
मला परवडत नव्हता . बऱ्याच वेळेस जवळच्या मित्रांनी मला त्यावेळी मदत केली . शिक्षण पूर्ण होताच एका खाजगी कंपनीत जॉब स्वीकारला.
जॉब करता करताच MBA व छोटे मोठे कॉम्प्युटर लँग्वेज कोर्सेस पूर्ण केले ...कंपनीत कामावरील निष्ठा , प्रामाणिकपणा पाहून झटपट वरच्या पोस्ट गाठल्या . वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी ओळखीच्या माध्यमातून सृष्टीचे स्थळ सांगून आले.
नकार देण्याचा प्रश्नच नव्हता , कारण... काय नव्हते तिच्यात पाणीदार डोळे , सरळ नाक , गव्हाळ रंग पाहता क्षणी तिला पसंत केले ...आणि
आभा तुला सांगतो मी भाळलो ते तिचे शालीन व्यक्तिमत्व , संस्कार ! ...
आणि तिचा केससंभार ..
अहाहा ...अजूनही आठवतात ती पाच वर्षे एकमेकांच्या सहवासातील , पण ..पण
किरणने भरून आलेले डोळे पुसले ...आभा मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती . किरणच्या हातावर
हलकेच थोपटल्यावर तो भानावर येऊन पाहू लागला ....त्याच वेळी ह्याच का त्या श्रीमंतांच्या
पोरी ! आपण आपल्या गरीब परिस्थितीमुळे त्यांच्या जवळपास ही फिरकत नव्हतो . पण आपला अंदाज चुकीचा होता आभा च्या बाबतीत
....किरण कसला विचार करतोस ! काय झाले ? सांग ना ! आभा छोट्या निखिलच्या जन्मानंतर अवघ्या सहा महिन्यात सृष्टीला ब्रेन ट्युमरचे निदान झाले,होता नव्हता
सगळा पैसा पणाला लावला पण शेवटच्या स्टेज ला गेलेला तो कॅन्सर अनेक प्रकारे कॉम्प्लेक्स होता आणि त्यातच ती गेली .
क्षणभर आभा , शॉक
मध्ये गेली . काय बोलावे हे न समजून Sorry to hear ! म्हणून गप्प बसली . मनात विचार करू लागली , दुःख म्हणतात ते हेच का ?
आपल्या आयुष्यातील वादळाने आपण उन्मळून
पडलो , पण इथे तर एक मूल आईविना पोरके झालंय ! किरण सावर स्वतःला काहीही हेल्प लागली तर मला सांग .
कंपनीचे एक व्हिजिटिंग कार्ड त्याच्याकडे देत तिने
किरण सह चहा घेतला .
प्रवास संपायला अजून एक तासाचा कालावधी होता . किरण ला जाणवले आभा काहीतरी

सांगायचा प्रयत्न , विचारावं का ?
आभा खरी विचित्र घटना तेंव्हाच घडली जेंव्हा सृष्टीला तिचे केस गमवावे लागले . पूर्ण खचून गेली होती ती , असो आता आम्ही बरेच सावरतोय छोटया निखिल
कडे पाहून ! घडून गेलेल्या गोष्टी ह्या अघटित असतात त्याचे दुःख बाळगत बसले की आपल्याला त्रास होतो .
त्यापेक्षा पुढील मार्ग धुंडाळावा म्हणूनच रस्ता शोधण्यासाठी परमेश्वराने
आपल्याला डोळे मागे न देता समोर दिले आहेत .
एवढे बोलून किरण खिन्नपणे हसला . आभा
त्याच्याकडे पहातच राहिली निःशब्दपणे !
काय बोलणार ह्यावर स्वतःच्याच विचारात गुंतून शांतपणे डोळे मिटून बसून राहिली...!!

#भाग_१९
जर्मनी त पोहचल्यावर आभा ने ममा ला मेसेज टाकून आपली रूम गाठली . कंपनीतील ह्या चार जणांची उतरण्याची
सोय एका गेस्ट हाऊस मध्ये केली होती . डिनर नंतर उद्याच्या कामाचा आढावा घेऊन जो तो झोपेसाठी आपल्या रूममध्ये रवाना झाला .
खरेतर प्रवासातील दगदग यामुळे पडल्या पडल्या झोप लागायला हवी होती पण आज आभा विचारांच्या गर्तेत गढून गेली . किती सोनेरी दिवस होते ते कॉलेजचे , त्या नंतरचे परदेशातील दोन वर्षाचे शिक्षण , अभिनव ची ओळख , त्यातून फुललले प्रेम !
सगळा जीवनपट तिच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता . ह्या क्षणाला स्मिता , तन्मय ची तिला राहून राहून आठवण येत होती . तिघांची मैत्री इतकी घट्ट ! अजूनही ते बंध जपलेले आहेत .
अभिनव , मिताच्या लग्नाबद्दल जेंव्हा सोसायटीतील मैत्रीण नयना कडून समजले तेंव्हा ती खूप खचली होती . सोप्प नसतं इतकं की आपल्या माणसाला क्षणात विसरावं ! अभि ने स्वतःची चूक कबूल केली
असती तरी आपण त्याचे शंभर गुन्हे माफ केले असते , पण त्याचा इगो आड आला होता ...असो
झालं गेलं विसर आभा , आता पुन्हा ह्या असल्या भानगडीत पडू नकोस , तिचे मन तिला पुन्हा पुन्हा बजावत होतं . जीवनात हे संकट आलं , ते तुझ्या यशाचा भाग समज ! ह्या यशाचा आस्वाद घेण्यासाठी , फिनिक्स भरारी घेण्यासाठी सज्ज राहा .
जर लग्नानंतर तू अशीच छळ सहन करत बसली असती तर तुझे सौंदर्य हे शाप ठरले असते आणि चारित्र्यावरचा कलंक तर कधीच पुसला गेला नसता , म्हणूनच जे घडले
ते भल्यासाठी समज आणि पुढे चालत राहा .
विचार करता करताच आभा झोपेच्या अधीन झाली .
सकाळी जोशी सरांचा
कॉल वाजला तशी आभा
ने घाईगडबडीत पटकन आवरून नवीन कंपनी कडे प्रयाण केले . तिथले
वरिष्ठ अधिकारी ह्यांच्या
बरोबर चर्चेच्या फैरी झडत होत्या . दहा दिवसांत सगळी कामे आटपून उर्वरित दोन चार दिवसात जेवढे भटकता येईल तेवढे भटकायचे होते . कंपनीतील इतर तिघे खूप उत्सुक झाले होते . दिवस भरभर सरत
गेले . बऱ्याच अंशी जर्मनीतील कामे आटपत
आलेली . परतीच्या आधी
दोन दिवस तिथल्या तिथल्या मॉल ला भेट द्यायला हे चोघे बाहेर पडले . सगळेच खुशीत होते . भारताची ओढ आता खुणावत होती . आपल्या घरच्यांसाठी काही भेटी घ्याव्यात म्हणून भरपूर खरेदी झाली . डिनरनंतर गेस्ट हाऊसवर परतानाच अचानक रस्त्यात गोंधळ उडाला . चौघेही क्षणभर मागे वळत असतानाच बंदुकीतून धडाधड गोळ्या सुटल्या . कोणाला काही कळण्याच्या आत सगळीकडे गदारोळ माजला . हल्लेखोर पसार
झाले . रस्त्यावर किंकाळ्यानी वातावरणात
भयानक तणाव निर्माण झाला . अँब्युलन्स सायरन वाजवत जखमी लोकांना स्ट्रेचर वरून उचलून हॉस्पिटलमध्ये
नेत होती . कोण , कुठे
काय ...हे न समजण्यापलीकडे होते .
भारतात ह्या बातम्या ऐकून रोहिताईंनी हंबरडा फोडला ...आभा .. आभा
....श्वेताची परिस्थिती विचित्र होती , एकीकडे भावजय कम् मैत्रीण , दुसरीकडे वडील...विजय
भट ह्यांचे तर संपूर्ण अवसान गळून गेले .....!
विशाल ने काही मित्रांच्या
सोबतीने जर्मनीकडे धाव घेतली .
चार दिवसाच्या अथक
प्रयत्नानंतर आभा शुद्धीवर आली . ममा ... ममा !! Thanks God !
एकाला वाचविण्यात तर यश आले . आता ह्यांच्याकडून इतर माहिती
कळेल . एव्हाना जर्मनीतील " आभा इन्फोटेक " च्या अधिकाऱ्यांनी ह्या तिघांना ओळखले , पण चौथा ? ...त्याची डेड बॉडी बघताच कपाळावर हात मारला ! काय करायला निघालो आणि असे कसे घडले . न्यूज पाहून डोके गरगरत होते .
विशाल हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर आभा ने त्याला ओळ्खले . ममा !
....हो , हो आभा ...आहे ती व्यवस्थित ! तू आधी बरी हो ...एखाद्या लहान मुलाला समजावतो तसे विशाल... आभा ला ....
समजावत होता . आभा वर जर्मन पोलिसांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्या , पण ती इतकेच सांगू शकली , की आवाज आला तसे ह्या चौघांनी मागे वळून पाहिले . हल्लेखोरांच्या काही कंपूत वाद चालू होता आणि अचानक काही कळण्याच्या आतच बंदुकीतून गोळ्या झाडल्या गेल्या . आभा च्या कमरेला गोळी लागून
गंभीर दुखापत झालेली होती . आभा खाली कोसळली आणि तिच्या डोक्यावरून सुटलेली गोळी जोशी सरांच्या खांद्याला छेदून चौथा कर्मचाऱ्याच्या डोक्याला
लागली . आभा ला हा प्रचंड मानसिक धक्का
बसला होता . जोशी सर व कंपनीतील चव्हाण सावरले होते . पण चौथा सहकारी पवन चे काय ?
तो अतिशय हुशार होता .
कंपनीत जॉईन होऊन त्याला चार च वर्षे झाली होती . घरी बायको , मुलगा व आई - वडील ...
काय आणि कसे तोंड द्यावे ह्या घटनेला . विशाल डोके गच्च धरून बसला होता . आभा ला आपण पाठवायला नको होते . झालेल्या घटनेने सगळेच हादरून गेले होते
प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात पण आभा चे आयुष्य म्हणजे संकटाची मालिका जणू !
पंधरा , वीस दिवसांनी ह्या सगळ्यांना मुंबई ला विशाल व त्याचे मित्र घेऊन आले . तन्मय , स्मिता , नयना , अभि चा कलीग प्रणव सगळेच धावत हॉस्पिटलमध्ये आले . कोण कोणाला समजविणार ? रोहिताईंनी पप्पांची जबाबदारी श्वेता व सुधा मावशी

यांच्यावर सोपवून पक्यासह मुंबई मुंबई गाठली .
आभा ला पाहताच त्यांनी चेहरा पदराने झाकून घेऊन हुंदका दाबला . लेकीची दयनीय अवस्था पाहून त्यांचे काळीज फुटायचं बाकी होतं . आभा ला तन्मय व इतरांच्या ताब्यात देऊन विशाल पुढील तयारीला लागला . उर्वरित तिघे पंधरा दिवस तरी मुंबईत
हॉस्पिटलमध्ये असणार होते . श्वेताच्या पप्पांचा
मुंबईत फ्लॅट असल्याने तिची आई नवऱ्याच्या सेवेला तातडीने आपल्या विहिणीसह धावली . जोशी सर व चव्हाण सावरत होते . पवन चा तर प्रश्नच नव्हता . त्याचा कलेवर निश्चेष्टपणे झोपला होता . पण आभा
....चेहऱ्यावरील व्रण व कंबरेखालील संपूर्ण भाग,
पाय जणू अपंग अवस्थेत होता...कसे असते ना माणूस यशाच्या मागे धावताना त्याला ते हुलकावणी देते तसेच आभा च्या बाबतीत होत होते .

#भाग_२०
हाती कुबड्या घेऊन आभा मुंबईहून उपचारानंतर बेंगलोर ला
परतली . एका निवांतक्षणी झालेल्या घटनांचा आढावा घेत राहिली . स्वतःच्याच स्वमग्न अवस्थेत ! पप्पा विजय भट आजारपणातून सावरतात
तोवर लेकीची ही अशी अवस्था परंतु आपली लेक एवढ्या मोठ्या संकटातून वाचली हेच देवाचे आभार मानून स्वतःचे समाधान करून घेत होते . मुंबईत असताना अभिनव चे पप्पा गुपचूप येऊन आभा ला भेटून गेले होते . किती ही झाले तरी ती एकेकाळी त्यांची सून होती . अजूनही तिच्याप्रति असलेले भावबंध त्यांनी जपलेले होते .
सध्या सहा महिने तरी घरात बसूनच कंपनीचे कामकाज हाताळायचे आभा ने ठरवले आणि ह्याच कालावधीत आपल्या स्वतःच्या जीवनाची डायरी आत्मचरित्र रुपात लिहायला सुरुवात केली .
जणू काही एकांतात बसल्यावर स्वतःच्याच अंतरंगात डोकावून पहावं आयुष्य खूप छोटं असलं तरी त्यातून तावून सुलाखून निघाल्यावर भरभरून जगावं .
आयुष्यात अचानक पुन्हा किरण सारख्या सज्जन मित्राची भेट घडावी , आठविला तो दिवस त्याच्या घरी गेल्याचा . मध्यमवर्गीय
जीवन जगत असले तरी किती समाधानी कुटुंब .
किरण ने हॉस्पिटलमध्ये
असताना केलेली मदत . घरचे सात्विक , सुग्रास असा एकवेळचा जेवणाचा डबा रोज ऑफिसला जाताना आभासाठी पोहचवायचा.
ह्यालाच म्हणतात मनाची श्रीमंती , माणुसकीची जाण ! किरणचा मुलगा निखिल व तन्मयचा मुलाचा ....दिवसभर धुमाकूळ बघून किरण च्या आईचे डोळे सतत पाणावत होते . सुनेने निरोप घेतल्यापासून ची
घरची उदासीनता काही वेळासाठी का होईना दूर झाली होती .
मुंबईतील ह्या कालावधीत अनेक भेटींना उजाळा मिळाला . काहींनी हळहळ व्यक्त केली तर काहींनी होप दाखविला ,
आयुष्यात पुन्हा उभारायचा ! यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलेच
कारण माणुसकीची जाण
महत्वाची . भरभरून बोलणारी मन मोकळं करणारी व्यक्ती मनात कपट ठेवत नाही , पण वरवरून हसणारा मात्र घात केल्याशिवाय रहात नाही , अशा अनेक गोष्टींचा अनुभव आभा ने तिच्या संकटकाळात घेतला होता . पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे , असे म्हणतात पैशाची गरज भासली तर ते व्याजानेही मिळू शकतात , पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सोय अजून झाली नाही . आनंदाच्या क्षणी परकेसुद्धा सामील होतात , पण दुःखद , संकटप्रसंगी जे सामील होतात तेच आपले हितचिंतक असतात .
आभाच्या लेखणीची धार तिच्या शब्दशब्दातून जाणवत होती . झाल्या इत्यंभूत घटनांचा आढावा घेत नव्या वास्तव जीवनाचा स्वीकार करण्यासाठी झेपावत होती . आयुष्यात अपयशी ठरल्यावर उठून
उभारून पुन्हा लढायला जो तयार होतो तोच खरा
धैर्यशील , शौर्यवान . आभा चे चरित्र वारंवार ह्याचेच सूचक होते . एका खंबीर मात्या - पित्याचे संस्कार तिच्या पाठीशी होते .
आभा , स्वतःकडून झालेल्या चुकांपासून ... सगळ्या गोष्टी डायरीतून व्यक्त होत होती . कपाळावरील सटवाईने लिहिलेले व हातावरील हस्त रेषा कोणीही पुसू शकत नाही.
विधिलिखित वा नियतीचे विचार कोणी बदलू शकत
नाही .
आभा बेटा , काय करत आहेस ? रोहिताईंनी आवाज दिला तशी ती भानावर आली .
ये ममा ...काही नाही जरा
निवांत वेळ मिळालाय त्याचा सदुपयोग करतेय !
डायरी लिहितेय माझ्याच आयुष्याची ! रोहिताई क्षणभर गप्पच बसल्या .
ममा प्लीज , नाराज होऊ नकोस ! मी लवकरच बरी होईन ग ! तू काळजी करू नकोस बिलकुल ....
आभा तसं नाहीये गं , मला दुसरीच चिंता सतावतेय की ह्या कुबड्या घेऊन तुला वावरताना पाहिलं की , माझं काळीज तिळंतीळं
तुटतंय ! ममा ...अगं , साहजिकच आहे , पण ह्या काही विधिलिखित गोष्टी आपल्या का हातात असतात का ? तू शांत रहा ममा ! लवकरच मी पुन्हा कंपनी जॉईन करेन
सर्व काही सुरळीत होईल . आभा , तुझे पपा
पुन्हा हतबल झालेत बघ!
नवी उभारी घेत असतानाच पुन्हा तुझ्या ह्या अपघाताने कोलमडून
पडले . मला तर काहीच सुचत नाही . तुम्हा दोघांचे
असे असहाय्य अवस्थेत ही हसण्याचा मुखवटा धारण करून वावरणे मला खरेच आता सहन होत नाहीये ! ममा , कूल हो ..म्हणता म्हणता हे पाच , सहा महिने ही सहज निघून जातील , पुन्हा मी पूर्ववत होईनच!
इतका आत्मविश्वास माझ्यात नक्कीच आहे .
पप्पा विजय भट यांनी आवाज दिला तसे आभा व रोहिताई भानावर आल्या...काय चालू मायलेकीचं हितगुज , आम्हाला सहभागी करून घेताय का त्यात ! तुम्हाला
तर सदानकदा चेष्टाच सुचते बाई ...मी जाते आभा ...सुधा मावशीला स्वयंपाकात मदत करते .
श्वेता , विशाल ही येतीलच
इतक्यात !
आभा व तिच्या पप्पांनी
कंपनीतील कामकाजाचा
आढावा घेऊन इतर गप्पांकडे मन वळवले ...
आभा बेटा ! तू लवकरच सावरशील यातून , बाळा!
पराभूत झाल्यावर कोसळण्यात नाहीतर उठून पुन्हा जीवनाची लढाई लढायला जो सज्ज होतो तो खरा योद्धा ! आणि मला तुझ्यात ते नेतृत्व ठासून भरलेले दिसतंय ! पप्पा
तुम्ही किती छान समजावून सांगता , तुम्ही ना एखादे प्रोफेसर शोभला असता बघा ! चल आभा जेवायला सगळे खोळंबले असतील
निघुया आणि एक लक्षात
ठेव उगवत्या

सूर्याचं दर्शन
घेत नव्या दिवसाचं स्वागत करायचं , कालचा
दिवस भूतकाळात जमा करून ! ह्यालाच जीवन ऐसे नाव ! आभा ....मला आठवतेय ...!
जीवन हे असंच असतं
थोडं सोसायचं , बरचसं
भोगायचं असतं !
ओल्या पापण्या मिटून ,
ओठांनी हसायचं असतं ,
सुखाबरोबरच दुःखालाही
झेलायचं असतं , स्वतःला
विसरून साऱ्यांमध्ये
मिसळायचं असतं .
जीवन हे असंच असतं !!
क्रमशः
©️सौ राजश्री भावार्थी
पुणे
( उद्याचा अंतिम भाग असेल )

#अंतिम_भाग_२१
म्हणता म्हणता , पाच ते सहा महिने सरले . आभा आता बरीच सावरली होती , म्हटलं तर
मानसिक दृष्ट्या व शारीरिक पण !...कुबड्या
चा आधाराने का होईना हळूहळू कंपनीत वावरत होती . अजूनही पायाचा धोका टळला नव्हता . पुन्हा काही घडू नये यासाठी सर्वोतपरी काळजी घेणे गरजेचे होते
विशाल बरोबरच ऑफिस ला येत जात होती . कंपनीत तिच्या बद्दल बरीच आसूया होती . परंतु आभा चे ऑफिसमध्ये उपस्थित राहणे ह्यामुळे बरेच जण उत्साहित होते . आभा व सहकारी यांचे ही इन्फोटेक कंपनी दुसरे कुटुंबच बनले होते .
लवकरच महिनाभरात येणारा आभा च्या वाढदिवसाचे प्रयोजन कंपनीच्या वतीने करण्यात येणार होते . त्यात जर्मनीचे बारळगलेले प्रस्ताव वगैरे साठी बरेच गेस्ट या Birthday च्या निमित्ताने उपस्थित राहणार होते . प्रचंड आघात होऊनही आभा मुळीच खचली नव्हती . हतबल जरूर झाली होती . अनेक धक्के आयुष्यात तिने सहन केले होते . जणू काही सौंदर्याचा सार्थ अभिमान एखाद्या पानगळी प्रमाणे निखळला गेला होता . अनेक व्याधींची रूपरेषा चेहऱ्यावर शापित सौंदर्य रुपात भासत होती . तरीही आभा स्टेबल होती
आत्मविश्वासाच्याच जोरावर !!
श्वेताने ऑफिसचे डेकोरेशन अतिशय अप्रतिम केले होते . आणि मुद्दाम आभा ला सरप्राईज द्यायच्या दृष्टीने सक्तीने चार दिवस घरी बसवले होते . रविवारचा
दिवस अचानक तन्मय , स्मिता , किरण , नयना , प्रणव मुंबईतील सर्व मित्र मंडळी घरी हजर झाल्यावर आभा सगळ्यांना पाहून आश्चर्यचकित झाली . घरी जणू काही एक छोटेसे गेट टूगेदर च श्वेता ने आयोजित केले होते , आभा ला कोणतीही पूर्वकल्पना न देता . सर्वजण गप्पात रंगून गेले
श्वेता लव्ह यु डिअर !
अगं मला थोडी पूर्वकल्पना तरी द्यायची ना ! आणि इतके सगळे तू कसे मॅनेज केलंस !
करावं लागतं हो वन्सबाई
तुमच्यासाठी थोडं ! ए चावट गपं आता ! रोहिताई व आभा चे पप्पा
इतर मंडळी ह्या नणंद भावजय चे प्रेम पाहून भारावून गेले होते . भरून
आलेले मन आणि भरून आलेलं आभाळ पाऊस पडून गेल्यावर जसं मोकळं होतं तसाच काहीसा आजचा प्रसंग होता .
सांजवेळी पार्टीच्या
वेळेस श्वेताने मुद्दाम पार्लर एक्स्पर्ट मैत्रिणी कडून आभा चा हलकासा मेकअप करून घेतला . सुंदर पायघोळ गाऊन ..! आभा चे सौंदर्य
पाहून सर्वजण बघतच बसले . हळुवार संथपणे पावले टाकत आभा गेस्टपुढे आली . तसा सगळ्यांनीच Happy Birthday ! आभा चा पुकारा केला . रोहिताई
व मिस्टर विजय भट ह्यांच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पुन्हा पाणावत होत्या . लेकीच्या ह्या सौन्दर्याला कोणाचे गालबोट लागले . मनातले सारं काही व्यक्त करण्यासाठी तेवढाच ताकदीचा माणूस समोर असावा लागतो , तरच संसाराचा सारीपाट सुरळीत चालतो , पण...!
विचारात गुंतले असताना
आभाने पप्पांना आवाज दिला . केक कापून सेलिब्रेशन झाल्यावर प्रत्येक जणांशी आभा स्वतःहून बोलून विचारपूस करत होती .
डिनर चा आस्वाद घेऊन मंडळी परतत होती . जर्मनीहुन आलेले शिष्टमंडळ ...विजय भट व विशाल ह्यांच्याशी बोलून उद्याच्या मिटींगच्या
तयारीला लागले , एक प्रयत्न फसला पण आता पुन्हा ही संधी घालवायची नाही .
पार्टीहून सगळे घरी परतल्यावर गप्पांची मैफिल पुन्हा एकदा जमली . मुंबईकर लोक दुसऱ्याच दिवशी परतणार असल्याने गप्पांना वेळ ही अपुरा पडत होता . आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ती आपली माणसं , त्यांचे अस्तित्व . देव आपलं नशीब लिहीत नाही तर आयुष्याच्या या वळणावर आपले विचार , व्यवहार , कर्म ह्याने आपले नशीब घडत जाते.
बरं ! आभा बेटा , ह्या तुझ्या सगळ्या मित्रमंडळी
यांच्यासमोर मला तुला काही सांगायचे आहे .
पप्पा ! आता पुन्हा तुम्ही हे काय चालू केलंत ! मला काही एक ऐकायचं नाही . तन्मय ने येऊन आभा च्या खांद्यावर थोपटलं तसे आभा अचानक रडू लागली . माणसाला अतिशय आनंद , कौतुक झाले तरी
त्याप्रसंगी रडायला येते अशीच अवस्था आज आभा ची झाली होती .
आभा शांत हो ...अगं , तुझ्या मनातील वेदना , सल आम्हा सगळ्यांना कळतेय . म्हणतात ना सोन्याने लोखंडाला विचारावं की का रे बाबा !
आपल्या दोघांनाही हातोड्याने घाव घातला असता तुझाच आवाज जास्त येतो , तेंव्हा लोखंडाने उत्तर काय दिले असेल तर ...आपल्याच लोकांनी आपल्याला त्रास
दिला , मारले तर त्याचा जास्त त्रास होतोच ना !
तसाच काहीसा प्रकार !
...तर आभा मी काय म्हणतो , पप्पा विजय भट
आवंढा गिळून बोलले आम्ही आज आहोत तर उद्या नाही . विशाल , श्वेता जरी तुझ्या पाठीशी असले तरी तुझं आयुष्य ..
पुढचे बोल न बोलताही सारेच निःशब्द झाले . पप्पा... बोला ना मी एवढी का जड झालीये तुम्हाला ? नाही बेटा असा तू विचारही मनात आणू नकोस , फक्त आम्हा सर्वांना असे वाटतेय की तू पुन्हा एकदा एक प्रयत्न करून पहावा ...कशाचा पप्पा ?
आभा न समजून पप्पांकडे पहात राहिली . बेटा ! आमच्या मनात पुन्हा एकदा तू लग्नाचा विचार करावा असे वाटतेय ! काय पप्पा ?
काय बोलताय तुम्ही लग्न आणि मी ...आता ..नो !
आयुष्यात ए

कदा संसाराचा डाव मांडून पाहिला , पण डाव रंगात यायच्या वेळेस उधळुनी रंग सारा धुसूर झाला ....!
आभा हुमसून हुमसून रडू
लागली . पप्पा मी पुन्हा जर्मनीला जाण्याचा विचार करतेय आणि तशी
माझ्या मनाची तयारी झाली आहे . बेटी पुन्हा एकदा विचार कर ह्यावर व शांतपणे निर्णय घे .
ओके पप्पा आणि हो मला तशी संधी मिळाली तर मी नक्कीच पुन्हा सप्तपदीच्या पाऊलवाटेवर चढेन पण आता सध्या तरी नकोच !
हो आभा , आम्ही तुझ्या निर्णयाचे कायम स्वागत करू . अगं ,फाटलेल्या कपड्याला शिवताना टोचणारी सुई सगळ्यांच्या
लक्षात राहते पण धाग्याचं
काय ? तसेच आभा तुझं जगणं म्हणजे आयुष्यात सगळ्यांना बांधून ठेवणारा धागा आहे . असो , लग्नाचा पाया रचल्याने सगळ्या गोष्टी साध्य होतातच असे नाही , तर स्वतःच्या कर्तृत्वाने त्या सिद्ध कराव्या लागतात . सौंदर्याचा हा शापच
असा निराळा असतो . आयुष्यात एकाकी भोग तुझ्या वाटेला आले . पप्पा , आता हे असले विचार डोक्यातून काढून टाका . साधे सरळ आयुष्य प्रत्येकीच्या वाट्याला येईलच असे नाही . अनेक वर्षे संसारात एकत्र असून कायम दुःखी असणारी जोडपी काय कमी आहेत
का जगात ?
पोरी , बास कर आता इतकं शहाणपण कसं आलं ग तुझ्यात . आभा च्या डोक्यावर कौतुकाचा हात फिरवत विजय भट तिला थोपटत होते . पप्पा
मी शेवटी तुमचीच मुलगी आहे असे बोलून आभा जोरजोरात हसायला लागली . वातावरणातील ताण थोडा हलका होऊन पुन्हा सगळे हास्यकल्लोळात मग्न झाले .
तन्मय ,स्मिता , प्रणव , नयना , किरण तुम्हा सर्वांच्या कायमच मी ऋणात राहीन . तुम्ही दिलेली मैत्रीची साथ कायम माझ्या पाठीशी अशीच राहू देत . म्हणतात ना ...पाकळ्यांचे
गळणे म्हणजे , फुलांचे मरण असते , मरताना ही सुगंध देणे...यातच आयुष्याचे सारं असतं , असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं
पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं !!
आणि वन्स ...मी हो ह्या कुठल्या पंक्तीत बसू , श्वेता ने फुरंगटून विचारल्यावर आभा ने तिला मिठीच मारली .
दोघींच्या डोळ्यातुन प्रेमाचे आनंदाश्रू ओघळत होते . चला...विशाल ने आवाज दिला...एक सेल्फी घेऊया ...या सारे !
सारे घर आनंदाने दणाणत होते . पाहुणे परतली आणि आठवडाभरात आभा ने अनेक कामाचे मनोरे रचले ...त्यातून सवड काढत आभा डायरीत डोकावून मृगजळ मधील काही गोष्टी आठवू लागली ....सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेनुसार होत नसतात . काही नियतीच्या इच्छेनुसार कराव्याच लागतात . कधी कधी वाटतं आपण
नियतीच्या हातचं एक खेळणं तर नाही ना !
कदाचित ह्यालाच लोक नशीब म्हणत असतील , जेंव्हा लोक नशिबाबद्दल बोलतात आणि जर काही गोष्टी त्यांच्या इच्छेप्रमाणे झाल्या नाहीत तर नशिबाला दोष देऊन मोकळे होतात .
नाही आभा तू त्यातली
नाहीस , तुझं नशीब तू घडवणार आहेस . नव्या सूर्योदयाबरोबर कोवळी सोनेरी किरणं लेऊन !
आभा स्वतःच्या मनाशी समजूत घालून डायरी लिहीत बसली ...!!
जीवनाच्या प्रत्येक वळणावर ....
सारं काही मिळतं गेलं असतं तर ....
काही गमवायची भीती आणि काही कमवायची
किंमत ....कधीच समजली नसती !!
शापित असलं तरी सौंदर्य माझं खास आहे .
जगानं घेतली कर्तृत्वाची दखल तर तीच माझी आस आहे .
अलवार डायरी बंद करून स्वतःच्या बॅगेत तळाशी ठेवत अनेक आठवणींच्या कुपीसह दुसऱ्याच दिवशी आभा जर्मनी च्या अनवट वाटेवर प्रयाण करायला सज्ज झाली , नव्या इच्छा आकांक्षासह ....!!!!!!!
समाप्त 😊🙏
🌹💐🌹💐🌹💐🌹💐
©️ सौ राजश्री भावार्थी
पुणे
२६ / ०९ / २०२०
( सदर कादंबरीचे संपूर्ण हक्क लेखिकेच्या ताब्यात आहेत , लवकरच एकूण तीन कादंबऱ्या प्रकाशनाच्या मार्गावर आहेत . वाचकांनी खालील मनोगत जरूर वाचावे 😊🙏)
#मनोगत
नमस्कार 🙏😊
#शापित_सौंदर्य या माझ्या दुसऱ्या कादंबरीच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधताना मला मनस्वी आनंद होत आहे. जेवढा उत्साह मला या कादंबरीचा पहिला भाग आपल्या समोर सादर करताना होता त्याही पेक्षा जास्त उत्साह आणि उत्सुकता मला शेवटचा भाग सादर करताना आहे कारण आपला कादंबरीला मिळालेला उदंड प्रतिसाद आणि प्रेम. यामुळेच माझा उत्तरोत्तर उत्साह दुणावत गेला आणि हुरूप वाढला.
कादंबरीतील प्रसंग , भावनांची उलथापालथ , त्यातील सकारात्मता यावर तुमच्या आलेल्या प्रतिक्रिया, त्यावर झालेली चर्चा , मत मतांतरे यामुळे कादंबरी आपल्या पर्यंत पोहोचते आहे हे लेखिका म्हणून मी माझे यश समजते. आपल्यासारख्या वाचक रसिकांचे प्रेम या कादंबरीला मिळाले ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. आभा या मध्यवर्ती पात्राला आपण उदंड प्रेम दिलेत. तिच्या बरोबर आपण समरस झालात , संवाद साधलात , असेच प्रेम आणि प्रतिसाद आपण माझ्या पुढील कादंबरीस द्यावा आणि माझ्या लेखन कार्यास प्रोत्साहन द्यावे ही अपेक्षा व्यक्त करून इथे थांबते. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार मी मानते .
धन्यवाद 😊🙏
#राजश्री_भावार्थी

*आजपासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" मन:पूर्वक शुभेच्छा...!विघ्नहर्ता श्री मंगल मुर्ती.. तुमच्या सगळ्या चिंता, दु :ख, कोरोना संकटं, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि तुम्हाला अधिकाधिक आनंद देवो..हा श्री गणेशोत्सव तुम्हाला सुफळ-संपन्न होऊ दे.. हीच त्या ब्रम्हांड नायकाकडे हात जोडून मनापासून प्रार्थना..!*
*गणपती बाप्पा मोरया*
🙏🌹
*गणपती बाप्पा मोरया*
🙏🌹