Forwarded from Psi Balraje Pawar
महाराज, तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात
चाललंय तरी काय ?
महाराज, माफ करा आम्हाला
तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात
चाललंय तरी काय ?
आई भवानी ची शप्पथ घेऊन
तुम्ही परकियांविरुध लढले
एक एक गड किल्ले काबीज करून
हिंदवी स्वराज्य निर्माण केले
जाती पातीचं राजकारण न करता
सर्व धर्मियांना समान वागणूक दिली
जगभर आपल्या ख्यातीने
आपण रयतेचा राजा ही पदवी मिळवली
पण महाराज, माफ करा आम्हाला
तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात
चाललंय तरी काय ?
तुमच्या बद्दल कोणी अपशब्द बोलतो
उलट सुलट बोलून तुमचा अपमान करतो
कोणी रात्री बेरात्री चौकात पुतळे बसवतो
बसविलेला पुतळा दुसरीकडे हलवतो
तुम्ही दिलेली शिकवण विसरतो
तुमची तुलना कोणा अहिऱ्या गहिऱ्याशी करतो
जाती जाती मध्ये भांडणं लावतो
कोणी आया बहिणीची अब्रू वेशीला टांगतो
तर कोणी निर्माण केलेलं स्वराज्य
पुसून टाकण्याचं काम करतो
एवढ्या सन्मानाने झालेला तुमचा राज्याभिषेक
सोहळा पाहिलं
तर तुमच्या शौर्य, पराक्रम, बलिदानाची प्रचिती येते
हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी
महाराज, आज तुमची गरज आहे.
तुम्ही पुन्हा एकदा या मातीत जन्म घ्यावा
ही आमची आर्त हाक आहे.
बाळराजे पवार
पोलीस उप निरीक्षक,
वाकोला पोलीस ठाणे, मुंबई

❤39👍2🙏1
माझ्यावाचुन .....
माझ्यावाचून आजकाल तुझ काहीस अडतय म्हणे
हसणाऱ्या गालात खळी येत असतानाच
डोळ्यात पाणी भरतय म्हणे
माझ्यावाचुन तुझ काहीस अडताय म्हणे
चार चौघात गप्पा रंगतानाच
कोणीतरी हळूच तुला चिडवून जातंय
मनातील तुझ्या भावनेला सांगतानाच
थोडंसं खर खोटं होतंय म्हणे
माझ्यावचून तुझ काहीस अडतय म्हणे
भार दिवसा तुला स्वप्न अशी यावी
मुंडावळ्या बांधून कोणी तिथे सजावी
मऊशार शालू नी शेला तुझा ओढतय म्हणे
माझ्यावाचून तुझ काहीस अडतय म्हणे
खर सांगू का ही इच्छा तुझी बरी नव्हे
नुसतेच वचनाची पत्रिका खरी नव्हे
मागून घे पुन्हा अशी जसं जुळता जुळता जुळतय म्हणे
पण खरच माझ्यावचुन तुझ काहीस अडतय म्हणे
सोनाली ओंकार वाळके
पुणे

❤28💔1
नजर गहिरी...
नजरेत तिच्या एक सुप्त वादळ दडलंय,
चेहऱ्यावर मात्र गालात हसू उमटलंय...
काहीतरी लपवून ती चोरून पाहत आहे,
शब्दांशिवाय मनाचा ठाव घेत आहे...
कपाळावरचा तो लाल गर्द शृंगार,
करतोय काळजावर सरळ अचूक वार...
तो अभिमानाचा रंग की आहे कोणती खूण?
गुपित हे पाहतंय प्रत्येक मन थकून...
केसांच्या बटांमधून ती नजर जेव्हा रोखते,
धडधड मनाची एका क्षणात वाढते...
ती समोर उभी आहे सगळं काही जाणून,
पण रहस्य तिने ठेवलंय काळजात मिटून...
_ जगदीश नेरूरकर( कल्याण )
नजरेत तिच्या एक सुप्त वादळ दडलंय,
चेहऱ्यावर मात्र गालात हसू उमटलंय...
काहीतरी लपवून ती चोरून पाहत आहे,
शब्दांशिवाय मनाचा ठाव घेत आहे...
कपाळावरचा तो लाल गर्द शृंगार,
करतोय काळजावर सरळ अचूक वार...
तो अभिमानाचा रंग की आहे कोणती खूण?
गुपित हे पाहतंय प्रत्येक मन थकून...
केसांच्या बटांमधून ती नजर जेव्हा रोखते,
धडधड मनाची एका क्षणात वाढते...
ती समोर उभी आहे सगळं काही जाणून,
पण रहस्य तिने ठेवलंय काळजात मिटून...
_ जगदीश नेरूरकर( कल्याण )
❤25😁1🙏1🤣1
मला बुद्ध आवडतो...
कारण सत्याच्या शोधार्थ तो निघाला तो निघालाच..
वाटेत अनेक संकटांशी सामना केला..
घोर तपश्चर्या केली, गुरु केले, त्यांच्या मर्यादा समजल्यांनंतर त्यांना सोडून दिलं..
राज्य, नाती गोती, वैभव यांचा त्याग केला,
तेव्हा त्याला एक अद्भुत ज्ञान आलं..
अर्थातच 'दिव्य ज्ञान' !
बुद्ध तो बुद्धच.
पण बुद्धांची शिकवण सगळ्या संकेतांना तोडून फोडून टाकणारी आहे..
प्रत्येकाला स्वतःच्या मुक्तीचा मार्ग शोधता येतो, शोधण्याचा अधिकार आहे..
हा त्यांचा संदेश क्रांतिकारी आहे..
स्वर्ग, नर्क, ईश्वर, आत्मा वगैरे मी मानीत नाही..
कारण बुद्धांनी स्वतः विचार करण्यावर आणि अनुभवातून सत्य समजून घेण्यावर भर दिला.
जगात काहीही कायम नाही – ना सुख, ना दुःख… म्हणून तणावातही शांत राहा.
प्रतिक्रिया देऊ नका, शांतपणे प्रतिसाद द्या.
जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष ठेवा.
बुद्ध म्हणतात –
जसं समुद्राच्या वर लाटा असतात पण तळ शांत असतो,
तसंच आपलं मनही शांत असायला हवं.
तणाव हा बाहेरच्या जगाचा भाग आहे,
पण शांत राहणं ही आपली निवड आहे.
मला बुद्ध आवडतो.. 🤍!
@Marathi_Kavita

❤64👍6🙏6🥰1
प्रीतीच वारे तिच्या
अंगाला स्पर्श करून गेले
भरले अंगात शहारे
हृदयाला वेड लावून गेले
ओठांवरचे बोल
शब्दात मांडत गेलो
प्रेमाच्या लाटेत तीच्या
सहज तरंगत गेलो
तीच्यासाठी रचल्या कवीता
चंद्र अन ताऱ्यावर
प्रेमात तुझ्या प्रिया
पार पोहचलो मी कुठंवर
स्वप्नातील राजकुमारी ती
बाकी चेहरे धुक्याआड गेले
रोज जगतो कवितेतून
सोबत जगायचं तेवढं राहून गेले
✍️Anonymous..{हिंगोली}
अंगाला स्पर्श करून गेले
भरले अंगात शहारे
हृदयाला वेड लावून गेले
ओठांवरचे बोल
शब्दात मांडत गेलो
प्रेमाच्या लाटेत तीच्या
सहज तरंगत गेलो
तीच्यासाठी रचल्या कवीता
चंद्र अन ताऱ्यावर
प्रेमात तुझ्या प्रिया
पार पोहचलो मी कुठंवर
स्वप्नातील राजकुमारी ती
बाकी चेहरे धुक्याआड गेले
रोज जगतो कवितेतून
सोबत जगायचं तेवढं राहून गेले
✍️Anonymous..{हिंगोली}
❤33🔥3👍2
Forwarded from Psi Balraje Pawar
भारतात दिवसेंगणिक आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले असून सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात होत असल्याचे एनसीआरबी च्या अहवालावरून दिसत आहे. काल परवा लातूर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड आणि पुणे येथील बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केल्याने वैद्यकीय तसेच व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून लोक आत्महत्या का करतात? याची कारणे, उपाय व जनजागृती आजच्या लेखात चर्चा केलेली आहे.
👍6❤2
Forwarded from Rutuja mapare
हसवताना रडणं विसरवणारा असतो, आपल्यासाठी स्वतःला मागे ठेवणार असतो, कधीच मागत नाही काही परत,मित्र म्हणजे
निस्वार्थी मनाचा स्वच्छ आरसा असतो..!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💫❤️
@rutuja_writes1203
निस्वार्थी मनाचा स्वच्छ आरसा असतो..!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💫❤️
@rutuja_writes1203
❤8
Forwarded from B K
मैत्री म्हणजे नेमके काय?(नक्की वाचा)
"मैत्री" म्हणजे न बोलता मनातली व्यथा,दुःख जाणून घेणे😊मैत्री म्हणजे म्हणजे वाईट वेळेनुसार बदलणारी नव्हे💫तर वाईट वेळच बदलून टाकणारे एकमेव नाते.."मैत्री" म्हणजे रक्तपलिकडील हक्काचं नातं🥰"मैत्री" म्हणजे विचारांची गुफणं जी कधीच वेगळी होत नाही एकत्र राहते. "मैत्री"म्हणजे निस्वार्थपणे एकमेकांना लावलेला जिव्हाळा,स्नेह साथ देणे😇मैत्री म्हणजे आपल्या अस्तित्वाची क्षमतांची जाणून करून देणे🥰मैत्री म्हणजे कोणताही भेदभाव नसलेले भगवान श्रीकृष्ण-सुदामाचे नाते😇"मैत्री"म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत अगदी मृत्यूला एकत्र कवटाळणी घालणारे भगतसिंग,राजगुरू,सुखदेव असे नाते🫡"मैत्री"म्हणजे मित्राच्या दुःखात सुख,सांत्वन करणारे नाते!"मैत्री"म्हणजे आयुष्यात योग्य मार्ग दाखवणारे नाते😇 "मैत्री"म्हणजे अनेक नात्यात एक असे नाते जिथे निसंकोच पणे मनातील व्यथा,दुःख व्यक्त करायला असणारे व्यासपीठ..अशा मैत्रीदिनाच्या शुभेच्छा🥰आणि त्यांना धन्यवादही...
Happy friendship day..😇🥰
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Cont-7218160575(what's)
Telegram-@Bskendre5
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

❤9
*दै.पथदर्शी,अग्रलेख* दि. 03/08/2026
*लाचखोर सरळ बडतर्फ झाले तर वरच्यांचीही वाहती गंगा बंद होईल काय?*
*महाराष्ट्र* शासनाचा असा कोणता विभाग आहे, ज्यात लाचखोरीचा कॅन्सर पसरलेला नाही? असा प्रश्न जर कुणी उपस्थित केला, तर त्याचे उत्तर शोधणे अवघड व्हावे, अशी आज राज्याची भयानक स्थिती आहे. बहुतेक विभागात आता पदांची बोली लागत असल्याने मंत्रालय हे राज्याच्या प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे केंद्र आहे की ' खोके गोळा केंद्र ' झाले आहे? असा उघड प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. नगरविकास, गृह, महसूल, परिवहन, शिक्षण, आरोग्य, वने, सा. बां. कितीतरी विभाग आहेत. ते भ्रष्ट्राचाराने बरबटलेले आहेत. परवा वन विभागाच्या बीडच्या एका वरिष्ठ वनाधिकार्याने आपला झेंडा गाडला. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड यास तब्बल ४५ लाख रुपये लाच घेताना एसीबीने त रंगेहाथ पकडले. उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीनंतर लागलीच तो सापळ्यात अडकला. तो चार दिवस पोलिस कोठडीत गेला. त्याच वेळी इकडे धुळ्यात समाज कल्याण विभागाचा वर्ग दोनचा अधिकारी विशाल चौधरी २० हजार रुपये घेताना एसीबीच्या ताब्यात गेला. राज्यात एसीबीने दोन - चार लाचखोर ताब्यात घेतले नाहीत, असा दिवस जात नाही. हा कॅन्सर इतका वाढला आहे. यांचे पुढे काहीही वाकडे होत नाही, ही गॅरंटी असल्याने ही लाचखोरी कोरोना सारखी वेगाने वाढत आहे. ती थांबावी यासाठी कुठले व्हॅक्सिन शोधावेसे शासनालाच वाटत नाही. कारण हे लाचखोरच वरपर्यंत पेट्या आणि खोके पोहोचविणारे साधन आहेत. त्यांनीच लाचखोरी बंद केली तर वरपर्यंत प्रवाह कसा जाईल? म्हणूनच शासनकर्त्या मंडळींना या प्रवाहाच्या झिरप्यांना बंद करावयाचे नाही. शिवाय भ्रष्ट्राचाराच्या उगमावर बुचही मारावयाचे नाही.
बीडच्या या लाचखोर लखमावाड बाबत खूप तक्रारी होत्या. मात्र खात्याचे वरचे लोक दखल घेत नव्हते. कां घेत नव्हते? त्याला फुकट प्रोटेक्ट करीत होते काय? या प्रश्नांची उत्तरे आपोआप समोर आली आहेत. बीड हे भ्रष्ट्र अधिकाऱ्यांचे मेळावा स्थान झाले आहे. परंतु बीडचे लोक लाचेच्या तक्रारी करण्यासाठी बीड एसीबी कडे न जाता नेहमी अन्य जिल्ह्यातील एसीबीकडे कां जातात? या प्रश्नाचेही उत्तर शोधणे आता आवश्यक झाले आहे. आता देखील लखमावाडची कारवाई छ.संभाजी नगरच्या एसीबीने केली आहे.
हा लखमावाड एमपीएससी परीक्षेतला टॉपर होता. आता देशातले आयएएस व एमपीएससीचे इतके टॉपर लाचेत पकडले जावू लागले आहेत, की या परिक्षांबाबत, त्यांच्या निवड प्रक्रियेबाबत व त्या परिक्षा घेणाऱ्या आयोगांबाबतच प्रश्न विचारले जावू लागले आहेत. या आयोगांच्या नावात ' पब्लिक सर्व्हिस ' शब्द आहे. तो कशासाठी आहे? राज्यघटनाकारांचा हे आयोग स्वायत्त ठेवण्यामागाचा जो पवित्र हेतू होता, तो हेतू हे आयोग पूर्ण करित आहेत काय? लाचेत इतक्या मोठ्या प्रमाणावर युपीएससी व एमपीएससीचे टॉपर सापडू लागले आहेत, म्हणून हा प्रश्न समोर येत आहे. शिवाय देशात व राज्यात कितीतरी शासकीय विभागांमध्ये शेकडो - हजारो कोटींचे घोटाळे समोर येत आहेत. यासर्व शासकीय विभागात सर्वोच्च स्थानी प्रशासकीय नेतृत्व करणारे हेच आयएएस अधिकारी असतात. ते खूप हुषार - चाणाक्ष, उच्च आय क्यु वाले, प्रॉब्लेम हंटर - प्रॉब्लेम सॉल्व्हर वगैरे - वगैरे असतात, असे मानले जाते. मग त्यांच्या खात्यात त्यांच्या हाताखाली एवढे शेकडो - हजारो कोटींचे घोटाळे होत असताना, त्यांच्या लक्षात कसे येत नाही? त्यांनी डोळे मिटून घेतले होते काय? असा प्रश्न त्यांना कां विचारला जात नाही. त्यांची काहीच ' अकाउंट्याबिलीटी ' कां फिक्स केली जात नाही? हा आज देशातला सर्वात जिवंत प्रश्न आहे. भ्रष्ट्राचाराचा प्रवाह हा वरून खाली वाहात असतो. वरूनच बोली लावून पदस्थापना देण्यात येत असतील, तर अशी पदस्थापना विकत घेणारा अधिकारी खाली मनसोक्त धुमाकुळ घालणारच. त्याच्या बाबत नागरिकांच्या तक्रारींवर पांघरूण घालण्याची ड्यूटी मग वरीष्ठांना करावी लागणारच. त्यातून जनतेत प्रचंड नैराश्य येत आहे, याची फिकीर कुणालाच नाही.
राज्यभरात एक जानेवारी ते ३० जुलै अखेरची एसीबी छाप्यांची आकडेवारी काय सांगते. या सात महिन्यात राज्यात एसीबीने ४३९ कारवाया केल्या. यात ६३२ जणांना अटक केली. अपसंपदेचा एक गुन्हा व इतर १२ गुन्हे आहेत. गत वर्षाच्या मानाने गुन्ह्यात पाच टक्क्यांची वाढ आहे. एसीबीने कारवाई केली तरी २१७ जणांना शासनाने अद्याप निलंबितही केलेले नाही. कोर्टात खटला दाखल करण्यासाठी ४८४ प्रकरणात अद्याप राज्यशासन व सक्षम अधिकारी यांची परवानगीच मिळालेली नाही. राज्यभर जनतेतून प्रचंड संताप आहे. लाचेत पकडलेले अधिकारी दोन - तीन महिन्यात पुन्हा खर्चीवर कसे येवून बसतात? त्यामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत असतो. त्यांना निलंबन काळात ५० टक्के, ७५ टक्के वेतन देणे बंद करावे, व ताबडतोब बडतर्फ करावे. तशी कायद्यात सुधारणा व्हावी.

❤13👍4💯1
अशी सर्व स्तरातून मागणी असताना, राज्याचे कारभारी त्याकडे डोळेझाक कां करतात? बदल्या व पदस्थापनेतील त्यांचीही वाहती गंगा बंद होण्याची त्यांना भिती वाटते काय? असा प्रश्न आता नागरीक विचारु लागले आहेत!
( कृपया फॉरवर्ड करा- *योगेंद्र जुनागडे,* धुळे )
@Marathi_Kavita
( कृपया फॉरवर्ड करा- *योगेंद्र जुनागडे,* धुळे )
@Marathi_Kavita
❤4👍2💯1
"सामन्यांतील असामान्य असे नटसम्राट"..(नक्की पूर्ण वाचा..✍️)
काही व्यक्ति ह्या फक्त पडद्यापुरते कलाकार किंवा हीरो नसून ते आपल्या आयुष्यातही असामान्य हीरो अथवा हिरेच असतात,असे म्हणलं तरीही त्यात काही वावगं ठरणार नाही..!त्या हिर्यांच्या खाणीतील,आपल्या मराठी मातीतील महाराष्ट्रातील एक कोहिनूर हिरे म्हणजे नाना पाटेकर सर हे व्यक्तिमत्त्व हे आपल्याला लाभले होते हे आपलेच सौभाग्य..!🙂
देशसेवेसाठी आपले प्राण पणाला लावणारे नाना ज्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान प्रत्यक्ष सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांसोबत सेवा केली होती.चित्रपटातील एखाद्या देशसेवेच्या पात्राला दाद देण्यासाठी कसे झगडावे हे नानांकडून शिकण्याजोगे..'प्रहार' या चित्रपटातील लष्करी अधिकाऱ्याची (मेजरची) भूमिका साकारण्यासाठी त्यांनी भारतीय लष्कराच्या मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये सुमारे ३ वर्षे खडतर लष्करी प्रशिक्षण घेतले होते,ह्यातून त्यांची कर्तव्यदक्ष आणि समर्पणता दिसून येते..🫡
देशसेवेसोबतच त्यांची सामाजिक बांधिलकी,समाजाप्रती असणारी आपुलकी,शेतकर्यांच्या आत्महत्याग्रस्थ कुटुंबांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़े..त्यांच्या सामाजिक विचारांतून एक पेरलेले बीज म्हणजे"नाम फाऊंडेशन"ज्याच्या शाखा दुष्काळी भागातील लोकांना,शेतकर्यांना,महिलांना आजही कठीण काळात उभे राहायला अनेकांना आधार देत असते🫡
हेच त्यांचे वेगळेपण त्यांना सामान्यतून असामान्य बनवत होते,भलेही मग ते कार्य कोणत्याही क्षेत्रातील पडद्यावरील असो की पडद्यामागील किंबहुना त्यांचा खाजगी जीवनातील खूप काही शिकवून जाते..आजच्या दुष्काळी काळात त्यांच्यासारख्या माणसांची गरज होतीच पण काळाचा घाला,नेहेमी उणीव भासेल..भलेही आज ते शरीराने आपल्यात नसतील परंतु त्यांच्या विचारांनी,सामाजिक कार्यांनी जिवंत असणारे,त्यांचे कार्य खरच खूप असामान्य होते म्हणूनच खरेखुरे आपल्यातील असे "नटसम्राट"पुन्हा मिळणे दुर्मीळच....त्यांच्या कार्याला सलाम व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!🫡🙏
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)

❤8👍3
Forwarded from ShashanK
📚🔥 मराठी साहित्यप्रेमींसाठी खास पर्वणी! 🔥📚
❤️ आवडती मराठी पुस्तके आता E-BOOK स्वरूपात! ❤️
📖 फक्त ₹९९ मध्ये तुमच्या आवडीची E-BOOK! 😍
✨ उपलब्ध E-BOOK पुस्तकांची यादी ✨
📚 शिवाजी सावंत
🔸 छावा
🔸 ययाती
🔸 मोरावळा
📚 व. पु. काळे
🔸 तप्तपदी
📚 बाबुराव अर्नाळकर
🔸 रत्नराज झुंजार
🔸 एकोणासावे शिरकाण
🔸 गोलंदाज आणि कांचण
🔸 नववे नवल
📚 वि. स. खांडेकर
🔸 कौचवध
🔸 हिरवा चाफा
🔸 पहिले प्रेम
🔸 सुखाचा शोध
🔸 मध्यरात्र
🔸 अजून येतो वास फुलांना
📚 रणजित देसाई
🔸 राधेय
🔸 पावनखिंड
🔸 गंधाली
🔸 मेघ
🔸 लक्षवेध
📚 पु. ल. देशपांडे
🔸 असा मी असामी
🔸 ती फुलराणी
🔸 बटाट्याची चाळ
🔸 मैत्र
🔸 खिल्ली
📚 भालचंद्र नेमाडे
🔸 कोसला
🔸 बिढार
📚 रत्नाकर मतकरी
🔸 फाशी बखळ
🔸 तन-मन
🔸 अडम
🔸 स्वप्नातीर चांदणे
🔸 खेकडा
━━━━━━━━━━━━━━━━━━
💥 प्रत्येक E-BOOK फक्त ₹९९ मध्ये! 💥
📲 E-BOOK खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा!
📞 WhatsApp / Message: 8308650426
📩 तुम्हाला हवे असलेल्या पुस्तकाचे नाव मेसेजमध्ये पाठवा.
📚 वाचा मराठी… जपा मराठी साहित्य! ❤️

❤6🥰1
मराठी कविता pinned «📚🔥 मराठी साहित्यप्रेमींसाठी खास पर्वणी! 🔥📚 ❤️ आवडती मराठी पुस्तके आता E-BOOK स्वरूपात! ❤️ 📖 फक्त ₹९९ मध्ये तुमच्या आवडीची E-BOOK! 😍 ✨ उपलब्ध E-BOOK पुस्तकांची यादी ✨ 📚 शिवाजी सावंत 🔸 छावा 🔸 ययाती 🔸 मोरावळा 📚 व. पु. काळे 🔸 तप्तपदी 📚 बाबुराव अर्नाळकर 🔸 रत्नराज…»