SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
184 videos
2.53K files
5.55K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
टायपिंग संदर्भात विचारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी...*
✍2
CBT Announcement.pdf
1.2 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Media is too big
VIEW IN TELEGRAM
पाचशे-हजार पदांकरिता एक-एक, दोन-दोन, पाच-पाच लाख मुलं हे त्या ठिकाणी परीक्षेला बसतात. त्याच्याऐवजी वीस-वीस हजार पदं हे कसे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतील आणि वेळेमध्ये त्याचा निकाल कसा लावता येईल हा आपण प्रयत्न सुरू केलाय.
मी MPSC च्या अध्यक्षांचं अभिनंदन करेन की नुकताच त्यांनी नवीन रेकॉर्ड केला. २१ दिवसांमध्ये परीक्षा घेऊन त्याचा निकाल लागला. परीक्षेमध्ये कुठलीही गडबड नाही, कुठलाही गोंधळ नाही, कुठलाही त्या ठिकाणी पेपर लीक नाही आणि २१व्या दिवशी त्या ठिकाणी त्याचा निकाल लागलेला आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न हा आहे की MPSC च्या परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत. जास्तीत जास्त मुलांना संधी मिळाली पाहिजे. आणि अत्यंत पारदर्शीपणे या परीक्षा झाल्या पाहिजेत.
या संदर्भात मला हे समजलं की आता काल-परवा काहीतरी अध्यक्षांनी घोषणा केली की या सगळ्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काही तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कुठलाही निर्णय एकतर्फी होणार नाही. निर्णय हा आपण सगळ्यांशी चर्चा करून घेऊ.
मी आज अध्यक्षांना विचारलं, त्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलं देशातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या त्या ठिकाणी ऑनलाईन होतायत आणि आता पुढच्या वर्षीपासनं NEET ची परीक्षा देखील त्याच पद्धतीनं घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे आपले विद्यार्थी हे पारदर्शी परीक्षेला सामोरे गेले पाहिजेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेत त्याचे निकाल लागून त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. याकरता मी हा निर्णय घेतलाय पण मी त्यांनाही सूचना केली की विद्यार्थ्यांशी व्यापक चर्चा करा. त्यांना हे समजावून सांगा. हे निर्णय काही MPSC च्या हिताकरता नाहीयेत. निर्णय जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या हिताकरता आहेत. विश्वासात घेऊन घेतलेले निर्णय हे नेहमी उत्तम असतात. एकतर्फी घेतलेले निर्णय हे अनेकांच्या डोक्यामध्ये काही ना काही कन्फ्युजन तयार करतात.
आणि म्हणून मी विद्यार्थ्यांनाही आश्वस्त करू इच्छितो, MPSC मध्ये बदल खूप करायचे आहेत. त्याच्यामध्ये पारदर्शकता अधिक आणायची आहे. पण हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून आणि विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी विश्वासात घेऊन हे केलं जाईल.
फक्त या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय अनेक वेळा कोचिंग क्लासेसचे लोक काहीतरी त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्यांचं जे काही सेटअप आहे, हे सेटअप डिस्टर्ब झाल्यामुळे या ठिकाणी जी आंदोलनं उभी करतात, ती मात्र करणं योग्य नाहीये. त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं काम हे मुलांना प्रशिक्षित करणं आहे. मुलांना त्या ठिकाणी वापरणं हे तुमचं काम नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने जर मुलांचा वापर कोणी करणार असेल तर ते देखील योग्य नाहीये..."
❤4👍3
Answer Key Out ✅🔥

RRB NTPC UG Exam CBT-01 2025-26

Answer Key Link
https://rrb.digialm.com/EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=100181&orgId=33128
❤2
👌2
❤1✍1
👍2
❤1
❤1
❤1