दाते पंचांग (Date Panchang)
3.36K subscribers
2.48K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
7 सप्टेंबर 2025, रविवारी खग्रास चंद्रग्रहण
दिनांक 7 सप्टेंबर रोजी रविवारी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असून हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे. रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ग्रहण सुरु होणार असून रात्री ११ वाजता खग्रास अवस्था सुरु होईल, या वेळेस पूर्ण चंद्रबिंब झाकले जाईल आणि रात्री १२ वाजून २३ मिनिटांनी पुन्हा चंद्रकोर दिसू लागेल. १ तास २३ मिनिटे खग्रास अवस्था राहणार आहे. उत्तररात्री १ वाजून २७ मिनिटांनी ग्रहण संपेल व पूर्ण चंद्रबिंब दिसू लागेल. भारतासह संपूर्ण आशियाखंड, अफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे या प्रदेशात ग्रहण दिसेल.
हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरु होत असल्याने दुपारी १२:३७ पासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत, मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप घेणे हे करता येईल. लहान मुले, वृद्धवक्ती, आजारी - अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी 7 सप्टेंबरच्या संध्याकाळी ५:१५ पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. ग्रहण पर्वकाळ म्हणजे रात्री ९:५७ ते उत्तररात्री १:२७ या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करु नयेत, आधी करून घ्यावीत किंवा ग्रहण मोक्षानंतर करावीत.
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, जेवण करू नये. महाराष्ट्रामध्ये काही प्रदेशात रविवारी देखील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु असतात अशा ठिकाणी रात्री ९ पूर्वी गणेशाचे विसर्जन करावे.
यापूर्वी 16 सप्टेंबर 1997 रोजी याप्रमाणे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलेले होते.
❤24
🙏14❤3
🙏10❤7👍1
🙏8❤6👏1
१० सप्टेंबर २०२५ - भाद्रपद कृष्ण चतुर्थी - संकष्ट चतुर्थी

datepanchang.com
❤6🙏2
🙏14❤4
🙏12❤6
🙏10❤5
🙏9❤4
संपर्क साधण्यासाठी मेल पाठवा:
sampark@datepanchang.com
❤6👍3
🙏11❤9
🙏11❤6
अधिक माहिती साठी भेट द्या: https://datepanchang.com/
❤4
🙏10❤5
यंदा नवरात्र 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असे १० दिवसांचे
आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होतो, यावर्षी 22 सप्टेंबर रोजी सोमवारी नवरात्रारंभ होणार असून याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाईल. साधारणपणे नवरात्र हे नऊ दिवसांचे असते. परंतु तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी नवरात्र हे ८ किंवा १० दिवसांचे होऊ शकते. यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र १० दिवसांचे असणार आहे. गेल्या वर्षी 2024 मध्ये देखील तृतीया वृद्धीतिथी होती आणि नवरात्र 10 दिवसांचे होते. नवरात्रामध्ये देवीस रोज एक माळ अर्पण करताना जितक्या दिवसाचे नवरात्र असेल तेवढ्या माळा रोज एक याप्रमाणे अर्पण कराव्यात. वृद्धी असल्याने दोन दिवसांच्या दोन स्वतंत्र माळा अर्पण कराव्यात. अनेकजण नवरात्रीचे सर्व दिवस उपवास करतात मात्र काही कारणाने ते शक्य नसल्यास पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करावा. तसे करणे ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचे दिवशी तरी करावा.
नवरात्रापूर्वी अशौच आल्याने प्रतिपदेस नवरात्र बसविता येणार नसेल तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ (24 सप्टेंबर), पंचरात्रोत्सवारंभ (27 सप्टेंबर), त्रिरात्रोत्सवारंभ (29 सप्टेंबर) किंवा एकरात्रोत्सवारंभ (30 सप्टेंबर) असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसाचे नवरात्र करावे. वयोमाना मुळे सुद्धा असे कमी करता येईल.
नवरात्रामध्ये देवीचा टाक किंवा मूर्ती याची वेगळी स्थापना करून पूजा केली जाते. काही जणामंध्ये इतर देवांची पूजा ९ दिवस केली जात नाही, ते अयोग्य आहे. अशा वेळेस पूजेतील इतर देवांची अभिषेक करुन नेहमी प्रमाणे रोज पूजा करावी आणि घटावर / टाकावर फुलाने पाणी शिंपडून पूजा करावी.
यावर्षीच्या नवरात्रातील काही प्रमुख दिवस -
ललिता पंचमी :- 26 सप्टेंबर, शुक्रवारी
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) :- 29 सप्टेंबर, सोमवारी
दुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन, महाष्टमी उपवास :- 30 सप्टेंबर, मंगळवारी
महानवमी, नवरात्रोत्थापन :- 1 ऑक्टोबर, बुधवारी
विजयादशमी (दसरा) :- 2 ऑक्टोबर, गुरुवारी (विजय मुहूर्त – दुपारी २:२७ ते ३:१५)
नवरात्रामध्ये अखंड नंदादीप लावला जातो काही वेळेस वाऱ्याने किंवा काजळी काढताना तो विझतो. अशा वेळेस काही अशुभ नसते, तो नंदादीप पुन्हा लावता येतो.
- दाते पंचांगकर्ते
❤20
🙏13❤6
🙏12❤5👍1