LetsUpp Marathi
4.87K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
या घडीच्या 10 महत्वाच्या घडामोडी

Letsupp | Bulletin

▪️ शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख अनंतात विलीन; काल दुपारी सांगोल्यात शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

▪️ महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला, पुण्यात 50 वर्षीय महिलेला लागण झाल्याची आरोग्य विभागाची माहिती

▪️ राज्यात काल दिवसभरात 225 रूग्णांचा मृत्यू; तर 6 हजार 959 नवीन कोरोनाबाधित रुग्ण

----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६
----------------------

▪️ पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्राच्या हॉटशॉट्स, बॉली फेम अ‍ॅपमधून 51 अश्लील चित्रपट जप्त; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

▪️ गडचिरोलीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याचा पोलिसांकडून पर्दाफाश; 10 जणांना अटक, राज्यस्तरीय रॅकेटची शक्यत

▪️ आजपासून एटीएममधून पैसे काढणं होणार महाग; आरबीआयचे नवीन नियम लागू, सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता

▪️ जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांत चकमक; दोन दहशतवादी ठार

▪️ पंतप्रधानांनी गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही एक हजार कोटी द्यावेत, खासदार संजय राऊत यांची मागणी

▪️ देशातील 10 राज्यांत कोरोना विषाणूचा महास्फोट; केंद्र सरकारकडून संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना

▪️ कॅनडामध्ये नव्या डेल्टामुळे कोरोनाची चौथी लाट येऊ शकते; कॅनडाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा

To know more click here
https://letsup.app.link/gdmbj5N2lib
गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी; 'लालबागचा राजा' मंडळाने घेतला मोठा निर्णय

LetsUpp | Trending

🛕 गेल्या वर्षी कोव्हीड-19 संसर्गमुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता.

🔔 यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे मंडळाच्या बैठकीत ठरले आहे. यामुळे यंदाच्या वर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे.

👉 गणेश मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्बंध शासनाने घालून दिली आहे. त्याचे काटेकोर पालन मंडळाकडून केले जाईल. भाविकांना लालबाग राजाचे दर्शन ऑनलाइन घेता येईल यासाठी मंडळाकडून तयारी केली जाणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Veymsroqmib
या घडीच्या 10 महत्वाच्या घडामोडी

Letsupp | Bulletin

▪️ जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे

▪️ लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली पुण्यातील चुमुकली वेदीकाची प्राण ज्योत अखेर मालवली

▪️ कोरोनाच्या 'आर व्हॅल्यू'ने टेन्शन वाढले, पॉझिटिव्हीटी दर 10 टक्केपेक्षा जास्त तिथे निर्बंध कठोर करा! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राज्यांना सूचना

----------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ९६२३१७४५५६
----------------------

▪️ पूरग्रस्त भागांच्या मदतीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

▪️ दक्षिण गोव्यातील कर्फ्यूमध्ये 9 ऑगस्टपर्यंत वाढ; दुकानं, चित्रपटगृह, कसिनो, संग्रहालयं आणि आठवडी बाजार बंद राहणार

▪️ काश्मीरमध्ये सरकारचे कठोर निर्बंध जाहीर, दगडफेक करताना पकडल्यास 'नो पासपोर्ट, नो गवर्नमेंट जॉब'

▪️ आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे सुमारे 8 कोटी रुपयांचे स्वतंत्र आदिवासी वसतिगृह उभारण्याचा निर्णय राधाकृष्ण विखे यांनी घेतला

▪️ घाटकोपर-मानखुर्दला जोडणारा छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल खुला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

▪️ भारतीय हॉकी संघ 49 वर्षांनंतर उपांत्य फेरीत, ग्रेट ब्रिटनवर 1-3 असा दमदार विजय मिळवला

▪️ बारावीचा निकाल आज सोमवार (दि.2 ऑगस्ट) जाहीर होण्याची शक्यता, निकालाकडे लागले विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष!

To know more click here
https://letsup.app.link/ildeK1eInib
मुख्यमंत्री आज सांगली दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

Letsupp | Trending

⚡ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

🌊 मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. आता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

🏚️ दरम्यान सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे.

🗣️ नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पूरग्रस्तांची भेट घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

💁🏻‍♂️ असा असणार आहे मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा

▪️ सकाळी 9.50 वा. मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.

▪️ सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे मोटारीने आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

▪️ सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

▪️ सकाळी 11.55 वा. कसबे डिग्रज येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

▪️ दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

▪️ दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल, येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

▪️ दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

▪️ दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद.

▪️ दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

To know more click here
https://letsup.app.link/zFTNYkCInib
'त्या' जिल्हाधिकाऱ्यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच बदली झाली रद्द

LetsUpp | Parbhani

⚡ परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर नुकतेच निवृत्त झाले व त्यांच्या जागी आंचल गोयल यांची नियुक्ती देखील झाली.

👨🏻‍💼 मात्र, गोयल यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच नाट्यमय घडामोडी घडल्या आणि मुंगळीकर यांच्या जागी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सोपवला गेला.

👩🏻‍💼 दरम्यान पदभार स्वीकारण्यासाठी आंचल गोयल या परभणी जिल्ह्यात दोन दिवस आधीच दाखल झाल्या होत्या.

💁🏻‍♂️ आंचल गोयल या डॅशिंग आणि कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. जिल्ह्यातील नेत्यांना त्या नको होत्या.

🗣️ त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या दबावापोटी सरकारने त्यांची परभणीतील नियुक्ती रद्द केली असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सध्या रंगली आहे.

👍 मुंगळीकरांच्या निवृत्तीनंतर आता अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर हे परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

📍 मात्र आंचल गोयल यांच्या जागी परभणी जिल्हाधिकारी म्हणून कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

To know more click here
https://letsup.app.link/8rI5qiRVnib
मुंबई लोकलमध्ये प्रवासासाठी 'या' कर्मचाऱ्यांना मुभा

LetsUpp | Trending

🚊 वकिलांचाही फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता वकील आणि कोर्टातील क्लार्कना मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र वकील संघटनेकडे देणं अनिवार्य आहे.

🚇 त्यानंतर संघटना वकिलांना पासच्या मंजुरीसाठी प्रमाणपत्र देणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवून तिकीट विंडोवर केवळ पास दिला जाईल, दैनंदिन तिकीट मिळणार नाही, अशी माहिती महाधिवक्त्यांनी हायकोर्टात दिली आहे.

🚇 यावेळी मात्र सर्वसामान्य जनतेचं काय? असा सवाल हायकोर्टानं केला. लस घेतल्यांना जर घरात बसावं लागतं असेल तर लसीकरणाचा उपयोग काय? असंही हायकोर्टानं म्हटलं आहे.

📍लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा सरकारचा मानस आहे, असंही महाधिवक्ता म्हणाले.

👉 सध्या चर्चगेट ते दहीसर प्रवास करायला किमान 3 तास लागत आहेत. सर्वसामान्यांचाही गांभीर्यानं विचार करा, असं हायकोर्टानं म्हटलं. गुरूवारपर्यंत यावर भूमिका स्पष्ट करू, असं आश्वासन महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं.

To know more click here
https://letsup.app.link/32h1RNr9nib
*‘मिमी’ आवर्जून पाहावी अशी कलाकृती*

LetsUpp | Entertainment

🎬 इंग्लिश विंग्लिश’, ‘डिअर जिंदगी’, ‘हिंदी मिडीयम’, ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटांमधून लक्ष्मण उतेकर यांनी कॅमेराच्या मागून उत्कृत्ष्ट कलाकृती प्रेक्षकांना दाखवली आहे. यासोबत त्यांनी मराठीत ‘टपाल’, ‘लालबागची राणी’ आणि हिंदीतील ‘लुकाछुपी’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची वेगळी छाप पाडली आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिमी’ चित्रपट नेटफ्लिक्स रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

🎞️ सुरुवातीपासून शेवटापर्यंत हा चित्रपट आपल्याला गुंतवून ठेवतो. उत्कृष्ट कथा, कलाकारांची मेहनत, दिग्दर्शकाची पकड आणि कॉमेडीचा तडका यामुळे ‘मिमी’ चित्रपट प्रभावी वाटतो. या चित्रपटात भावभावनांचे विविध कंगोरे उलगडून दाखवले आहेत.

🇮🇳 एकेकाळी भारतामध्ये सरोगसीचा मोठा व्यवसाय केला जात होता. यामुळे पाश्चात्त्य देशांसाठी भारत सरोगसीचं केंद्रस्थान बनला होता. या सरोगसी व्यवसायातून अनेक महिलांचे आणि तरुणींचे बळी गेले आहेत. इच्छा नसतानाही कुटुंबाच्या दबावामुळे किंवा परिस्थितीमुळे अनेक तरुण मुलींना हा व्यवसाय करावा लागला. यातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. ‘मिमी’मध्ये हीच गोष्ट मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे.

👩‍🍼 २०११ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या ‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटावर ‘मिमी’ बेतलेला आहे. त्याची मूळ कथा समृद्धी पोरे यांची आहे. मराठी चित्रपटाचं हिंदी रूपांतर लक्ष्मण आणि रोहन शंकर यांनी केलं आहे.

👀 या चित्रपटाची गोष्ट सुरू होते, उत्तर प्रदेशातल्या एका गावात. इथं ‘सरोगसी’साठी तयार असणाऱ्यांची कमी नाही. जॉन (एडन व्हायटॉक) आणि समर (एवलीन एडवर्ड्स) हे अमेरिकी जोडपं त्यांच्या बाळासाठी सरोगेट आईच्या शोधात भारतात आलं आहे. त्यांचा चालक भानू (पंकज त्रिपाठी) याला हे कळल्यावर तो त्या जोडप्याला मिमीपर्यंत (क्रिती सेनन) घेऊन जातो.

💃 उत्तम नर्तिका असलेल्या मिमीला अभिनेत्री व्हायचं आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सरोगेट आई होण्याचं स्वीकारते; पण जॉन आणि समर सगळं अर्ध्यावरच सोडून अमेरिकेला निघून जातात. पुढं मिमी बाळाला कसा जन्म देते आणि स्वतःसह, कुटुंब आणि समाजाशी कशी झगडते, हे सर्व समजण्यासाठी आपल्याला ‘मिमी’ चित्रपट बघावा लागलं.

📌 या चित्रपटात क्रिती सेननने उत्कृष्ट अभिनय केला आहे. तिच्या सोबतीला असणाऱ्या सई ताम्हणकरची भूमिका देखील चांगला भाव खाऊन जाते. या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे ते पंकज त्रिपाठींनी. त्यांचा अभिनय नेहमीसारखाच दाद मिळवणारा आहे. आवर्जून पाहावी अशी ही कलाकृती आहे.

*मिमी*
● दिग्दर्शक: लक्ष्मण उतेकर
● कथा-पटकथा: लक्ष्मण उतेकर, रोहन शंकर
● कलाकार: क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक
● छायांकन: आकाश अग्रवाल
● संकलन; मनीष प्रधान
● संगीत; ए. आर. रेहमान
● ओटीटी; नेटफ्लिक्स


👉 चित्रपट समीक्षा - प्रशांत शिंदे

*बॉलिवूड असो कि हॉलिवूड, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक अपडेट, हिरोहिरॉईन्स चे खास किस्से जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप*
https://letsup.app.link/vwIBPr2aoib
VIDEO : फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या कोल्हापूरच्या महिलेला प्रियांका चोप्रा म्हणाली, यू रॉक!

LetsUpp | Kolhapur

💁🏻‍♂️ सोशल माध्यमांवर काही गोष्टी व्हायरल झाल्या तर कधी त्या ट्रोलही करतात तर काही प्रसिद्धीच्या शिखरावर देखील पोहचवतात.
👱🏻‍♀️ नुकतेच कोल्हापूर येथील मेहंदी आर्टिस्ट सोनाली यांच्या खडाखड इंग्रजीची बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस व प्रियांका चोप्राला चांगलीच भूरळ पडली आहे.

😍 मेहंदी आर्टिस्ट सोनाली वाघारिया या अस्खलित इंग्रजी बोलतात. त्यांच हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून याचीच दखल सिनेकलाकारांनी घेतली आहे.

🧐 कोण आहेत सोनाली वाघारिया?
▪️ जेमतेम परिस्थितीमुळे सोनाली वाघारिया यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. मुंबईतील सांताक्रूझ येथे सोनाली यांनी जुहू परिसरात परेदशी पर्यटकांच्या हातावर मेहंदी काढण्याचे काम केले.

🗣️ परदेशी नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची इंग्रजी भाषा त्यांनी अवगत केली. एके दिवशी इंग्रजी बोलण्याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला.

👩🏻‍🦰 अभिनेत्रींनी घेतली दखल
या व्हिडिओची दखल अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी घेतली. ‘स्ट्राँग वुमन’ म्हणून त्यांनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी त्यांना मुंबईला येऊन रिल्स बनविण्याचे व मेहंदी काढण्याचे आमंत्रण दिले आहे.

To know more click here
https://letsup.app.link/Hry0miiVpib
भारतीय तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून धमकी

LetsUpp | Trending

⚡ टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकार समोर आला आहे.

🏠 प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील साराडे गावचा आहे. जाधव कुटुंबातील चार जण एका झोपडी वजा घरात राहतात. जाधव लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले.

💁🏻‍♂️ यासंदर्भात जाधवने सांगितले की, सकाळी पाच सहा जण आले आणि माझ्या वडीलांना आणि काकांना धमकी देऊन गेले. आम्ही घराची काही दुरुस्ती करणार आहोत, यासाठी त्यांचा विरोध आहे.

👉 याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. त्यांना एक स्वतंत्र मार्ग हवा आहे. ज्यावर आम्ही होकार दिला होता. पण आता त्यांनी मर्यादा सोडली आहे.

🗣️ आम्ही घराची दुरुस्ती करणार आहोत. त्याला विरोध करत आहे. या घरात आम्ही अनेक वर्षापासून राहत आहोत, सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत, असे जाधवने सांगितले.

To know more click here
https://letsup.app.link/ic0zgMXQpib
...आणि अभिनेते मिलिंद शिंदे बालंबाल बचावले!

LetsUpp | Trending

⚡ लॉकडाऊनमुळे चित्रपटांच्या चित्रीकरणाची कामं अर्धवट थांबली होती. मात्र अनलॉकनंतर काही प्रमाणात ती कामे चालू झाली आहेत.

👉 या पार्श्वभूमीवरच एका आगामी मराठी चित्रपटाच्या उर्वरीत भागाच्या चित्रीकरणाचे काम चालू असताना जेष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे हे थोडक्यात बचावले आहेत.

काय आहे घटना? :

● अभिनेते मिलिंद शिंदे आपल्या उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र "जयंती" या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यासोबत अगदी जीवावर बेतण्याइतकी घटना घडली आहे.

● मोठ्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याने सर्वजण अगदी उत्साहित होते. चित्रपटाच्या व्याप्तीनुसार मोठमोठाले लाईट्स, जिमी जीब क्रेन्स, मल्टिकॅमेरा सेटअप अशा अनेक अवजड उपकरणांच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरु होणार होते.

● नेहमीप्रमाणे मिलिंद शिंदे आपल्या भूमिकेमध्ये मग्न होऊन सराव करत होते, सेटवर जिमी जीब कॅमेराचा सेटअप लावलेला होता, कॅमेरा टीमही जिमी जीबवर पुढील मंद प्रकाशातील शॉट च्या चित्रीकरणाचा सराव करत होती.

● कथित सीनसाठी जिमी जीब क्रेनचं वेगाने खाली येणं हा चित्रीकरणाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि म्हणूनचं क्रेनच्या वेगाचे नियंत्रण हे चोख असावे यासाठी टीम काम करत होती.

● या आव्हानात्मक शॉटच्या सरावात टीम इतकी गुंतली होती की कोणालाचं आपल्या सरावात मग्न असलेले मिलिंद शिंदे हे क्रेन ज्या दिशेने खाली येणार होती नेमके तिथेचं उभे होते हे समजलं नाही.

● परंतु जिमी जीब क्रेन नियंत्रित करणाऱ्या ऑपरेटरला खाली उभे असलेले मिलिंद शिंदे दिसले आणि सरावादरम्यान वेगाने खाली येणाऱ्या जिमी जीब क्रेनला त्याने अगदी चपळाईने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या बाजूला वळवली.

● नेमक्या त्याच क्षणी मिलिंद शिंदें फ्रॅक्शन ऑफ सेकंदातचं खाली वाकले आणि थोडक्यात बचावले. जिमी जीब ऑपरेटरने प्रसंगावधान दाखवून ती क्रेन नियंत्रित केली म्हणून होणारा भयंकर अनर्थ टळला.

To know more click here
https://letsup.app.link/QoEO9KFPpib