महाराष्ट्राचा_भुगोल
8.84K subscribers
Jindgi ek rah hai...
Hum Jaha Chahenge waha wo hume le jayegi...
Download Telegram
पृथ्वीचे अंतरंग
●● पृथ्वीचे अंतरंग ●●

'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.

पृथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.

पृष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे.
पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.


अंतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.

प्राथमिक लहरी (P Waves)
दुय्यम लहरी (S Waves)
पृष्ठीय लहरी (L Waves)
या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.

प्राथमिक लहरींची वैशिष्ट्ये:
भूकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.
प्राथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच
खोलपर्यंत प्रवास करतात. प्राथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास
करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.

दुय्यम लहरींची वैशिष्ट्ये:
प्राथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात. दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. मध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.

पृष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:
पृथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात. पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष


पृथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.

भूगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.

भाय्य गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.

कठीण घन पदार्थाचा आंतगाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.
सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :
सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व - पश्चिम दिशेत (वायव्य - आग्नेय)
A. सातमाळा - अजिंठा डोंगररांगा :
पूर्व - पश्चिम दिशेत विस्तार
जिल्हा - नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.
उंची - 200 ते 300 मीटर
ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.
पश्चिमेकडील भागास - 'सातमाळा'
पूर्वेकडील भागास - 'अजिंठा' म्हणतात.
या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्‍यात अजिंठा लेण्या आहेत.
या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.
धुळे - गाळणा डोंगर
नांदेड - निर्मल डोंगर
औरंगाबाद - वेरूळ डोंगर
हिंगोली - हिंगोली डोंगर
नांदेड - मुदखेड डोंगर
यवतमाळ - पुसद टेकड्या
सातमाला - सप्तश्रुंगी(1416 मी. )
तौला - (1231 मी.)
अंकाई - टंकाई - (961 मी.)
सुरपालनाथ - (958 मी.),
सतमाळा - (945 मी.)
अजिंठा - शिरसाळा (885 मी.)
बुलढाणा (546 मी.)
पठार - मालेगाव व बुलढाणा पठार.

B. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर :
आग्नेय : वायव्य दिशेत.
जिल्हा : पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर.
नाणे घाटापासून(हरिश्चंद्र - 1424) पूर्वेकडे उंची कमी होत जाते. ही डोंगररांग पुढे आग्नेयेस हैद्राबादपर्यंत जाते.
पश्चिमेकडील भागात : हरिश्चंद्र गड व पूर्वेकडील भागास - बालाघाट.
या डोंगर रांगेत पुढील डोंगररांगांचा समावेश होतो.
अहमदनगर - हरिश्चंद्र डोंगर, पुणे - तसूमाई डोंगर, अहमदनगर - बाळेश्वर डोंगर इ.
बीड, लातूर, उस्मानाबाद, जिल्ह्यात बालाघाट डोंगर पसरली आहे.
बालाघाट डोंगर रांगेत तुळजाभवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर व नळदुर्ग येथे नळराजांनी बांधलेला किल्ला आहे.
C. महादेव डोंगर रांगा :
वायव्य ते आग्नेय दिशेत.
महाबळेश्वर - पाचगणीपासून आग्नेयेस.
आग्नेयकडे कर्नाटककाकडे कमी होते.
या डोंगररांगेत शंभू महादेवाचे पवित्र देवालय आहे. (शिखर शिंगनापुर)
या रांगेत पुढील डोंगर आहेत. सातारा -बामणोली, कर्हाड - आगाशीव डोंगर.
या रांगेत सासवड पठार, औंध पठार, खानापूर पठाराचा समावेश होतो.
महाराष्ट्रातील इतर स्थानिक डोंगर
कोल्हापूर-पन्हाळा व ज्योतिबा डोंगर, चिकोरी डोंगर
नंदुरबार - सातपुडा पर्वताचा भाग, तोरणमाळ डोंगर
अमरावती - गाविलगड टेकड्या व मेलघाट डोंगर
नागपूर - गरमसुर, अंबागड व मनसर टेकड्या
गडचिरोली - भामरागड, सुरजगड, चिरोली, चीमुर टेकड्या
भंडारा - दरेकसा, नवेगाव टेकड्या
गोंदिया - दरेकसा, नवेगाव टेकड्या
चंद्रपुर - चांदूरगड, पेरजागड.
महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती
महाराष्ट्रातीलआदिवासी जमाती......
१९५१ मध्ये भारतात आदिवासी लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा ४था क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एकुण ४७ आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत.

warli pentings

१) सह्याद्री विभाग:-
= नाशिक,रत्नागिरी, रायगड, ठाणे, अहमदनगर, पुणे इ.
= मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकुर, दुबळा धोडीया इ.
२) सातपुडा विभाग:-
= धुळे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, नांदेड इ.
= कोकणा, पावरा, गामीत, गावीत, भिल्ल, कोरकू, धानका, पारधी, नायकडा, राठवा इ.
३) गोंडवन विभाग:-
= चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, नागपूर इ.
= गोंड, आंध, कोलाम, परधान, हळबा-हळबी, कावर, थोटी- थोट्या, कोरकू, माडीया, राजगोंड इ.
मुळात अकोले तालुक्याचा पश्चिम पट्टा हा डोंगराळ आणि वेगवेगळ्या आदिवासींची वस्ती असलेला शेकडो कदाचित हजारो वर्षापासून या आदिवासी जमाती या पर्वतराजीच्या कुशीत आपले नैसर्गिक

जीवन जगत आहेत. गेल्या १०-२० वर्षापासून दळणवळणांच्या साधनांमुळे त्यांच्या नागरी वस्तीशी आणि नागरसमाजाशी संबंध येऊ लागला. त्यामुळे त्यांच्या विचारसरणी, राहणीमान, दृष्टीकोनात बदल दीसू लागला आहे. परंतु अशा परिस्थितीतही मागच्या पीढीतील अनेकांनी तालुक्याचे गाव पाहिलेले नाही. या आदिवासींमध्ये महादेव कोळी या समाजाची वस्ती सर्वात जास्त आहे. गेली अनेक शतके इथला आदिवासी पुर्णत: आदिम जीवन जगत होता. १९७७ साली(कुमशेत येथील) तेव्हाण्चे आदिवासी जीवन यात पुष्कळ बदल झालेला असला तरी त्यांच्या समस्या नागरी समस्यांपेक्षा कितीतरी भयानक आहेत. पावसाळ्यात त्यांच्या हालाला पारावर नसतो. प्रवरा खोर्यातील आदिवासींपेक्षा मुळा खोर्यातील आदिवासी अधिक समस्याग्रस्त आहेत. सरकारी योजना व मिळणार्या अनुदानामुळे त्यांना निवारा, कपडा, रेशन, औषधोपचार, मुलांचे शिक्षण इ. सुविधा मिळू लागल्या आहेत. त्यामुळॆ पुर्वीपेक्षा जीवनस्तर निश्चितच उंचावला आहे. पण ज्या कुंटुबात अजुनही कोणी शिकलेले नाही, त्यांच्या जीवनमानात फारसा फरक नाही.
संदर्भ: हरिश्चंद्रगड-श्री.विठ्ठल शेवाळॆ.
ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत आदिवासींना विविध नावाने संबोधले जाऊ लागले......ते खालीलप्रमाणे......

१९०१=पशुपालक
१९११=पशुदेववादी
१९२१=डोंगरी व वन्यजमाती
१९३१=आदिम जमाती
१९४१=जनजाती
१९३५ च्या कायद्याने
१९५० च्या संविधानानुसार= वन्यजमाती(जनजाती)
Q: आदिवासी कुणास म्हणावे???????
"धरतीला खर्या अर्थाने आपली माता मानणारे हे आदिम जन, आदिवासी, जन्मभर नाचणारी, गाणारी, राकट शरीराची पण निरागस मनाची माणसं, प्रगतीकडे जाणार्या आधुनिक शिक्षणाच्या पहिले पाऊल टाकण्याआधी धार्मिक चालीरीती, मागासलेपणा, आर्थिक दुर्बलता, भुतेखेते व देवदेवतांच्या जंजाळातून बाहेर पडावे की न पडावे या संभ्रमात वेळ घालावणारी माणसं, ही निसर्गपुजक संस्कृतीशी, निसर्गाशी एकरुप झालेली भोळीभाबडी माणसं, गतिहीन व रुढीप्रिय समाज म्हणुन "आदिवासी" असे ओळखले जातात.......
@ चुनखडी
महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती:
महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

चुनखडी :
बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडकापासुन तयार केला जातो. महाराष्ट्रात चुनखडीचे फक्त दोन टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ात आढळतात.

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्य़ात चुनखडीचे सर्वात जास्त साठे आढळतात. याशिवाय धुळे, नंदुरबार, नांदेड, इ. ठिकाणीही चुनखडीचे साठे आढळतात. मात्र हे साठे कनिष्ठ दर्जाचे आहेत.
चंद्रपूर - या जिल्ह्य़ात बरोडा व नाजोरा तालुक्यात चुनखडीचे साठे आढळतात.

डोलोमाइट:
याचा उपयोग प्रामुख्याने लोहपोलाद निर्मितीसाठी तसेच खत कारखान्यात केला जातो. डोलोमाइट व डोलोमाइटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्य़ांत आढळतात. याशिवाय रत्नागिरी व नागपूर जिल्ह्य़ांतही थोडे साठे आढळतात. भारतातील डोलोमाइटच्या एकूण साठय़ांपकी एक टक्का साठा महाराष्ट्रात आढळतो.
कायनाइट व सिलीमनाइट हिऱ्यांना पलू पाडण्याच्या उद्योगात तसेच काचकाम रसायन उद्योग, सिंमेट उद्योग यामध्ये उपयोग केला जातो.
मँगनिज
महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती:

महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

मँगनिज:
भारतातील एकूण मँगनिज साठय़ापकी ४० टक्के साठा एकटय़ा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनिजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळतात.

भंडारा - या जिल्ह्य़ात आढळणारे मँगनिजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.
नागपुर - या जिल्ह्य़ात मँगनिज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासुन पूर्वेस रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्य़ातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्य़ात कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनिजचे साठे आढळतात.
सिंधुदुर्ग - या जिल्हय़ात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनिजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनिजचे साठे आढळतात.
महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती :
लोहखनिज
महाराष्ट्र हे साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

लोहखनिज:
भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात.

पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सुरजागड लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.
चंद्रपूर - चिमुर तालुक्यात िपपळगाव, भिसी, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत.
गडचिरोली - गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात.
गोंदिया - गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्य़ात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते.
सिंधुदुर्ग - या जिल्हय़ात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकडय़ांत दोन किमी लांबीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत.
कोल्हापुर - या जिल्ह्य़ात शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात.
बॉक्साइट
महाराष्ट्र खनिज साधनसंपत्ती :

महाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

बॉक्साइट :
याचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे २१ % बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साइटचे साठे उच्च प्रतीचे आहेत, ते कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्य़ांत आढळतात.

कोल्हापूर - या जिल्ह्य़ात शाहुवाडी, राधानगरी व चंदनगड तालुक्यात बॉक्साइटचे साठे आढळतात. येथील बॉक्साइटचा उपयोग इंडियन अ‍ॅल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथे अ‍ॅल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मितीसाठी उपयोगात आणले जाते.
रायगड - या जिल्ह्य़ात बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने मुरुड, रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत केंद्रित आहेत.
ठाणे - या जिल्ह्य़ात सालसेट बेट व तुगार टेकडय़ांच्या प्रदेशात बॉक्साइटचे साठे आहेत. येथील साठे कनिष्ठ प्रकारचे आहेत.
या क्षेत्रांच्या व्यतिरिक्त मुंबई उपनगर (बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबोली घाटाच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी जिल्ह्य़ात (दापोली व मंडणगड तालुक्यात) बॉक्साइटचे साठे आढळतात. बॉक्साइटचे साठे हे मुख्यत: जांभ्या खडकात आढळतात.
चांदोली राष्ट्रीय उद्यान



महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते.दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.

• स्थान-सांगली जिल्ह्यात ३२ शिराळा तालुक्यात वारणा नदीवर\ चांदोली धरण आहे.त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे

• स्थापना-
या अभयारण्याची स्थापना १९८५ साली झाली.



• विस्तार३०० चौ.कि.मी. क्षेत्र असलेले चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्हयामध्ये येते.वारणा नदीचा उगम येथेच होतो. १७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.

• अभयारण्याविषयी माहिती-चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३ वाघांसह २५ बिबट्यांचे ठसे नुकत्याच झालेल्या प्राणिगणनेत आढळून आले आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू व हरियाल पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आले आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली , सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणिगणना २०१० साली, मे महिन्यात दोन टप्प्यांत करण्यात आली. संपूर्ण अभयारण्याची १२ खंडांत विभागणी केली आहे. प्राणिगणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात.

त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्चित केली जाते. ठशांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्चिती केली जाते. वन्य प्राण्यांच्या गणनेत, चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह २५ बिबट्यांचा वावर असल्याचे ठशांवरून निदर्शनास आले आहे, तर ३५० ते ४०० च्या दरम्यान गवे, २५० ते ३०० च्या दरम्यान सांबरे, १०० अस्वले, यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत, तर भेकर, रानडुक्कर सर्वत्र आढळतात. सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येत आहे. प्राण्यांच्या गणनेसाठी इस्लामपूरचे सहायक वनसंरक्षक एम. एम. पंडितराव, वनक्षेत्रपाल संजय कांबळे यांच्यासह वनरक्षक व स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमींनी सहकार्य करून प्रत्यक्ष प्राणिगणनेत भाग घेतला होता.


• विविध प्राण्यांचा वावर-
प्राणी - संख्या

वाघ-३

बिबट्या-२५

गवा -३५० ते ४००

सांबर -२५० ते ३००

अस्वल- १००

• पर्जन्यमान-या अभयारण्याच्या क्षेत्रात वार्षिक सरासरी दोन ते अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो.

• किल्ला-कर्नाळा अभयारण्यात जसा कर्नाळा आहे तसा येथेही प्रचितगड हा चांदोली अभयारण्यातला ऐतिहासिक किल्ला आहे.

• विस्तार-याच वनक्षेत्र सुमारे तीनशे नऊ चौरस किलोमीटर आहे. त्यामध्ये सांगली , सातारा,कोल्हापूर, आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या वनक्षेत्राचा समावेश होतो.

• वनसंपत्ती-चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे ऐन,बेहडा, जांभूळ ,हिरडा,पांगारा. फणस.माड,उंबर, आवळा ,आंबा ,आपटा ,असे वृक्ष आणि अडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत

• प्राणीसंपत्ती-अभयाराण्यमध्ये बरेच वन्य जीव वस्तीला आहेत.

प्राणी- पट्टेवाले आणि बिबट्या , वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर , वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकु्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.

पक्षी- महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड , ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभाई, सुतार , भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व धरणातील जलाशयावर बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात . मैना ,सातभाई,होले,भारद्वाज, मोर असे पक्षी आहेत.

सरपटणारे जीव- सरडा/सरडे,नाग अजगर असे सरपटणारे प्राणी आहेत.इतर कीटक किडेही भरपूर आहेत.

विशेष फुलपाखरे- या अभयारण्याचे वैशिष्ट्य असे आहे कि या अभयारण्यात फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती बघायला मिळतात.यात जगात इतरत्र नामशेष झालेल्या काही फुलपाखरांच्या जातींचा समावेश आहे.
अस्वल- अभयारण्यात सिद्धेश्वर नावाचे एक ठिकाण आह
े.त्या ठिकाणी खडकाळ घळी आहेत.तिथे अस्वल दिसतात.


• अभयारण्यात जाण्याचा काळ-जानेवारी ते मे हा काळ चांदोली अभयारण्य फिरण्याकरता योग्य आहे.

• विशेष काळजी-
माहितीगार माणूस किवा वनरक्षक बरोबर घेतल्याशिवाय या अभयारण्यात फिरण्याचं धाडस सामान्य प्रवाश्याने करू नये.कारण इथले जंगले दाट आहे त्यामुळे रस्ता चुकण्याची भीती असते.पायी फिरण्यापेक्षा वाहनातून फिरणे सोपे आहे.पण पायी फिरण्यातला आनंद काही वेगळाच असतो.भटकंती मध्ये जे अनुभव अशा ठिकाणी घेवू शकतो ते वाहनातून फिरताना येऊ शकत नाहीत.पण या रानवाटा अरण्यातून जातात.जवळपास माणसांची वस्ती नसते.म्हणून बरोबर पाणी आणि खाद्य न्यावे लागते.

• विश्रामगृह-
चांदोली आणि वारणा येथे पाटबंधारे खात्याची विश्रांतिगृह
आहेत.त्यात राहण्या-खाण्याची सोय आहे.
प्रवरा नदी
प्रवरा नदी





अन्य नावे - अमृतवाहिनी
उगम- रतनगड ८५२ मी.
मुख- रत्नाबाईची गुहा
लांबी- २०० कि.मी.
देश - महाराष्ट्र
उपनद्या- मुळा, आढळा, म्हाळुंगी


प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा , आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.

प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले , संगमनेर , कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पाउन प्रवरासंगम येथे गोदावरी नदीस मिळते. प्रवरा नदी भंडारदरा धरणापासुन ते ओझरपर्यंत कालवा मानले जाते. तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात.


कालवे-कालव्याचे नाव डावा कालवा उजवा कालवा लांबी (कि.मी.) ७७ ४५

क्षमता (घन मी./सेकंद) २६.३६ ६.८२

ओलिताखालील क्षेत्र(हेक्टर) ५९,६२५ २९,८६६

ओलिताखालील शेतजमीन (हेक्टर) ४०,०९० २३,६५०

धरणे-प्रवरा नदीवर भंडारदरा धरण व निळवंडे धरण ही धरणे
आहेत.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान




हे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.

जंगलाचा प्रकार-
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, साग, सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात.

भौगोलिक-उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटिडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. या जंगलाचा विस्तार सुमारे १३४ चौरस किलोमीटर आहे. माधव झरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी हे झरे आणि पाणसाठी येथे आहेत. हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे.


प्राणी जीवन-नवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, हंस , क्रौंच , करकोचे, बगळे, पाणकोंबडया , पाणकावळे इत्यादी. तळ्यात विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे वाघ, बिबट्या, अस्वल , तरस, सांबर , नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे साप आढळतात यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात विशेष म्हणजे तलावात पाणमांजरे आढळतात. निसर्गसाहित्यीक मारुती चित्तमपल्ली यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच उद्यानात केला होता. तसेच येथे कधी कधी रानकुत्रीही आढळतात. त्यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात सारस क्रौंचाची एक जोडी नेहेमी असते. विदर्भातील पक्षीअभ्यासकांनुसार महाराष्ट्रात केवळ येथील सारस क्रौंचाची वीण केवळ नवेगाव मध्ये होते.
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, --------- पाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र, ------------------- पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्र, ------------------ भाटय़े (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र, ------------------ श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र, -------------------- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्र, -------------------- यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र, -------------------- डिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज ---केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र -----राजगुरूनगर (पुणे)
Channel name was changed to «महाराष्ट्राचा_भुगोल»
पंचगंगा नदी




उगम- प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका,कोल्हापूर.
मुख- नृसिंहवाडी (कृष्णा नदी)
लांबी- ८०.७ कि.मी.
देश- महाराष्ट्र
उपनद्या- कासारी , कुंभी , तुळशी , भोगावती
या नदीस मिळते- कृष्णा नदी


पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार पंचगंगा असे नाव पडले आहे.

स्रोत-पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून ( चिखली गाव, करवीर तालुका ) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती
नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते.

स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. यासंगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते

प्रवाह-
कोल्हापुरातून सुरू झालेली पंचगंगानदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे इचलकरंजीकडून वाहत जाऊन कृष्णा नदीला कुरूंदवाड येथे मिळते.

या प्रवाहाला हातकणंगले येथे आळता टेकडीवरून कबनुरजवळ आणखी एक महत्त्वाचा प्रवाह मिळतो.
महाराष्ट्र पठाराची निर्मिती




महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.70 दशलक्ष वर्षापूर्वी - भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले. या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे 'असिताश्म व कृष्णप्रस्तर' हे दोन प्रकारचे खडक आढळतात.महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील खोरी आढळतात.
तापी-पूर्णा खोरे
गोदावरी खोरे
प्रणहिता खोरे
भीमा खोरे
कृष्णा खोरे
आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.
ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.
धारवाड खडक : या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स
, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.
पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.
कडप्पा श्रेणींचा खडक : महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.
विंध्ययन खडक : विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.
हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.
गोंडवना खडक : अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊ न दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.
खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.
कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.
त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.
चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.
कोयना धरण




•प्रवाह- कोयना नदी

•स्थान -कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र

•सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी.

•लांबी -८०७.७२ मी

•उंची -१०३.०२ मी

•बांधकाम सुरू -१९५४-१९६७

•ओलिताखालील क्षेत्रफळ १२१०० हेक्टर

•जलाशयाची माहिती

निर्मित जलाशय शिवसागर जलाशय

•क्षमता- २७९७.४ दशलक्ष घन

कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.

•धरणाची माहिती-


बांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट
उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)
लांबी : ८०७.७२ मी
दरवाजे प्रकार : S - आकार लांबी : ८८.७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)
पाणीसाठा क्षमता : २७९७.४ दशलक्ष
घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६
दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र :१२१०० हेक्टर
ओलिताखालील गावांची संख्या :९८ वीज उत्पादन [संपादन]
टप्पा १:
जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त
विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता :२६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ६५मेगा वॅट [संपादन]

टप्पा २:
जलप्रपाताची उंची : ४९० मी. जास्तीतजास्त
विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता :३०० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ७५
मेगा वॅट [संपादन]
टप्पा ४:
जलप्रपाताची उंची : ४९६ मी. जास्तीतजास्त
विसर्ग : २६० क्यूमेक्स निर्मिती क्षमता :१००० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X २५०मेगा वॅट

दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : ८८.७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)


•शिवसागर जलाशय
कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न
परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.


पाणीसाठा-
क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर
ओलिताखालील गावे : ९८

वीज उत्पादन-
टप्पा १:
जलप्रपाताची उंची : ४७५ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट
टप्पा २:
जलप्रपाताची उंची : ४९० मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट
टप्पा ४:
जलप्रपाताची उंची : ४९६ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट