मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
9.48K subscribers
65 photos
35 videos
14 files
86 links
मराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके

इतर अपडेट्स

Promotion: @dappu
Download Telegram
लेखकांचे सोशल मीडियावरचे अनुभव

⁣एक बाई ना मला फेसबुकवर त्रास देतेय... असं काही नसतं की फक्त स्रियांनाच त्रास दिला जातो... पुरुषांना देखील छळलं जातं... त्यांना टॉटींग केलं जातं... तसं मला हे नवीन नाही ... इतके वर्षे फेसबुकवर काढल्यावर अनुभव खूप आहेत आणि तिकडे दुर्लक्ष कसे फेकून मारायचे हे ही मला माहित आहे... पण कधी कधी अति होतं... ही बाईचं बघा...

आधी नुसत्या कॉमेंट यायच्या... मग ही बाई थेट इनबॉक्स मध्ये यायला लागली... इनबॉक्स येऊन नुसता त्रास द्यायची...

' सर जेवले का?...'
' सर काय करताय?...'
' सर मी तुमची फॅन आहे...'
' सर मला ऍड करा ना...'
' सर आज तुमच्या आवडीचे जेवण केलंय...'

असं वगैरे वगैरे खूप काही लिहायची... मी आपला हं हं म्हणून सोडून द्यायचो...पण या बाईने मात्र हद्दच पार केली... यावेळी चक्क सरळ सरळ कॉमेंट मध्ये
' I Love You Sir ' म्हणाली रावं...

मला तर घामचं फुटला... एक दिवस ही बाई माझं लिखाण, फेसबुक बंद करणार हे नक्की... आता एका पुरुषाने शेवटी तक्रार तरी कोठे करायची ना?...

शेवटी आपलीच पोस्ट आणि आपल्याच पोस्टवर आलेली तिची कॉमेंट... आपण नुसते हतबल...

कुलकर्ण्यांचा " कसंतरी होतंय संघटनेचा अध्यक्ष " प्रशांत
👍3😱3❤1🤯1
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की लहान मुलांसाठी काय करू आणि काय नाही असे होते ☀️😎


त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक छानपैकी कॉमिक्स आणि बुक्सचे चॅनल फक्त आमच्या लहानग्या मित्रांसाठी 📚


तर मग मंडळी, करताय ना जॉईन पटकन ?


https://t.me/kids_ebook


मित्रांनाही जॉईन करायला लावा, उन्हाळा आल्हाददायक जाईल हे नक्की ❤️☺️


Share & forward ▶️
👍2❤1👌1
*भारतीय महानगरांमध्ये कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी रु. 1.5 लाख+ पगारही पुरेसा नाही!*
आयआयटीयनची पोस्ट व्हायरल होत आहे
👍2
इतिहास तुम्हाला नाराज करू शकतो.

इतिहास तुम्हाला अस्वस्थ करू शकतो.

इतिहास तुम्हाला संतप्त करू शकतो.

इतिहास वाचून जर नेहमी तुम्हाला फक्त गर्व, आनंद होत असेल तर तुम्ही खरा इतिहास नाही, काहीतरी वेगळेच वाचत आहात.
❤14👍8
*अक्षर मानव*
*मोफत ऑनलाईन उन्हाळी शिबीर*

दि.17, 18, 19 मे 2024

_शाळा - कॉलेजच्या चक्रापासून, जिवनाच्या निरंतर रहाटगाड्यापासून, व्हॉट्स ॲप - इंस्टा - रिल पासून दूर घेऊन जाणारे हे शिबीर आपल्या बुध्दीला सकस शिदोरी देणारे ठरणार आहे. विचारांची घुसळण होऊन, शंकांचे निरसन होऊन, सुसंवाद घडून जरा डोकं शांत होणार आहे._

वयोगट: खास शाळा - कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी (वय १० वर्षापुढील) ( इच्छुक कुणीही- सर्वांसाठी खुले -प्रवेश फी नाही )

नोंदणीसाठी लिंक :
https://chat.whatsapp.com/Ja68dmEQ6zWJNqqPxKFdRc
👍9
सर आत्तापर्यंत महेश तानाजी इंगळे,MPSC करणारा विद्यार्थी आहे 🙏

आत्तपर्यंत सगळ काही पणाला लाऊन खर्च केला आहे 🙏
यापुढे पैसे जमा होत नाहीत 🙏

तुम्ही माझी पोस्ट ग्रूप वर share केली तर काहीतरी मदत होईल सर 🙏
खुप गरज आहे मदतीची सर 🙏

मी आणि आई सदैव तुमची ऋणी राहील 🙏
👍8
द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती..!!

प्रा. विद्याधर पुंडलिकांनी एका मुलाखतीत पुलंना विचारलं,
‘ तुम्हाला आवडलेली तुमची सर्वात धमाल कोटी किंवा विनोद कोणता ? ( त्या पुंडलिकाला म्हणावं, ‘ त्यानं फेकलेल्या विटेवर मी उभा नाही ’, ही माझ्यावरची कोटी सोडून. )’

तेव्हा पुलं म्हणाले, ‘ एखाद्या कवीला ‘ तुझं कुठलं यमक चांगलं जुळलं ? असं विचारण्यासारखा हा प्रश्न आहे . तरी पण मला विचारता आहात , म्हणून सांगतो . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेन घेताना त्याच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय , असं कुणी तरी विचारल्यावर मी चटकन म्हणालो , ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती !’

गंमत म्हणून आणखी एक कोटी सांगतो . ब्लड बँकेसाठी नेहमी येणाऱ्या – जाणार्या माणसाकडून रक्त मागणार्या लीलाबाई मुळगावकरांवरुन ‘ हिच्याइतकी रक्तपिपासू बाई मी आजवर पाहिली नाही ’ असा विनोद मी केला होता

आपल्या लेखणीने वाचकांच्या कित्येक पिढ्यांना खळखळून हसवणारे लेखक, पद्मभूषण पु. ल. देशपांडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
❤13👍7🔥2👏2
⁣सी ए फाउंडेशनच्या परीक्षा चालू आहेत. येत्या २६ जूनला त्या संपतील. सीए कोर्सच्या तीन परीक्षांपैकी पहिल्या (फाउंडेशन) आणि शेवटच्या (फायनल) परीक्षेच्या तयारीसाठी मुलांना पुरेसा वेळ मिळतो. पण मधली परिक्षा म्हणजे 'इंटरमिजिएट' साठी मात्र इनमीन नऊ महिने हाताशी असतात. त्यामुळे इंटरमिजिएट परीक्षा हा सीए कोर्समधील मोठ्ठा बॉटलनेक आहे. सगळ्यात जास्त गळती याच परीक्षेत होते.

इंटरमिजिएट म्हणजे काय? याची तयारी करताना कधीपासून प्लॅनिंग करावे लागते? मुलांना व पालकांना काय काय माहिती असणे आवश्यक असते? याबद्दल बहुसंख्य विद्यार्थी अनभिज्ञ असतात. परीक्षा झाल्यावर रिझल्ट लागेपर्यंत अगदी आरामात राहतात. रिझल्ट जर नकारात्मक लागला तर संपूर्ण घर हतोत्साहित होते आणि विद्यार्थ्याचा आत्मविश्वास डळमळतो. आणि रिझल्ट जर सकारात्मक लागला तर मग घाईघाईने मित्र सांगतील त्या क्लासला प्रवेश घेऊन, कुठल्याही प्लॅनिंगशिवाय पुढील अभ्यास सुरु होतो. शेवटी परीक्षा जवळ आली की मुलं ढेपाळतात. हे होऊ नये म्हणून माझ्या क्लासमधील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे एक मोफत काउन्सेलिंग सेशन मी दरवर्षी घेतो.

यंदा पालकांच्या आग्रहास्तव ती पद्धत बदलून एकापेक्षा जास्त काउन्सेलिंग सेशन्स आयोजित केली आहेत. यातील काही ऑफलाईन सेशन्स आहेत तर काही ऑनलाईन आहेत. जेणेकरून पुण्याबाहेरील विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही याचा लाभ घेता येईल.

या मोफत सेशन्सला उपस्थित रहाण्यासाठी आधी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही लिंक https://bit.ly/WhatAfterCAFC किंवा या पोस्टसोबत जोडलेल्या इमेजमधील क्यू आर कोड स्कॅन केला तरी चालेल.

तुमच्या घरात, सोसायटीत, मित्रमंडळीत आणि नातेवाईकांत कुणी सीए फाउंडेशनची परीक्षा देत असेल तर हा मेसेज त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा. देशपातळीवर चालणाऱ्या या परीक्षेसाठी भरपूर वेळ, श्रम आणि पैसे खर्च करण्याआधी योग्य प्लॅनिंग करण्यासाठी त्यांना याचा नक्की उपयोग होईल.

शेअर केल्याबद्दल आगाऊ धन्यवाद
👍12❤2
ही असते सामाजिक जाणिवेच्या कवितेची आणि तशा कविता लिहिणाऱ्या कवीची ताकद. 🙏
❤17👍11
लायब्ररी बंद होणे म्हणजे समाजावर होणारी एक जखम आहे.

असो, बूकस्पेस लायब्ररी बंद होत आहे. १.५ -२ लाख पुस्तकांचा खजिना सर्वांसाठी विक्रीस उपलब्ध आहे.
सर्व पुस्तके ५०-१००-१५० रुपये, म्हणजे अगदी ५०% - ७५% सवलतीत मिळतील.
त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके देखील आहेत. लहान मुलांसाठी देखील अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.
मिळण्याचे ठिकाण - बूकस्पेस, सिल्वर आर्च अपार्टमेंट्स, लेन न. ३, डहाणुकर कॉलोनी, कोथरुड, पुणे ३८.
वेळ - सोमवार ते शनिवार सकाळ ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मिळतील.
संपर्क - प्रसाद ९८९०६५८३८७

(पहिलं वाक्य जिव्हारी लागलं😔)
👍15🤯8
आठवत का कुणाला?
❤59👍31
⁣विधानसभा निवडणूक-2024
मतदार यादीत आपले नाव आजच तपासा
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यात सुरु केलेला यावर्षीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा 20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करण्याची संधी उपलब्ध आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मतदान यादीत नाव तपासणे का गरजेचे आहे?

अनेकदा असं दिसतं की नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात. अशावेळी त्यांचे नाव मतदान यादीत न आढळल्यास ते मताधिकाराला मुकतात.

बऱ्याचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते, तिथेच आपले नाव असेल असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात. मात्र मतदार केंद्रांच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते. या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही असे समजून ते मतदानाला मुकतात.

मतदार ओळखपत्रात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक इ. वैयक्तिक तपशिलात चुका असतील तर, मतदाराला असे ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या वेळीही ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते. त्यामुळेही हे बदल करून घेणे आवश्यक आहे.

या सगळ्यासाठी आपण वेळोवेळी मतदार यादीत आपले नाव तपासले पाहिजे. जेणेकरून मतदार यादीत आपले नाव नसेल तर आपण मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतो, तसेच आपल्या वैयक्तिक तपशिलात- पत्त्यात बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करायची गरज असेल तर त्यासाठीचे अर्जही वेळेत भरू शकतो. यामुळे आपण ऐन मतदानाच्या दिवशी होणारा गोंधळ आणि विलंब टाळू शकतो.

मतदान यादीत नाव कसे तपासावे?
ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव तपासण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक electoralsearch.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि दुसरा Voter Helpline App.
आपल्याला, आपले वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदार ओळखपत्रासोबत जोडलेला युनिक मोबाइल नंबर, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्युआर कोड या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

Voter Helpline App च्या होम पेजवरील Search Your Name In Electoral Roll हा पर्याय निवडला की, वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्रावरील बारकोड किंवा क्युआर कोड आणि मतदार ओळखपत्र क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.

electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर वैयक्तिक तपशील, मतदार ओळखपत्र क्रमांक आणि मतदार यादीतील आपल्या नावासोबत जोडलेला युनिक मोबाइल क्रमांक या माहितीच्या आधारे मतदार यादीत आपले नाव शोधण्याचे पर्याय दिसतात.

आपण एसएमएसद्वारे देखील मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. त्यासाठी आपल्या मोबाइलवरून ‘ECI <स्पेस> <मतदान ओळखपत्र क्र.> हा मेसेज 1950 या क्रमांकावर पाठवावा लागतो.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही पीडीएफ स्वरुपातील मतदार यादी उपलब्ध असते. आपल्या मतदारसंघातील यादी भागानुसार ही मतदार यादी डाऊनलोड करून आपण त्यात आपले नाव तपासू शकता.

यासोबतच आपण जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन, तिथे उपलब्ध असलेल्या मतदारयादीच्या प्रतीतही आपण आपले नाव तपासू शकतो. तेव्हा, त्वरित आपले नाव तपासा आणि आपला मताधिकार सुनिश्चित करा.
👍9❤1
कलाकार हवेत :
पुण्यात एका दोन अंकी प्रायोगिक नाटकासाठी साधारण एक पुरुष पात्र व एका स्त्री पात्राची आवश्यकता आहे. पुरुष पात्र साधारण 22 ते 25 व मुलगी 18-20 वर्षाची असावी. तालीम बावधन इथे असेल. तालमीला वेळ देऊ शकणाऱ्या , अभिनयाची जाण असणाऱ्या व शुद्ध भाषा बोलू शकणाऱ्या कलाकारांनी 9822440845 ह्या नंबर वर संपर्क साधावा. धन्यवाद.

२२ - ८ - २०२४
(सोशल मीडियावरुन साभार)

हौशी कलाकारांपर्यंत पोचवण्यासाठी फॉरवर्ड करा. 🙏
❤2👍2🔥1
आज चारचाकी गाडी घरासमोर रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला पार्क केली होती. आजूबाजूला काही झाडं आहेत. त्यावर किंवा बरेचदा घराच्या कुंपणाच्या भिंतींवरही बरीच माकडं येऊन बसतात. बरेचदा सोबत पिल्लं असतात. ती दंगाही करतात. कळ्या, कोवळा पाला पण खातात. पण त्यांची मस्ती बघायला मजाही वाटतेच.

आज अशीच मस्ती करताना सकाळच्या वेळी एक पिल्लू एका कुत्र्याच्या तावडीत सापडलं. आणि लगोलग कुत्र्याने ते पिल्लू समोर पार्क केलेल्या चारचाकी गाडीखाली नेलं. माकडांनी आक्रमक पवित्रा घेत गाडीला चारो ओरसे घेर लिया. माकडं प्रचंड आक्रमक झाली होती. भिती वाटण्याईतपत. विचित्र भयानक आवाज करून करून बोचकारे घेत त्या कुत्र्याला घाबरवलं. एक मध्यम चणीचं माकड गाडीखाली शिरलं आणि लगेच त्या कुत्र्याला हुसकावून बाहेर काढलं. आणि अक्षरशः त्या कुत्र्याला धरलं, त्याचे लचके तोडायला सुरुवात केली आणि मग आपसूकच त्याच तोंड उघडल्याने ते माकडाचं पिल्लू कुत्र्याच्या तोंडातून सुटलं. आई लगेचच पिल्लाला पोटाशी धरून फाटकाबाजूच्या मोठ्या भिंतीवर येऊन बसली. उरलेल्या लोकांनी त्या कुत्र्याचा यथेच्छ समाचार घेतला. आणि काही कळण्याच्या आतच माकडांचं अख्खं खांडच फाटकाबाजूच्या भिंतीमार्गे गायब झालं. कुत्रा आत्ता चालूही शकत नाहीये. लंगडतोय. अंगावरच्या जखमांनी विव्हळतोय. शॉकमध्ये होता बहुधा फार. पुन्हा कुठल्याच माकडाच्या वाटेला जाणार नाही कुत्रा मरेपर्यंत.

आपल्या बाळासोबत कुणी काही आगळीक केली तर किती भरकन धावून आलीत माकडं.... आणि सगळी आलीत बरं. वेगवेगळ्या ठिकाणी बसलेली सगळी धावून आलीत. आणि आपलं बाळ समजून, आपल्यातल एक समजून लढलीत आणि आपला गडी दुसऱ्याच्या तावडीतून यशस्वीपणे सोडवून आणला. नाहीतर आपण माणसं लचके तोडणा-याची, लचके ज्याचे तोडले जाताहेत त्याची जात बघतोय, पुढलं मरेनाका.. ते नंतर पाहू. काय फालतूपणा आहे...

आणि कितीही संताप आला तरी बदलापूरच्या कुत्र्याला हात लावायला कायदा परवानगी नाही ना देत. त्या बाळाचं तडफडणं उघड्या डोळ्यांनी बघायच नुसतं त्याच्या आईवडिलांनी... आणि तोवर कुत्रे जिकडेतिकडे मोकाट फिरणार. काय करायच ? आपण फक्त बातम्यांमध्ये गावांची नावं वाचायची, आपल्या लेकरांचा विचार करून घाबरं व्हायचं, रिपोर्टरला किंवा अजून कुणाला शासनाचा प्रतिनिधी आणखी किती उर्मटपणे बोलू शकतो ते बघायचं आणि हळहळायच. परत दुसऱ्या दिवशी विसरायचं. त्याच्या पुढच्या दिवशी पुन्हा आहेच नवीन "नाव गाव वस्तू प्राणी"...

आपल्यापेक्षा माकडं पुरलीत... कशाला मरायला उत्क्रांती झाली ती.....

- Sneha Tompe
👍27🔥8