मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
9.5K subscribers
65 photos
35 videos
14 files
86 links
मराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके

इतर अपडेट्स

Promotion: @dappu
Download Telegram
⁣YouTube वरचे एक मिलियन Views!

आमच्या Parent Academy च्या YouTube चॅनलने नुकताच एक मिलियन (दहा लाख) व्ह्यूजचा टप्पा ओलांडला.

आम्ही पालकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विषयांबद्दल व्हिडियो तयार करतो. व्हिडियो शुद्ध मराठीत असतात. दर आठवड्याला एक व्हिडियो आम्ही तयार करतो. तो आठ-दहा मिनिटांचा असतो.

ह्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून आम्ही हे करायला लागलो. सुरुवात केली तेंव्हा आम्हाला जेमतेम एक हजार subscribers होते, आज ३५०००+ झालेत आणि एकूण दहा लाखांहून जास्त वेळा आमचे व्हिडियोज पाहिले गेलेत.

आमच्या सगळ्यांच व्हिडियोजवर भरभरून कमेंट्स येतात. त्यातल्या बहुसंख्य अत्यंत सकारात्मक असतात.

आपण जे करतो आहोत ते लोकांपर्यंत पोचत आहे आणि त्यांना ते आवडत आहे, त्याचा फायदा होत आहे ही अत्यंत समाधानाची गोष्ट आम्ही अनुभवत आहोत!

तुम्ही शून्य ते अठरा वर्षांच्या मुलाचे पालक असाल आणि आमचा चॅनल बघितला नसेल तर तो अवश्य बघा, आवडला तर subscribe करा आणि खूप आवडला तर शेअर करा!

आणि अर्थातच, पालक म्हणून तुम्हाला कोणत्या समस्या सोडवायच्या आहेत, कशावर व्हिडियोज हवे आहेत हे आम्हाला सांगत रहा. आम्ही आमच्या परीने नवे नवे व्हिडियोज करायचा प्रयत्न करत राहू!

आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व पालकांचे मनापासून आभार!

चॅनलची लिंक पहिल्या कमेंटमध्ये.
https://www.youtube.com/@parentacademyindia
❤1
भर दिवाळीत कोण कोण आवडीचे पुस्तके वाचत आहे ??


का? कोणते पुस्तक ?? शक्य तितके सविस्तर सांगा
❤1
दिवाळी अंकाची पोस्ट मधली फाईल अनेकांना ओपन होत नसल्याने हटवण्यात आलेली आहे
*सांगली मधे खालील ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत किसान क्रेडिट कार्ड साठी त्वरित लोकलचे उमेदवार पाहिजेत*
🗓️ Application Started 31 Oct 2025

🔗 *Apply Here:* wa.me/919860362962?text=job+MS901

Last date: 1 Nov 2025 10:30am
Interview: 4 Nov 2025

▪️Vacancy code: MS901
💺 *Position: FOS Executive (Banking - Agri)*
OFFICE WORK + FIELD WORK

💳 *Salary: 19,500+ Incentives + 6000 TADA allowances +PF, ESIC, Insurance, benefits*

📌 *Locations:* VITA - विटा,MIRAJ - मिरज, TASGAON - तासगाव, ISLAMPUR WALWA - इस्लामपूरवाळवा, BHAVANINAGAR - भवानीनगर, BHILWADI - भिलवडी, PALUS - पलूस, KASEGAON - कासेगाव, NAGAJ - नागज, NEWARI - नेवारी, SHIRALA - शिराळा, KAWATHE Mahnkal - कवठेमहांकाळ, AATPADI - आटपाडी, KADEGAON - कडेगाव, SAWALAJ - सावळज

🎓 *Eligibility:*
12th/Graduate/PG
Experienced preferred
Freshers can apply
Age limit: 18-34

👷 *Role:* Agriculture kisan credit card & related tasks

📂 2 resumes, 2 photos
शैक्षणिक, वैयक्तिक व इतर सर्व डॉक्युमेंटचे क्लीअर फोटो/pdf सोबत ठेवावेत.

⛳ *ADR JOBS*
📞
09860362962
सूचना: पात्र उमेदवारांनी वरील लिंकवर क्लीक+सेंड करून, आपला रिझ्युम पाठवावा.

*आमचे सर्व जॉब अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा: WhatsApp Group:*

*Channel*
https://whatsapp.com/channel/0029Va5H7Xg8KMqoWguLzR0M

*Telegram:*
https://t.me/+LqdBahmu7ZYzODdl

📲 *Forward to your friends, family & groups*
❤2
प्रार्थना_किंवा_आकर्षणाचा_सिद्धांत_खरंच_काम_करतो_का? (भाग 1)

उत्तर आहे, "नाही. अजिबात नाही."

"द सिक्रेट" ह्या पुस्तकाने एक काळ गाजवला होता. असं म्हणण्यापेक्षा हे पुस्तक प्रत्येकाच्याच लाईफमधे कधीतरी एक काळ गाजवत असतं असं म्हणणं अधिक सयुक्तिक राहील. ह्या पुस्तकावर आधारित एक documentary film पण आली होती ती पण एकदम ढासू होती.

तुम्ही कल्पना करा एका अप्रतिम जीवनाची.. गाडी बंगला, बँक बॅलन्स, सुंदर बायको, गोंडस लेकरं, विदेश पर्यटन, luxury life. कल्पना करा अर्थात visualize करा. म्हणजे तुम्हाला आयुष्यात जे जे हवंय ते मनःचक्षु समोर चित्रित करा आणि ते "फील" करा..

असं केल्याने तुमची प्रार्थना विश्वाच्या अंतरात्म्यापर्यंत पोचेल आणि आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमची ती प्रार्थना चमत्कारीकरित्या वास्तवात उतरेल. अहाहा! किती छान! ☺️

ती फिल्म पाहून आणि ते पुस्तक वाचून थोडा वेळ असं वाटायला लागतं जणु काही आपल्याला जादूची छडीच सापडली की काय, किंवा अलादीनचा चिराग सापडला.
जसं काही कोणतं दिव्य रहस्य तुमच्या पुढ्यात उलगडलं. जसंकाही कोणत्यातरी दैवी दिव्य चमत्कारीक महाशक्तीने तुम्हाला वरदान दिलं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अजूनही हे सिक्रेट माहित नाही आणि तुम्हाला माहित झालं म्हणून तुमच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आता मी हे सिक्रेट कुणाला सांगु की नाही? सांगितलं तर मग माझं वेगळेपण कसं राहील? आणि नाही सांगितलं तर मी कसा blessed वगैरे आहे हे लोकांना कसं कळेल? अश्या विचारात तुम्ही रमून जाता. तुमच्याशिवाय अक्खी दुनिया तुम्हाला एकाएकी चु*या वाटायला लागते.

मग तुम्ही पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी प्रॅक्टिस करता. आणि सतत चेक करत असता की काही रिजल्ट मिळालेत का? मिळताहेत का?

घंटा काही रिजल्ट मिळत नसतात तरीही तुम्ही चिकाटीने प्रॅक्टिस करता. आपल्यालाच कसं रिजल्ट मिळत नाहीये म्हणून मग तुम्ही मित्रांनाही हे "सिक्रेट" सांगता. "शहाणे" मित्रही मग ह्याच नादी लागतात. आपण मठ्ठ नाही हे भासवण्यासाठी मग तुम्ही आणि तुमचे मित्र एकमेकांना खोटेखोटे रिजल्ट्स सांगत असता. पण ते असेच छोटेमोटे रिजल्ट्स असतात उदाहरणार्थ मी visualize केलं आणि मला पार्किंग मधे जागा मिळाली वगैरे वगैरे. कारण मोठ्या डिंगा मारल्या तर मग पुरावे द्यावे लागतात न?

हा शुद्ध वेडेपणा बरेच दिवस चालतो. काहीजण कालांतराने ह्यातून बाहेर पडतात. पण काही जिवट जीव असतात. वर्षानुवर्षे ते ह्या नादी लागलेले असतात.

ह्या निव्वळ थोतांड असलेल्या आकर्षणाच्या सिद्धांतावर कोर्सेस सेमिनार डिजाईन करुन मात्र अनेकजण करोडपती झालेत. कोर्सेस शिकून मात्र कोणीच श्रीमंत होत नाही. ते जिथल्या तिथेच असतात.

ह्या आकर्षणाच्या सिद्धांतावर विश्वास ठेऊन चालणाऱ्या अनेक अध्यात्मिक संस्था आहेत. त्यातली एक "तेज ज्ञान फाउंडेशन" ह्या नावाने काम करते. ह्या संस्थेत मी अनेक वर्षे होतो. खरंतर हा एक अध्यात्मिक कल्ट आहे. इथले साधक असल्या बिनबुडाच्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यांचे गुरु त्यांना अश्याच प्रकारच्या प्रार्थना शिकवतात. Law of attraction ला ते वेगवेगळी नावं देऊन त्याच तद्दन मुर्ख गोष्टी शिकवत असतात.

आता हा आकर्षणाचा सिद्धांत खरंच काम करतो का? ह्या मूळ मुद्द्यावर येऊयात.

तर ह्या तेज ज्ञान फाउंडेशनच्या नागपूर सेंटरचं उदाहरण घेऊयात. 2004 पासून नागपुरात कार्यरत असलेल्या ह्या संस्थेच्या सेंटर ला अजूनपर्यंत स्वतःच्या मालकी हक्काची जागा विकत घेता आली नाही.(विशेष म्हणजे ह्यासाठी ते वर्षानुवर्षे सामूहिक प्रार्थना आणि visualization करताहेत ). आश्रम तर सोडाच पण साधा हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉटही ते विकत घेऊ शकले नाहीत. गेल्या विस वर्षांपासून अत्यंत समर्पित भावाने साधना, प्रार्थना करणाऱ्या अनेक साधकांना साधी नोकरी नाही, धंदे चालत नाही, कर्जबाजारी आहेत. ह्यांच्यासाठी law of attraction का बरं काम करत नसावा? बरं ही काही एक दोन उदाहरणं नाहीत, बहुतांशी साधकांची लाईफ लंगलंगच आहे. (लंगलंग हा वऱ्हाडी शब्द असून ह्याचा अर्थ भिकारचोट असा होतो ).

Law of attraction म्हणजे लोकांना निव्वळ मुर्ख बनवून त्यावर आपलं पोट भरण्याचा व्यवसाय आहे.

अभ्यास, मेहनत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्किल्स डेव्हलपमेंट ह्याच गोष्टी तुम्हाला यशस्वी बनवत असतात. शेखचिल्लीसारखी स्वप्न रंगवून इच्छापूर्ती होत नसते.

~डॉ. विजय रणदिवे

भाग 2 इथे वाचा 👇
https://t.me/marathi_book/346
❤9💯3
प्रार्थना_किंवा_आकर्षणाचा_सिद्धांत_खरंच_काम_करतो_का? (भाग 2)

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात कधीना कधी स्वतःसाठी किंवा इतरांसाठी प्रार्थना केल्या असतीलच. यश, आरोग्य, समृद्धी इत्यादी प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना केल्या जातात. काही प्रार्थना केवळ याचना रूपात असतात तर काही प्रार्थना नवसाच्या रूपात असतात. फरक एवढाच की नवस करताना आपण आपली प्रार्थना फलद्रूप झाल्याच्या मोबदल्यात काहीतरी देण्याचं कबूल करत असतो.

काही प्रार्थना पुर्ण होतात तर काही होत नाहीत असा आपला अनुभव असतो. आपण कधी हिशेब ठेवत नाही की किती आणि कोणत्या प्रार्थना पूर्ण झाल्या आणि किती व कोणत्या नाही झाल्या. त्या कधी पूर्ण होतात अन कधी होत नाहीत एवढंच आपण म्हणु शकतो.

पण ह्या प्रार्थनांची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी एक मोठा प्रयोग करण्यात आला होता तुम्हाला माहित्ये का?

हा प्रयोग THE GREAT PRAYER EXPERIMENT म्हणून ओळखला जातो.

अध्यात्मिक वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असलेले भौतिकी तथा वैद्यकशास्त्री Russel Stannard ह्यांच्या नेतृत्वात हा प्रयोग करण्यात आला होता. २४ लक्ष डॉलर्स खर्च झालेला हा भव्य प्रयोग करण्यासाठी आर्थिक सहाय्य केले होते जॉन टेम्पलटन फाउंडेशनने. जॉन टेम्पलटन फाउंडेशन ही नेहमीच अश्या प्रयोगासाठी अर्थसाहाय्य करत असते.

बॉडी माईंड मेडिकल इन्स्टिट्यूट चे हृदयरोगतज्ञ् डॉ. हर्बर्ट बेन्सन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भल्या मोठ्या टीमने हा प्रयोग केला. ह्या प्रयोगासाठी 1802 अश्या रुग्णांची निवड करण्यात आली ज्यांच्या हृदयाची बायपास सर्जरी होणार होती. ह्या रुग्णांना 3 गटात विभाजीत करण्यात आलं.

पहिला गट - ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या पण त्यांना प्रार्थना केल्याबद्दल कल्पना दिल्या गेली नाही.

दुसरा गट - ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या नाही आणि त्यांना प्रयोगाबद्दल कल्पना दिली नाही.

तिसरा गट - ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत अशी त्यांना कल्पना देण्यात आली.

प्रार्थना अशी होती, "शस्त्रक्रिया यशस्वी होवो, प्रकृतीत वेगाने सुधारणा होऊ दे आणि शस्त्रक्रियेपश्चात कोणतेही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये".

प्रयोग डबल ब्लाईंड स्टडी पद्धतीने करण्यात आला. प्रयोगाची गोपनीयता इत्यादी नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. मिनेसोटा, मॅसेच्युसेट्स आणि मिसुरी ह्या तीन चर्चेस मधून प्रार्थना करण्यात आल्या.

ह्या प्रयोगाचे निष्कर्ष प्रार्थनेच्या बाजूने सकारात्मकच येतील अशी प्रयोगात सहभागी झालेल्या सर्वांची खात्रीच होती कारण सगळे सहभागी हे ईश्वरवादीच होते.

परंतु... झालं त्यांच्या अपेक्षेच्या उलट.

एप्रिल 2006 च्या अमेरिकन हार्ट जर्नल च्या अंकात ह्या प्रयोगाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले ते असे -

दुसऱ्या क्रमांकाच्या गटाची म्हणजेच ज्यांच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या नाहीत त्यांची तुलना इतर दोन गटांशी (म्हणजे ज्यांच्यासाठी प्रार्थना केली गेली ) केली असता असा कोणताही लक्षणीय फरक दिसून आला नाही. अर्थात प्रार्थना केली काय अन नाही केली काय असा खुप मोठा काही फरक दिसून पडला नाही.

दुसरा निष्कर्ष तर आणखीच धक्कादायक होता. तो असा की ज्यांच्या साठी प्रार्थना केल्या गेली अश्या पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या गटाची आपसात तुलना केली असता दोन्ही गटात पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स (शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत ) भरपूर प्रमाणात बघायला मिळाली. त्यातही ज्यांना प्रार्थने बद्दल सांगण्यात आलेलं होतं त्यांच्यात 59 टक्के रुग्णांत कॉम्प्लिकेशन्स दिसून आलेत जेव्हा की ज्यांना प्रार्थनेबद्दल कल्पना नव्हती त्यांच्यात फक्त 52 टक्केच कॉम्प्लिकेशन्स दिसून आलेत.

काय म्हणाल आता?

असाच एक निष्कर्ष चार्ल्स डार्विनच्या चुलत भावाने म्हणजे फ्रान्सीस गॅल्टन ह्याने केला होता. ह्यासाठी त्याने ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्यांच्या आरोग्याची तुलना सामान्य जनतेच्या आरोग्याशी पडताळून बघितली. राजघराण्यातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी नित्यनेमाने चर्चेस मधे प्रार्थना केल्या जातात, तर आम जनतेसाठी कधीतरी क्वचितच कुणीतरी प्रार्थना करत असतं. ह्याचा अर्थ राजघराण्यातील सदस्यांचं आरोग्य आम जनतेच्या आरोग्यापेक्षा अधिक चांगलं असायला हवं होतं, पण प्रत्यक्षात तसा कोणताही लक्षणीय फरक दिसून आला नाही.

हा ग्रेट प्रेयर एक्सपेरिमेंट सपशेल अपयशी झाल्यावर ईश्वरवाद्यांनी सारवासारव करत हास्यास्पद तर्कटं द्यायला सुरवात केली. झालेल्या फजितीमुळे खजिल होऊन त्यांनी मग ह्या प्रयोगाच्या विश्वसनियतेवरच शंका उपस्थित केल्या.
❤7💯1
शेवटी, प्रार्थना करणे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असून तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. प्रार्थना करुन आपण आपलं त्या व्यक्तीबद्दल असलेलं प्रेम, काळजी आणि शुभेच्छा व्यक्त करत असतो जे त्या व्यक्तीला "बरं" वाटण्यापुरतं का होईना उपयोगाचं असतं. आजारी व्यक्तीचं मनोबल जरा वाढवण्यासाठीही ते उपयोगाचं असतं.

प्रार्थना करणारा आणि ती ऐकून घेत ती पूर्ण करणारा असे दोघं जण ह्यात अभिप्रेत असतात. माझी प्रार्थना ऐकणारी आणि मला मदत करणारी कुणीतरी अदृश्य शक्ती नक्कीच असावी ही एक सुप्त इच्छा प्रार्थना करण्यामागे असते. अदर एन्ड ला कुणी असो वा नसो परंतु याचना /प्रार्थना करुन माझ्या मनोबलात भर पडत असेल तर त्यात काही गैर नाही. पण आपल्या ह्या भाबड्या आशेचा गैरफायदा घेऊन आपलं शोषण करणारे भोंदू आपल्या अवतीभवती टपलेले असतात ह्याचं भान असु द्यावं.

~डॉ. विजय रणदिवे

भाग 1 इथे वाचा 👇

https://t.me/marathi_book/345
❤5🙏3
*पुणे(ग्रामीण) मधे खालील ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेत किसान क्रेडिट कार्ड साठी त्वरित लोकलचे उमेदवार पाहिजेत*
🗓️ Application Started 31 Oct 2025

🔗 *Apply Here:* wa.me/919860362962?text=job+MS902

Last date: 6 Nov 2025 12:30pm
Interview: 7 Nov 2025

▪️Vacancy code: MS902
💺  *Position: FOS Executive (Banking - Agri)*
OFFICE WORK + FIELD WORK

💳 *Salary: 19,500+ Incentives + 6000 TADA allowances +PF, ESIC, Insurance, benefits*

📌 *Locations:*  ​ SHIRUR GHODNADI - शिरूर घोडनदी, BARAMATI - बारामती, BHOR - भोर, DAUND - दौंड, RAJGURUNAGAR - राजगुरुनगर, PURANDHAR SASWAD - पुरंदर सासवड, ACB INDAPUR - इंदापूर, URULIKANCHAN - उरुळीकांचन, CHAKAN - चाकण, KURKUMBH - कुरकुंभ, , MIDC RANJANGAON - एमआयडीसी रांजणगाव, NARAYAN GAON - नारायणगाव, JEJURI - जेजुरी, KOREGAON BHIMA - कोरेगाव भीमा, SHIKRAPUR - शिक्रापूर


🎓 *Eligibility:*
12th/Graduate/PG
Experienced preferred
Freshers can apply
Age limit: 18-34

👷 *Role:* Agriculture kisan credit card & related tasks

📂 resume, आधार नंबर, PAN नंबर.
तुमच्या शैक्षणिक, वैयक्तिक, कामाच्या अनुभवाचे व इतर सर्व डॉक्युमेंटचे क्लीअर फोटो/pdf फोनवर आणि इमेलवर ठेवावेत.

⛳ *ADR JOBS*
📞
09860362962
सूचना: पात्र उमेदवारांनी वरील लिंकवर क्लीक+सेंड करून, आपला रिझ्युम पाठवावा.

*आमचे सर्व जॉब अपडेट्स मिळविण्यासाठी जॉईन करा: WhatsApp Group:*
 
*Channel*
https://whatsapp.com/channel/0029Va5H7Xg8KMqoWguLzR0M

*Telegram:*
https://t.me/+LqdBahmu7ZYzODdl

📲 *Forward to your friends, family & groups*
❤5
⁣चीन आणि भारत यांनी जवळजवळ सारखीच सुरुवात केली होती, भारताचा छोटा भाऊ मानला गेलेला चीन आज विकासाच्या आणि प्रगतीच्या सर्व मानांकनांवर भारतापेक्षा खूप पुढे निघून गेला आहे. या मागची कारणमीमांसा करण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न झाला. नुकताच नितीन भारती आणि ली यांग या शास्त्रज्ञांनी लिहिलेला एक रिसर्च पेपर भलताच चर्चेत आला होता. या पेपरमध्ये त्यांनी काही इंटरेस्टिंग निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मी नुकताच हा रिसर्च पेपर वाचला.
या पेपरमधले काही ठळक मुद्दे.
१. भारतातील आताची शिक्षण पद्धती ब्रिटिशांच्या प्रयत्नातून उदयाला आली. या पद्धतीत ब्रिटिशांना क्लर्क आणि प्रशासकीय अधिकारी घडवायचे होते. त्यामुळे ही शिक्षण पद्धती तशीच डिझाईन करण्यात आली. स्वातंत्र्यानंतरही हाच एटीट्यूड पॉलिसी मेकर आणि विद्यार्थी पालकांमध्ये राहिला. आजही सरकारी नोकरीचे जबरदस्त आकर्षण भारतीय समाजात दिसते.
२. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी शक्यतो कुठल्याही स्ट्रिम मधले ग्रॅज्युएशन चालते. त्यामुळे बहुतांश लोकांनी हुमानिटीज च्या विषयांना प्राधान्य दिले. कथा कविता वाचत ग्रॅज्युएशन करायचे. नंतर सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी किंवा क्लर्क व्हायचे हा फॉर्म्युला पूर्वीपासून चालू आहे.
३. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून भारताने उच्च शिक्षणासाठी जागतिक दर्जाच्या संस्था उभारल्या. पण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकारी शाळेत शिकलेल्या वर्गापैकी फार कमी मुले माध्यमिक शिक्षणानंतरचे उच्च शिक्षण घेऊ शकले. फार मोठ्या काळापर्यंत चांगले उच्च शिक्षण हे सामान्यांच्या आवाक्या पलीकडे राहिले. हे म्हणजे फरारी विकत घेणे पण ती चालवण्यासाठी रस्तेच नसणे असे झाले.
४. चीनमध्ये Qing राजघराण्याकडून सत्ता सोडल्यानंतर सरकारी पातळीवर सर्वसमावेशक धोरणे अवलंबणे सुरू झाले. शिक्षणाच्या पॉलिसी डिझाईन करताना व्होकेशनल ट्रेनिंग वर जास्त भर देण्यात आला. शाळा म्हणजे फक्त कथा कविता ऐकण्याचे आणि वाचण्याचे ठिकाण न बनता विविध व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य प्राप्त करण्याचे ठिकाण बनले. त्यामुळे इंजीनियरिंग आणि तंत्रज्ञान केंद्रित मानसिकता असलेले विद्यार्थी बनत गेले.
५. भारताने ज्याप्रमाणे प्रथम उच्च शिक्षणावर भर दिला त्या उलट चीनमध्ये प्रथम प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर प्रचंड भर देण्यात आला. त्यामुळे आपले बेसिक क्लियर असलेल्या पिढ्या घडत गेल्या.
६. भारतात आजही इंग्रजी शिकणे आणि बोलणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे पूर्वी सरकारी क्लर्क आणि नंतर बीपीओ मध्ये काम करू शकणारे कर्मचारी आणि आयटी कंपन्यात तंत्रज्ञानावर काम करू शकणारे इंजिनियर्स बनवणे सोपे झाले. पण यापैकी कोणीही क्रियेटर नव्हते. ते फक्त पश्चिमेकडे बनलेले तंत्रज्ञान वापरून सेवा देत होते. त्यातले कुठलेही तंत्रज्ञान भारतात बनले नाही. चीनमध्ये याउलट इंग्रजी वगैरे वर भर देण्यापेक्षा इंजीनियरिंग, कोअर सायन्स आणि गणितावर प्रचंड भर देण्यात आला. त्यांची आजची पिढी पश्चिमेकडच्या देशांना घाम फोडतील असे तंत्रज्ञान विकसित करत आहे.

अजून बरेच मुद्दे आहेत.
❤9👍1
पश्चिम घाटाच्या जैव विविधतेचे अभ्यासक ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ यांचा अभ्यासपूर्ण लेख...
🤯5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
सर्वांसोबत शेअर करा, खूप महत्त्वाचे आहे हे, म्हणूनच हिंदीत असून शेअर केले
❤5👍3
ही आहे खरी बातमी, अफवांवर विश्वास ठेवू नका
👍2
⁣# माझ्या_डायरीतून

तिच्याशी ब्रेकप करून १४ वर्षे लोटलेली. एकदा एखाद्याच्या आयुष्यातून निघून गेल्यावर परत तिच्या आयुष्यात ढुंकूनही पाहायचं नाही हा माझा स्वभाव. त्यामुळे आता ती काय करतेय .. कुठंय .. कुणाशी लग्न केलं .. काय सुरूय तिच्या आयुष्यात ह्याचा पाठपुरावा करणं मला पटत नाही. तरीही मधेच कुणीतरी येऊन तिच्या आयुष्यातल्या काही घडामोडींची खबर देऊन जायचं. पण मी स्वतःहून कधीच तिच्या वाटेला गेलो नाही.

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका मित्रासोबत त्याच्या सासरच्या फॅमिली फंक्शनमध्ये अमरावतीला जाणं झालं. शहरात प्रवेश करताच मनाला एक वेगळीच हुरहूर लागली. मी त्या शहरात पाय ठेवणं शक्यतो टाळतो ते ह्याच कारणाने . मित्राच्या बायकोच्या घरी पोचलो. अन लक्षात आलं कि ती इथंच जवळपास कुठंतरी राहते. पुसटसं आठवत होतं. एकाएकी उतरलेला माझा चेहरा पाहून मित्रानं मला कारण विचारलं. मी म्हटलं तिचं घर इथंच कुठंतरी आहे. तो बोलला चल शोधुयात.

नको. कशाला ? मी.

थोडा वेळ बसलो. माझी बेचैनी वाढत होती. मला एन्झायटी व्हायला लागली. मित्र बोलला अरे पाहून तर ये घर . मी म्हटलं तू थांब मी जाऊन येतो. गाडी काढली. दोन गल्ल्या पुढं गेलो अन तिचं घर दिसलं. आणखी धडधड वाढली. मनात म्हटलं बस्स इतकं पुरेसंय. पण पायाखालचा ब्रेक दबत नव्हता. गाडी जाऊन थांबली ती थेट तिच्या घरापुढं. कारच्या काचांवर फिल्म चढलेली असल्याने मी बाहेरून कुणाला दिसणार नव्हतो. ती अंगणातच बसलेली होती . बहुतेक जिन्याच्या पायरीवर. हि अजूनही माहेरी कशी ? आली असेल माहेरवाशीण म्हणून.

आता मी काय करणार होतो? काय करू शकणार होतो? अर्थात काहीच नाही. मी तेव्हाही काय करू शकलो होतो ?

तेच घर. तेच अंगण. पण ती तीच होती का? ? कदाचित ती ती नव्हतीच. ती तर कधीच हरवली होती. ती हरवली होती म्हणूनच तर मी तिला सोडून दिलं होतं. अहं .. मी तिला सोडून द्यावं म्हणूनच ती हरवली होती. मग हि कोण होती अंगणात बसलेली? दिसत तर तिच्यासारखीच होती. गाडीच्या काचांतून मी तिला न्याहाळत होतो. आता धडधड जरा शांत होत होती. तिचं लक्ष हातातल्या मोबाईलवर. कदाचित नवऱ्याला "मिस यु" वगैरे मेसेज करत असावी. आधी मला करायची.

थोड्या वेळात एक महिला घरातून अंगणात आली. बहुतेक तिच्या भावाची बायको असणार. तिनं हिच्या हातात चहाचा कप सोपवला. हिनं तो दोन घोटातच संपवला. अरे हि आता चहा प्यायला लागली? आधी नव्हती घेत ती. ह्म्म्म हि ती नव्हेच ना. चहाचा कप खाली ठेवत ती तशीच उठली अन घरात गेली. पाठीवर एक बॅग लटकवून तिनं स्कुटी स्टार्ट केली. अन भुर्रकन निघून गेली. मला तिच्या मागे मागे जायचं नव्हतं. पण माझी गाडी आपोआप जागेहून हलली. तिच्या मागे मागे गाडी धावत होती. गल्ल्यागल्ल्यातून वळण घेत मी तिच्या मागे जात होतो. का? ते मलाही कळत नव्हतं.

एखाद किलोमीटर पुढं गेल्यावर एका ब्रेकरवर तिच्या स्कुटीची गती अचानक मंदावली . अन माझी स्पीडमध्ये असलेली कार अगदी तिच्या स्कुटीच्या नंबरप्लेटला धडकता धडकता राहीली. तिनं आपल्या साईड मिरर मध्ये रागानं पाहिलं. मी भानावर आलो. करकचून ब्रेक मारत मी थांबलो. अन माघारी वळलो.

तिला मी दिसलो असेल का? मला नाही वाटत असं. पण गेलोच कशाला मी तिच्या मागेमागे? चुत्या आहे मी. एका टपरीवर थांबलो. सिगारेट पेटवली. असं काही झालं म्हणजे मी सिगारेट ओढतो. वाईट सवय.

परत त्याच गल्ल्या. तीच वळणं. घरी पोचेस्तोवर शांत झालो. अगदी नॉर्मल. मित्र बोलला, सापडलं का तिचं घर ? ती दिसली का?

मी म्हटलं , तिचं घर दिसलं . ती नाही दिसली. ती तर केव्हाच हरवली होती.

✍️ डॉ. विजय रणदिवे
❤20👍3🙏1
ह्यावर्षी क्रिसमस २५ डिसेंबर २५ ला येणार



आणी असे आयुष्यात परत कधीच नाही होणार



😊😊
😱4❤2
Join this group if you want to learn or teach marathi.

असे काहीजण आहेत की ज्यांना मराठी शिकायची आहे पण त्यासाठी ते फी वगैरे देऊ शकत नाहीत.

तरी जे कोणी त्यांना मराठी बोलणे शिकवायला किंवा त्यात मदत करायला तयार आहेत त्यांनी मराठी शिका - Learn मराठी हा ग्रुप जॉईन करा.

https://t.me/Marathi_Learning
❤3
आमचे व्हॉट्सऍप चॅनल अजूनही जॉइन केले नसेल तर तुम्ही खूप चांगले कन्टेन्ट मिस करत आहात.

सादर आहे आता आणखी नव्या स्वरूपात, आमचे मराठी अपडेट्स ऑफिशियल चॅनल.

त्यावर काय आहे हे आम्ही सांगितल्यापेक्षा तुम्हीच बघा म्हणजे लगेच प्रेमात पडणार 😁 लव ॲट फर्स्ट साईट असते तसे सबस्क्राईब ॲट फर्स्ट व्हिजिट होणार 😍

https://wa.me/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
❤2
मराठी साहित्य आणि इतर बरंच काही .... pinned «आमचे व्हॉट्सऍप चॅनल अजूनही जॉइन केले नसेल तर तुम्ही खूप चांगले कन्टेन्ट मिस करत आहात. सादर आहे आता आणखी नव्या स्वरूपात, आमचे मराठी अपडेट्स ऑफिशियल चॅनल. त्यावर काय आहे हे आम्ही सांगितल्यापेक्षा तुम्हीच बघा म्हणजे लगेच प्रेमात पडणार 😁 लव ॲट फर्स्ट साईट असते…»