मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
9.5K subscribers
65 photos
35 videos
14 files
86 links
मराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके

इतर अपडेट्स

Promotion: @dappu
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बघुच आता, हा मेसेज किती फॉरवर्ड होतो ते 😂😂😂😂😅🤣
🔥4❤2👏1🤯1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पश्चिम बंगालमध्ये हिंदी पत्रकाराने हिंदी भाषेतून प्रश्न विचारता बंगाली भाषेतच त्याला उत्तर देणारी बंगाली अस्मिता... ❤️

पण आपल्या इथे समोरून कोणीही हिंदीत बोललं की त्याला लगेच हिंदीत उत्तर द्यायला सुरुवात करतात... मराठी_भैय्ये
👍3💯3❤2
आज मी एका ग्रुपमध्ये मेसेज पाठवला, "चांगली पुस्तके वाचा, तुम्हाला प्रेरणा मिळेल." 📔

काही वेळाने प्रेरणाचा मेसेज आला, "तुम्ही संपूर्ण लायब्ररी वाचू शकता पण मी काही भेटणार नाही"🫣

🤣😂🤣😂😊
👏5❤2🤯2🔥1🙏1
*बारामती विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे, पायलटची घोडचूक आहेच, त्यानं रनवे न दिसूनही लँडिंग ट्राय केलं अन् तेही एकदम चुकीच्या ठिकाणी*


https://aaib.gov.in/What's%20New%20Assets/Preliminary%20Report%20on%20VT-SSK.pdf
❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गॅसला बॅकअप म्हणून इंडक्शन घेण्याच्या विचारात, त्याआधी या गोष्टी नीट तपासा । BolBhidu Current

( Gas shortage 2026 India, Cooking gas, induction stove buying guide, best induction cooktop, kitchen appliance tips, induction safety, ISI mark, kitchen hacks, home gadgets, induction vs gas, kitchen essentials, smart cooking, electrical safety, induction cookware )
❤2
⁣प्रवाशांना जास्त चालायला लावून ह्युस्टन विमानतळाने त्यांच्या तक्रारी संपवल्या?

माणसाला रिकामं उभं राहणं हे चालण्यापेक्षा १० पटीने जास्त त्रासदायक वाटतं. हा मानवी स्वभावाचा असा एक पैलू आहे, ज्याचा वापर करून एका विमानतळाने कोट्यवधी रुपये खर्च न करता प्रवाशांचा राग शांत केला.सध्या अमेरिकेतील ह्युस्टन विमानतळावर सरकारी कामांच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना तासंतास रांगेत उभं राहावं लागतंय.पण याच विमानतळाच्या इतिहासात एक असा काळ होता,जेव्हा लोक फक्त ७ मिनिटांच्या प्रतीक्षेमुळे संतापले होते.
****
गोष्ट आहे ह्युस्टन विमानतळावरील बॅगेज क्लेम एरियाची. विमान लँड झालं की प्रवासी आपल्या बॅगा घेण्यासाठी धावत सुटायचे. पण तिथे गेल्यावर त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागायची. प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस पडू लागला. 'आमच्या बॅगा इतक्या उशिरा का येतात?' हा एकच प्रश्न विचारला जात होता.
विमानतळ प्रशासनाने यावर उपाय म्हणून खूप पैसा खर्च केला.त्यांनी बॅगा हाताळण्यासाठी जास्तीचा स्टाफ नेमला.बॅगांची गती वाढवली.आता बॅगा आधीपेक्षा थोड्या लवकर येऊ लागल्या.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रवाशांच्या तक्रारी कमीच झाल्या नाहीत.मग विमानतळाने काही तज्ज्ञांना पाचारण केलं. त्यांनी प्रवाशांच्या हालचालींचं बारकाईने निरीक्षण केलं. तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली.
****
प्रवाशांना विमानातून उतरून बॅगेज बेल्टपर्यंत पोहोचायला फक्त १ मिनिट लागायचा. त्यानंतर तिथे उभं राहून बॅगेची वाट पाहण्यात त्यांचे सरासरी ७ मिनिटं खर्च व्हायचे. म्हणजे त्यांच्या एकूण वेळेपैकी ८८% वेळ हा फक्त 'रिकामं उभं राहण्यात' जात होता. यानंतर विमानतळ प्रशासनाने बॅगांचा वेग वाढवण्याऐवजी एक विचित्र निर्णय घेतला. त्यांनी प्रवाशांचे अरायव्हल गेट्स बॅगेज बेल्टपासून लांब हलवले. इतकंच नाही, तर ज्या बेल्टवर बॅगा येणार आहेत,तो रस्ता मुद्दाम वळणावळणाचा केला.
यामुळे झालं असं की, प्रवाशांना विमानातून उतरून बॅगेज बेल्टपर्यंत पोहोचायला आता १ ऐवजी ६ मिनिटं चालू लागलं. चालून तिथे पोहोचल्यावर अवघ्या २ मिनिटांत त्यांच्या बॅगा हातात येऊ लागल्या.
****
गंमत बघा, प्रवाशांचा एकूण वेळ अजूनही ८ मिनिटंच होता. पण या बदलामुळे त्यांच्या तक्रारी चक्क 'झिरो' झाल्या.ही गोष्ट इथे संपत नाही. यामागे 'बिहेवियरल इकॉनॉमिक्स'चं एक मोठं तत्त्व दडलंय.

जेव्हा आपण रिकामे उभं राहून वाट पाहतो, तेव्हा आपल्याला वेळ संथ चालल्यासारखा वाटतो. याला 'अनऑक्युपाइड टाईम' म्हणतात. पण जेव्हा आपण चालतो किंवा काहीतरी कृती करतो, तेव्हा आपलं डोकं गुंतलेलं असतं. याला 'ऑक्युपाइड टाईम' म्हणतात.
चालताना वेळ पटकन निघून जातो, असं प्रवाशांना वाटू लागलं.त्यांना वाटलं की विमानतळाने बॅगा खूपच लवकर आणल्या आहेत, कारण त्यांना तिथे उभं राहून वाट पाहावी लागली नव्हती.
****
ह्युस्टन विमानतळाचा हा किस्सा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. ग्राहकांच्या तक्रारी नेहमीच मुख्य समस्येबद्दल नसतात,तर त्या त्यांच्या अनुभवाबद्दल असतात.
कधीकधी समस्येचं मूळ तांत्रिक नसून मानसिक असतं.आपण फक्त घड्याळाकडे बघतो,पण माणसाच्या मनाचं घड्याळ कसं चालतं,हे समजून घेतलं की सर्वात कठीण प्रश्नांची उत्तरंही साध्या उपायांत सापडतात.
आजच्या वेगवान जगात आपण तंत्रज्ञानाने वेग तर वाढवलाय,पण माणसाचा संयम मात्र कमी झालाय, नाही का?
❤9🔥4
कथा झरना.pdf
14.7 MB
मुलांच्या परिक्षा एव्हाना संपल्या असतील, संपत आल्या असतील.
खास मुलांसाठी काही मराठी, विंग्रजी.
पहिलंच आहे ‘कथा झरना’. नावावरून हिंदी वाटेल, पण आहे मराठीतच! तब्बल चारशे पानांत शंभर एक कथा. कश्या? तर, भरपूर रंगीत चित्रांसह. मोठ्या टायपात. इनोदी, पुराणातील आणि लोककथा अश्या सर्व प्रकारच्या. शक्यतो लघुसंगणकावर – ल्यापटॉपवर अथवा ट्याबवर एकावेळी दोन पानं दिसतील असं दाखवा, लहानग्यांना वाचून दाखवा. मला वाचायला मजा आली. आपण, आपले बाल-कुमारही enjoy करतील.
👍7❤3
*टॅक्सी चालकांना मराठी बोलता येणे सक्तीचे*

निर्णय चांगला आहे पण असा निर्णय घेण्याची वेळ का आली ह्यावर सुद्धा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. सरकारने आणि मराठी माणसांनी सुद्धा. हिंदी नाकारून भाषिक अतिक्रमण रोखा.


येत्या १ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधितांची मराठी लिहिता, वाचता येण्याबाबतची पडताळणी केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असून, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. राज्यात अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. वास्तव्याच्या ठिकाणची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे – मंत्री सरनाईक

मराठीभाषा महाराष्ट्र
रिक्षाचालक टॅक्सीचालक परवाना
🔥5❤4👍2
कासवांची गोष्ट.pdf
5.8 MB
मुलांसाठी हे दुसरं...
कार्तिक शंकर: कासवाची गोष्ट.
२००५ प्रथम बुक्स..

काय आहे ही गोष्ट? सूर्यप्रकाशाने उबवलेल्या अंडयांतून रात्रीच्या अंधारात ऑलिव्ह रिडली कासवांची पिले बाहेर येतात. त्यातील एक पिल्लू या कथेचा नायक आहे. तेच ही कथा सांगतेय. किनाऱ्यावरून महासागराची वाट कुठेही न चुकत वा न पकडले जाता पार केल्याबद्द्ल त्याला आनंद आहे. पण महासागरातले सर्व धोके हे छोटेसे ऑलिव्ह रिडली पार करू शकेल? प्राणघातक शार्क माशांपासून, भयंकर जाळयांतून आपले संरक्षण करत ती मोठी होईल का? ती स्वत:चे घरटे बनवून त्यात अंडी घालण्याचा आनंद अनुभवू शकेल का? ऑलिव्ह रिडली कासवाच्या या मनोगतामध्ये ती इतर मनोरंजक प्राण्यांना तिच्या प्रवासात कशी भेटते ते वाचा!
मूळ लेखकाला मी ओळखतो. त्यांच्या विभागात मी काम केले आहे. आता, इथं पश्चिम किनाऱ्यावर काही कासव संवर्धन केंद्र आहेत. बघू केंव्हा योग येतोय त्यांना अनुभवण्याचा!
वर अनेक मराठी पुस्तकं आहेत. नोंदणी करावी लागते. त्यांनतर अलिबाबाचा खजिनाच समोर येतो. हे पुस्तक तर वाचाच, वाचून दाखवाच, पण त्या संकेतस्थळावर जाऊन इतरही पहा.
👍1
Abhyankar 2021-Vidnyan Mhanaje Kay.pdf
19.5 MB
शंतनू अभ्यंकर. विज्ञान म्हणजे काय? (२०२१) आणि शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (२०२२). किशोर मासिक, बालभारती, पुणे.
हे संकलन आहे. ‘किशोर’च्या लहानग्या वाचकांसाठी भरपूर चित्रांसह. आणि विषयाला धरून अजून काही लेख. एकूण ८३ पानं. म्हणजे तसं छोटसंच! गेल्यावेळेस म्हणालो तसं लहानग्यांना वाचून दाखवा. यातली चित्रं दाखवा. त्यांनी काही प्रश्न विचारले तर मात्र उत्तर देण्यासाठी तयार रहा! मला वाचायला मजा आली. आपण, आपले बाल-कुमारही enjoy करतील.
❤2🙏1
हजरजबाबी_बिरबल_मानसी_हजेरी.pdf
820.4 KB
मुलांना सुट्ट्या आहेत तर संग्रहातले दोन तारे.
पहिला बिरबल. ‘चतुर बिरबल आणि बादशहा जुने पण चांगले’ आणि ‘हजरजबाबी बिरबल’. यात नसलेली, पण पहिल्यांदा बिरबल वाचतांना भिडलेली ‘तांदूळ-गाड्या-मेव्हणा-हेलपाटे’ प्रयत्नपूर्वक मिळवून मुद्दाम सुरुवातीला दिलीय. आता जाणवतंय आयुष्यभर यातल्या बिरबलाप्रमाणे वागायचा प्रयत्न केलाय. जरूर पहा.
बिरबलाच्या गोष्टी विंग्रजी, हिंदीतून सुद्धा आहेत. उदाहरणार्थ मी एकत्रित केलेलं तब्बल दीडशेपानी Birbal The Wise 2024 - लहानग्यांसाठी आणि Birbal Rib Tickling tales 2024 थोडं मोठ्या-कुमार वाचकांसाठी.
एक करता येईल. विंग्रजी सुधारण्यासाठी आधी ही मुलांच्या हाती द्यावीत. मग मराठीतल्या गोष्टी त्यांना हुडकायला सांगाव्यात. त्यांना आवडलेल्या गोष्टी इतरांना सांगायला उद्युक्त करावं.
हिंदीतली, अमरचित्रकथा आणि ‘अकबर बिरबल गोष्टी’ इथं तारायंत्रावर आहेत. म्हणून पुन्हा देत नाही.
साऱ्याच पुस्तकांत भरपूर रंगीत चित्रं आहेत. मजा येईल!
काही गोष्टी पुनःपुन्हा येतात. पण एकूण मजा येते.
❤8
बाळ हवं आहे_.pdf
121 KB
मुलबाळ हवे आहे?

"एखाद्या जोडप्याला बाळ होऊ देणं अथवा न देणं हा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे",असं जर तुम्हाला वाटत नसेल, तर पुढचा लेख तुमच्यासाठी आहे...
"लग्नाला 4, 5, 8, 9 वर्ष झाली तरी घरी अजून पाळणा हलला नाही, असं कसं?"हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर पुढचा लेख तुमच्यासाठी आहे.
"एखादं मूल झाल्याशिवाय स्त्रीचं स्त्रीत्व पूर्ण होत नाही असं जर तुमचं मत असेल", तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी आहे.
"करिअरमध्ये स्त्री कितीही उच्च असली, भले ती डॉक्टरेट झालेली असली, पण तिला जर मूल नसेल, तर समाजात तिची किंमत कस्पटासमान आहे" असं जर तुमचं मत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

PDF वाचायला अडचणी येत असतील तर वेबपेज : https://anotepad.com/notes/6d56bmwf

ह्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया इथे कमेंटमध्ये नक्की द्या.
❤2👍2👌1
⁣मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली असेल. सुट्टीत त्यांचा मोबाईल आणि टीव्हीवरचा स्क्रीन टाइम वाढतो. त्यांना या सुट्टीत स्क्रीन पासून ठेऊ दूर आणि पुस्तकांचा खाऊ देऊ भरपूर.. 🥳डॉ. नितीन हांडे यांची सहज सोप्या भाषेत विज्ञानाची गोडी लावणारी पुस्तकं.. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारी पुस्तकं.. कुतूहल जागं करणारी पुस्तकं..❤️ शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सर्वांनी वाचली पाहिजेत अशी पुस्तकं.. 🎈
१) आपले भवताल : आपल्या सौरमालेची, या ग्रहांनी, नक्षत्रांनी जगभरातील संस्कृतीमध्ये, कालमापन पद्धतीमध्ये मिळवलेले स्थान यांची रंजक माहिती. मूल्य: २००
२) की की की की कीटक : आपल्या भवताली असणाऱ्या कीटकांची रंजक माहिती.. मुलांच्या डोक्याला खुराक. मूल्य: २००
३) सायंटिस्ट खोपडी भाग १.. बेलपासून नोबेलपर्यंत : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २७ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी. मूल्य: ३००
४) सायंटिस्ट खोपडी भाग २… जेन झी पासून रिव्होल्युशनरी जनरेशन पर्यंत.. २१ अफलातून शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी. मूल्य: ३००
५) मेलुहा ते भारत : हजारो वर्षापूर्वी भारतात असलेल्या गौरवशाली ज्ञानपरंपरेचा वेचक आढावा. मूल्य: ३००
६) ज्ञानाचा प्रवाहो चालिला : देवी, रेबीज या लसींपासून कोरोना लसपर्यंत जीवरसायनशास्त्राचा झालेल्या प्रवासाचा रंजक आढावा. मूल्य: २००
७) इस्रो : द प्राईड ऑफ इंडिया: इस्रो या भारतातील अग्रगण्य संस्थेची इत्यंभूत माहिती. संस्थेची वाटचाल आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे महत्वाच्या मोहिमा. अगदी सोप्या भाषेत रॉकेट सायन्स. मूल्य: ३००
८) पाथमेकर्स : लिंगभेदाच्या अडथळ्यांवर मात करून स्त्री संशोधकांसाठी नवीन रस्ता निर्माण करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञांची प्रेरक कहाणी. मूल्य: २७०
९) मिथकांचे जग: जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीतील सृष्टीच्या जन्म कथा, सृष्टी निर्माण करणारे त्यांचे देव यांची रंजक गुंफण. मूल्य: ३८०

कोणतीही चारपेक्षा अधिक पुस्तके मागवली तर त्यावर २० टक्के सवलत असेल. ऑर्डर देण्यासाठी ८९५६४४५३५७ या नंबर वर व्हाट्सअप कराल.
पोस्ट शेअर देखील कराल🙏
❤5