MPSC GK 2026
3.51K subscribers
104 photos
2 videos
32 files
624 links
⛰️ मराठी सामान्य ज्ञानाचे भांडार ⛰️

⭐ अधिक माहितीसाठी जुन्या देखील पोस्ट वाचा.

⭐ नवनवीन पोस्ट देखील तुमच्यासाठी आम्ही आणत असतो.

⭐ स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम PDFs

⭐ तुमच्या मित्रांना देखील जॉईन करण्यासाठी नक्की सांगा

🌐🌐🌐🌐🌐
Download Telegram
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
जगातील प्राण्यांच्या एकूण प्रजातींपैकी किती टक्केपेक्षा अधिक प्रजाती भारतात आहेत?
Anonymous Quiz
30%
७.५ टक्क्यांहून
42%
५.६ टक्क्यांहून
22%
३.३ टक्क्यांहून
6%
६.९ टक्क्यांहून
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
शेती,पशुपालन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, रस्ते हे कोणत्या संस्थेचे प्रमुख कामे आहेत?
Anonymous Quiz
23%
नगरपालिका
33%
पंचायत समिती
39%
जिल्हा परिषद
5%
यापैकी नाही
Word of the Day: Serendipity

Word Meaning: Serendipity refers to the occurrence of valuable or desirable things by chance or accident, in a way that is unexpected or unplanned. It is the act of making fortunate discoveries or finding something beneficial while searching for something else entirely. Serendipity often involves a combination of luck, curiosity, and an open mind, leading to unexpected and positive outcomes.
कारागृहातील कैद्यांना कर्ज देण्यासाठी जिव्हाळा योजना सुरू करणारे राज्य कोणते?
Anonymous Quiz
50%
महाराष्ट्र
20%
गुजरात
16%
राजस्थान
14%
तेलंगणा
भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग काय म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
33%
कोकण किनारपट्टी
29%
मलबार किनारपट्टी
34%
कोरोमंडल किनारपट्टी
3%
यापैकी नाही
Word of the Day: Euphoria

Word Meaning: Euphoria is a state of intense happiness, excitement, and joy. It is characterized by a feeling of extreme elation, often accompanied by a sense of well-being, exhilaration, and positivity. Euphoria can be experienced in response to various situations, such as achieving a goal, receiving good news, or experiencing something pleasurable or uplifting.
👍1
ग्रीस हा विकसित देश असून 1981 पासून युरोपीय महासंघांचा प्रमुख सभासद आहे. या देशाचे चलन युरो असून, पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मध्यम स्वरूपाची आहे. ग्रीस या देशाची राष्ट्रीय भाषा ग्रीक ही आहे.
या देशाचे क्षेत्रफळ हे 1,31,986 चौ.किमी. असून या देशाच्या दक्षिण दिशेला भूमध्य समुद्र तर पूर्वेस इजीअन व पश्चिमेस आयोनियन समुद्र असून वायव्ये दिशेला अल्बेनिया, उत्तरेला यूगोस्लाव्हिया व बल्गेरिया आणि ईशान्य व पूर्वेला तुर्कस्तान आहे.

या देशाचा 25,202 चौरस किमी. प्रदेश बेटांनी व्यापलेला असून त्यांत सिक्लाडीझ, डोडेकानीझ, स्पॉरडीझ व आयोनियन हे द्वीपसमूह व क्रीट, यूबीआ, लेझ्बॉस, कीऑस, रोड्झ, सेफालोनिया, कॉर्फ्यू व सेमॉस ही मोठी बेटे समाविष्ट आहेत.
या देशाचे हवामान हे उन्हाळा कडक व हवा कोरडी असून हिवाळा ओला असतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. समुद्रसपाटलेला सरासरी तापमान 27° से. असते. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पिंडस पर्वताच्या पश्चिमेकडे जास्त पाउस पडतो. त्यामुळे ग्रीसची पूर्व किनारपट्टी ही खूपच कोरडी असते.

अथेन्सच्या परिसरात फिरताना हा कोरडेपणा चांगलाच जाणवतो. ग्रीसच्या पर्वतीय क्षेत्रात मात्र चांगला पाऊस पडतो व हिवाळ्यात बर्फ पडतो उत्तरेकडील डोंगराळ भागात अल्पाईन जंगले आहेत. ग्रीसची एजियन समुद्रातील बेटांवर खूपच कोरडे हवामान आहे.
ग्रीस या देशाची दोन भागात विभागणी केली जाते. भौगोलिक दृष्ट्या ग्रीस हा बाल्कन द्वीपकल्पाचा दक्षिण टोकाचा भाग आहे. एजियन समुद्रातील अनेक बेटांचे समूहांमुळे ग्रीसचे बेटे व मुख्य भूमी असे वर्गीकरण करता येईल. ग्रीसमध्ये अनेक बेटे असून एकूण 1400 बेटे ग्रीसच्या अखत्यारीत येतात त्यापैकी 227 बेटांवर मनुष्यवस्ती आहे. ग्रीसला अतिशय लांब असा समुद्र किनारा, एकूण 14,880 किमी. समुद्रकिनारपट्टी लाभली आहे.

विविधरंगी बेटे हे ग्रीसचे विशिष्ट आहे. ग्रीसच्या बेटांमधील भौगोलिक विविधता खूप आहे तरीही बहुतांशी बेटे ही ज्वालामूुीपासून तयार झालेली आहे. सॅंटोरिनी ह्या बेटावर इस पूर्व 1600 साली जबरदस्त ज्वालामुखी फुटला होता त्यामुळे या बेटाची भौगोलिक रचनाच बदलून गेली.

आज हे बेट ग्रीसचे सर्वांत प्रसिद्ध बेट आहे. क्रेटा हे सर्वांत मोठे बेट असून एकूण 1400 लहानमोठी बेटे ग्रीसच्या अख्यारीत आहेत. ग्रीसचा एगियन समुद्र हा त्याच्या पाण्याच्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. एजियन समुद्राचे पाणी अतिशय गडद निळ्या रंगाचे दिसते, जे एका प्रकारचे भौगोलिक आश्चर्य आहे.

ग्रीस या देशातील वार्दर व स्त्रूमा त्यातून नद्यांना वर्षभर पाणी असते. इजीअन समुद्राला ग्रीसमधून मिळणाऱ्या इतर नद्यांमध्ये नेस्तॉस, आलीआक्‌मॉन, पिनीअस व स्पेर्खीऑस, पेलोपनीससमधील सर्वात मोठी नदी युरोतस, कॉर्फ्यू बेटावर मेगॉसी आणि आयोनियन समुद्राला मिळणाऱ्या ॲकिलोअस, आराख्थॉस आणि थीअमिस आहे.
कुसुमाग्रज

मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. त्यांना आपल्या प्रभावी साहित्यलेखनामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण कवि कुसुमाग्रज यांची मराठी माहिती मिळवणार आहोत.

प्रारंभिक जीवन
कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला नाशिक मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु लहान असतांनाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णु वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. एकुलती एक बहिण कुसुम असल्याने त्यांनी कुसुम चे अग्रज अर्थात कुसुमाग्रज नाव धारण केले. तेव्हापासूनच शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करू लागले.

शिक्षण आणि करीयर
कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण नाशिक मधील पिंपळगाव या तालुक्यात झाले. पुढील शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाशिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई महाविद्यालयातून पूर्ण केले.



20 वर्षाच्या वयात त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात प्रवेश केला. या शिवाय आपल्या जीवन काळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 20 वर्षाच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कवितासंग्रह 'जीवनलहरी' प्रकाशित केला. नंतर नाशिक मध्येच त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट सती सुलोचना मध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले.

नंतर काही काळ त्यांनी विविध नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून काम केले. 1942 हे वर्ष त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे होते. कारण याच वर्षी मराठी भाषेचे ध्येयवादी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा 'विशाखा' हा कविता संग्रह स्वखर्चावर प्रकाशित केला. वि. स. खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचे वर्णन करताना लिहिले की, "कुसुमाग्रजांच्या शब्दांमुळे सामाजिक असंतोष प्रकट होतो, परंतु त्यांच्यामुळेच जुने जग नव्या मार्गाकडे जात आहे ही आशावादी श्रद्धा आहे".

1942 च्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत असत. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा जयजयकार..' ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली. या कवितेतून मराठी भाषेतील स्फुल्लिंग ज्वाला प्रमाणे बाहेर पडले. त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही. कारण रजिस्टर मध्ये कुसुमाग्रजांचे नाव वि वा शिरवाडकर लिहीले होते.

विशाखा या काव्यसंग्रहानंतर त्यांनी अनेक नाटके, कवितासंग्रह आणि कथासंग्रह लिहिले. त्यांचे नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी भाषेतील ते दुसरे लेखक होते. याशिवाय त्यांनी अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवन लहरी इत्यादी प्रसिद्ध कवितासंग्रह लिहिले.
👍1
Word of the Day: Conundrum

Word Meaning: Conundrum refers to a difficult or challenging problem or situation that is perplexing and difficult to resolve. It often involves a complex or puzzling issue for which there may not be a clear or straightforward solution. Conundrums can be thought-provoking and require careful analysis, critical thinking, and creative problem-solving to navigate through the complexities and reach a resolution.
👍1
41 व्या लोकमान्य टिळक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
Anonymous Quiz
12%
अमित शहा
56%
नरेंद्र मोदी
24%
एस जयशंकर
8%
अजित डोवाल
👍1
फिलिप चॅटियर अवॉर्ड २०२३ हा सन्मान जस्टिन हेनिनला मिळाला, हा कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे?
Anonymous Quiz
25%
टेनिस
55%
बॅडमिंटन
12%
क्रिकेट
7%
हॉकी
👍2
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
मानव रंग, उंची, व शारीरिक स्वरूपात _____ मुळे भिन्न असते.
Anonymous Quiz
21%
प्रजातींची विविधता
59%
जनुकीय विविधता
17%
परिस्थितीकीय विविधता
2%
यापैकी नाही
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
ग्रीस हा देश जगातील प्राचीन देशात गणला जातो. ग्रीक संस्कृती ही तुलनात्मकदृष्ट्या प्राचीन भारत, इराण, इजिप्त, चीन, इटली, कोरिया, जपान या संस्कृतींइतकीच जुनी आहे. जिथे मानवी सभ्य संस्कृतीची सुरुवात झाली, असा ग्रीस हा युरोपमधील पहिला देश आहे.
ग्रीक संस्कृतीची मुळे क्रेटा परिसरात सापडतात. इ.स.वी पूर्व 6 व्या ते 7 व्या शतकात ग्रीक संस्कृती ही अनेक स्वायत्त शहरात विभागली होती. प्रत्येक शहर हे एका देशाप्रमाणे असे. अशी अनेक शहरे एजियन समुद्रापासून ते इटलीपर्यंत होती.

अथेन्स, स्पार्टा, थेस्पीया ही त्यातील काही प्रमुख शहरे होती. या शहरांमध्ये परस्पर मैत्रिभााव तसेच शत्रुत्व असे. ही शहरे एकमेकांत अनेकदा युद्धे देखील करत. इसवी सनपूर्व 4 थ्या ते 5 व्या शतकात ग्रीक संस्कृती या शहरांमध्ये भरभराटीस आली. हा काळ प्राचीन ग्रीसचा सुवर्ण काळ मानला जातो.
या काळात असे मानतात की प्राचीन जगातील अनेक आश्चर्ये ग्रीसमध्ये होती. जी कालाओघात नष्ट झाली. यातील खुणा अजूनही अथेन्समधील प्राचीन मंदिरांमध्ये दिसून येतात. होमरने इलियड, ओडिसीसारखी महाकाव्ये या काळात रचली गेली. वाणिज्य, कला, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र यांचा ग्रीसमध्ये उदय झाला व भरभराटीस पावले.

ऑलिंपिकसारख्या खेळा-महोत्सवांचा उदय झाला. ग्रीसवर या काळात पर्शियाची मोठी आक्रमणे झाली जी परतवून लावण्यात स्पार्टा व अथेन्सने हिरिरीने सहभाग घेतला. पहिल्या युद्धात अथेन्सने मॅराथॉन येथे पर्शियाचा पराभव केला ज्याच्या स्मरणार्थ आज मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा आयोजित होते.

दुसऱ्या युद्धात थर्मिस्टीकलीस या सेनापतीने नौदलीय युद्धात पर्शियाचा पराभव केल. फिलिप्स या मॅसेडोनियाच्या राजाने सर्व ग्रीक राज्ये जिंकून ग्रीस एका छत्राखाली आणली. याच्याच मुलगा जो महान अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर म्हणून ओळखला जातो, याला आतापर्यंत सर्वात महान सेनापती मानले जाते. त्याने ग्रीकांचे साम्राज्य भारतापर्यंत वाढवले.
👍1
ग्रीसमधील दक्षिण व मध्य प्रदेशात भूमध्य सागरी वनस्पती तसेच पर्वत प्रदेश आढळतात. उत्तरेस मध्य युरोपीय प्रदेशात खुरटी झुडपे, पानगळ व सदाहरित वृक्ष आढळतात त्यामध्ये ओक, चेस्टनट, फर, पाइन हे वृक्ष देखील आढळतात. वसंत ऋतूत खडकाळ भागात विविधरंगी फुलझाडांना बहर येतो.

डोंगराळ प्रदेशात रानडुक्कर, रान मांजर, लांडगे, लिंक्स, मोर्टेन-पिंगट अस्वल, हरिण, पश्चिम व दक्षिण प्रदेशांत खोकड, रानबकरा, साळू हे प्राणी आढळतात. तर पेलिकन बगळे, ठिपक्यांचा कोकीळव करकोचे हे पक्षी असून उत्तर यूरोपमधले अनेक जातींचे पक्षी हिवाळ्यात या देशात येतात. समुद्रात मासे, कवची जलचर, कासव, स्पंज इ. सापडतात.

ग्रीस या देशांमध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामध्ये ओट, मका, गहू, बार्ली, कलिंगडे, बटाटे, टोमॅटो, तंबाखू, कापूस, साखर, आल्फा-आल्फा, बीट, ऑलिव्ह, बेदाणा, मोसंबी, लिंबे, सफरचंद, द्राक्ष, पीच हे महत्त्वाचे पिके ही घेतली जातात.

ग्रीस या देशाची संस्कृती ही प्राचीन मानली जाते. तसेच हा देश प्राचीन देशांमध्ये गणला जातो. प्राचीन काळी येथे बारा देवतांना पुजले जाईल. अपोलो, झेउस, व्हिनस, तीतीका अश्या काही देवता होत्या.

ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर हा प्राचीन धर्म लुप्त पावला. कॉन्स्टंटाईन या रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिस्ती धर्म हा ग्रीक लोकांनी स्वीकारला.

या देशातील ग्रामीण भागातील लोकांची राहणीमान साधी आणि आहारामध्ये गहू-रोटी, ऑलिव्ह, शेळीचे दूध, कांदा, पावटे, पालेभाजी, ताजा किंवा खारा मासा यांपैकी असतो.

त्यांच्या घरांच्या भिंती ह्या दगड मातीच्या व पांढऱ्या रंगाचे लहान घर असून जवळ एखादे बदामाचे किंवा डाळिंबाचे झाड तसेच आजूबाजूला फुल झाडे खिडक्यातून एक दोन कुंड्या पाणी भरलेले माठ तसेच जळण्यासाठी कोळशाच्या शेगड्या ही पद्धत सर्वत्र दिसून येते.

10 व्या शतकापर्यंत पोपशी संबध ताणल्यानंतर ग्रीक व बायझंटाईन नागरिक स्वतःला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले, तुर्की काळात ग्रीसमध्ये इस्लामी करणात प्रखर विरोध झाला व तुर्की सम्राटांनीही धार्मिक भावना न दुखावता राज्य करावयाचे ठरवले त्यामुळे ग्रीसची ख्रिस्ती परंपरा अबाधित राहिली. संविधानाप्रमाणे पारंपारिक ख्रिस्ती धर्म हा ग्रीसचा अधिकृत धर्म आहे. ग्रीस संविधानाप्रमाणे सर्व नागरिकांना आपपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

ग्रीस या देशांमध्ये ऑलम्पिक खेळ खेळला जातो म्हणून या देशाला ऑलिम्पिकची जन्मभूमी असेही म्हटले जाते. ऑलम्पिक खेळ हा प्राचीन काळी ग्रीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांप्रमाणेच भरवले जात होते. 1896 च्या पहिली ऑलिंपिक स्पर्धा व 2004 मधील ऑलिंपिक स्पर्धा ग्रीसमध्ये भरवली गेली. फुटबॉल व बास्केटबॉल हे ग्रीसमधील आवडीचे खेळ आहेत.
ग्रीस या देशांमध्ये अनेक बेटे असल्यामुळे येथे प्राचीन अवशेष आढळून येतात त्या अवशेषांवर जुन्या संस्कृतीचे शिल्प, सुंदर निसर्ग दृश्य व सुखद हवामान असल्यामुळे येथे अनेक युरोपिय व अमेरिकन पर्यटक हा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येथे येतात. तसेच येथे ऐतिहासिक व धार्मिक सण उत्सव पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक येतात.
👍1
नोमॅडिक एलिफंट हा युद्ध सराव भारत व कोणत्या देशात झाला?
Anonymous Quiz
18%
चीन
53%
मंगोलिया
17%
स्पेन
11%
मलेशिया
Word of the Day: Intrinsic

Word Meaning: Intrinsic refers to something that is inherent, essential, or naturally part of the nature or character of a person, thing, or concept. It represents qualities, attributes, or values that are internal and integral to the object or subject under consideration. Intrinsic factors are internal to the entity itself and are not dependent on external influences or circumstances.
Word of the Day: Procrastination

Word Meaning: Procrastination refers to the act of delaying or postponing tasks or actions that require attention or completion. It involves intentionally putting off important or necessary activities in favor of more immediate, pleasurable, or less demanding tasks. Procrastination often leads to inefficiency, decreased productivity, and increased stress, as tasks pile up and deadlines approach.
👍1
कॅनडा देशाची संपूर्ण माहिती

या देशाचे क्षेत्रफळ हे 99,84,670 चौरस किमी. असून या देशाच्या पूर्व दिशेला अटलांटिक महासागर तर पश्चिमेला प्रशांत महासागर असून उत्तरेला आर्टिक महासागर आहे. दक्षिणेस दोन देशांना विभागणारी जगातील सर्वात लांब सीमारेषा ही अमेरिका व कॅनडा यांच्या दरम्यान असून तिची लांबी 8,891 किमी. आहे.

कॅनडा या देशाची जुलै 2009 च्या जनगणने प्रमाणे लोकसंख्या 33,487,208 एवढी होती. येथील प्रमुख भाषा ही फ्रेंच व इंग्लिश आहेत.

कॅनडा या देशाचे चलन कॅनडियन डॉलर आहे

कॅनडा या देशातील हवामान हे थंड व सौम्य प्रकारचे असते. हिवाळ्यामध्ये सर्वत्र हिवाळा हा फार कडक असतो तसेच येथील तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते. येथील जानेवारीतील मॉन्ट्रिऑलचे सरासरी तापमान -40 से. असून खंडांतर्गत भागात विनिपेग येथे -180 से. असते.

तसेच उत्तर आर्टिक बेटा मध्ये ते सरासरी -370 से. असते व तेथील हिवाळा हा सौम्य असतो. येथे हिवाळ्यात हिमवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. येथील उन्हाळ्यातील म्हणजे जुलै महिन्याचे सरासरी तापमान हे 210 सेल्सियस मिनी पॅक ची 200 सेल्सिअस ही स्टोरी या 160 सेल्सिअस व उत्तरेकडील प्रदेशातील वीस सेल्सिअस असे आठळते.

या मानाने शरद ऋतु मधील तापमान सौम्य असते व आकाश सुद्धा निरभ्र असते. पावसा विषयी बोलायचे झाले तर उत्तरेकडील बऱ्याच भागात व मध्यवर्ती भागात वार्षिक पर्जन्यमान 50 सेंमी असून प्रेयरी प्रदेशात हे प्रमाण 30 सेंमी पेक्षाही कमी असते.
👍2
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
भारत सरकारने १९५०साली राष्ट्रीय सुरक्षा कायदा कोणत्या वर्षीच्या ॲक्टनुसार संमत केला?
Anonymous Quiz
16%
१७७३ चा ॲक्ट
35%
१९१९ चा ॲक्ट
38%
१९३५ चा ॲक्ट
11%
१८५३ चा ॲक्ट