⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
13) 'अरेरे ! सचिन तेंडुलकर आउट झाला !' या वाक्यात आलेले वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत.
Anonymous Quiz
15%
उभयान्यावी अव्यय
9%
शब्दयोगी अव्यय
68%
केवलप्रयोगी अव्यय
8%
कारणबोधक अव्यय
👍6
15) पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ? (PSI/STI 2006)
Anonymous Quiz
12%
द्वंद्व
54%
द्विगु
27%
बहुव्रीही
6%
अव्ययीभाव
👍2❤1👏1
16) 'दिग्दर्शक' या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?
Anonymous Quiz
4%
दिग्दर्शकी
85%
दिग्दर्शिका
8%
दिग्दर्शीकी
3%
दिग्दिर्शक
👍1👏1
17) 'मासा' या शब्दांचे अनेकवचनी रूप कोणते
Anonymous Quiz
73%
मासे
19%
माशे
5%
माश्ये
3%
यापैकी कोणतेही नाही
👍2👏1
18) पर्यायी उत्तरांतून पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा
Anonymous Quiz
17%
नदी-नद्यांना
55%
डबा- डब्यातील
17%
भिंत- भिंतीच्या
12%
कुऱ्हाड-कुऱ्हाडीने
👍1👏1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) ‘विटीदांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) वैकल्पिक व्दंव्द 2) समाहार व्दंव्द
3) अव्ययी भाव 4) बहुव्रीही

उत्तर :- 3

2) उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

1) अर्धविराम 2) स्वल्पविराम 3) पूर्णविराम 4) अपसारणचिन्ह

उत्तर :- 2

3) ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) रूपक 2) उपमा 3) श्लेष 4) यमक

उत्तर :- 2

4) सिध्द शब्द निवडा.

1) गुरू 2) गुरूने 3) गुरूला 4) गुरूच्या

उत्तर :- 1

5) ‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● क्षणभंगुर x चिरकालीन

● अबोल x वाचाळ

● आसक्त x अनासक्त

● उत्तर x प्रत्युत्तर

● उपकार x अपकार

● घाऊक x किरकोळ

● अवजड x हलके

● उदार x अनुदार

● उतरण x चढण

● तारक x मारक

● दयाळू x निर्दय

● नाशवंत x अविनाशी

● धिटाई x भित्रेपणा

● पराभव x विजय

● राव x रंक

● रेलचेल x टंचाई

● सरळ x वक्र

● सधन x निर्धन

● वियोग x संयोग

● राकट x नाजुक

● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

2)निश्चय दांडगा करणे : ठाम निश्चय करणे 
पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुमनचा निश्चय दांडगा होता. 

2) मनस्ताप सहन करणे : मनाला होणारा त्रास साेसणे
राम नापास झाला, त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला. 

3) ताब्यात घेणे : सर करणे 
गिर्यारोहकाने कडा सर केला होता. 

4) मन खट्टू होणे : वाईट वाटणे
या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही, हे ऐकताच सीमाचे मन खट्टू झाले.
 
5) एका पायावर तयार असणे : सदैव तत्पर असणे
सिनेमा पहायला जाऊया म्हटले की रिया नेहमी एका पायावर तयार होते. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

1) भाषा – भाषा 2) सभा – सभा 3) फोटो – फोटो 4) घोडा – घोडे

उत्तर :- 4

2) विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय
म्हणतात ?

1) अधिकरण 2) संप्रदान 3) करण 4) विभक्तीप्रतिरूपक अव्यये

उत्तर :- 4

3) ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

1) संयुक्त वाक्य 2) मिश्र वाक्य 3) केवल वाक्य 4) संकेतार्थी

उत्तर :- 2

4) ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) अतिरेक्यांविरूध्द 2) लढताना 3) शहीद झाला 4) त्याचा धाकटा मुलगा

उत्तर :- 4

5) ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी 2) कर्मणी 3) भावे 4) संकर

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
⭕️♦️⚠️ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
- बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
- मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
- 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
- लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
- बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
- लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
- 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
- कलकत्ता विद्यालय

👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
❇️ अंमलबजावणी संचालनालय (ED)

◆ स्थापना : 1 मे 1956


◆ महत्त्वाचे :
-सुरुवातीला प्रत्येक परकीय नियमन कायदा 1947 अंतर्गत कायद्याचे उल्लंघन हाताळण्यासाठी अंबलबजावणी विभाग म्हणून स्थापना करण्यात आली.

-1957 मध्ये या विभागाला अंमलबजावणी संचालनालय असे नाव देण्यात आले.

❇️ सध्या ED :

1) परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999

2) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 या कायद्यांच्या अंमलबजावणीचे काम करते.

◆ संचालक : एस के संजय कुमार मिश्रा

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
★ महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे ★

★ विद्यापीठाचे नाव - स्थळ - स्थापना ★

◆ मुंबई विद्यापीठे - मुंबई - १८५७

◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर - 1923

◆ पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे -1949

◆ डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958

◆ शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962

◆ कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983

◆ Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989

◆ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव - 1990

◆ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993

◆ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921

◆ सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004

◆ गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

◆ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).

◆ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).

◆ नारळ 🍐 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).

◆ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).

◆ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◆ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).

◆ हळद 🌼 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).

◆ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).

◆ राष्ट्रीय 🌰 कांदा - लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
❇️ चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2023 ❇️

◆ श्री पुरुषोत्तम रुपाला यांनी अ‍ॅनिमल पॅंडेमिक प्रीपेरनेस इनिशिएटिव्ह (APPI)” लाँच केले आहे.

◆ पंतप्रधान मोदींनी आसाममध्ये रेल्वे प्रकल्प, मिथेनॉल प्लांटचा शुभारंभ केला.

◆ नवी दिल्ली येथून एक विशेष भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू करण्यात आली आहे जी प्रवाशांना देशभरातील बीआर आंबेडकरांशी संबंधित विविध शहरांमध्ये घेऊन जाईल.

◆ ‘वंदे मेट्रो’ डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होईल असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

◆
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हैदराबादमध्ये 125 फूट उंच आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

◆ तुर्कीच्या नौदलाने TCG अनाडोलूवर पहिले मानवरहित हवाई विंग सादर केले.

◆ भारतीय उद्योग परिसंघ (CII) ने भारत-EU व्यापार कराराच्या फायद्यांवर जोर दिला आहे, जो भारत-EU संबंध वाढवण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करू शकतो.

◆ भारत-स्पेन जॉइंट कमिशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन (JCEC) चे 12 वे अधिवेशन 13 एप्रिल रोजी झाले.

◆ शाहरुख खान आणि ‘एसएस राजामौली यांचा 2023 च्या टाईम मॅगझिनच्या वार्षिक 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला आहे.

◆ असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, 28 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी 29 भारतातील करोडपती आहेत.

◆ चीनच्या वाढत्या खंबीरपणाला तोंड देण्यासाठी संयुक्त कवायतींमध्ये 18,000 सैनिक सहभागी झाले.

◆ वर्ल्ड आर्ट डे 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ जागतिक आवाज दिन 16 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ 16 एप्रिल रोजी सेव्ह द एलिफंट डे 2023 साजरा केला जातो.

◆ प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले.

◆  NHAI ने फॉरेस्ट एन्ट्री पॉइंट्सवर फास्टॅग आधारित पेमेंट सक्षम केले.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🛑महसूल विभाग रिक्त जागा.

👉 उपजिल्हाधिकारी:- 16 पदे रिक्त

👉 तहसीलदार:- 66 पदे रिक्त

👉 शिपाई:- 954 पदे रिक्त

👉 नायब तहसिलदार :-281 रिक्त पद

👉 तलाठी:- 5030 रिक्त पद

👉 उपअधीक्षक भूमिअभिलेख:- 15 रिक्त पद

👉 शिपाई:- 1025 रिक्त पद

👉 दुय्यम निबंधक:- 219

महसूल आणि वन विभाग क्लास 1 आणि क्लास 2 च्या पण जागा खूप रिक्त आहेत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️ 24/04/2023 रोजी 140 नवप्रविष्ठ महिला उमेदवारांना ट्रेनिंग साठी पाठवणार आहे तरी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
⭕️ सीएपीएफ आता 13 भाषा मधुन देता येणार आहे तसेच मराठीतून देखील हि परीक्षा देता येणार आहे...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━