शाळा®
11 subscribers
6 photos
3 links
Important Question's For Pre and Main Exam

MPSC | UPSC | PSI | STI | ASO | POLICE | BANK | SSC । Other Exams |
Download Telegram
#History
#Notes
#State_Service
संगम काळ

०१. संगम साहित्य आठ ग्रंथात समाविष्ट आहे. नत्रिने, कुरगदो, ऐगुरुणुरु, पाटट्रीफ्तु, परीपाडल, कलित्तौगै, अह्नानुरू, पुरनानुरू हे ते आठ ग्रंथ आहेत. तमिळ व्याकरणावर आधारित ‘तौल्कप्पियम’ या ग्रंथाची रचनासुद्धा संगम काळातच झालेली आहे. h 


०२. गायकांच्या गाण्यावर नर्तकी नृत्य करत असे. यांना ‘पाणर’ तसेच ‘विडैलियर’ असे म्हटले जात होते. 


🎯०३. ‘संगम’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. याचा अर्थ ‘गोष्टी’ किंवा ‘परिषद’ असा होतो. संगम साहित्याचा मुख्य विषय ‘शृंगार’ व ‘वीरगाथा’ आहे. या काळात शृंगाराला ‘अहम’ आणि वीरगाथेला ‘पुरम’ असे संबोधले जात होते. ‘पेदिनेकिलकिन्कू’ ही संगम साहित्याची प्रसिद्ध रचना आहे.


🎯०४. प्रथम संगमाचे आयोजन ‘मदुरा’ येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. द्वितीय संगमाचे आयोजन ‘कपाटपुरम’ येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. तृतीय संगमाचे आयोजन ‘मदुरा’ येथे नक्कीरर यांच्या अध्यक्षतेखाली केले होते.


🎯०५. ‘अवे’ हा संगमकालीन परिवार होता ज्याचा अर्थ सभा असे होतो. ‘उर’ नावाची संस्था नगराच्या प्रशासनाची व्यवस्था पाहत असे.


🎯०६. अरीक्मेंडू येथील उत्खननातून असे स्पष्ट होते कि येथे पूर्वी रोमन व्यापाऱ्यांची छावणी अस्तित्वात होती.


🎯०७. संगम काळात शिक्षकाला ‘कनक्काटर’ तर विद्यार्थ्याला ‘भान्वन’ किंवा ‘पिल्लै’ असे संबोधले जात होते.


🎯०८. पार्श्वनाथाने  भिक्षुंसाठी चार व्रत सांगितले होते. 
—– मी जीवित प्राण्यासोबत हिंसा करणार नाही.
—– मी नेहमी सत्यच बोलणार. 
—– मी चोरी करणार नाही.
—– मी कोणतीही संपती ठेवणार नाही.


🎯०९. बौद्ध साहित्यात महावीर स्वामींना निगष्ठ नाथपुत्र किंवा निग्रंथ सातपुत्र असेही म्हटले आहे. महावीर स्वामींचे बिहारच्या पटना जिल्ह्याजवळील पावापुरी नावाच्या ठिकाणी निर्वाण झाले.


🎯१०. सम्यक श्रद्धा, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण हे बौद्ध धर्मातील त्रिरत्न आहेत. जैन धर्मानुसार आत्म्याला भौतिक तत्वापासून मुक्त करणे हेच निर्वाण आहे. महावीर स्वामींनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे पंचमहाव्रत सांगितले आहेत.


@mpscshala
100% यातील एखादं वाक्य येणारच😊👍👍👍
#History #Notes
#State_service

वैदिक काळातील मंत्रिमंडळाची पदे व कर्तव्ये  –


१) राजन्य – या पदावर राजपुत्र राज परिवार सरदार यांपैकी क्षत्रिय व्यक्ती असे.
२) माहिषी – पट्टराणी हे पद देत तिने नाजूक बाबींवर व संकटकालीन सल्ला द्यावा.
३) पुरोहित – हा राजाला धर्म प्रमुख राहून व संकटकाळी मदत करणारा.
४) सेनानी – हा सन्य प्रमुख असे.
५) सूत – हे राजाचे खासगी अधिकारी व सारथी.
६) संग्रहित – हा अर्थ व्यवहार सांभाळणारा कोषाध्यक्ष होय.
७) भागदूत – हा कर वसुली करणारा.
८) ग्रामणी – हा ग्रामप्रमुख या पदाचे कार्य पाहत असे.
९) अक्षवप- हा अधिकारी जुगार निरीक्षक व नियंत्रक होता.

@rahulaanapat