MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
✅ रतन टाटांना ‘सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर

➣ टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या ‘सेवा भारती’ संस्थेकडून ‘सेवा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

➣ समाजसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी टाटा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

➣ रतन टाटांबरोबरच चलासनी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

➣ या दोन्ही नामवंत व्यक्तींना ‘सामजिक विकासासाठी या व्यक्तींनी वेळोवेळी दिलेला निधी आणि योगदान’ यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असं संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त दिलं आहे.

➣ एकूण 24 व्यक्ती आणि संस्थांना समाज कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

➣ हा पुरस्कार उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

#Award #current_affairs_notes