MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#CombineHistory

🟥 संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेसाठी इतिहास : कमी वेळेत जास्त मार्क्स मिळवण्याची रणनीती

👉संयुक्त गट-ब व क पूर्व परीक्षेमध्ये इतिहास विषयाचे पूर्वी १५ मार्क्स येत असत; मात्र २०२३ पासून इतिहासासाठी १० मार्क्स दिले जात आहेत.
तत्त्वतः संपूर्ण इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे; परंतु वेळेअभावी किंवा कमी मार्क्स असल्यामुळे, जर काही अतिशय महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित केले, तर कमी वेळेत जास्त मार्क्स मिळवणे शक्य आहे — असा माझा अभ्यासानुभव आहे.

👉खालील घटक PYQ (Previous Year Questions) च्या आधारे निवडलेले असून, यामधूनच बहुतांश प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे.

👇अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचे इतिहास घटक :

» ब्रिटिशांची भारतात सत्ता स्थापना

» सुरुवातीच्या काळातील रेल्वे उद्योग व इतर आर्थिक-औद्योगिक उपक्रमांची स्थापना
» वृत्तपत्रांचा इतिहास
» ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था
» १८५७ चा उठाव

👇सामाजिक व राजकीय संघटना :

» प्रार्थना समाज
» परमहंस सभा
» भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
» ईस्ट इंडिया असोसिएशन
» बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन
» महिलांशी संबंधित संस्था व चळवळी

👇घटनात्मक सुधारणा व कायदे :
» १८७३ पासून पुढील कायदे
१९०९, १९१९, १९३५ आणि १९४७ चे कायदे

👇इतर महत्त्वाचे घटक :

» समाजसुधारक
» ब्राह्मणेतर चळवळ
» गव्हर्नर जनरल व त्यांची कारकीर्द
» भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व समकालीन संस्था
» हिंदू व मुस्लिम राजकारण
» हिंदू महासभा
» वहाबी आंदोलन
» शेतकरी चळवळी
» क्रांतिकारी चळवळी
» आदिवासी चळवळी
» कामगार चळवळ