MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#stories
#inspiration

खूपच रागा रागाने घराबाहेर पडलो...🚶

घरी परत जायचेच नाही,
या इराद्यानेच!

आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले...

घर सोडले ते मोठा माणुस बनून येईन...

आणि तेंव्हाच वडिलांना तोंड दाखवेन...

जर मला एक मोटर सायकल घेऊन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात???

आणि आज मी रागातच पप्पांचे पाकिट पण चोरून आणले होते, ज्याला पप्पांनी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही.

मला माहित होते यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार,

मला पण कळू दे किती माल लपून ठेवलाय ते !

त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता?

खुप मोठे विचार चक्र 😇 डोक्यात चालू होते, चालताना मला बूटातुन काहीतरी टोचत असल्याचे जाणवले...

बूट काढून पाहिले तर टाचेतुन थोड़े रक्त आले होते, बूटातुन एक खिळा टोचत होता, त्रास तर झाला!

पण राग;
राग त्रासापेक्षा जास्त होता...

रागातच पुढे चाललो...🚶🚶🚶

पुढे गेल्यावर दुसऱ्या बूटातुन ओले ओले जाणवले...

रस्त्यावर पाणी सांडलेले होते.

उडी मारताना पाणी बूटात आले, बूट पायातुन काढून पाहिले तर बूट खालून फाटलेला होता....

तरीही रागातच लंगडत लंगड़त बस स्टँडवर आलो.

पण दुर्दैव...

तासभर एकही एस.टी.नव्हती...

मग वेळ होता म्हणून पप्पांचे पाकिट तरी चेक करून पाहू...

पाकिट उघडले त्यात एक 📝 चिठ्ठी मिळाली.

त्याच्यावर लिहिले होते लॅपटॉप साठी ४० हजार रूपये अमुक व्यक्ती कडून उधार घेतले...

अरे; तो लॅपटॉप तर माझ्यासाठीच पप्पांनी घेतला आहे आणि तो माझ्याकडेच आहे.

दुसरी एक मुडपलेली 📑 चिठ्ठी मिळाली--

ऑफिस मध्ये काम करताना तुमची आवड काय? आहे ते लिहा असे सांगितले होते...

त्यावर पप्पानी चांगले बूट वापरायला आवडते...
असे लिहले होते.

अरे चांगले बूट??
परंतु त्यांचे बूट तर फाटलेत...

आई मागच्या चार महिन्यांपासून पप्पांना सांगते नविन बूट घ्या...

पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात अजुन सहा महिने तरी चालतील हे बूट...

मग घेऊ, आत्ताच काही गरज नाही...

मी...😔
मी आत्ता समजलो किती चालतील ते अजून.

एक तीसरी 📋 चिठ्ठी मिळाली.

जुनी गाड़ी दया आणि नवीन गाड़ी घेउन जा...

आणि ते वाचताच मेंदूला अक्षरश: डोक्यात मुंग्याच आल्या...

पप्पांची गाड़ी...

आणि मग मी घराच्या दिशेने धावतच सुटलो...

आत्ता पायात खिळा पण टोचत नव्हता...

मी घरी धापा टाकतच पोहचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाड़ी ही नव्हती...

मी समजलो पप्पा कुठे आहेत!

पप्पा तिथेच होते...

मी धावत जावून जोरात मिठीच मारली आणि पप्पांचा खांदा ओला झाला...

नको पप्पा नको..
मला नाही पाहिजे मोटर सायकल...

बास पप्पा अगोदर तुम्हाला नविन बूट घ्या...

आणि हो पप्पा,
आता मला मोठा माणुस व्हायचच आहे...

तो पण तुमच्यासारखाच....

पप्पा फक्त तुमच्या सारखाच...

पुर्ण शोरुममध्ये शांतता पसरली...

सगळं शांत वातावरण...

मित्रांनो;
आई-वडिलांना ओळखा.

आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही...

खऱ्या अर्थाने जगा...

हेच तर खरं जिवन आहे...

आपण सर्व सजिव आहोत याचे भान असू द्या...

आवडलं तर नक्की शेअर करा...

माणूस बनून जगा आणि मानवता हा एकच धर्म पाळा...

🌷🌷🌷🌷
पोस्ट आवडली तरच शेयर करा💐
#stories
#inspiration
सुप्रभात.

जीराफच्या पिल्लाला जन्म घेतांना कदाचीतच कुणी बघीतलं असेल. आईच्या गर्भातुन तो दहा फुट उंचीवरुन धाडकन जमीनीवर पडुन जन्म घेतो.खाली पडताच तो पाय पोटाशी दुमडुन शरीराचं गाठोडं करुन राहतो. अर्भकच ते ! ना त्याच्यात पायावर उभं रहाण्याची क्षमता असते ना ईच्छा. त्याची आई क्षणभर आपल्या जिभेने त्याचे नाक कान साफ करते आणि अवघ्या पाचच मिनीटानी ती अर्भकाला कठोरतेचा धडा शिकवते.

ती प्रथम पीलाच्या चारी बाजुनी फिरते आणि मग अचानक असं काही करु लागते की बघणारा आश्चर्यचकीत होउन जातो. अचानक ती अर्भकाला ईतक्या जोराने लाथ मारते की ते दोन कोलांट्या मारुन दुर जाउन पडतं.

यावरही जेव्हा ते बाळ उभही राहु शकत नाही, ती पुन्हा शक्तीशाली लाथ मारते. लाथा खाउन खाउन तो बिचारा अर्धमेला होउन जातो. तरीही त्याची आई प्रहार करत जाते. आणि एका क्षणाला ते पील्लु आपल्या कमजोर कोवळ्या टांगांवर कसेतरी उभे राहते.

आई जिराफ त्यावेळी पुन्हा विचीत्र काम करु लागते, ती आपल्या बाळाचे पाय जीभेने चाटु लागते. ती त्याला आठवण देउ ईच्छिते की तो आपल्या पायावर कसा उभा राहीला. जंगलात आता धोक्याच्या परीस्थितीत एका उडीतच पिल्लाला सुरक्षीत ठिकाणी जावे लागणार आहे.

जिराफच्या ज्या पिल्लांना आईचा लाथांचा प्रसाद मिळत नाही, ते जंगलातील हींस्त्र श्वापदांचा बळी पडतात.

जगात असे अनेक लोकं आहेत, जे कठोर मेहनत करुनही धुत्कारल्या जातात, त्यांच्यावर नियती असेच एकामागोमाग एक प्रहार करत जाते. परंतु जितक्या वेळा त्या़च्यावर प्रहार होतो तीतक्या वेळा ते खचुन न जाता पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागतात. अशा लोकांना पराजीत करणं वा त्यांच्या ध्येयापासुन परावृत्त करणं अशक्य आहे. आणि एका क्षणी आयुष्याच्या एका सुंदर वळणावर त्यांना त्यांच ध्येय मिळुनच जातं ज्याकरता त्यांनी ईतक्या यातना सहन केल्या.

एक मासाचं अर्भक हे करु शकतं, आपण तर धट्टेकट्टे माणसं आहोत. चला उठुया नव्या जोमाने. नवीन क्षितीजांकडे जाण्यासाठी. एक सुर्य झाकाळला म्हणुन काय झाले. अनंत सुर्य अनंत क्षितीजे आपली वाट बघत आहेत.

Telegram.me/mpsc_simplified
#stories

न्यूनगंड मार्गदर्शनएका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनतवाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही!!गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !!हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !!: दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!✍एक सुंदर सुविचारसमस्या नाही असा "मनुष्य" नाही...!आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!☄Be Positive☄,,,

http://Telegram.me/mpscsimplified
#stories
एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.

भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य? हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, "रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.

आपली अवस्था अशीच आहे. आपण सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने विचार न करता अशा अनेक बाबींचे अंधानुकरण करीत आहोत, त्यामुळेच आपली वाटचाल लंगड्या हत्ती प्रमाणे सुरू आहे. आपली वाटचाल सुव्यवस्थीत होण्यासाठी आपला माहुत सदाचारी असला पाहिजे
---'तरुणांसाठी :--

1) अन्य जाती-धर्मांवर टिका
करत वेळ वाया घालवू नका.
जे चांगलं असेल त्या गोष्टी
आत्मसात करा.💮

2) दंगली- मारामारी करुण आपलं
नाव खराब करुण घेऊ नका.
आता लढाईचा काळ
राहिलेला नाही.💮

3) उच्च शिक्षण तुम्हाला आणि
तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
जीवन देऊ शकतं.💮

4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
गुलामी करू नका.

5) आजचा तरुण एकमेकांना मदत
करुण प्रगती करू शकतो.
त्यासाठी राजकीय पक्षाची वा
नेत्याची गरज नाही.💮

6) मंदिरात दान करण्याऐवजी
गरीब आणि गरजू तरुणांना
मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
मदत करतीलच.💮

7)इंग्लिश बोलायला शिका.
हा मराठीचा अपमान नाही काळाची गरज आहे.💮
"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल. .!!!

@mpscsimplified