नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from B K
✍✅🔘...अभ्यासासोबतचे  महत्तवपूर्ण शिक्षण...🔘✅✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖➖
(अभ्यासासोबत कश्याचे शिक्षण घाव्ये?ज्यामुळे नोकरीसाठी तुमचीच निवड होवू शकते ह्यासाठी लिखाण नक्की पूर्ण वाचा)
आपण सर्व अभ्यास करतो त्याचा उद्देश काय असतो एक चांगली नोकरी मिळवणं बस एवढाच.खर पाहता सर्वांनाच नोकरी मिळणार आहे का?उत्तर आहे नाही.अभ्यासासोबत काय काय शिकावे जेणेकरून आपला सर्वांगिण विकास होईल,सगळ्या गोष्टी,कौशल्ये पुस्तकात असतात किंवा त्या वर्गात शिकवल्या जात नसतात,आणि अश्या गोष्टींनाच,कौशल्याचं जास्त महत्त्व असत.
  एक घडलेलेच उदाहरण पाहूया एक नामांकित कंपनी असते त्यांना कंपनीत कामासाठी काही officers ची गरज असते,त्यासाठी दोन टप्पे असतात परीक्षा आणि मुलाखत.खूप विद्यार्थी त्यासाठी अर्ज करतात परंतु पदे मात्र कमी असल्यामुळे निवड अवघड असते.परीक्षेत पात्र होऊन मुलाखतीसाठी काही विद्यार्थी पोहचतात पण हवे असतात दोन-तीन.त्यापैकी दोघांना मुलाखतीच्या दालनाच्या आतमध्ये गेल्यास जे pannel सदस्य म्हणतात,"तुमची निवड झाली आहे,अभिनंदन सर".हे विचार करतात आपण आणखी मुलाखतही नाही दिली तरीही आपली निवड कशी झाली?आणि त्यांना तर परीक्षेत इतरांपेक्षा मार्क्स थोडे कमी असतात.मग ते pannel मेंबर्सला विचारतात तुम्ही आमची निवड कशी केली?ते सांगतात तुम्ही ह्या रूममध्ये येण्याच्या मार्गावर आम्ही मुद्दाम काही कचरा ठेवला होता आणि बाजूलाच एक नळ चालू होता.सर्व आले पण कोणीच वाटेतला कचरा कुंडीत टाकला नाही,किंवा नळ बंद केला नाही परंतु तुम्ही दोघांनी ते केलं. आम्हाला पहायचं होत कोण भविष्यात वेळेची गरज पाहून आपलं काम प्रामाणिकपणे करेल आणि अश्यांचीच आम्हला गरज आहे.नाहीतर तुमच्या कागदावर असणाऱ्या गुणांचा काय उपयोग इथपर्यंत येणारा प्रत्येक हुशार असतो हे माहीतच आहे,पण खरंच जबाबदारीने पुढे कोण काम करू शकता ह्यासाठी योग्य कोण हे पाहायचं होत आणि म्हणूनच आपली निवड केली आहे.दोघेही आनंदीत होतात आणि नोकरी स्वीकारतात.
   आपल्या माहीतच आहे आजकाल प्रत्येक नोकरीसाठी उदा.UPSC,MPSC,bank इतरसाठी पण मुलाखत आहेच,आणि तिथे तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे हे समजतच.कोण पुस्तकात हुशार आणि कोण पुस्तकांबाहेरही आणि त्यानुसारच निवड होते.फक्त कागदावरील मार्क्स उपयोगाचे नाहीत.ज्यांना संतुलन बनवता आले त्यांना जिंकायला जगही कमी आहे.अश्यंना नोकरी घरी शोधत येते.जपलेले छंद, कौशल्य,सवयी कधी मोठ्या पदासाठी निवड करून देतील,काही सांगता येत नाही.त्यामुळे ह्या काही बारीक वाटणाऱ्या परंतु इतरांपेक्षा वेगळ्या बनवणाऱ्या आवडी,छंद व कौशल्य नक्कीच जोपासली पाहिजे.कधी काय कामी येईल काय माहित?
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻
👍3👏3
📚वपू्र्झा,,,,,,✍🏻व.पु.काळे

माणूस कितीही मोठा असो. राजा असो, भिकारी असो. गरीब असो- श्रीमंत असो. आई असो- बाप असो वा अगदी पोटचा पोर असो. त्याच्या नशिबातले शेवटचे शब्द हेच "उचला आता"!
सगळे अवयव म्हणे एकदा ब्रम्हदेवाकडे गेले आणि म्हणाले. 'आमच्यातला मोठा कोण हे सांगा.'
ब्रम्हदेव म्हणाले, ज्याच्या वाचून अडत तो मोठा.
त्यावर प्रथम डोळे रुसून गेले. माणसाने देवाला विचारलं, डोळ्याशिवाय तू कसा जगलास?
त्यावर माणसाने सांगितलं, जगलो एखाद्या आंधळ्याप्रमाणे!
मग कान रुसून गेले.
पुन्हा प्रश्न विचारल्यावर माणूस म्हणाला, जगलो एखाद्या बहिऱ्याप्रमाणे!
असं होता होता, सगळे अवयव रुसून थकले. शेवटी प्राण रुसून जायला लागला आणि माणूस उत्तर द्यायला उरलाच नाही. तेंव्हा जेहेत्ते कालाचे ठायी, सर्वात महत्त्वाचा प्राण. म्हणूनच तो एकदा रुसून गेला की बाकीचे म्हणतात-  *"उचला आता"!*
👌6❤1👍1
व.पुं.नी लिहिलेले एक वाक्य आठवले, " आपल्या मनात आपल्या आवडत्या माणसाचं जे चित्र असतं त्याला फक्त जन्म असतो, मृत्यू नसतोच.."मध्यंतरीच भा.रा. तांबे यांचा स्मृतिदिन होऊन गेला. एक अप्रतिम गीतकार ते होतेच यात काही शंका नाही पण जसं त्यांनी रचलेले जन पळभर हे गाणं काळजाला हात घालणारे आहे तसेच ते जेव्हा अंथरूणास खिळून होते त्या वेळी त्यांनी लिहिलेली एक तितकीच हृदयस्पर्शी कविता होती " मधू मागसी माझ्या सख्या परी.."
हे नुसतेच गाणे नसून मृत्यूकडे केलेली एक गोड आळवणी आहे. भा.रां.ना जेव्हा समजले की आपली प्रकृती आता नवीन काव्य लिहिण्यासाठी साथ देऊ शकत नाही तेव्हा अतिशय आर्ततेने त्यांनी ही कविता लिहिली आहे.
  " मधू घटची रिकामे पडती घरी.." अर्थातच, या कवितेतील हा मधूघट म्हणजेच भा.रां.नी रचलेली काव्य रचना. माणूस जेव्हा शरीराने थकतो त्या वेळी त्याच्याकडे स्वतःचे असे काहीच उरत नाही, हेच भा.रा.तांबे म्हणत आहेत, " माझी प्रकृती आता कोणतंही काव्य लिहिले जाईल अशी राहिलेली नसल्यामुळे हा काव्यरुपी मधूघट आता घरी रिताच पडून असणार आहे.." असे दिनवाणी आर्जव खरंच एक प्रतिभावान गीतकारच करु जाणे..
    "आजवरी कमळाच्या द्रोणी, मधु पाजिला तुला भरोनी
       सेवा ही पुर्वीचि स्मरोनी, करि न रोष सख्या दया करी.‌"
भा.रां.नी अनेक सुंदर गीतांचा नजराणा कायमच सर्वांना बहाल केला आहे. पण गात्र थकली की मन देखील थकते. या ओळीतून भा.रा. सुचवत आहेत, आजपर्यंत मी अनेक काव्यपंक्ती या कमळाचे द्रोण भरुन देत होतो पण आता गात्र शिथिल झाल्यामुळे ही सेवा आता पुन्हा देणं शक्य नाही, त्यामुळे त्याचा राग मानू नकोस. अखेरचे कडवे हे फारच काळजाला हात घालणारे आहे, निसर्गाचा नियमच आहे जो जन्माला येतो तो एक दिवस या जगाचा निरोप घेतो, कारण हिच जगरहाटी आहे.
   " ढळला रे ढळला दिन सखया, संध्या छाया भिवविती हृदया.." ही शेवटची ओळ ऐकून डोळे पाणावतात. संध्या छाया म्हणजेच कातरवेळ. कुठेतरी आपला प्रवास संपत चालला आहे असे ही ओळ सांगू पाहते. त्यामुळे आता मी कोणतीही काव्यरुपी सेवा कशी देणार? कारण, माझे नेत्र आता पैलतीरावर विलीन होत आहेत.. शेवटचं हे काव्य लता दीदींनी तितक्याच आर्ततेने गाऊन भा.रां.ना कृतकृत्य केले आहे. व.पुं.नी लिहिलेले एक वाक्य या गीतकाराला अगदी चपखल बसते, " आयुष्य निव्वळ जगण्यासाठी नसतं तर त्याचा महोत्सव करायचा असतो.." हेच भा.रां.नी केले. भा.रा.तांबे आणि व.पु.काळे या दोघांमध्ये एक गोष्ट सारखी आहे, भा.रां.नी उत्तमोत्तम गाणी या महाराष्ट्राला दिली तर व.पुं.नी आयुष्य जगण्यासाठी विचारांची अविट भेट दिली. शेवट एवढेच लिहावेसे वाटते, " आयुष्याच्या रंगमंचावर वावरताना असे वावरावे की पडदा पडला तरी टाळ्यांचा कडकडाट सुरुच राहिला पाहिजे..."

वपु काळे .

😊
👍6👌4❤1
🙏😊
    मी निघालो सुखाच्या शोधात....

  वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं....

मला सोबत घेतल्याशिवाय तुला

सुखाचा पत्ता मिळणार नाही.

    💐💐🌹🌹शुभ रात्री 🌹🌹💐💐
👍8❤3
Forwarded from .........
जीवन जगत असताना सगळ्याच गोष्टी मनासारखे होत असतात असं नाही....काहीचा त्याग पण करावं लागतो मग ते आपले मनाविरुद्ध असेल तरी पण काही गोष्टी आपण ठरवत नसतोत त्या मागचं पण खुप मोठं कारण असतो..... नेहमी जे मनाला हवे असते ते कधीच मिळू शकते नाही... मग त्याला नशीब नाव दिलं जात💯💫 ✍️vaishu. K
👌8👍1
Forwarded from .........
#या सुंदर फुलांना पण माहीत नसतं..... उगवत असताना आपला उपयोग देवळातल्या मंदिरासाठी होणार आहे का कुठे होणार आहे तरी ही त्यानी सुगंध देणाचं आणि सुंदरता त्याची कधी सोडत नाहीत.... आणि आपण माणसे थोडंसं काही झालं तर संकट आल्यास आपण आपले काम ही करणं सोडून देऊ.... मनून प्रत्येक माणसामध्ये सुंदरता असते ती म्हणझे विचाराची सुंदरता तर... जसे फुल आपल्यास सुगंध देणाचं सोडत नाहीत तसेच आपण आपले काम कधी सोडायचं नसतं ते करत रहायचं असतं मग कोण काय बोलत कोण काय म्हणत याही पेक्षा मन काय म्हणत हे जास्त महत्वाचे आहे#🌸❤️✨___✍️vaishu. K
👌6👍5
Forwarded from ओम m शेळके
एकमन#लेखक
 
@Ommshelke
👍7👏1
पुरुष online असले तर अभिमानाची गोष्ट ..पण बायका online असल्या की आभाळ कोसळते..त्यांच्यावर jokes टाकले जातात..चर्चेचा विषय होतो...पण तरिही...

  स्त्री online राहते..

होय ती online राहते....
सर्वांशी connected राहायला
एकमेकांशी बोलायला
हितगुज करायला🤗
सुख दुःख जाणायला

होय ती online राहते ....
शुभेच्छासंदेश द्यायला
कोडकौतुक करायला 😘
चांगले विचार घ्यायला
कधी खळखळून हसायला 😂

होय ती online राहते...
विचारांना वाट द्यायला
पोस्टस् ला प्रतिसाद द्यायला
अनेकांशी संवाद साधायला
अनोळखींशी नाते जोडायला👫

होय ती online राहते...
भावना व्यक्त करायला
मनातील कल्ला थांबवायला

मनाप्रमाणे जगायला 💃

so never feel guilty for being online... 😌

dedicated to all ladies

🔥🔥  दृष्टीकोन 🔥🔥

☝ 1) एक स्त्री आपल्या विचारांना लाईक देते.....तर त्याचा अर्थ असा नाही. ..की ती तुम्हाला लाईक करते.👉.ती तुमच्या विचारांना सलाम करते...

☝ 2) एक  स्त्री  तुमच्या फोटोला लाईक करते तर....याचा अर्थ असा होत नाही. .की ती तुम्हाला लाईक करते...👉..ती तुमचं कौतुक करते......

☝ 3) एक स्त्री तुमच्याशी बोलते..चॅटींग करते...याचा अर्थ असा नाही होत...की तीला तुम्ही प्रिय आहात. ...👉..ती पण माणूस आहे. .स्रीपुरुष भेदभाव विसरून. .केवळ माणूस या नात्याने विचाराची देवाणघेवाण करते...

☝ 4) एक स्त्री तुमच्या बरोबरीने जेव्हा काम करते....तेव्हा तिला असं समजू नका...की तिला पुरूषांसोबत राहायला आवडत....👉...तिची मेहनत तेव्हढी आहे, की ती पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते...

🔥 जेव्हा आपली स्त्री विषयीची "मानसीकता" आणी "दृष्टीकोन" बदलेल....त्यावेळी ख-या अर्थाने. ..ती स्वतःला सुरक्षित समजेल...आणि मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला साथ देईल.
✊✊

प्रत्येक स्त्री चा आदर करा..

✨Forwarded Msg from kavi ✨
Credit goes to writer✍️✨
❤10👍8🔥3👌1
*सुख इकडं तिकडं शोधून कुठही मिळत नसतं..

आपण जे खरं जगणं*

*जगत असतो..त्यातच

माणसाचं सुख दडलेल असतं..!* 🤗🌿


*🙏🏻🌹 शुभ प्रभात🌹🙏🏻*
❤7👍3👌1
Forwarded from .........
#श्री स्वामी समर्थ केंद्र नांदेड🙇‍♀️🌸🙏....... शरीराला आजार झालास त्यासाठी hospital आहेच🏥.... पण मनाच्या शांती साठी देवच लागतो🥹🙌🙏......काही गोष्टी देवाला आणि आपल्यालाच माहीत असतात......जेव्हा माणूस आतून तुटतो या हरतो तेव्हा त्याच्या सोबत असणाऱ्या परमात्मा च्या शक्ती ची गरज असते ती शक्ती आपल्या नेहेमी सोबत असते फक्त निष्ठा आणि परमात्मा वार श्रद्धा असावी लागते...... तो सगळं ठीक करतो.... तो बगतो आपले कर्म आपला चांगुलपणा त्या देवाला सगळं कळते आपल्या मनातील भावना आपलं दुःख..... आपल्यापेक्षा त्यानी बनवेलेले plans खुप bettre असतात... Trust on god everything is bettre🙏🙏🌸..... श्री स्वामी समर्थ🌹🌹💐
👏6👍4
Forwarded from .........
# गुलाबाचं फुल खुप सुंदर असतं.... पण जपूनच धरावं लागतं कारण त्याला काटे असतात🌹.... असच आयुष्यात कोणती गोष्ट कितीही सुंदर आणि आपलीशी वाटत असेल ना..... लक्षात ठेवा प्रेत्येक सुंदर गोष्टीमाघे काटेच असतात.... त्यामुळे माणसे जोडत असताना नेहेमी विचार करून समजून जोडावीत.... गोड बोलणाऱ्या लोकापेक्षा..... आपली चूक काय आहे दाखवणारे लोक कधी पण चागंली असतात जरी ते कडू बोलतील पण ते सत्य असतील☝️🙏😊_✍️ vaishu. K
👌6👍2
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
#नको असलेली नाती विनत बसण्यापेक्षा त्याना मनातून उसवून मोकळं केलेले कधी ही चागले ज्याने या विनाकारण नात्यामुळे त्रास आपणास होईल😌____✍️vaishu. K
👍10👏1
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
# चांगल्या लोकांची परीक्षा घायचा प्रयत्न करू नवे,..... कारण ती पाऱ्यासारखी असतात..... तुम्ही जेव्हा दुखवता त्याना तेव्हा ती मोडत नाहीत पण.नंतर ती शांततेतेणे, हळुवार पणे तुमच्या सहवासातून कायमची निघून जातात☝️☝️☝️☝️☝️वास्तविकसत्य 💫✨
👍10
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
आजकाल लोक समाजमाध्यमावर जेवढी चागलं बनायचं प्रयत्न करताहेत तेवढीच चागंली त्याच्या खऱ्या आयुष्यात असतात का??..... जसे कि एक लेखक चे लिखाण फक्त स्त्रियांच्या आधार, सन्मान, त्याचं शिक्षण विषयी लिहतो पण तेवढाच तो स्त्रियांचा आदर त्याच्या आयुष्यात करत असतो का... जशी लोक आजकाल दिसतात ना तशी बिलकुल नाहीत..... जसे दिसतं तसे मुळीच नाही सध्या च्या युगात... आईवडिलांना सोडल्यास आपण कुणालाच चागल्याप्रकारे ओळखु शकत नाही हे त्रिकाल सत्य आहे☝️☝️☝️☝️☝️✍️✨
👌9❤4👍4
✨"सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक सण दसऱ्याचा.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा"✨
👍1
Forwarded from Kiran Ambure
""पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा,

                तुमच्या कर्तुत्वाला,
                 पुन्हा एक नवी दिशा..

नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत नव्या शुभेच्छा."


* सर्वांना  विजयादशमी/ दसऱ्याच्या                     हार्दिक शुभेच्छा....💞💞💞💞

स्वप्नपूर्ती फाउंडेशन
छत्रपती संभाजीनगर
👍3
Forwarded from 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐊
🙏1