Forwarded from ओम m शेळके
नात भावनिकरीत्या कितीही मजबूत असलं तरी त्याला गैरसमजुतीचा स्पर्श झाला की नाते तुटायला लागतं म्हणून कुठल्याही नात्यात गैरसमजाची शंका आली तरी एकमेकांसोबत बोलून लवकर clear करा कारण याचा त्रास दोघांना होतो मात्र त्यात एकाला गैरसमजुतीने का होईना कारण माहित असते पण दुसऱ्याला हे माहिती नसते की आपण चुकलो कुठे आणि आपला गुन्हा काय म्हणून एकदम त्या व्यक्तीशी बोलणं बंद करू नका त्याला तुमचा जो गैरसमज दूर करणयाची एक तरी संधी द्या नाही तर तो व्यक्ती आतून खूप दुखावतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍5❤2
Forwarded from ओम m शेळके
जीवन एक सुखकर प्रवास आहे त्यात कधी दुःखाचे घाट तर कधी सुखांची वाट थोड्या थोड्या अंतराने येत राहतं फक्त या रस्त्यात आपल्या संयम सुटुद्यायचा नसते लोकं काय नावं ठेवणारच आपण आपलं ध्येय उत्तम प्रकारे साध्य करायचं असतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍6👌2❤1
@natemanache
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.
*एक सुंदर कथा* ...
🐪
एका व्यापार्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली .
व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये बराचदा करार झाला आणि शेवटी त्या व्यापा्याने उंट विकत घेऊन घरी नेला !
घरी पोहोचल्यावर व्यापा्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..!
काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरा रत्नांनी परिपूर्ण आहेत ..!
सेवक ओरडला, "बॉस, तू एक उंट विकत घेतला, परंतु त्याबरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा!"
व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखी चमकत होते आणि चमकत होते.
व्यापारी म्हणाले:
"मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे!"
नोकर मनात विचार करत होता "माझा बॉस किती मूर्ख आहे ...!"
तो म्हणाला:
"मालक कोण आहे हे कुणालाही कळणार नाही!" तथापि, व्यापार्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली.
उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, "मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान दगड काजवेखाली लपवले होते!
आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!
व्यापारी म्हणाला,
"मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही!"
जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता!
शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला:
खरं तर मी बॅग परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते.
या कबुलीजबाबा नंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने पटकन बॅग रिकामी केली आणि त्याचे हिरे मोजले !
पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जशाला तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या ?
व्यापारी म्हणाले: ...
*"माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान."*
विक्रेता मूक होता!
यापैकी 2 हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे.
*ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, स्वाभिमान अन प्रामाणिकपणा आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.*
निवांत क्षणी...
🌾🌾

👌12👍5❤1
*कवितेचे नाव :- तू मात्र धीर सोडू नकोस*
बारा महिने होऊन गेलेत व्यवहार सारे ठप्प झालेत .
साठवलेले चार पैसे कधीच सारे फस्त झालेत .
मांडणीच्या वरच्या कप्प्यातले धान्यांचे डब्बे रिते झालेत .
आता मोजून मापून तेलाची फोडणी भाजीला द्यावी लागतेय .
सध्या या साऱ्या परिस्थितीत सामान्य माणूस जगत आहे .
पण तु सुरक्षित तर आहेस ना ? मग सैरभैर होऊ नकोस
हे ही दिवस जातील तू मात्र धीर सोडू नकोस .......
काळ वाईट आहे पण आपल्या नकळत जगणं शिकवून जातोय .
अन्न वस्त्र निवारा यांचं महत्व पटवून देतोय .
लाखों रुपयांत न होणारी लग्न काही हजारांत होत आहेत .
कित्येक मुलींच्या बापाच्या खांद्याचे भार हलके होत आहेत .
बाहेर खेळायला जाण्याचा हट्ट मुलांनी कधीच सोडून दिलाय .
गजबजलेल्या रस्त्यांचा आवाज
भयाण शांततेने वेढून गेलाय .
वाहवत चाललेल्या माणसाला एका विश्रांतीची गरज होतीच
ती मिळाली पण , तू मात्र हताश होऊ नकोस
हे ही दिवस जातील . तू मात्र धीर सोडू नकोस ........
सर्वात जास्त हाल हातावर पोट असणाऱ्यांचे झालेत ,
दिवसभर राबून संध्याकाळी तेल मीठ आणणाऱ्यांचे झालेत .
व्यापारी वर्ग सद्य परिस्थितीत पुरता कोलमडून पडला आहे .
कमाई शून्य पण मागणाऱ्यांचा त्याच्या डोक्यावर बडगा आहे .
मध्यमवर्गीय माणूस आपलं उघडपण दाखवायला घाबरतोय .
लोक काय म्हणतील ??? या विचाराने अजूनही बावरतोय .
सगळीच माणसं चार भिंतीत मनाविरुद्ध कोंडून बसलीत ,
हा शरीराचा कोंडमारा मनावर जड होऊ देऊ नकोस .
हे ही दिवस जातील तू मात्र धीर सोडू नकोस ....
*सर्वांना नक्की पाठवा,आणि प्रत्येकांचं मनोबल वाढवा..
* *आपलाच मित्र *

👍12❤1
Forwarded from 🌷M.S.Aher🌷 💖💝💖
🌹🌹🌹🌹
*ज्ञानाचे भांडार*
=====
मम्मी म्हणा मदर म्हणा
*आई* शब्दात *जीव* आहे ....
पिता म्हणा पप्पा म्हणा,
*बाबा* शब्दात *जाणीव* आहे
सिस्टर म्हणा दीदी म्हणा
*ताई* शब्दात *मान* आहे ....
ब्रदर म्हणा भाई म्हणा
*दादा* शब्दात *वचक* आहे....
फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा
*मित्र* शब्दात *शान* आहे ....
रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा
*नातं* शब्दात *गोडवा* आहे
हाय म्हणा हॅलो म्हणा,
*हात* जोडणे *संस्कार* आहे
सर म्हणा मॅडम म्हणा
*गुरु* शब्दात *अर्थ* आहे
ग्रँड पा ग्रँड मा शब्दात
काही मजा नाही
*आजोबा आणि आजी*
सारखे सुंदर *नाते* जगात नाही..
गोष्टी सर्व सारख्या
पण *फरक* फार *अनमोल* आहे
*अ ते ज्ञ शब्दात ज्ञानाचे भांडार आहे*...
🌹🌹🌹

👌10👍4
💝 *पैसे किती कमवावे❓*
आणि ते
*कोणासाठी❓*💝
*वन बेडरुम फ्लँट*
माझ्या वडिलांचे स्वप्न हाेते की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन अमेरीकेतील बहुराष्ट्रिय कंपनीत नाेकरीला लागावे. जेव्हा मी अमेरीकेत आलाे तेव्हा हे स्वप्न जवळपास पुर्ण हाेत आले हाेते.
आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पाेहचलाे हाेताे. मी असे ठरवले हाेते की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल की, जेणे करुन भारतात गेलाे कि पुण्यासारख्या शहरात सेटल हाेईल.
माझे वडिल सरकारी नाेकरीत हाेते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लँट, अन तुटपुंजी पेंशन.
परंतु मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे हाेते.
घरची, आई-बाबाची खुप आठवण यायची. एकट वाटु लागायच. स्वस्तातल एक फाेन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना काँल करत हाेताे. दिवस वार्यासारखे उडत हाेते. दाेन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली. अजुन दाेन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.
लग्नासाठी राेज नवनवीन स्थळ येत हाेती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय मी घेतला. आईवडिलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झाल पाहिजे. स्वस्तातले तिकीट पाहुन मि १० दिवसांची सुट्टी घेतली. मी खुश हाेताे, आईबाबांना भेटणार हाेताे. नातेवाईक व मित्रांसाठी खुप सार्या भेटवस्तु घ्यायच्या हाेत्या. त्याही राहुन गेल्या.
घरी पाेहचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फाेटाे मी पाहिले वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडिल समजुतदार हाेते. दाेन दिवसात माझे लग्न लागले. खुप सारे मित्र येतील अस वाटत असताना फक्त बाेटावर माेजता येतील असे मित्र लग्नाला आलेले. लग्नानंतर आईबाबांना काही पैसे हातावर टेकवले.
"आम्हाला तुझे पैसे नकाे पाेरा पण वरचेवर भेटायला येत जा " अस बाबा सांगताना त्यांचा आवाज खाेल गेला हाेता. बाबा आता थकले हाेते, चेहर्यावरच्या सुरुकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करूण देत हाेत्या. शेजार्यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पाेहचलाे.
पहिले दाेन वर्ष बायकाेला हा देश खुप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नँशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत हाेत. बचत कमी हाेऊ लागली पण ती खुश हाेती. हळुहळु तीला एकाकी वाटु लागल. कधीकधी ती आठवड्यातुन दाेनदा किंवा तिनदा भारतात फाेन करु लागली. दाेन वर्षानी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी.
मी जेव्हा जेव्हा आईबाबांना काँल करायचाे तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे हाेते.
दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचाे. पण पैशांच गणित काही जुळायच नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा.
वर्षामागन वर्ष सरत हाेती, भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले हाेते. एक दिवस अचानक आँफीस मधे असताना भारतातन काँल आला,
*"माेहन बाबां सकाळीच गेले रे".*
खुप प्रयत्न केला पण सुट्टि काही भेटली नाही, अग्निला तर साेडा पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही. मन उदविग्न झालेल. दहा दिवसात दुसरा काँल आला, *आईची पण प्राणज्याेत मालवली हाेती.*
साेसायटितील लाेकांनी विधी केले, नातवंडाचे ताेंड न पाहताच आई वडिल ह्या जगातुन निघुन गेले हाेते.
अाईबाबा जाऊन दाेन वर्ष सरली. ते गेल्यानंतर एक पाेकळी तयार झालेली,
आईबापाची शेवटची ईच्छा, ईच्छाच राहिलेली.
मुलांचा विराेध असताना भारतात येऊन स्तिरस्थावर हाेण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात हाेती. राहण्यासाठी घर शाेधत हाेताे पण आता पैसे कमी पडत हाेते नवीन घर ही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत अालाे. मुले भारतात राहयला तयार नसल्याने त्याना पण घेऊन आलाे.
मुले माेठी झाली, मुलीने अमेरिकी मुलासाेबत लग्न केल. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहताे. मी ठरविले हाेते आता पुरे झाले, गाशा गुंडाळुन मि भारतात आलाे. चांगल्या साेसायटित
*' दाेन बेडरुमचा' फ्लँट* घेण्यापुरते पैसे माझ्याकडे हाेते. फ्लॅटही घेतला.
आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या 'दाेन बेडरुमच्या' फ्लँटमधे आता मि फक्त एकटाच राहताे. उरलेल आयुष्य जिच्यासाेबत आनंदात घालवायच ठरवलेल तिन इथेच जिव साेडला.
कधीकधी मल वाटते हा सर्व खटाटाेप केला ताे कशासाठी❓ याचे माेल ते काय❓
माझे वडील भारतात राहत हाेते तेव्हा त्याच्या नावावरही एक फ्लॅट हाेता.
माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही.
केवळ एक बेडरुम जास्त आहे.
* त्या एका बेडरुमसाठी मी माझे*
*आईवडिल गमावले,*
*मुलांना साेडुन आलाे,*
*बायकाेपण गेली.*
खिडकितुन बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते, त्या सुंदर आठवणी मनात फेर धरु लागतात.
अधुन मधुन मुलांचा अमेरिकतन फाेन येताे ते माझ्या तब्येतीची चाैकशी करतात, अजुनही त्यांना माझी अाठवण येते यातच समाधान आहे.

👍10🎉1
आता जेव्हा माझा मृत्यु हाेईल तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांच भल कराे.
पुन्हा प्रश्न कायम अाहे.
हे सर्व कशासाठी❓
अन काय किंमत माेजुन❓
मी अजुनही उत्तर शाेधताेय.
फक्त एका बेडरुम साठी❓
जगण्याचे माेल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे.
त्यासाठी आयुष्य पणाला लाऊ नका, आनंदाचे क्षण जगा.

😢13👍5👌4
*याच्यासाठी त्याच्यासाठी . नुसताच पळत होता ,*
*ते गेले घरी निघून , हा एकटाच जळत होता ......*
जिवनाचा खरा अर्थ कळायचा असेल तर स्मशानात चक्कर मारली पाहीजे,,,
कारण स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....
हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..
जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते.
जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात 100 एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घाटावर, अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरा समोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्या साठी झगडला, त्यातील एक गोष्ट सुध्दा बरोबर नव्हती.
जळताना - ना प्रेम करणारे जिवलग, ना नातेवाईक, ना सगे सोयरे, ना करोडोची संपत्ती.
अरे अरे....
तरीही तो आयुष्यभर खोट्या गोष्टीचा मोह धरून पळत राहिला.... ही खंत तर नसेल वाटत त्या जळणा-या प्रेताला...?
समाज बंधुंनो....!
आत्मप्रौढी, स्वतःचा मोठेपणा, दुस-याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती, गर्वाची भाषा, अहंपणाचा महामेरू ही जीवनातील -हासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही
चला.... जीवन सुंदर बनविण्यासाठी काम- क्रोध-लोभ- मत्सररूपी लक्षणांना दूर ठेऊन जीवनात किती ही मोठेपद, प्रतिष्ठा, यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेऊ या....
प्रेमळ-आनंदी-सर्वांचा आदर-आधार......म्हणून माणूस बनू या....!
Credit Goes to writer ✨

👍8👌4
Forwarded from @v. Khandre
आपण आजकालच्या पिढी बद्धल प्रेमाचे काय विचार आहेत हे जाणून घेऊ... आणि हे तुमच्या आयुष्यात अनुभवले असतील तुम्ही नकीच time काढून वाचावं🙏🙏🙏.... आज काल मुलांचे मुलींविषयी असणार प्रेम हे एक attraction वर depend झाले आहे..... मग तो eye contact असो या...... Insta, teligram, Twitter, snapchat वर झालेले असो....... थोडा वेळ कोणाच्या आयुष्यात आलो म्हणझे तो right च person असू शकतो असं नाहीये... कधी आपण चुकीचं पण असू शकतो ..... जास्त करून आता तर..... जेवढी त्या व्यक्ती ची गरज आहे तो परेंत तो व्यक्ती..... आपल्यला आवडेल तसे बोलायला सुरुवात करतो आणि बोलत जात असतो..... तेव्हा आपल्यला जाणीव होते..... हा तर माझ्यासाठी बनेलेला आहे...... तेव्हा feel पण व्हयला लागतं...... पण कोणच्या बोलणावरून एवढं मोठा decision घेणाचं टाळावं.... तो decision पुढे जाऊन त्रास तर नाही देणार न...... आजकाल अशी च वागतात... लोक त्याचं काम झाल्यास आपला विचार न करता.... सोडून पण जातात..... Bettre भेटल्यास त्याना..... प्रेम करताना नेहेमी खुप विचार , चोकशी करून करावं....... त्या प्रेमासाठी आपण आपली study, आपले frds आपले आईबाबा, नातेवाईक सगळांना विसरून त्याना time देत असतो...... आपल्यला नेहेमी वाटते तो right आहे आणि मी त्याच्यासोबत खुश असेल...... आयुष्यातल्या सगळ्या आनंद सोडून आपण एकाव्यक्ती च्या माघे असतोत...... ज्यांनी आपल्यला कधी प्रेमच केलेले नसतं..... मनून result आपल्यला दुःख च भेटणार आहेत....... प्रेम करा हो.... स्वतःशी, फिरावं, हसावं,... जे आवडेल ते करावं फक्त आरश्यातल्या दिसणाऱ्या व्यक्तीसाठी.... तो नेहेमी आपल्या सोबत असणार आहे शेवटपरेंत...... Time द्या तुमचे स्वप्न पूर्ण करणासाठी..... आणि मनबहरून जगण्यासाठी...... आयुष्यात खुप नाती आहेत..... प्रेमास सोडून ज्यांचे किंमत अमूल्य आहे..... नेहेमी अश्या fake love पासून दूर रहा आणि नेहेमी आनंदी रहा😊😊😊🙏🙏................ ✍️@vaishu. Khandre
👍9👌5🔥1