नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
स्वप्नातील वाट
                           स्वप्नात पाहिली चांदणी रात्र
अस्पष्ट ती एक वाट
अवघड चालता चालता
पारिजातकाच्या सुंगधासवे झाली पहाट
                                स्वप्नातील ती रम्य पहाट
दवबिंदूची ओलसर वाट
धुके पसरलेले दाट
जागली ती रहाट

स्वप्नातील ती रहाट
किलबिल पक्षी गातात
गायी-वासरांचे हंबरणे
टपटप टापांसवे रानी निघतात

स्वप्नातल्या त्या रानात
मंजुळ कोकिळ गाते
झरे,ओढे,नदीची खळखळ
मन मोहून जाते

मन स्वप्नातील संध्याकाळी
उदास उदास होते
पण,सुंदर सुर्यास्त पाहून
सुंदर वास्तव्यात जागे होते.

श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
❤4👍1
✨ Join : @natemanache ✨

कानाखाली कोणतरी ओराची चपराक मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यंत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल.
माणूस इतका बदलतो का 2. आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणाया या माउलीची त्याला क्षणभरही आठवण. यते नसेल का ?. आणि येत असेल तर ही जबाबदारी त्याने का झटकावी १. संगळच अनुत्तरीत होतं. माझा चेहरा खाली . घालून मी आता विचार करीत होतो. इतकथाल माझ्या पाठिवर तोच थरथरता हात फिरला. मी वरती पाहिल तर
- तिच बोई मला म्हणाली, ' इतका विचार करू नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हंजे झोळ!'
मगतर मेल्याहून मेल्यासारख झालं. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो कारण एका क्षणात माझं पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आईच वडीलांच घोडस दुःखसुदधा कधीच जागला येत नाही.
● जिवनाच्या सचोटीत एवढ शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हेट
सेटलमेंट, न्यूजॉब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठं हरवून बसतो आम्हाला कळत नाही. उोक जउ झालं. मी उठलो आणि चालू लागली.
शेजारच्या जिल्हापरिषेदयेच्या शाळेत मास्तर मूत्नांना विचारत होते. 'आपण काय शिकल्लो' २.
मी मनाशीच उत्तर दिलं,

' आयुष्यात इंजिनिभर 'आयुष्यात नाही होता आलं तरी चालेलं पण चांगला, जबाबदार माणूस जरूर व्हायचं.'
👍5❤1
"आयुष्यं" म्हणजे असतो एक प्रवास जो सुरु होतो
आपल्या जन्मापासुन अन कदाचित मरणानंतरही
संपत नाही. 
अनेक उन्हाळे पावसाळे पहायला
मिळतात या प्रवासात. काही सुखाचे क्षण
अनुभवायला मिळतात, तर काही कायमचा धडा
शिकवुन जातात काही स्वप्ने नकळतपणे पाहिली
जातात, तर काही जाणुन बुजुन पण अनेकदा
त्यातली काही स्वप्ने अर्धवटच राहुन जातात. 
अशा ह्या प्रवासाच्या पुस्तकात काही पाने नकळत
जोडली जातात तर काही कोरीच राहुन जातात...
आणि मग शेवटी ह्या कोऱ्या कागदांचे तयार होते
एक वेगळेच पुस्तक ज्याला आपण नाव देतो
  "माझे आयुष्य"

Credit goes to Writer 🌼🙏
❤5
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"संस्कार" हे रक्तातच असावे लागतात.कर्तृत्वाने कितीही मोठी उंची गाठली तरीही जर त्याला संस्काराची साथ नसेल तर कर्तृत्व कितीही मोठे असलेतरी ते शोभून दिसत नाही..देशप्रेम🇮🇳आणि आईच्या आशीर्वादापेक्षा काहीही मोठे नाही❤️ काळाच्या ओघात आपण अनेक संस्कार शिकतो परंतु एका विशाल उंचीवर गेल्यास तेच संस्कार खऱ्या आयुष्यात उतरवण्यासाठी आपण किती झुकतो ह्यावरुनच आपली खरी उंची आणि मनाचा मोठेपणा दिसून येतो..❤️
..........🦋🌺😇💞...........
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
👍4👌4❤1
@natemanache

भरारी साठी सोधाव रोज नवीन आकाश..
कर्तव्य साठी तोडावे भावनांचे फास...
किती ही दुःख असल तरी चेहऱ्यावर असावे हास्य तरंग...
किती ही संकटे आली तरी धैर्य राहो आपल...
खूप दिवसा पासून वाटतयं असं एकदा तरी जगून पहावं...
अपयशाला रोज हिंवत यशाला जिंकत जाव...

🌻Good morning ☀️🌞
👌4
Forwarded from G.K
कभी किसी की हमदर्दी ना लिजीएगा लोग बादमे एहसान जताते है।
कभी किसी से तोहफा ना लिजीएगा लोग कहकर बताते है।।
💯💯
👌5👍1
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना

सखे तुझ हसणं
तुझ बोलणं
तुझं चिडणं
तुझं ते रागावणं
तुझं ते रुसण
तुझ ते शांत बसणं
मला पसंत आहे

कस काय सांगू
शब्दात सखे तुला की

तुझी प्रत्येक अदा मला
सखे पसंत आहे
🥰🫂😘🫂🥰

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍5🥰1
Forwarded from Pratik Pawar
संस्कार आणि विचार खूप महत्त्वाचे असतात,
फक्त शिक्षण घेऊन चांगला माणूस बनता येत नाही!
👍8👌1
Forwarded from Pratik Pawar
कोऱ्या कागदावर लिहावं की मनातच ठेवावं त्या एका चेहऱ्याला मी कितिदा पहावं ..

आठवणींत जगावं' की स्वप्नांत बघावं.. देवाकडे तुला मी कितादा मागावं ..
👌8❤2👍1
भावनेशी खेळ झाला की व्यक्ती एकांत पसंत करतो...

@natemanache
👍2😢2
@natemanache

*वपुंची विचारपुष्पे*🌷🌷
-------------------

वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात
त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्व मित्रांसाठी  समर्पित.....

१) सर्वात जवळची माणसे
सर्वात जास्त दुःख देतात

२) सर्वात जीवघेणा क्षण कोणता?
खूप सदभावनेने  एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच  यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी.

३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो.

४) प्रेम म्हणजे काय?
दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे.

५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो

६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो.

७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते.

८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा.

९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही.

१०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे.

११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त "बापच" विकत घेऊ शकतो

१२) खर्च केल्याचे दुःख नसते
हिशोब लागला नाही की त्रास होतो

१३) सर्वात जवळ असणाऱ्या माणसाने धोका दिल्याशिवाय जाग येत नाही.

१४) नातवंडं झाल्यावर म्हाताऱ्याचा विरोध बोथट होतो म्हणतात.

१५) माणसाने समोर बघायचे का मागे
यावरच पुष्कळसं सुख दुःख अवलंबून असते.

१६) मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं
एका वेळेला एकच साधता येते
स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचा मन

१७) लोक खरं  मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात

१८) आपल्याला वाटतं तितकं आपण स्वतंत्र नसतो

१९) समजूत घालायला कोणी नसले की स्वतःलाच बळ आणावं लागतं .

२०) अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो. नाही का?

२१) जो गेल्यानंतरच कळतो त्याला "तोल" म्हणतात.

✍🏻 वसंत पुरुषोत्तम काळे.
👌9👍8👏1
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
*🔸आठवण आईची🔸*

*तिन्ही सांज झाली. देवापुढे दिवा लावायला उठले, आणि नेहमी प्रमाणे समईच्या प्रकाशात आईचा चेहरा देवीच्या जागी दिसला. रोज संध्याकाळी देवा पुढे दिवा लावून माझी वाट पहात बसायची.*

*नेहमी म्हणायची, माझे हे वाट पाहणे कधी संपणार काय माहीत.*

*उशीर झाल्यावर आपली पण वाट पाहणारे कोणीतरी असते, याची किंमत मला मी 'आई' झाल्यावर कळली. आज का कोण जाणे... आईची खूप आठवण आली दिवा लावताना...*

*ये ग जरा वेळ काढून. अधूनमधून यावं मुली ने माहेर पणाला. मी गेल्यावर किंमत कळेल बघ माहेरपणाची. असे नेहमी म्हणायची. कसे तरीच वाटायचे मनाला. आज आई नाही, तिची मायेची हाक नाही. आज माझ्या 'सासरी' गेलेल्या मुलीची वाट पाहताना जाणवते... माझ्या आईचे लेकीच्या भेटीसाठी तळमळणारे हृदय.*

*तीच आठवली दिवेलगणी ला. तिचे चेहऱ्यावरचे करुण पण स्निग्ध भाव. तेच भाव अजूनही एखाद्या मोरपिसासारखे मनाच्या कप्प्यात जपून ठेवले आहेत मी. माझी देवावर श्रद्धा होती... पण आई इतकी नव्हती. कधीतरी असे घडले की, मी मनापासून देवापुढे हात जोडले माझ्या मुलींसाठी.*

*मग कळले आई होणे म्हणजे काय असते.. आपसूकच तिन्हीसांजेला दिवा लावू लागले न विसरता. पण आजही दिवा लावताना आठवते माझे माहेर.*

*आईचे मनाचे श्लोक, तिची कारुण्याने भरलेल्या स्वरातली करुणाष्टके, त्यातच मिसळलेला कुकर च्या शिट्टीचा आवाज , उदबत्ती च्या घमघामाटा बरोबरच आंबेमोहोर तांदळाचा भात आणि हळद हिंग घालून शिजवलेल्या वरणाचा तोंडाला पाणी सुटणारा वास, गरम गरम पोळ्या आणि टॉमेटो च्या कोशिंबीरी चा थाट.*

*तिन्ही सांज म्हणजे डोक्यात पक्का बसलेला हा त्रिवेणी संगम. माझी साधी सोपी 'माहेरा' ची व्याख्या.*

*खरंच माहेरवाशिणी ... जर माझे मनोगत वाचत असतील, तर नक्की भेटून या आपल्या आईला. एखादा फोन तरी कराच. आई मला म्हणायची तू पक्की आई झालीयस. मुलींशिवाय दुसरे काही तुला सुचतच नाही.*

*मुलीची आई होणं सोपं नाही ग बाई!! आधी तिची मैत्रीण हो... मग तुझी लेक तुझं 'आईपण' सहज स्वीकारेल.*

*हो आई ... मी प्रयत्न करतेय. पण अजूनही दिवा लावताना देवी च्या जागी तूच दिसतेस. ज्या दिवशी माझ्या मुलींना 'देवीच्या' जागी 'मी' दिसेन ना आई.... त्या दिवशी मी समजेन की, मीही तुझ्यासारखे मातृत्व निभावले.*

*लेखक: अज्ञात...🙏*
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
👍7❤1
*....बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?🤔😊😊😊👌👌👍👍

भारतातल्या घराघरात जे सकाळ-दुपार-संध्याकाळ, सोमवार ते रविवार, रोज-रोज, वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी - भाजी - वरण - भात - कोशिंबीर - चटणी - उसळ वगैरे वगैरे, आणि लाडू - चिवडे - मिठाया - पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केला आहे का?



- फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती? तेल तापले ते कसं ओळखायचं?

- गॅस किती मोठा, किती लहान, केव्हा कमी - जास्त करायचा, पदार्थ उलथन्याने किती हलवायचा, उलथनं की डाव, का झारा? कढई का पातेलं?

- पदार्थ शिजला हे कसं ओळखायचं?
- एका वेळी ४ पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं?

- ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन कसं करायचं?
- प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकटं, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा?

- दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत बाजूला चार भांडी घासणे, एखादी भाजी चिरणे, एखादी यादी करणे, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमाने उठवणे (किंवा गदागदा हलवून येणे) हा वेळेचा हिशोब कसा करायचा?

- मीठ, तिखट, साखर किती घालायचं?
- पोळी/चपाती/फुलका/पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार, आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार आणि जाडी याची सांगड कशी घालायची?
- उरलेल्या अन्नाचं काय करायचं?

- वातावरण/ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा?

किती गोष्टी असतात स्वयंपाक म्हटलं की?

मग लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन ही शिकायला लागणार आहे

बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे involvement. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो, स्वयंपाकघर चालत नसतं.

गणित आणि विज्ञान या माणसाने शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुषार म्हणणारी आपण माणसं, प्रसंगी पूर्ण अशिक्षित असुन स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकाच्या हुशारीला आपण दाद कितीवेळा देतो?

निसर्गाने दिलेली अंगभूत हुषारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते पण आपण डिग्री, मार्क, इंग्लिश येणे असली मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो.

एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःला जाणीव करून द्यावी.

किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड complicated गोष्टींकडे बघावं, दिवसात किमान तीन वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं.

खाण्यापूर्वी, दिवसातुन एकदा तरी निसर्गाने आपल्या घराला सढळहस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत.

👍🙏

#Copied
Credit goes to writer ✨
👍7👏2
*🌹श्री स्वामी समर्थ 🌹*
*मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ असेल तर,*
*फसवणारा जरी कोणी असला,*
*तरी वाचवणारा आपल्या पाठीशी नेहमी उभा राहतो !!!*

🌹🌹🌹🌹🌻🌻🌹🌹🌹🌹
*🙏🏻🌹 शुभ प्रभात🌹🙏🏻*
👌9👍3
Forwarded from B K
थोडशी सत्यपरस्थिती बदल सांगणाऱ्या चार ओळी आपण वाचू शकता का?
काहीतरी फरक नक्की स्पष्ट दिसतोच की,जेव्हा एखाद्या मुलीला मदत हवी असते तेव्हा कधीच मदत न करणारे सुद्धा तिला मदत करण्याचा प्रयत्न करतात चांगलच आहे..पण त्याचठिकाणी जर एखादा मुलगा मदतची अपेक्षा करत असेल तर तकोणी ढुंकूनही पाहत नाही..थोडं कटू आहे पण खरं आहे..* 🥹
एखाद्या मुलीने सोशल मीडियावर एखादी साधी जरी पोस्ट शेअर केली तरी तिला खूप लाइक्स मिळतात,पण त्याचठिकाणी मुलाने किंवा पुरुषाने शेअर केलेली पोस्टही कोणी पाहत नाही..मुलगी जेव्हा दुःखात असते,तर तिला खूप लवकर प्रतिक्रिया मिळते परंतु एखादा मुलगा/पुरुष जेव्हा दु:खी पोस्ट टाकतो तेव्हा त्याला कोणी साध कोणी विचारतही नाही,काय झालं म्हणून,काही लोकं ह्या सर्व बाबतीत अपवाद असतील,त्या लोकांचे आभार..
(कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏)
....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍7
Forwarded from Vinayak Bhise
अब तो यही
दर ख्वाहिश है

उस रब से की

तुम्हारी याद
आने से पहले तुम्हारा
दिदार हो जाये

✍🏼विनायक भिसे , बारामती
Mo. 7798150143
👍3
*तुम्हाला वाटतं तुमच्या योजना फसल्या?*

सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर अवकाशात फक्त 8 दिवस राहणार होते.

पण त्याऐवजी, ते तिथे तब्बल 286 दिवस अडकले होते!

ते अक्षरशः अवकाशात अडकले होते.

*कल्पना करा:*

👉🏾 तुम्ही एका छोट्या सहलीसाठी पॅकिंग करता, पण जवळजवळ एका वर्षासाठी घरापासून लांब राहता.

👉🏾 ताजी हवा नाही. खरी खुरी घरगुती जेवणं नाहीत. बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नाही—फक्त रिकाम्या अवकाशात थांबून राहायचं.

👉🏾 आणि कधी (किंवा खरंच) घरी परतता येईल का, याचीही खात्री नाही.

... आणि आपण इथे असतो,

10 मिनिटं ट्रॅफिकमध्ये अडकलो तरी चिडचिड करतो.

एका व्यवहाराला काही महिने उशीर झाला तरी संयम सुटतो.

एका नकारपत्रामुळे सगळं सोडून द्यावंसं वाटतं.

*दृष्टीकोन बदला.*

या अंतराळवीरांकडे पर्यायच नव्हता.

ते तिथून सुटण्यासाठी कोणतीही फ्लाइट बुक करू शकत नव्हते.
त्यांना स्थिती स्वीकारून, शांत राहून, आणि संयमाने वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.

286 दिवसांचा अनिश्चिततेचा कालावधी.

... आणि त्यांनी तो यशस्वीपणे पार केला!

जर हे अंतराळवीर 8 दिवसांच्या ट्रिपवर जाऊन 9 महिने अवकाशात टिकू शकतात,
तर तुम्ही आणि मी आयुष्यातले काही छोटे अडथळे, विलंब, आणि संघर्ष सहज झेलू शकतो!

*या गोष्टीतून काय शिकायला मिळतं?*

✅ संयम ठेवा: तुमच्या नियोजनानुसार सगळं घडेलच असं नाही. पण संयम ठेवा, मार्ग सापडेल.

✅ स्थिती स्वीकारा: काही वेळा परिस्थिती आपल्या हातात नसते, पण आपली प्रतिक्रिया आपल्या हातात असते.

✅ तणावाने काहीही सुटणार नाही: शांत राहा आणि पुढे काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा.

✅ लक्ष्यावर भर द्या: छोटे विलंब आले तरी अंतिम उद्दिष्ट नजरेसमोर ठेवा.

✅ जिंकायचं ठरवा: परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून मार्ग काढायचाच, असं ठरवा.

*शेवटी:*

जीवनात अनेकवेळा तुमच्या योजना कोलमडतील.

गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतील.

पण सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर 286 दिवस अवकाशात टिकले,
तर तुम्हीही तुमच्या अडचणींवर मात करू शकता!

मनःस्थिती बदला. धीर ठेवा. आणि पुढे चला. 🚀
👍19