नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
माणसाला माहित नाही की खाली एक साप आहे. महिलेला माहित नाही की एक मोठा दगड त्या माणसाला चिरडत आहे.

महिला विचार करते: "मी खाली पडणार आहे! आणि मी वर चढू शकत नाही कारण साप मला चावणार आहे! माणसाने थोडी अधिक ताकद लावून मला वर ओढायला हवे!"

माणूस विचार करतो: "मी प्रचंड वेदनेत आहे! तरीही मी तुला शक्य तितके वर ओढत आहे! तू थोडे अधिक प्रयत्न का करत नाहीस?"

आपल्याला दुसऱ्या व्यक्तीच्या संघर्षाची जाणीव नसते, आणि त्यांना आपली व्यथा समजत नाही. हेच आयुष्य आहे—काम असो, कुटुंब असो, भावना असोत किंवा नाती असोत, आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. विचार करण्याची पद्धत बदलली, स्पष्ट संवाद साधला आणि थोडा संयम ठेवला, तर कोणतीही परिस्थिती सोपी होऊ शकते.

आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, दुसऱ्याच्या परिस्थितीचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

कधीकधी आपण दुसऱ्याला दोष देतो, पण त्यांच्या जागी जाऊन पाहिले तर त्यांच्यावर किती ताण आहे हे समजेल.

संवाद आणि समजूतदारपणा यामुळे कोणतेही नाते अधिक मजबूत होते.

आपण भेटणारा प्रत्येक माणूस एक अदृश्य संघर्ष लढत असतो.त्यामुळे, दयेने वागा,समजून घ्या आणि शक्य असेल तिथे मदतीचा हात दय
👌11❤2👍1
एक गोष्ट नेहमी *व्याजासकट परत* करायची असते ती म्हणजे एखाद्याने *आपल्याला* दिलेला *आनंद*... 💯✅😊


*🙏🏻🌹 शुभ प्रभात🌹🙏🏻*
👍9
Forwarded from ओम sm शेळके
अपूर्ण शरीर असलेल्या माणसाने पूर्ण प्रेमात पडू नये कारण हल्ली प्रेम करणं एक स्पर्धा झाली आहे त्यात मनाला काडी मात्र किंमत उरलेली नाही फक्त या स्पर्धेत गरज असते माणसांमध्ये आपलेपणा विसरून मीपणा निर्माण करण्याऱ्या धनाची आणि कालांतराने नष्ट होणाऱ्या तनाची मी म्हणत नाही की ह्या गोष्टी नसल्याने प्रेम करूच नका म्हणून आवडत्या व्यक्तीवर जीवापार एकतर्फी प्रेम करा पण याचा त्रास स्वतःला सोडून दुसऱ्याला होता कामानाही राव बाकी प्रेम हे प्रेमचं असतं मात्र सर्वानसाठी ते सेम नसतं!,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍2🔥2
खूप छान लेख आहे अवश्य वाचा

😍 🙏🙏 *खरच*🙏🙏

त्या दिवशी रात्री मी *स्वैपाक* करताना *माझा*
*छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात* होता*.
मी *छोटासा फुलका* लाटून तव्यावर टाकला
आणि एकदा परतुन भाजून घेतला.
*तोवर दुसरा लाटून तयार होताच*.
एका हातात पकड घेऊन तवा उचलला
आणि *फुलका चिमट्याने त्यावर धरला*,
*लगेच तो फुगून आला*.
मुलगा आश्चर्याने म्हणाला
*"झाला पण फुलका?*
*ईतका सोप्पा* ??"
😃
मी म्हणाले
"हो, *कठीण नसतोच मुळी फुलका*.
खर तर *सगळा स्वैपाकच मुळी*
*सोप्पा असतो* . *कठिण* असतं ते...
*तो रोज रोज करणे*, ^दिवसातून^
*अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे*,
*आपल्या मूड चा, मनःस्थिती चा* ,
*आजारपणाचा, दुखण्याचा* *कशाकशाचा*
विचार न करता *अचूक आपली*
*भूमिका निभावत भयंकर*
**उकाड्यात* देखील *शेगडी* जवळ
*न कंटाळता लढत देणे* .

सगळे संपले असे वाटत असतानाच
*ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून*
*चार पोळ्या जास्त कराव्या लागणे* ,
स्वैपाक घर *आवरून ठेवल्यावर*
'संपली एकदाची *दगदग आतापुरती'*
असे *वाटत असतानाच*... बैठकीतून '
*'आज जेवूनच जा' चा पुरुष मंडळींनी*
*पाहुण्यांना केलेला *आग्रह*
*हसून* साजरा करणे आणि *तडक*
*बिनपगारी overtime* करणे

आणि हे करीत असताना *प्रत्येकाची भाजी*,
*तिखट, चटणी* ची ^वेगळी आवड^
आणि ^तर्‍हा^ समजून *त्यानुसार*
*जास्तीत जास्त मने सांभाळत* खपणे

बरे *एवढे करून भागेल*
तर *कसले स्वैपाकघर?*
म्हणुन सगळा *जिव निघून गेल्यावरही*
*ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून*
पुन्हा *लख्ख करून* ठेवणे,

ईतक्या मेहनतीला *साधा कुणी*
*thank you चा उच्चार ही न करता*
साधी *पुढली ताट देखील न उचलता*
*निघून जाणे*

*भरीस भर* म्हणून
*'ह्यात कोणते जग जिंकले*??
*स्त्रिया असतातच स्वैपाक आणि*
*घरकाम करण्यासाठी* टाइप'
*सामाजिक मान्यता असणे..*

आणि *हे सगळे शिकल्या सवरल्या*
*स्त्रिया आहात म्हणुन बँक, शाळा*,
*नोकर्‍या, उद्योग, मीठ मसाला*,
*नातेवाईक, सण समारंभ* ईत्यादी व
इतर *अनेक गोष्टी जास्तीच्या सांभाळुन*
फिरून *ओट्याशी दोन हात करीत*
*न कुरकुरता उभे राहणे*.

^कामवाल्या बाईला^ *निदान पगार तरी देतात*,
^घरच्या बाईला^ तर *तेवढीही किम्मत नसते*.

अरे ..
**फुलका कठीण नसतोच मुळी..*
*कठीण असतो तो स्त्री जन्म* ."*

( *खूप साऱ्या स्त्रियांचे मनोगत* ...)🙏🙏🙏🙏

Credit goes to writer ✨
Copied Content
👍6👏5😢2
Forwarded from B K
.."ज्याचं जळत त्यालाच कळतं"..(नक्की वेळ काढून पूर्ण वाचा)

  "पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या वंशा मग कळे.."हे संत तुकारामांनी म्हणलेली ओवी सर्व विद्यार्थ्यांना व वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू पडतेच..ते किती कष्ट करतात हे त्यांनाच माहिती असते परंतु कधी नशिबाने डावलले आणि निकाल काही मार्कवरुन राहिला तर आपल्याच जवळचे नातेवाईक,मित्र आपल्याला जणू काय आपण मोठा गुन्हा केला की काय असे पाहतात,टोमणे मारतात, आपल्या घरच्यांचना काय केले तुमच्या विद्यार्थ्याने असे बोलून त्यांचे कान भरतात..गावातल्या मंदिरावर,चव्हाट्यावर बसून डायलॉग मरणारे लोक आपलेच असतात..ज्यांनी स्वतः आयुष्यात काही केले नाही असेही लोक डायलॉग मारतात हेच तर खूप लज्जास्पद ह्याला अपवादही असतील काही,तुझ्यासोबतचा ह्याला इथे नोकरी लागली त्याला तिथे असे टोमणे मारणाऱ्या लोकांनी त्यांनी स्वतः,किंवा त्यांच्या मुलांनी काय केले ते पाहावे मग इतरांना बोलावे कटू आहे पण सत्य आहे..
      तुमचे आतापर्यंतचे कष्ट,यश कोणी नाही बघणार,तुम्ही किती रात्रा उपाशी पोटी राहून काढल्यात?कितीदा तुम्ही रडलात हे कोणीच नाही पाहणार जो येईल तो डायलॉग मारण्याचा प्रयत्न करेल..अशाने विद्यार्थांच्या मनावर दडपण येते आणि तो चुकीचे पाऊले उचलवू शकतो..जे आज डायलॉग तुमच्यावर मारतात भविष्यात त्यांना किंवा त्यांच्या मुलांना उद्या असे कोणी,टोमणे मारले तर मग तुम्हाला कसे वाटेल..इतरांना सल्ला देणे ह्या काळात खूप सोपी गोष्ट आहे परंतु तो स्वतः अंगी बाळगण,किंवा त्याची सुरवात स्वतःच्या घरापासून करणे ही थोडीशी अवघड गोष्ट आहे..सल्ला देण्यापेक्षा समोरच्या विद्यार्थ्याला साथ द्या तेच तुमचे सत्कर्म,त्याचे पाय खेचण्यापेक्षा त्याचे हात ओढून वर घ्या..आपल्या सल्ल्यामुळे कुणाचे नुकसान होणार नाही ह्याचा विचार नक्की करावा..

....🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍6❤1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे

फेक नाही ओरिजिनल
सखे तुझ्या चेहऱ्यावरील
मला smile पाहिजे

सखे मला तु
तुझी साथ पाहिजे

कस सांगू सखे तुला
मला तुझ्या चेहऱ्यावर
खुशी पाहिजे

सखे मी सदैव आनंदी
राहायचं कारण ही तु पाहिजे

सखे कळत नकळत
प्रत्येक क्षणी
कारण विनाकारण
सखे मला तु पाहिजे

ये ऐक ना सखे
वेळ परिस्थिती कशी ही असो
सखे मला सदैव सोबत तु पाहिजे

माझी ओळख सखे
तुच पाहिजे
माझ्या जगण्याचं कारण
सखे तुच पाहिजे

✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143
👍1
Forwarded from ओम sm शेळके
आपण जसं आहो तसं स्वीकारून समजून घेणार कोणी भेटलं की जगणं खरंच खूप सुंदर होऊन जातं नाही तर समाज आहेस की राव आपली खिल्ली उडवायला शेवटी प्रत्येक परिस्थितीत चांगलं शोधलं की वाईट आपोआपच आयुष्यातून दूर निघून जात हा एक अनुभव आहे बाकी काही नाही!,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍5
Forwarded from B K
...स्पर्धा परीक्षा एक जग आणि वास्तव.. (पूर्ण लिखाण वाचा,सगळ्या गोष्टींचा विचार करून हे लिखाण लिहिले आहे)

वास्तवाकडे जरा डोकावून पहा 💯 सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि एका व्हिडिओच्या प्रेरणेने किंवा प्रेरक व्याख्यानाने स्पर्धा परीक्षेच्या मोठ्या गुंतागुंतीच्या जगात तुमचे सुंदर आयुष्य आणि वेळ वाया घालवू नका...काही विद्यार्थ्याने बिकट परिस्थितीत स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवले म्हणून सगळ्यांनाच त्याच क्षेत्रात आपले नाव गाजवण्याचे संधी मिळेल असे नाहीच...
अस नाही की स्पर्धा परीक्षेची तयारी करू नये,नक्की करावी त्यात काही वाद नाहीच परंतु स्पर्धा परीक्षा म्हणजे काही पूर्ण जीवन नाही..असे अनेक विद्यार्थी असतात त्यांनी खूप वर्ष कष्ट केलेले असतात परंतु एक दोन मार्क्सच्या फरकाने त्यांची निवड राहिलेली असते अशांचा संघर्ष कोणतेच चॅनल दाखवत नाही..
त्याने घर सोडून राहण्यापासून ते बेचव जेवण,ढीगभर पुस्तके,डोळ्यात मोठी स्वप्ने,घरच्यांची अपेक्षा,नातेवाईकांचे टोमणे,वारंवार येणारे अपयश,येणाऱ्या कमी जाहिराती व अशा अनेक समस्यांचा सामना करता त्याने अनेक रात्रा काढलेल्या असतात तो संघर्ष,अशी विद्यार्थ्याची व्यथाही आपण डोळे उघडून पाहिले पाहिजे....आजकाल वेगवेगळ्या कोचिंगचे क्लासेस आपल्याला ऑनलाईन मिळू शकतात त्यासाठी पुणे,दिल्ली जाणे गरजेचेच नाही,फक्त जिथे अभ्यास करू तिथे अभ्यासच वातावरण निर्माण करणे गरजेच आहे,आणि ऑफलाईन मध्ये क्लासेसच अनेक बाजारीकरण पण होत असलेले दिसून येते.अनेक वर्ष पुण्यासारख्या,दिल्लीसारख्या ठिकाणी अभ्यास करायला विद्यार्थी जातात क्लासवाले,चहावाले, मेसवाले,झेरॉक्सवाले,रुमवाले किती मोठे होउन जातात ह्याचे माप नसते,मग जर का ते एवढा लहान व्यवसाय करून पोट भरू शकतात मग आपणही स्पर्धा परीक्षे करत करत,किंवा करण्याआधी छोटा मोठ प्लॅन B म्हणून काहीतरी हातचा ठेवायला काय हरकत आहे..भविष्यात दुर्देवाने काही झालेच नाहीतर आपण उपाशी तर मरणार नाही ना? नाहीतर आपण ह्या चक्रात कधी अडकून जाऊ आणि नैराश्यातून चुकीच्या मार्गावर पाऊल ठेवायला वेळ लागणार नाही..
जर तुमच्याकडे अपयश पचविण्याची क्षमता असेल,ताकद असेल आणि निरंतर कठोर परिश्रम करण्याची क्षमता असेल तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात टिकू शकता अन्यथा विविध नोकऱ्या,जॉब आहेत जिथे तुम्ही चमकू शकता..तुमच्या सामर्थ्यानुसार आणि तुमच्या आवडीनुसार तुमचे क्षेत्र निवडून तिथेही आपण आपला डंका वाजवू शकतो...
(लिखाण हे वास्तविक आणि वयक्तिक मत असून सगळे सहमत असतीलच असे नाही,उद्देश वास्तविकता मांडणे एवढच आहे)
...🦋🌺✍🙏....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
❤2👍1
Forwarded from B K
असंख्य शूर मावळांच्या रक्ताने लाल झालेल्या,अनेक क्रांतिकारकांच्या प्राणाच्या आहुतिने स्वतंत्र झालेल्या;शाहू,फुले,आंबेडकर ह्यांच्या सारख्या थोरांची कर्मभूमी असणाऱ्या;छ शिवाजी,संभाजी महाराज ह्यांच्या त्यागामुळे पावन झालेल्या;अनेक संत,महात्मांची जन्मभूमी असलेल्या तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर ह्यांच्यासारख्या अनेक थोरांचा वारसा लाभलेल्या,सह्याद्रीच्या सौंदर्याने नटलेल्या महान अश्या राष्ट्रास आणि इथे जन्मलेल्या,घडलेल्या प्रत्येकास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩
......🦋🌺✍🙏.....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
🙏3❤2👍1
Forwarded from ओम sm शेळके
🚩🙏🏻💯♥️✍🏻
👍2
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना सखे

सुखाच्या शोधात
दुःखाला पाठीवर घेऊन
मी फिरतो

सखे स्वप्नच्या दुनियेत हि
मी रोज तुलाच पाहतो

सखे स्वतःच विसरून
तुझाच विश्वात मी जगतो

सुखाच्या शोधात
दुःखाला पाठीवर घेऊन
मी फिरतो

✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍1🥰1
Forwarded from ओम sm शेळके
आपल्या कित्येक इच्छा जन्मताचं मरण पावतात  फक्त या एकाच कारणामुळे की लोकं काय म्हणतील आपण याचं विचाराने मानसिकरित्या खूप थकतो आणि स्वतःच अस्तित्व गमावून बसतो दुसऱयांच्या नजरेने स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला की आपल्या आयुष्यात आपण मध्ये गोडवा  निर्माण होतो✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍8
Forwarded from B K
Based on True story💯 आजच्या काळात समाजाचा,शिक्षणाचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी 'फुले' चित्रपट गरजेचा; वेळ असेल तर नक्की पाहावा असा चित्रपट..हा चित्रपट कदाचित आजकालच्या ऍक्शन,प्रेमाच्या,थ्रिलर चित्रपटांसारखा नसेल,तरीही हा चित्रपट पाहा कारण थोर समाजसुधारकांची संघर्षगाथा डोळ्यासमोर पाह्यला मिळणे दुर्मिळ असतेच..आता कुठे आपल्याला त्यांच्या समाजसुधारकांच्या कार्यांची जाणीव होतंय येणाऱ्या काळात त्यांचे महत्त्व ही समजेल..आपल्या देशात असे वीर जन्माला येतात.देशासाठी,समाजासाठी एवढा त्रास सहन करतात,स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून सर्वांचे आयुष्य फुलवतात ह्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल 🇮🇳
.......🦋🌺✍🙏.......
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👏4👍3
Forwarded from Pratik Pawar
_*कर्तुत्व श्रेष्ठ असेल तर माणसाचे चित्र एक दोन रेषांमध्ये सुद्धा स्पष्ट आणि ठळक दिसते.*_
👌13❤2👍1
Forwarded from ओम sm शेळके
गरजेचे हे नाही की आपण कोणावर प्रेम करतो तर गरजेचं हे आहे की आपल्यावर कोण प्रेम कारण प्रेमाची गाठ एका हाताने बांधता येत नाही त्याला दुसऱ्या हाताचा आधार घ्यावा लागतो तरचं ती गाठ पक्की बसते नाही तर हलक्या एका गैरसमजुतीच्या धक्क्यामुळे ते लगेच गडून पडू शकते!,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
👍4
आयुष्य अपघाताने जगण्याऐवजी

निवडीने जगावं म्हणजे

भविष्याला हवा तसा

आकार देता येतो...!

Good Night✨
👍5
Forwarded from Vinayak Bhise
सखे वाटत तुला भेटाव
अलगद घट्ट मिठीत घ्यावं

सखे डोळे भरून तुला पहावं
पाहता पाहता सखे तुझ्या
डोळ्याच्या विश्वात रमाव

सखे वाटत तुला भेटाव
अलगद घट्ट मिठीत घ्यावं

सखे न काही बोलता देखील
फक्त तुलाच पहात रहावं

सखे नजरेनं तुझ्यासोबतच
प्रत्येक क्षण मनात टिपून घ्याव

सखे वाटत तुला भेटाव
अलगद घट्ट मिठीत घ्यावं

सखे डोळे भरून तुला पहावं
पाहता पाहता सखे तुझ्या
डोळ्याच्या विश्वात रमाव

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo - 7798150143
👍2🥰2❤1
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लोक ढासळलेल्या घराच्या विठाही सोडत नाहीत परंतु इतिहास सांगतो सर्वप्रथम आपला विरोध,गद्दारीची सुरुवात आपल्या जवळच्या,रक्ताच्या लोकांपासून होते,त्यामुळे आपल्या मधले गर्दीतले कोण आणि गर्दीतले आपले कोण हे ओळखता आले पाहिजे...💯
......🦋🌺✍🙏.....
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
👍7