Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
धर्मवीर संभाजी महाराज
सत्त्य आणि संघर्षाच एकमेव प्रतीक...
✍️"इतिहासाचीं पान चाळत असताना इतिहासाच्या सोनेरी पानावर अनेक राजे सम्राट आणि युगपुरुषाचीं नाव सापडतात. सम्राट चंद्रगुप्त मौर्य,सम्राट अशोक, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप,हिंदवी स्वराज्य नायक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यापुढील एक महत्वपूर्ण नाव म्हणजे स्वराज्याचे धाकले छत्रपती धर्मवीर संभाजी राजे शिवाजी राजे भोसले महाराष्ट्राच्या भूमीवर एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात लेखणी घेवून स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत ज्यांनी शत्रूशी झुंज दिली ते राजे छत्रपती संभाजी महाराज. दुसऱ्याचीं स्त्री,दुसऱ्याच धन यावर कधीही नजर ठेवू नका.असं जगाला सांगणारे राजे संभाजी महाराज यांचा जन्म आजच्या दिवशी 14मे 1657ला किल्ले पुरंदर याठिकाणी झाला. वडील छत्रपती शिवाजी महाराज तर आई सईबाई यांचा हा सुपुत्र या भूमीत जन्माला आला. त्यांच्या या जन्मदिनी त्यांच्या चरणी मानाचा मुजरा. मराठ्यांमध्ये स्वाभिमान जागवत मराठ्यांमध्ये स्वराज्याच बिजरोपण करणारी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ या संभाजीच्या आजी त्यानीच संभाजीवर उत्तम संस्कार केले.संभाजी राजे लहान असतानाच त्यांची आई सईबाईच निधन झालं.. त्यामुळे संभाजीचा सांभाळ जिजाऊ माँसाहेब यांनी केला. संभाजी राजे लहानपपणापासूनच शूर होते.वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण हा महत्वपूर्ण राजकीय ग्रंथ लिहला विचार करा आजच्या काळात 14वर्ष वयाच्या मुलांना साधा निबंध लिहता येतं नाही.. राजेनी ग्रंथ लिहला आणि तो सुद्धा संस्कृत भाषेत लिहला.महाराजांना 14भाषा येतं होत्या..1680मध्ये छत्रपती शिवराय यांच्या निधनानंतर संभाजी महाराजाचा रायगडावर राज्यभिषेक झाला.येशूबाई या त्यांच्या धर्मपत्नीने कायमच त्यांना साथ दिली.राज्यभिषेकानंतरचा बराच काळ औरंगजेब, सिद्धी, पोर्तुगीज यांच्या सोबत लढण्यात गेला.महाराजानी आपल्या जीवनात 120लढाया लढल्या.विशेष म्हणजे एकही लढाई हरली नाही.65किलोचीं तलवार उचलणारा हा 6फूट 2इंच उंची असणारे धीप्पाड आणि धाडशी नायक संभाजी राजे होते.शिवाजी महाराजानंतर अरमार आणि नौदलाचा विकास संभाजीने केला.भारताच्या इतिहास सर्वात प्रथम जर नौदलाचीं स्थापना कोणी केली असेल तर,ती शिवाजी महाराजानी केली..संभाजी महाराज यांच संपूर्ण जीवन मुघलाशी संघर्ष करण्यात गेलं.मराठ्यांने जे अटकेपार झेंडे रोवले त्याचा पाया राजे संभाजी महाराज यांनी रचला..पण शेवटी फंदफितूरीमुळे महाराज 1689साली औरंगजेबच्या तावडीत सापडले,आणि औरंगजेबाने 40दिवस हालहाल करुन संभाजीचीं हत्त्या केली.दि.11मार्च 1680रोजी..याबद्दल म्हणावं वाटतं की
"सत्त्यवाद्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला.कारण सत्त्य हे संघर्षाच प्रतीक आहे.इतिहासाच्या पानापानात सत्यवाद्याचा संघर्ष लिहल्या गेला.लिहल्या जात राहील, कारण आमचा इतिहास सत्त्य आणि संघर्षाचा आहे.औरंगजेबाने संभाजीला सांगितलं की मुस्लिम धर्म स्वीकारा सर्व शिक्षा माफ करतो. पण तरीही स्वाभिमानी राज्यांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही. अश्या सत्त्य बोलणाऱ्याचे शीर कटल्या गेले. डोळे फोडल्या गेले. हिंदू धर्मासाठी राज्यांनी आपलं रक्त सांडलं,प्राण दिला पण धर्म सोडला नाही.. म्हणून संभाजी राजे धर्मवीर ठरतात. शेवटी इतिहासाची पानं इमानदार होती. त्यांनी सत्त्यवाद्याच नावं आपल्या पानावर सोनेरी अक्षराने लिहलं. विरोधक कोणाचेही असो, छत्रपती शिवाजी महाराज वा संभाजी महाराज त्यांच्या विरोधकाना इतिहासाच्या पानावर स्थान नाही. सिहाच्या जबड्यात हात घालून,सिहाचे दात मोजणारे इमानदारी आणि सत्यनिष्ठा यांच एकमेव प्रतीक स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम..
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -:8806379959
✍️@ABCs1432

🙏6
Forwarded from ओम sm शेळके
ज्ञानशास्त्रं पंडित महाकवी रणधुरंदर अजिंक्ययोद्धा धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🚩🙏🏻🌺 आणि सर्व रयतेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या 335 व्या जयंतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🚩🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🏻
ओम शेळके
@Ommshelke
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🏻
ओम शेळके
@Ommshelke
🙏3👍1
Forwarded from ओम sm शेळके
हल्ली आता प्रत्येकांने स्वार्थीपणाचां रंग चळवुन घेतला आहे माणसां माणसांतला संवाद पूर्णपणे थांबला आहे उरली आहे फक्त स्वार्था पुरती नाती हरवली जातं आहे माणसातील माणुसकी हे कुठे तरी थांबायला हवं आपण स्वतःहून प्रत्येकाशी मीपणा सोडून आपलेपणाने बोलायला हवं कारण आपण जसं वागतो तसंच काहीसं आपल्या सोबत घडतं हा सुष्ठीचा नियम आहे राव आवडला तर विचार नक्की करा👍🏻🙏🏻✍🏻💯
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍3
Forwarded from ओम sm शेळके
आपण स्वतःमध्ये इतकं खूश राहायचं की परिस्थितीतुन मिळणार दुःख पण मोचक वाटू लागेल कारण परिस्थिती फक्त आपल्याला भवतीक दुःख देऊ शकते मात्र आपण अंतर्मनात किती खूश राहतो यावर सगळं सुखरूपी समाधान लपलेलं असते,,,!✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍7
Forwarded from B K
कर्म(नक्की वाचा)
थोडावेळ लागेल पण कर्माची फळे नक्की भेटतात,आज आपण जसे इतरांसोबत वागू,करू तेच उद्या आपल्यासोबत घडते.आज तुम्ही कुणाच्या कष्टाचे पाच पैसे बुडवले तर उद्या तुमचे त्यापेक्षा जास्त पैसे जाणार,आज इतरांच्या प्रगतीवर जळत असाल,चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचे पाये खेचत असाल तर उद्या तुमच्यावरही तीच वेळ येणार,तुम्हीच इतरांसाठी खोदलेल्या खड्यात तोंडावर पडू शकता आज इतरांना चिल्लर समजतंय,उद्या चिल्लर मागण्याची वेळ तुमच्यावर येण्याची शक्यता असते..आज इग्नोर करणारे,Attitude दाखवणारे,चांगले वागूनही वाईट ठरवणारे,तोंडापुढे गोड आणि माघे खोड काढणारी माणसे कधीच सुखाची झोप घेऊ शकत नाही..कर्म चुकले की फळे भेटणारच ती महान धनुर्धारी कर्णाला,असुरांचा राजा असणाऱ्या रावण,भगवान कृष्णाच्या सख्या कौन्समामाला चुकली नाहीत,देवाचे मामा झाले म्हणजे काय झाले,चुकीचे ते चुकीचे किंमत मोजावी लागणारच कुणी कितीही शूर असो.चांगल्या कार्याचीही फळे मिळते,शेवटी आपल्या हातात असते कोणते कर्म करायचे?
......🦋🌺✍🙏......
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास शेयर करा

👍11👌3
जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना...
परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही.
💢 Good Night 💢

👍11
उंबर्याशी विसावलं
आता कसलीही नाही घाई ..
वय दाराशी अडकलं
हे म्हातारपण द्वाड बाई।१।
घर खाया उठलेलं
सारं कसं चिडीचूप ..
दिसागणीक वाढते
लेकरांची याद खूप।२।
भरलेला होता वाडा
ओसरीला आला-गेला ..
पायताणांचा राबता
सडा पडे गर्द ओला।३।
लेकरांनी माजघर
तिथं कालवा केवढा ..
रडे हट्ट हाणामारी
शांत रातीस तेवढा।४।
पाखरा इवं सारी पोरे
शिकूनियां दूर गेली ..
विसरोनी गांव खेडी
शहराची वासी झाली।५।
धनी काळवासी झाले
आतां कोठला दरारा ..
म्हातारीच्या डोईवर
उभा रीता हा पसारा।६।
फक्त उन्हाळ्याची सुट्टी
घालविण्या पोरे येती ..
म्हातारीच्या सोबतीला
फक्त मोकळ्याच राती।७।
रस्त्यावर वाटसरूं
येतां जातां ख्याल पुसें ..
अवचित बोला साठीं
माय उंबर्याला बसे।८।
माय उंबर्याला बसे !!
(छायाचित्रातील माईला वंदन 🙏)
Credit goes to writer ✨
आता कसलीही नाही घाई ..
वय दाराशी अडकलं
हे म्हातारपण द्वाड बाई।१।
घर खाया उठलेलं
सारं कसं चिडीचूप ..
दिसागणीक वाढते
लेकरांची याद खूप।२।
भरलेला होता वाडा
ओसरीला आला-गेला ..
पायताणांचा राबता
सडा पडे गर्द ओला।३।
लेकरांनी माजघर
तिथं कालवा केवढा ..
रडे हट्ट हाणामारी
शांत रातीस तेवढा।४।
पाखरा इवं सारी पोरे
शिकूनियां दूर गेली ..
विसरोनी गांव खेडी
शहराची वासी झाली।५।
धनी काळवासी झाले
आतां कोठला दरारा ..
म्हातारीच्या डोईवर
उभा रीता हा पसारा।६।
फक्त उन्हाळ्याची सुट्टी
घालविण्या पोरे येती ..
म्हातारीच्या सोबतीला
फक्त मोकळ्याच राती।७।
रस्त्यावर वाटसरूं
येतां जातां ख्याल पुसें ..
अवचित बोला साठीं
माय उंबर्याला बसे।८।
माय उंबर्याला बसे !!
(छायाचित्रातील माईला वंदन 🙏)
Credit goes to writer ✨
👍8❤3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
गुलाब पाकळी...
माझं पहिलं प्रेम❤️
"गुलाबांची अशी सुंदर फुलं मला खूप आवडतात.माझं पहिलं प्रेम म्हणजे गुलाबाची सुंदर पाकळी.. कारण आयुष्यातली पहिली कविता अश्याच एका सुंदर गुलाबांच्या पाकळीकडे पाहून सुचली होती.. आणि कवितेमुळेच मला एक नवी ओळख मिळाली.. कविता आणि लिखाण माझ्या आयुष्यातून वजा केल.. तर मी केवळ एक सर्वसामान्य विद्यार्थी आहे.. कवितेमुळेच मला दूर दूरची माणसं ओळखतात.. आणि ह्या सुंदर कविता सुचल्या त्या अश्याच सुंदर सुंदर फुलाकडे बघून म्हणून मला फुलं खूप आवडतात..." 🥰
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दी. 18मे 2025
✍️संपर्क-:@ABCs1432

सन्मान
✍️"जातीयतेच्या उतरंडी वरून एखादा अगदी खालच्या जातीतला माणूस जेव्हा सर्वोच्च पदावर पोहोचतो तेव्हा निश्चितच वरच्या जातीतल्याना ते फारस रुचत नाही.पण आपल्या देशात लोकशाही आहे संविधानाने सर्वांना सामान संधी दिल्या संविधानामुळे आणि स्वतः च्या गुणवत्तेच्या बळावर ही व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश झाली. न्यायाधीश पदाच्या जागा राखीव नसतात तिथे आरक्षण नसतं.सेवाजेष्ठता आणि गुणवत्त्ता याच्या आधारावर ही निवड होते. तशीच निवड न्या.भूषण रामकृष्ण गवई यांची 'सरन्यायधीश 'म्हणून झाली.ते जरी सर्वोच्च पदावर गेले तरी इथल्या लोकांच्या मनातील जातीवादी मानसिकता गेली नाही.ह्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रास झाला.तशी अवस्था न्या भूषण गवई यांचीसुद्धा झाली.ते पहिल्यांदा महाराष्ट्रात आले तेव्हा प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व प्रमुख अधिकारी उपस्थित असावे.पण तसे झाले नाही.खरतर जोपर्यंत लोकांच्या मनातून जात जातं नाही तोपर्यंत यांच गोष्टी होत राहणार.त्यामुळे जातीयवादी मानसिकता समाप्त करण्यासाठी अजून प्रयत्न हवे"
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC ).
(लेखक,शिक्षक जि. बुलढाणा )
✍️संपर्क -@ABCs1432

👍4❤2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
मधमाशी सृष्टीची जननी..
20मे जागतिक मधमाशी दिन..
✍️"आपल्या पिलासाठी फुलाचा सुगंध शोषून मधमाशी हे मधुर पोळ तयार करते. जर मधमाशी फुलावर बसली नाही. तर परागीकरणं होणार नाही. आणि जर परागीकरणं झालं नाही. तर फुलांपासून फळं आणि बी तयार होतं नाही. खरं तर मधमाशी ही ह्या सुंदर सृष्टीची जननी आहे.ती फुलावर बसते म्हणून झाडांना फळं आणि बीज येतात.स्वार्थी असतात ती माणसं जी मधमाश्यानी कष्ट करुन तयार केलेलं पोळ स्वतः साठी घेवून जातात. खरं तर सृष्टीतला प्रत्येक सजीव एकमेकांवर अवलंबून आहे.तसा माणूसही निसर्गावर अवलंबून आहे. पण स्वार्थी माणसानी सारा निसर्ग ओरबाडून खाल्ला. त्याबदल्यात परतफेड केली नाही. मधमाश्याची पोळ चोरली.त्याबदल्यातं झाडं लावली नाही. त्यामुळे झाडं लावा.. आणि ही सुंदर सृष्टी वाचवा.."✍️
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
✍️संपर्क-:8806379959

आयुष्यात काही गोष्टी मिळतात त्या फक्त नशिबामुळे किंवा प्रचंड मेहनत केल्यामुळे नाहीतर आपल्या पूर्वजांनी,वडिल्यांनी तसेच आपण करतो त्या केलेल्या स्तकर्मची पावती/फळ म्हणून🤗...जे आपण चांगले कर्म किंवा वाईट कर्मे करत असतो ते काही वेळ लागेल परंतु तेच शेवटी आपल्याकडेच परत येत असतात हे त्रिकालसत्य आहे💯म्हणून माणसाने नेहमी चांगले कार्य करत राहावे..काही जमत नसेल तर जे करत आहेत त्यांना आडवे तर जाऊ नये निदान..आणि दुसरा मुख्य मुद्दा की नशिबात ज्या गोष्टी उदा..पैसे,पद,नोकरी,सुख इ आहे ते नक्कीच तुम्हाला मिळणारच👍ते कोणीही कधीच हिरकाऊन घेऊ शकत नाही,परंतु तोपर्यंत संयम राखणं गरजेचे असते🤗इतरांचे वाईट आपण कधीच केले नसेल,कुणाच्या प्रगतीवर कधीच जळाले नसेल तर मग नक्कीच आपलं काही वाईट होणारच नाही भलेही आपले लोक कोणी सोबत असो की नसो(वास्तविक पाहता आपल्याच जवळच्या काही लोकांना,मित्रांना काही वेगळं केलेलं रुचत नाही)शेवटी कर्ता करविता तो(देव)आहेच की😇,मग जास्त ताण घ्यायचा नाही.फक्त योग्य मार्गाने कर्म करत पुढे चालायचे कारण शेवटी देवाजवळ तर सर्व कर्माचे हिशोब असतातच ना?🙏🏻
......🦋🌺✍🙏......
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास शेयर करा
......🦋🌺✍🙏......
लेखन✍-B.S.Kendre(stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास शेयर करा
👍5❤2🔥1👌1
Forwarded from ओम sm शेळके
नेमकं संसार म्हणजे काय तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी केलेला नुसता व्यवहार की दोघांनी मिळुन साजरा केलेला एक त्योहार।।जशी आपल्या हातांची टाळी एका हाताने वाजत नाही तशीच आयुष्यरुपी संसाराची गाडी एका चाकाने चालतं नाही राव।। प्रत्येकाला आपलं सुखदुःख सांगायला कोणी तरी हक्काचं हवं ते मिळताचं आयुष्याच्या जुन्या डायरीत एक अक्षर लिहल्या जाईल नवं!!,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
कुस्ती...
✍️"महाराष्ट्राच्या मातीत सर्वात प्रथम राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्ती सुरु केली.. शाहू महाराज स्वतः च एक कुस्तीवीर होते.त्यामुळे कुस्तीचा जनक म्हणून राजर्षी शाहूच नाव आदराने घेतल्या जातं..लावणी, तमाशा यांचा उगम कोल्हापूरात झाला कारण शाहूने कलाकारांला राजाश्रय दिला..कलाकाराच्या कलेला दाद देतं स्वतः च्या गळ्यातील हिऱ्यामोत्याच्या कोट्यावधी किमंतीच्या माळा शाहूने कलाकाराना बक्षीस दिल्याचा इतिहास आहे.. मराठी चित्रपट सृष्टीचा उगम सुद्धा कोल्हापूरमध्येच झाला..म्हणून महाराष्ट्राचीं सांस्कृतिक राजधानी म्हणून कोल्हापूरच नाव आदराने घेतलं जातं.. शाहू महाराज यांच्या जयंती किंवा स्मृतीदिनीच त्यांची आठवण करण्यापेक्षा जेव्हा कुस्तीच नाव येईल तेव्हा एकच नाव आठवलं पाहिजे.. ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आज 23मे जागतिक कुस्ती दिनानिमित्त राजर्षी शाहूना विनम्र अभिवादन व सर्वाना जागतिक कुस्ती दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!"
✍️शब्दरचना -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि.बुलढाणा)
✍️संपर्क -:@ABCs1432

👍3❤1
Forwarded from B K
सोपं नसतं मुलगा असणं👍 स्वतःसाठी कमी दुसऱ्यांसाठी जास्त जगतो,दुःख मनात साठवून आम्ही "जगासमोर हसतो.आम्ही मुलं डोळ्यातले अश्रू मनात टिपतो,कारण लहानपणापासून सांगितलं जातं "मुलं रडत नाही",आम्हालाही"भावना असतात" हो पण;दुर्भाग्यने आम्हाला रडून त्या व्यक्त करता येत नाही.आपल्या कुटुंबासाठी झटणाऱ्या एकट्या बापाची चाललेली धडपड बघून आमचे मन विरघळते,म्हणूनच काय कमी वयात "जबाबदारीचे ओझे" स्वीकारण्याचे बळ आमच्यात येते...मुलींप्रमाणे आमचं चरित्रसोबत पगार आणि नोकरी बघितली जाते,संपत्ती,घर आणि शेती यावरून आमची किंमत ठरते.तिचा आदर कर ती तुझा बहिणीसारखी आहे असे "सुसंस्कार" आम्हालाही आई-वडिलांकडून लाभले यशस्वी झाल्यावर तर महालातील "राजकन्या" ही आम्हाला मिळते,पण हार दिसताच प्रेम करणारी" प्रेयसी "सुद्धा सोडून जाते.... बसमध्ये चुकीने मुलीला धक्का लागला तर अपमानित होऊन कानाखाली चापट खावी लागते,मुलं आहेत ना आम्ही,आमच्यासाठी थोडी ना जनता मदतीला येते.."सर्व मुले वाईट नसतात" नसतात सर्वे चांगले, कारण त्यात तुमचे भाऊ आणि मित्र नाही का जातात गणले?मुलींनो तुमच्याकडे बघणारी प्रत्येक नजर वाईट नसते,कारण काहींना आईची सावली काहींना सखा-S kulkarni
❤13👍7👌2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
व्यसन... ✍️🖤
✍️"आयुष्यात मला फक्त एकच व्यसन आहे ते म्हणजे लिहण्याच..चित्र बघितलं की,मला आपोआप शब्द सुचतात आणि कविता तयार होतात.. लिखाण सोडल तर,बाकी मी सुपारी सुद्धा खात नाही आणि चहा सुद्धा घेतं नाही.. आणि कोणत्याच व्यक्तीची मला सवय सुद्धा नाही..लिहणं हाच माझा छंद आणि हेच माझं व्यसन आहे आणि हे व्यसन आयुष्यभर सुटणार नाही."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक,कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
लिखाण दि. 25मे 2025
✍️संपर्क-:@ABCs1432
Good Evening 🖤

👌7❤2👍1