नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from Vinayak Bhise
💞 ऐक ना सखे…

शब्दांविना… अपेक्षांविना…
फक्त मनानं,
तुझ्याजवळच…
तुझाच बनूनी प्रत्येकक्षणी
राहायचं आहे…

कारण विनाकारण
माहित नाही गं,
पण असं वाटतं
सदैव, फक्त तुझ्यासोबतच जगायचं आहे… ❤️

✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
📞 Mo. 7798150143
❤3
@natemanache

रडण्यासाठी एकटा माणुस पुरेसा असतो.
👉पण हसण्या साठी
सोबत कोणीतरी असावं लागतं
म्हणून चांगली माणसे जोडत रहा.
आणि गोड हसत रहा..

शुभ रात्री
👍1
आतिशय सुंदर लेख आहे.

फक्त प्रेम करा !
सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी
नेमकं काय असतं हे "सख्ख प्रकरण?"

सख्खा म्हणजे आपला सखा.
सखा म्हणजे जवळचा
जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केंव्हाही, काहीही सांगू शकतो.
त्याला आपलं म्हणावं,
त्याला सख्ख म्हणावं !

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावरपण पडता नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्य नसते पथ्य असते.

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो,
मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

ज्याच्याकडे गेल्यानंतर
आपलं स्वागत होणारच असतं
आपल्याला पाहून त्याला हसू
येणारच असतं
अपमानाची तर गोष्टच नसते
फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

पंढरपूरला गेल्यावर
विठ्ठल म्हणतो का .....
या या फार बरं झालं !

माहूर वरून रेणुका मातेचा
किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !
मग आपण का जातो ?
कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ....म्हणून !
हा ही एक प्रकारचा " आपलेपणाच !"

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ?
किंवा आपण नेलेले तो काय घेतो ?
काहीच नाही.

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का,
किती रोड झालीस ?
कशी आहेस ?
सुकलेला दिसतोस,
काय झालं ?
नाही म्हणत.

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?
पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?
प्रेम, माया, आपुलकी, विश्वास
म्हणजेच "आपलेपणा !"

हा आपलेपणा काय असतो ?

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ
भेटल्या नंतर बोलण्याची ओढ
बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ
निरोप घेण्या आधीच पुन्हा
भेटण्याची ओढ !

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं
त्याला आपलं म्हणावं
आणि चुलत, मावस असलं तरी
सख्ख म्हणावं !

मी त्याचा आहे आणि तो माझा
आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे .....
म्हणजे " आपलेपणा ! "

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात
आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात
तो आपला असतो ,
" तो सख्खा असतो !"

लक्षात ठेवा,

ज्याला दुसऱ्या साठी "सख्ख" होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं,
बाकी फक्त परिचितांची यादी असते
नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

तुम्हीच सांगा.....

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?
ज्याला तुमच्या दुख्खाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ?

आता एक काम करा

करा यादी तुम्हाला असणाऱ्या
सख्ख्या नातेवाईकांची
झालं न धस्सकन
होतयंन धडधड
नको वाटतंय न यादी करायला ....
रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी
आणि मानायला लागा सर्वांना आपलं
कोणी कितीही झिडकारलं तरी
कारण .....
राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही
जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं...

Credit goes to writer✨
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
❤6👍1👌1
@natemanache

एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की,

"we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same"

म्हणजे, "आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे "

किती सुंदर वाक्य आहे नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखिल कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो... अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!

"जिंदगी एक बार मिलती है"
  "बिल्कुल गलत है!"
सिर्फ मौत एक बार मिलती है!
जिंदगी हर रोज मिलती है !!
  बस जीना आना चाहिए!!
😊😊😊😊😊😊😊😊😊
❤20
Forwarded from ओम sm शेळके
आपलं मन समजून घेणार कोणी भेटलं की आयुष्यातील बरचसं दुःखं नाहीस होत कारण कुठलंही व्यक्ती वरून कितीही खंबीर दिसत असली तरी त्याला कोणाचा तरी मानसिक आधार हवा असतो कारण परिस्थितीतून निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्या व्यक्तीचा आधार खूपच महत्त्वाचा ठरतो त्याला तो मिळतो तो खरच खूप भाग्यवान असतो!,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
❤4👌2
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा✍️वेळेनुसार,प्रसंगानुसार सर्व बदलते हे त्रिकाल सत्य आहेच💯हे कलियुग आहे इथे काम पडल्यासच लक्षात येतो आणि काम झाले की संपर्कही कट केला जातो,ओळखही बुडविली जाते,खरी किंमत करणारे,महत्व करणारे हातात मोजण्याएवढेच असतात🙁जवळ असताना क्षणाक्षणाला काळजी कळणारे,विचारपूस करणारे लोक,मित्र जसे घरापासून,जुन्या मित्रांपासून जबाबदारमुळे बाहेर पडतो तेव्हा नकळत कसे दूर होतो हे समजतही नाही भलेही आपण मैत्री,माणुसकी टिकवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात आणि क्षणक्षण सोबत घालवणाऱ्या माणसांपासून दूर जातो,वेळ गेल्यास सर्वांनाच एकमेकांचे महत्त्व कळते पण तोपर्यंत जो तो आपल्या कार्यात व्यस्त झालेला असतो🙁मग आयुष्याचा वाटेवर आपल्यासारखे एक लाख माणसे मिळू शकतात पण त्या एक लाखात आपण एक नसू✍️ह्या प्रवासातही काही मोजके व्यक्ती असतात जे शेवटपर्यंत टिकून असतात..काहींना तुमच्याशी वावगं असते त्यांना नेहमी आपण कितीही चांगलं वागण्याचा,काम करण्याचा प्रयत्न करू,नाव ठेवण्याची संधी सोडणार नाही हेही खरंच👍🏻
....🦋🌺😇💞...
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
❤4👍2
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा..✍️

  आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिन 8 मार्च ला असतो माहिती आहे,बालक दीन 14 नोव्हेंबर असतो माहिती आहे..पण पुरुष दीन केव्हा असतो माहितच नाही😒कारण 19 Nov हा पुरुष दीन आहे हे माहितच नसतं कसं माहिती होणार?कारण ज्या प्रमाणे इतर दिवस साजरी केले जातात त्याबद्दलची माहिती समाजमाधांमवर दिवसांचे स्टेटस ठेवले जाते तसे किंवा त्यापेक्षा कमी पुरुष दिनाचे असतात हे सत्यच😳पुरुषाच्या भावना जबाबदारीच्या पांघरूण उचलून पाहिले तर त्याचे गुंतागुंतीचे आयुष्य समजेल..समाज बहुधा पुरुषांकडे कठोर,विश्वासघाती म्हणून पाहतो.. समाजातल्या काही चुकीच्या पुरुषांच्या वागण्यामुळे संपूर्ण पुरुषांना चुकीचे समजले जाते..पुरुषालाही वेदना होतात,तोही रडतो पण खंत एकच की त्याला समजून घेणारे कोणीच नसते😔 जबाबदारी ही प्रत्येकालाच असते पण पुरुषाच्या संघर्षाच्या प्रवासात खूप कमी सोबत असतात..सगळ्यांना त्यांच्यापासून काही ना काही अपेक्षा असते पण त्याला काय हवं कोणी कधी विचारतही नाही हेही खरंच😔
  श्यामची आई हे पुस्तक सर्वांनाच माहीत आहे पण तसे पुरुषावर लिहिलेले प्रख्यात पुस्तक माहिती आहे का?आणि असेल तरीही ते जास्त वाचनात नसेल कारण लहानपणापासून त्याच्या डोक्यावर जबाबदारीचे ओझे दिले जाते आणि ते मृत्यूपर्यंतही संपत नाही😳त्याला कुटुंबाचे अस्तित्व टिकवण्यासाठी लहान वयापासून बाहेर ठेवले जाते,नंतर शिक्षण आणि नोकरीसाठी अनेक हालपेष्टा सहन कराव्या लागतात,वरून समाजाचे,नातेवाईकांचे काही वेळी घरच्यांचेही टोमणे एकूण घ्यावे लागतात.त्याला स्वतःला व्यक्त होयलाही जागा नसते..एवढं सगळं असूनही तो स्मितहास्यामागे सगळे लपवतो आणि चालत राहतो..सर्व जबाबदारीच्या वाटेवर चालणाऱ्या,पुरुषांना धन्यवाद व शुभेच्छा🤝(नकळत भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व)
....🦋🌺😇💞....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-
7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
❤4
''हो" आणि "नाही" हे दोन छोटे
           शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार
         करावा लागतो...
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी
             गमावतो
"नाही" लवकर बोलल्यामुळे,
             आणि
"हो" उशिरा बोलल्यामुळे...

✨ Good Night ✨

💫 Join: @natemanache 💫
❤9🥰2👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
नक्की वाचा
संविधान दिवस 🇮🇳🇮🇳
❤1
Forwarded from B K
नक्की पूर्ण वाचा..✍आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी रक्त सांडले आणि स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशात शांतता टिकवण्यासाठी अनेकांनी आपले प्राण दिले🫡26/11 ही काळी रात्र देश कधीच विसरणार नाही..पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई येथे छ.शिवाजी टर्मिनस,हॉटेल ताज,महालपॅलेस & टॉवर, ओबेरॉय असा गर्दीच्या ठिकाणी हल्ले केले😔ह्या हल्यात अनेक विदेशी नागरिकही मरण पावले,अनेक अधिकाऱ्यांनी देशासाठी आपले प्राण ओवाळून टाकले.१९७ ठार झाले,तर ८०० पेक्षा जास्त जखमी झाले😞
हसत मृत्यू झेलणाऱ्या हेमंत करकरेअशोक कामटे,विजय साळसकर सर अशा अनेक अधिकाऱ्यांचे ह्या मातीवर उपकार आहेत🫡म्हणूनच आज आपले अस्तित्व आहे.तुकाराम ओबले, मे संदीप उन्नीकृष्णन ह्यांनी दाखवून दिले की हिरो हे फक्त चित्रपटात नसतात तर खऱ्या जीवनातही असतात🇮🇳त्यांच्या नसानसात देशभक्ती होती,त्यांच्या वीरमरणामुळे कसाब ला जिवंत पकडण्यात यश आले.अशा अधिकारी,लोक आपल्यात आहेत जे आपल्यापेक्षा देशाचा,इतरांचा आधी विचार करतात म्हणूनच सुरक्षित आहोत.जय हिंद🇮🇳शहिदांना नमन🙏
....🦋🌺😇💞....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
❤6👍1
Forwarded from ओम sm शेळके
शब्दांचा खेळ प्रत्येकाला खेळता येतो पण मनाच ठाव घेणारं एखाद वाक्य पण आयुष्याची प्रेरणा देऊन जाते कितीही पण कठीण परिस्थितीत उभं राहायचं बळ मिळते फक्त या संघर्षाच्या काळात आपलं हक्काचं व्यक्ती सोबत असलं की कुठल्याही समस्येत संधी शोधता येते!,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke
👍3❤1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
महात्मा ज्योतिबा फुले..
एक सत्त्य शोधक
ज्योतीराव गोविंदराव फुले...यांचे मूळ आडनाव होतं गोऱ्हे पण पुण्यात त्यांचा वडिलोपार्जित फुलाचा व्यवसाय होता.. स्वतः च्या शेतात फुलं पिकवायची आणि पुण्याच्या बाजारात विकायची हा त्यांचा व्यवसाय त्यामुळे लोकं त्यांना फुले म्हणायला लागले,आणि कालांतराने त्यांच नाव पडलं फुले.. ज्योतीराव गोविंदराव फुले अर्थात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले... स्त्री शिक्षणाची ज्योत दक्षिण भारतात प्रथमच पेटवणारे महात्मा फुले हे पहिलेच कर्ते सुधारक होते.. ते जे बोलायचे ते करायचे.. अश्या महात्मा फुलेचा जन्म झाला तो म्हणजे 11 एप्रिल 1827 ला सातारा जिल्हातील 'कटगुण' ह्या गावी नंतर गोरे परिवार पुण्यात स्थायिक झाला..वडील गोविंदराव तर आई चिमणाबाई यांचे हे सुपुत्र लहानपणापासून मिशनऱ्याच्या शाळेत शिक्षण झाल.. मुळात ब्रिटिशांनी भारतात ज्या मिशनरी शाळा सुरु केल्या तिथे जातीभेद नव्हता.. जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव त्या ठिकाणी नव्हता.. त्यामुळे फुलेचे 3बालमित्र हे ब्राम्हणच होते
ज्यामध्ये सदाशिव बल्लाळ गोवंडे, विनायक बापूजी भंडारकर, विनायक बापूजी डेंगल आणि सीताराम सखाराम दातार यांचा समावेश होता, ज्यांनी सत्यशोधक समाजाला मदत केली... लहानपणीच ज्योतीरावांनी थॉमस पेन यांनी लिहलेलं ' The Right of Man' हे पुस्तक वाचलं आणि त्यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला.. माणूस माणसाच नातं कळलं आणि ज्योतीरावांनी समाज सुधारणेच्या कामात आवड दाखवली आणि ही आवड अधिक वृंधीगत झाली ती म्हणजे पुण्यातल्या सत्त्यशोधक आखाड्याने.. पुण्यातले ताकदवान पहिलंवान म्हणजे 'वस्ताद लहुजी साळवे 'यांनी पुण्यात 'सत्त्यशोधक आखाडा 'स्थापन केला.. आणि त्याच आखाड्यात ज्योतिबा फुले कुस्ती आणि दांडपट्टा चालवायला शिकले.. फुले हे उत्कृष्ट पहिलंवान होते.. नंतरच्या काळात पुण्यातले ब्राम्हण फक्त दोनच व्यक्तीला घाबरत ते म्हणजे वस्ताद लहुजी साळवे आणि ज्योतिबा फुले... सावित्रीबाई फुले सोबत विवाह झाल्यावर फुलेच्या सामाजिक चळवळीला अधिक गती मिळाली.. सत्त्यावर अटळ निष्ठा असणाऱ्या फुलेने 1873मध्ये सत्त्यशोधक समाजाची स्थापना केली... त्याअगोदर 1जानेवारी 1848मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यात भिडेवाडा याठिकाणी मुलीची पहिली शाळा सुरु केली.. तेव्हा फुलेच वय होतं अवघ 21वर्ष..इतक्या कमी वयात फुलेनी मुलींसाठी शाळा सुरु केली.. आणि आपला आजचा 21वर्षाचा तरुण सद्या काय करतोय..? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे...गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून फुलेने इथल्या व्यवस्थेला असूडाचे फटके दिले.. पुण्यातल्या सनातनवाद्यानी फुलेला खूप त्रास दिला,पण ह्याच वेळी वस्ताद लहुजी साळवे यांच्या सत्त्यशोधक अखाड्यातील पहिलंवानानी फुलेच्या कार्याला सुरक्षा व्यवस्था पुरवली... फुले हे लोकांच्या मनातील महात्मा होते.. त्यांना महात्मा ही पदवी....११ मे १८८८ रोजी मुंबईतील कोळीवाड्यातील कोळी व इतर कष्ट करी समाज बांधवानी दिली त्यामुळे लोकांच्या मनातील खरे महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले आहे.....फुलेली इथल्या प्रत्येक जाती, धर्मातील माणसासाठी काम केल..डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन गुरुपैकी एक गुरु फुले आहेत.. आज फुलेना मानणारा सर्वात मोठा वर्ग जर कोण असेल तर,ते आहे आंबेडकरवादी कारण कधी काळ ज्या अस्पृश्य समाजातील लोकांचा सावलीचा सुद्धा विटाळ मानल्या जातं होता.. अश्या काळात मांगा महाराच्या पोरांना ज्योतिबा फुलेली छातीशी धरलं आणि त्यांच्या साठी शाळा सुरु केल्या..स्वतः च्या घरातील पाण्याचा हौद दलितांसाठी खुला करणारा पहिले महात्मा होता ते म्हणजे ज्योतीराव फुले..अश्या महान ज्योतीराव फुलेनी स्त्री शिक्षण आणि अस्पृश्य उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातल.. अश्या महान राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन.. "
✍️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी,शिक्षक)
जि. बुलढाणा)
हा लेख कसा वाटलं याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा
✍️संपर्क -:8806379959
✍️संपर्क-
@ABCs1432
❤2
Forwarded from B K
"राष्ट्राचे एक थोर क्रांतिसुर्य"(नक्की पूर्ण वाचा)..✍
.......................................................
विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली.नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले.वित्ताविना शुद्र खचले,इतके अनर्थ एका अविद्येने केले✍असे शिक्षणाचे महत्त्व जगाला सांगणारे व सामाजिक कार्याचे क्रांतिसूर्य म्हणजे म.फुले🫡
आज महिला ह्या सर्व क्षेत्रात देशाची मान उंचावत आहेत,शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाची,समाजाची प्रगती करत आहेत हे शक्य झाले महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्या जिद्दी,शौर्य आणि इतरांबद्दल असलेल्या तळमळीमुळे.नाहीतर आजकाल कोण कुणासाठी निःस्वार्थपणे काय करत?महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.सावित्रीबाई सोबत फातिमा शेख ह्यांचेही योगदान विसरता येणार नाही.लहुजी साळवे हे महात्मा फुले ह्यांचे गुरू होते.
महात्मा फुले ह्यांनी कर्मकांड समाजातील,अनिष्ट परंपरा,सतीप्रथा, जातीभेद,अस्पृश्यता ह्यांना विरोध केला.विधवा पुनर्विवाहाची सोय केली,"बालहत्या प्रतिबंध गृह" सुरू केले. फुले ह्यांचे कृषीक्षेत्रातील योगदान खूप मोलाचे,शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम केले आणि त्यांच्या हितासाठी लिखाण केले,बाजारपेठा निर्माण केल्या त्यांच्या कार्याच्या सन्मान म्हणून राहुरी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले."सत्यशोधक समाजा"ची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली ज्याचे उद्दिष्ट जातिभेद,अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा वंचित घटकांना शिक्षण हा होता.महात्मा फुले यांनी जुन्या पुण्यासाठी १८७९ मध्ये खडकवासला धरण बांधले.विधवांच्या केशवपनाच्या क्रूर प्रथेला विरोध करण्यासाठी १८६५ साली तळेगाव ढमढेरे व ओतूर येथील न्हाव्यांचा संप घडवून आणला.त्यांचे साहित्यातील योगदानही अतिशय मोलाचे त्यातून त्यांनी शेतकरांच्या उच्च वर्गाकडून पिळवणूक कशी होते हे मांडले."गुलामगिरी","शेतकऱ्याचा आसूड" आणि "सार्वजनिक सत्यधर्म" इ महत्वपूर्ण लेखन केले..
त्यांच्या कार्यात त्यांना खूप लोकांनी विरोध केला कारण कोणी काही चांगले करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना खाली खेचण्याचे,विरोध करणारे काही लोक,समाज असतोच तरीही ते घाबरले नाही,कार्य चालूच ठेवले आणि गरीब,मुली शिकताय ही त्यांचीच कृपा..इतिहासाचे पान त्यांच्याशिवाय पूर्ण होताच नाही एवढे मोठे त्यांचे कार्य.त्यांच्या कार्यातुन प्रेरणा घेऊन डॉ आंबेडकर ह्यांनी पुढे ही सेवा चालू ठेवली.असे थोर व्यक्ती आपल्या भूमीत जन्माला येतात हेच आपले भाग्य पण दुर्दैव हे की त्यांनाही कार्य करताना त्रास झाला.त्यांच्या कार्याला सलाम व स्मृतीस अभिवादन💐
....🦋🌺😇💞....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
❤4
Forwarded from Vinayak Bhise
दुःख-त्रास, वेदना लपवून
बायकापोरांसमोर हसत
जगता आलं पाहिजे…

कपभर चहा घेताना
सार्‍या दुनियेचं टेन्शन विसरून,
क्षणभर हसत-हसत
जगता आलं पाहिजे…

बाप म्हणून…
डोळ्यातलं पाणी गिळत
मनातल्या वेदना जपून
ठेवाव्या लागतात,
घराला धीर देण्यासाठी
स्वतःची घालमेल शांत करावी लागते…

खांद्यावर कर्जाची,
आयुष्याची ओझी असली
तरी चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं,
कारण बापाच्या दुःखाने
घराचं आभाळच ढगाळतं…

मातीवरच्या या ताटातल्या चहातही
त्याचं जगण्याचं तत्त्व दडलंय
“जगणं कितीही कठीण असू दे…
हसून जगायचं,
कारण माझ्यावर
कोणीतरी अवलंबून आहे”

तुटूनही न तुटता
दररोज स्वतःला उभं करणारा
तो बाप…
थकलेलं शरीर, कष्टाची काळी रेघ,
आणि तरीही मनापासून येणारं हे हसू
यालाच तर म्हणतात
खऱ्या अर्थानं जीवन जगणं.

✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
'मोबाईलच व्यसन आणि आजची लहान मुलं..'हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा 👍
❤6👍1