नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.92K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from ओम sm शेळके
❤3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
'जात 'जी अजूनही गेली नाही.. हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा
👍 👍👍
Forwarded from ओम sm शेळके
शरीराने दुबळे होणे हा नशिबाचा भाग आहे .. पण मनाने दुबळे होणे हा अविचारचा परिणाम आहे .. ❤️👍

शिवाजी महाराजानी आपल्या प्रशकिय विभागात आशावादी आणि आनंदी मानस ठेवली, कारण परिस्थिती ही बदल्या जाऊ शकते पण त्यासाठी आवश्यक असते ते आशावादी मनस्थिती जी आपल्यावर अवलंबून असते✍️🤗 *komal rane*
❤9😢1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
'दिव्यांग व्यक्ती आणि माझा दृष्टीकोन..'हा माझा लेख आज प्रकाशित झाला
नक्की वाचा 👍👍
❤2
Forwarded from B K
आपली माती..🚩🙏🏻#World Soil Day..
आयुष्याच एक सत्य म्हणजे एका मातेने जन्म दिला आणि एक माता मृत्यूनंतर विसावून घेणार आहे💯 काय दिलं हो ह्या मराठी मातीने आपल्याला?तर माझ्या मराठी मातीने आपल्या सर्वांना जगण्यासाठी एक स्वाभिमान दिला🔥जगण्यासाठी एक माते सारखा आधार दिला😇ह्या मातीने आपल्याला लहानाचे मोठे केले,तिचे ऋण हे अमूल्य आहे.ह्या मातीने कितीतरी मोठ्या वीरांना घडवले🚩आणि ह्या मातीतच छ.शिवाजी व संभाजी महाराजांनी "स्वराज्याचा रक्तरंजित" इतिहास रचला.ह्या मातीनेच सचिन तेंडुलकर,रोहित शर्मा पासून लता मंगेशकर असे अनेक थोर खेळाडू,अधिकारी व व्यक्तिमत्त्व जगाला दिले🧡..ह्या मातीत बळीराजा जिवाचं रान करून सोन पिकवतो,आणि त्यातूनच जग जगते,हे सगळं शक्य होते मातीमुळे🙏🏻ह्या मातीचे संवर्धन करणे काळाची गरज आहे,नाहीतर आजकाल मातीची जाणीव ठेवणारे कमी होत आहेत ही शोकांतिका🥺नका विसरु ह्या मातीला,हीच्यामुळेच अन्न भेटते जगाला
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.
👌2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
'हरवलेली माणसं' हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा... 😍
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
बाबासाहेब 🙏💙
✍️ "6डिसेंबर 1956ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगातून निघून गेले, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहे आणि जिवंत राहतील.या आकाशात जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि तारे आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असतील... इतिहासाच्या पानापानावर आणि भारताच्या संविधानावर एक नाव सोनेरी अक्षराने लिहल्या गेलं ते..नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर* महामानवास कोटी..
कोटी प्रणाम विनम्र अभिवादन...
🙏🙏🙏🙏🙏💙
बाबासाहेब आंबेडकर याचे विचार हेच आमचे आचार होवो हिच सदिच्छा...!
🙏🙏🙏🙏🙏
👏2❤1
Forwarded from Vinayak Bhise
अन्यायाला वाचा फोडणारा
माझा देव म्हणजे बाबासाहेब
माणसाला माणूस म्हणून
जगायचा लावणारा
अधिकार देणारा माझा भीमराय

आज ६ डिसेंबर दुःख नाही,
हा जाज्वल्य अभिमानाचा दिवस आहे

बाबासाहेब
हा शब्दच एक क्रांती,
एक मशाल, एक जाज्वल्य बंड
जात-जमातीच्या गलिच्छ काळोखातून
माणसाला उजेडात आणणारा
एकटा महामानव भीम

अण्णाभाऊ म्हणतात
ए भीमा, तुझ्या पाऊलखुणा
म्हणजे आमच्या पिढ्यांची धडधड
तू नसतास तर आम्ही कबरखड्ड्यातच
जन्मायचो जगायचो मरायचो

तू दिलीस आम्हाला ओळख, हक्क,
अधिकार, आणि हातात दिलंस
एक ज्वलंत पुस्तक संविधान
ज्याच्या पानांत मनुष्य’ लिहिलाय
आणि समानता’ उभी आहे छाती फुगवून

भीमा, तू जिथे थांबलास
तिथून आमचा लढा सुरू होतो
कारण अजूनही भुकेची चिता धगधगतेय,
अजूनही अन्यायाचा वणवा धुमसतोय,
अजूनही माणूस मातीवर पाय ठेवून
माणसावर पाय ठेवण्याचा अहंकार बाळगतोय

रे अरे, जातिवाद्यांनो
आम्ही भीमाचे शिपाई आहोत,
तुमच्या अन्यायाला गुडघे नाही टेकणार
कष्टाची कुदळ आमच्या हातात,
आणि विचारांचा अंगार छातीमध्ये
उभे राहू तिथूनच क्रांती फुटते

तळागाळाच्या लोकांना भीमा
तू दिलेलं मानवी स्वाभिमानाचं कवच
आजही आम्ही शरीरासारखंच घालून जगतो
तुझी शिकवण म्हणजे आमचा धर्म,
तुझं विचारधन म्हणजे आमचा वारसा

✍🏻 विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤1👏1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
"सकारात्मक विचार.. नवा दृष्टिकोन हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा.." 🙏😍
👍2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
हिवाळा :गुलाबी आठवणीतला.. हा माझा लेख आज प्रकाशित झाला नक्की वाचा
👌3❤1
@natemanache

दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी?

ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी की ज्याचे विचार चुकीचे आहेत त्याने माघार घ्यावी?"
स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला......

स्वामी विवेकानंद म्हणाले "चूक कोण,बरोबर कोण याला
अजीबात महत्व नाही....
ज्याला सुखी रहायचे आहे,
आनंदी रहायचे आहे त्याने या
भांडणातून माघार घ्यावी....

स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की,
आनंद घेता येतो आणि देताही येतो...
अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात...
असे होऊ नये म्हणून, विसरा अन् माफ करा हे तत्त्व केव्हाही चांगल...

✨
👍8
@natemanache

*जगता आलं पाहिजे...*

मरता केव्हाही येतं,
पण जगता आलं पाहिजे.
सुख भोगता केव्हाही येतं,
पण दुःख पचवता आलं पाहिजे.

रंग सावळा म्हणून काय झालं,
कर्तृव उजाळता आलं पाहिजे.
रंग गोरा असला म्हणून काय झालं,
मनावरील काजळी काढता आली पाहिजे.

यशानं माणूस उंच जातो
पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे.
मिळालेल्या यशात समाधान मानून
आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.

पापं काय कसही करता येतं,
पण पुण्य करता आलं पाहिजे.
ताठ काय कोणीही राहतं,
पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.

ठेच जीवनात लागतेच,
सहन करता आली पाहिजे.
मलमपट्टी करून तिला,
पुन्हा चालता आलं पाहिजे.

शहाण्याचं सोंग घेऊन,
वेड होता आलं पाहिजे.
कशाला बळी न पडता,
आनंदी जगता आलं पाहिजे.

जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,
ती उणीव भरता आली पाहिजे.

हास्य आणि अश्रूचा मिलाप करून.
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...

*आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आले पाहिजे*
❤6👌1
*माणसं मनातली.....*

*मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....*

*काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...*

*चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....*

*शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....*

*शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....*

*म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो....*

*आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं !!*

*आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई....*

*ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.*

*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत....*

*कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?*

~~ श्री व. पु. काळे !
❤9
आयुषात सुंदर्ता.. देखणेपणा ची कमी नाही हो ..
आयुषात सुंदर्ता.. देखणेपणा ची कमी नाही हो ..
कमी आहे ती मनाच्या देखणेपाणाची मनाच्या श्रीमंताची, शांततेची.. समाधानची आणि मनाच्या मोठपाणाची ..

जन्माच्या आधी पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत धडधडतं ते हृदय ..किती ते नाजुक किती ते केविलवाणे ..
किती जपावं मनसाने त्या हृदयाला ...?
काधी स्वताच्या तर कधी दुसर्याच्या ... !!
जपुन ठेव मित्रा ते हृदय तुझे ..
काचे सारखं नाजुक असले तर तडा जायला वेळ लगत नाही दगडा सारख कणखर असले तर त्याचे कण  विसकटायला वेळ लगत नाही
कापसा सारखं मऊ असले तर भिजून जायला वेळ लागत नाही ...
पाण्या सारखं बेरंग असले तर कसलाही रंग चढायाला वेळ लगत नाही .. . .
हृदया असाव ते फुला सारखं .. निर्मळ, सुंदर , मोहक आणि सुरेख काशाची ही अपेक्षा न ठेवता सुंदर फूलणारं..
सर्वाना आनंद देत जगणारं कसले ही ॠण न ठेवता स्वातः कोमेजनारं !

Credit goes to Writer 🌼🙏
❤8
माणसांसाठी वेळ देणं हे नुसतं कर्तव्य नाही, तर आयुष्याची गुंतवणूक असते. आपण त्यांना दिलेले काही क्षण त्यांच्या मनात आयुष्यभरासाठी ऊब निर्माण करतात. कारण नाती हे बोलण्याने नव्हे, तर साथ देण्याने टिकतात. कितीही कामं असली, कितीही धावपळ असली, तरी आपल्या लोकांसाठी थोडं थांबणं गरजेचं असतं—नाहीतर एक दिवस असा येतो की कामं तर असतात, पण ज्यांच्यासाठी करतो ती माणसंच हातातून निसटतात. आणि मग उरते फक्त वेळ… पण त्याला देण्यासाठी कोणीच नसतं. म्हणूनच—ज्यांना आपल्या मनात स्थान आहे, त्यांना आपल्या दिवसातून थोडं स्थान देणं विसरू नका. नाती जपली तर वेळ आपोआप सुंदर होतो, आणि माणसं जपली तर आयुष्य...

Good Night ✨

Credit goes to writer ✨
❤5👌2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
'इमानदारी आणि इथली व्यवस्था.!'
हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा 👍
👍3
Forwarded from ओम sm शेळके
आपल्यापेक्षा तो खूपच सुखी आहे असं प्रत्येकाला वाटतं मात्र त्यांच्या जीवनातील संघर्ष त्यालाच माहिती असतो आपण फक्त वरून दिसण्यावर तो आनंदी आहे असा तर्क काढत राहतो पण खरा अभिनय तोच करत असतो दिवसभर सुखी असण्याचा बाजार मांडून रात्रीच्या अंधारात आपल्या डोळ्यातून दुःखाच्या वेदना बाहेर काढत असतो कारण तो पण एक माणूसच असतो!,,,✍🏻

एकमन#लेखक

@Ommshelke
❤2
Forwarded from B K
"जीवनाचे महत्त्व" स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण असा माझा लेख साप्ताहिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला..नक्की पूर्ण वाचा, आवडल्यास नक्की शेअर करा..😇✍️
लेखन -B.S.Kendre(stu)
Tele id-@Bskendre5
👍2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
' अभ्यास एक छंद..'हा माझा लेख आज प्रकाशित झाला नक्की वाचा👍👍
👏1