नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
Photo
नात्याच झाडं हा माझा लेख आज ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित झाला नक्की वाचा
👍👍❤️
👍👍❤️
परकेपणा
माणूस समाजप्रिय प्राणी आहे, तरीही अनेकदा तो स्वतःलाच परका वाटू लागतो. गर्दीत असूनही एकटेपणाची जाणीव होणे, आपल्या माणसांमध्ये असूनही मन न जुळणे म्हणजेच परकेपणा. हा परकेपणा कधी परिस्थितीमुळे निर्माण होतो, तर कधी अपेक्षांच्या ओझ्यामुळे.
आजच्या धावपळीच्या जीवनात नाती वरवरची होत चालली आहेत. संवाद कमी झाला आहे, समजून घेण्याची तयारी कमी झाली आहे. त्यामुळे माणूस हळूहळू स्वतःच्या भावना लपवू लागतो आणि मनात एक दरी तयार होते. हीच दरी परकेपणाला जन्म देते.
परकेपणातून बाहेर पडण्यासाठी संवाद, विश्वास आणि स्वीकार महत्त्वाचा आहे. एखाद्याने आपले मन मोकळे केले, कुणीतरी आपले ऐकून घेतले, तर परकेपणा कमी होऊ शकतो. शेवटी, आपुलकीची एक छोटीशी भावना देखील परकेपणाच्या अंधारात प्रकाश देऊ शकते.
Credit goes to writer ✨

👍7
डायरी…
आज पुन्हा तुझी आठवण आली.
कारण काहीच घडलं नाही… आणि हेच तर जास्त बोचतं.
एकेकाळी दिवसातला सगळ्यात छोटा वेळही आपला वाटायचा. “आज काय झालं?” हा प्रश्न इतका आपुलकीचा होता की सगळी थकवा विरून जायचा. आज मात्र दिवस संपतो, रात्री येते, आणि कुणालाच काही सांगावंसं वाटत नाही. किंवा सांगावंसं असतं… पण ऐकणारं कोणी उरलेलं नसतं.
मी कधीच भांडण केलं नाही.
मी कधीच तक्रार केली नाही.
मी फक्त थांबत राहिलो.
उत्तर उशिरा यायला लागलं, मग येणंच बंद झालं. सुरुवातीला स्वतःलाच समजावलं—“काम असेल”, “व्यस्त असेल”. पण मनाला सगळं कळत होतं. व्यस्ततेपेक्षा दुर्लक्ष जास्त मोठं होतं.
सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटलं, जेव्हा कळलं की मी अजूनही तसाच आहे… आणि तू मात्र बदललेला आहेस. तुझ्या आयुष्यात मी आता आठवणीतसुद्धा नाही, आणि माझ्या आयुष्यात तू अजूनही रोज आहेस. ही असमानता फार दुखावते.
कधी कधी वाटतं, मीच जास्त अपेक्षा ठेवल्या का?
मैत्रीत अपेक्षा ठेवणं चूक असतं का?
की फक्त “मला विसरू नकोस” एवढंच मागणं खूप जड होतं?
आजही फोन उचलताना एक क्षणासाठी वाटतं—कदाचित तू असशील.
पण नाही… तो क्षण रोजच खोटा ठरतो.
तरीसुद्धा, कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात तुझ्यासाठी जागा आहे. राग नाही, तिरस्कार नाही… फक्त शांत दुःख आहे. आणि कदाचित हीच खरी मैत्री असावी—जी दुर्लक्षानंतरही संपत नाही, फक्त मनात खोल जखम बनून राहते...

❤9😢1
काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपली सवय होऊन जातात. त्यांचं रोजचं वागणं, बोलणं, हसणं मनात खोलवर रुजतं. माझ्या आयुष्यात अशीच एक व्यक्ती आहे. तिची एक सवय मला खूप भावते—ती स्वतः दुःखी असतानाही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करते.
कोणालाही काही त्रास असला की ती आधी त्याचं ऐकून घेते. स्वतःच्या वेदना ती मनात साठवते, पण दुसऱ्यांच्या अश्रूंना थांबवते. कधी कधी वाटतं, एवढं मजबूत मन तिने कुठून आणलं असेल? पण मग जाणवतं—ही सवय तिने आयुष्याच्या कठीण क्षणांतून शिकली आहे.
ती रोज मला विचारते, “आजचा दिवस कसा गेला?” हा साधा प्रश्नही माझ्यासाठी खूप मोठा आधार असतो. कारण त्या प्रश्नामागे काळजी असते, आपुलकी असते. तिची ही सवय माझ्या आयुष्यातला अंधार दूर करते.
कदाचित तिला कधीच कळणार नाही की तिच्या या सवयीने माझं आयुष्य किती बदललं आहे. पण माझ्या मनात मात्र ही सवय नेहमीच जिवंत राहील—शब्दांपेक्षा खोल, आठवणींपेक्षा जवळची...

❤7🥰1👌1
@natemanache
आयुष्याचे प्रश्न सुटता सुटत नाही
दुसऱ्यांना शोधता शोधता स्वतःला
कधी विसरले हेच आठवतच नाही
जाणारे निघून गेले आयुष्यातुन
मी मात्र तिथेच आहे त्या बंधनात अडकून
माझ्या ओळखीची ती पहाट सापडत नाही
रस्ता दिसतो आहे पण वाट सापडत नाही...
Copied Content ✨
आयुष्याचे प्रश्न सुटता सुटत नाही
दुसऱ्यांना शोधता शोधता स्वतःला
कधी विसरले हेच आठवतच नाही
जाणारे निघून गेले आयुष्यातुन
मी मात्र तिथेच आहे त्या बंधनात अडकून
माझ्या ओळखीची ती पहाट सापडत नाही
रस्ता दिसतो आहे पण वाट सापडत नाही...
Copied Content ✨
👌4
चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर बंड
करण्याची धमक ज्यांच्यात असते.
त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण
करण्याची देखील धमक असते.
एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते
ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा "खालच्या"
पायरीवर असतात..! 😊
🌼 शुभ सकाळ🌼
💢Join Us - @natemanache 💢
करण्याची धमक ज्यांच्यात असते.
त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण
करण्याची देखील धमक असते.
एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते
ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा "खालच्या"
पायरीवर असतात..! 😊
🌼 शुभ सकाळ🌼
💢Join Us - @natemanache 💢
❤4🔥1👌1
नात्यात सगळ्यात जास्त दुखतं तेव्हा,
जेव्हा आपण कोणासाठी सवयीचा भाग होतो
आणि ते आपल्यासाठी गरजेचे असतात…
दररोज स्वतःलाच समजावं लागतं—
“तो/ती व्यस्त आहे”,
“नंतर बोलेल”,
“आपणच जास्त अपेक्षा करतोय”…
पण खरं सांगायचं तर
अपेक्षा जास्त नसतात,
प्राधान्य कमी असतं.
मन खूप वेळा ओरडतं,
पण ओठ गप्प राहतात,
कारण भीती असते—
आपण बोललो तर कदाचित
नातंच तुटेल.
खरं प्रेम तेच,
जे तुम्हाला दुर्लक्षित नाही तर सुरक्षित वाटायला लावतं,
जे तुम्हाला वाट पाहायला नाही,
तर समजून घ्यायला शिकवतं.
कारण जिथे
“तू आहेस” याचं समाधान नसतं,
तिथे
“मी आहे” यालाच अर्थ उरत नाही… 💔🥀
लेखक - विश्वास पाटील ✨

😢4
हळवं एकाकीपण
खूप काही बोलायचं असतं,
पण ऐकणारं कोणीच नसतं.
म्हणून शब्द आतच राहतात,
आणि मन थोडं थोडं जड होत जातं.
रात्री उशाला मिठी मारून
डोळे मिटले की
आठवणी हळूच जाग्या होतात.
कोणालाच नको असलेली
ती हळवी वेदना
फक्त आपलीच असते.
दिवसा सगळं नीट वाटतं,
हसूही येतं,
पण मनाच्या एका कोपऱ्यात
एक रिकामी जागा असते
जिथे कोणीच पोहोचत नाही.
कोणी कोणाचे नसते
हे समजतं, मान्यही होतं,
पण तरीही मन
एखाद्याची वाट पाहत राहतं…
कारण एकाकीपण
समजूतदार नसतं,
ते फक्त हळवं असतं...
Credit goes to writer ✨
खूप काही बोलायचं असतं,
पण ऐकणारं कोणीच नसतं.
म्हणून शब्द आतच राहतात,
आणि मन थोडं थोडं जड होत जातं.
रात्री उशाला मिठी मारून
डोळे मिटले की
आठवणी हळूच जाग्या होतात.
कोणालाच नको असलेली
ती हळवी वेदना
फक्त आपलीच असते.
दिवसा सगळं नीट वाटतं,
हसूही येतं,
पण मनाच्या एका कोपऱ्यात
एक रिकामी जागा असते
जिथे कोणीच पोहोचत नाही.
कोणी कोणाचे नसते
हे समजतं, मान्यही होतं,
पण तरीही मन
एखाद्याची वाट पाहत राहतं…
कारण एकाकीपण
समजूतदार नसतं,
ते फक्त हळवं असतं...
Credit goes to writer ✨
👌4❤2
Forwarded from B K
✍🌿जडणघडणीचा संघर्ष✍🌿(नक्की पूर्ण वाचा)
स्वतःला विकसित करण्याचा काळ म्हणजे जडणघणीचा काळ.यशस्वी होणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला संघर्ष हा चुकला नाही मग ते उद्योगपती,खेळाडू,अधिकारी,नायक किंवा प्रतिष्ठित व्यक्ती असो सर्वांना हा संघर्ष करावाच लागला.ह्या प्रवासात अनेक व्यक्ती मिळतात जे आपल्या संघर्षाचा काळात आधार देतात,खूप नशिबवान असतात असे व्यक्ती ज्यांना नशीबाने असे व्यक्ती मिळतात जशी मावळ्यांनी छ.शिवाजी महाराजांना शेवट्याचा श्वासापर्यंत साथ दिली🤝असे वाटेल की आताच्या काळात अशी माणसे मिळणे अवघड आहे परंतु हातावर मोजण्या एवढी का असेना पण आजही चांगली लोक आहेत पण अशी लोक जरा कठोर स्वभावाची असू शकतात ती इतरांसारखी गोड बोलून काम काढून घेणारी नसतात कारण ते निस्वार्थीपणे वागतात कटू बोलतात पण सत्य बोलतात परंतु आजकाल चांगल्या/योग्य गोष्टी पटतात कुणाला?म्हणून असे व्यक्ती नकोसे वाटतात व ते मिळाले तरीही समजत नाहीत.तुमचे यश,प्रगती हे सर्वांचे व्यक्तिक नसते.शेवटी कितीही मोठे कार्य,पद मिळवा मोजके नाव ठेवरणाच असतात✍
....🦋🌺😇💞....
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा

👍4
ऐक ना सखे…
सांग ना मला,
खरं प्रेम कुणाला मिळालं?
राधेला का,
मीरेला का,
की रुक्मिणीला…?
कोण कमी पडलं सखे
जिवापाड कृष्णावर प्रेम करायला?
राधेचं प्रेम न बोलताही
श्वासात श्वास मिसळणारं होतं,
मीराचं प्रेम विष पिऊनही
भजनात हसणारं होतं,
रुक्मिणीचं प्रेम हक्काचं,
नावावरचं, संसाराचं होतं…
पण सखे सांग ना,
त्यातलं कुणी सुखी झालं?
राधा विरहात जळाली,
मीरा लोकांच्या वेड्यात अडकली,
रुक्मिणीही राजवाड्यात
कधी कधी एकटीच रडली…
सखे प्रेम कमी कुणाचंच नव्हतं,
कमी होतं फक्त नशिबाचं वाटप,
कारण कृष्ण एकच होता,
आणि वेदना तिघींच्या पदरात पडल्या…
म्हणूनच सखे,
आजही जे मनापासून प्रेम करतात ना,
त्यांच्या वाट्याला
नेहमीच थोडंसं
दुःख जास्तच येतं…
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#राधा_मीरा_रुक्मिणी
#कृष्णप्रेम
#VinayakBhise
सांग ना मला,
खरं प्रेम कुणाला मिळालं?
राधेला का,
मीरेला का,
की रुक्मिणीला…?
कोण कमी पडलं सखे
जिवापाड कृष्णावर प्रेम करायला?
राधेचं प्रेम न बोलताही
श्वासात श्वास मिसळणारं होतं,
मीराचं प्रेम विष पिऊनही
भजनात हसणारं होतं,
रुक्मिणीचं प्रेम हक्काचं,
नावावरचं, संसाराचं होतं…
पण सखे सांग ना,
त्यातलं कुणी सुखी झालं?
राधा विरहात जळाली,
मीरा लोकांच्या वेड्यात अडकली,
रुक्मिणीही राजवाड्यात
कधी कधी एकटीच रडली…
सखे प्रेम कमी कुणाचंच नव्हतं,
कमी होतं फक्त नशिबाचं वाटप,
कारण कृष्ण एकच होता,
आणि वेदना तिघींच्या पदरात पडल्या…
म्हणूनच सखे,
आजही जे मनापासून प्रेम करतात ना,
त्यांच्या वाट्याला
नेहमीच थोडंसं
दुःख जास्तच येतं…
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#राधा_मीरा_रुक्मिणी
#कृष्णप्रेम
#VinayakBhise
❤7👍2
Forwarded from Vinayak Bhise
ऐक ना सखे…
आज फक्त
अजित दादा गेले नाहीत
हक्काचा आधार
घरातला माणूस हरपला,
आज
पोरांच्या शाळेच्या फीवर
“मी बघतो” म्हणणारा
बाप माणूस हरपला
आई–बापांच्या रडत्या डोळ्यांना
खोट्या आश्वासनांचा नाही,
तर खांद्याचा आधार देणारा
माणूस हरपला
आज एक नेता मेला नाही,
आज
फाइलांच्या ढिगात
माणूस शोधणारा
एकटा आवाज गप्प झाला
एका फोनवर
“या, बसू, बोलू” म्हणणारा,
नाव, जात, ओळख न विचारता
काम करणारा
आज कायमचा गमवला
सखे,
आज खुर्ची रिकामी नाही झाली,
आज दार उघडं ठेवणारा
घरचा माणूस गेला
आज स्मशानात
एक देह जळणार नाही सखे,
आज
सामान्य माणसाचा
शेवटचा आधार
राख होणार.
आज डोळे रडत नाहीत सखे,
आज काळीज रडतं…
कारण
आज नेता गेला नाही,
आज
हक्कासाठी उभा राहणारा
घरातला माणूस हरपला
आधार गेला …
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#ऐक_ना_सखे
#अजितदादा
#घरातला_माणूस
#आधार_हरपला
#नेता_नाही_माणूस
#सामान्यांचा_आवाज
#हक्काचा_आधार
#Baramati
#श्रद्धांजली
#काळीज_रडलं
#SocialJustice
#VoiceOfCommonMan
#Vinayakbhise
आज फक्त
अजित दादा गेले नाहीत
हक्काचा आधार
घरातला माणूस हरपला,
आज
पोरांच्या शाळेच्या फीवर
“मी बघतो” म्हणणारा
बाप माणूस हरपला
आई–बापांच्या रडत्या डोळ्यांना
खोट्या आश्वासनांचा नाही,
तर खांद्याचा आधार देणारा
माणूस हरपला
आज एक नेता मेला नाही,
आज
फाइलांच्या ढिगात
माणूस शोधणारा
एकटा आवाज गप्प झाला
एका फोनवर
“या, बसू, बोलू” म्हणणारा,
नाव, जात, ओळख न विचारता
काम करणारा
आज कायमचा गमवला
सखे,
आज खुर्ची रिकामी नाही झाली,
आज दार उघडं ठेवणारा
घरचा माणूस गेला
आज स्मशानात
एक देह जळणार नाही सखे,
आज
सामान्य माणसाचा
शेवटचा आधार
राख होणार.
आज डोळे रडत नाहीत सखे,
आज काळीज रडतं…
कारण
आज नेता गेला नाही,
आज
हक्कासाठी उभा राहणारा
घरातला माणूस हरपला
आधार गेला …
✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#ऐक_ना_सखे
#अजितदादा
#घरातला_माणूस
#आधार_हरपला
#नेता_नाही_माणूस
#सामान्यांचा_आवाज
#हक्काचा_आधार
#Baramati
#श्रद्धांजली
#काळीज_रडलं
#SocialJustice
#VoiceOfCommonMan
#Vinayakbhise
❤3
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*नकारात्मक प्रभाव*
असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
आणि एखादीला मनातुन मुलगी नको, मुलगी नको असा सतत धावा करुनही मुलगीच होते?
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?
तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..
तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…
जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.
उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हण्टलं की वजन अजुन वाढतं,
माझे केस गळतायत म्हण्टलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजुनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजुन अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...
ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.
म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.
फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.
मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडुन दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.
विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.
तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्यावर स्मितहास्ये ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..
1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे.
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजुचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही खुप खुप त्यांच्यावर प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
13) मी निरोगी आहे,
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.
याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल
तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मेंदुपर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत तो तुमच्या सार्या आज्ञा पाळेल आणि खर्या करुन दाखवेल.
आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची दणदणीत सुरुवात असेल!..
धन्यवाद!...

❤6🥰1