नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
4.93K subscribers
6.01K photos
455 videos
10 files
314 links
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Download Telegram
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
नक्की वाचा 👌
👍3❤1
खुप काही अपेक्षा करावी
आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं,

असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात..
कोणतीही अपेक्षा न करता
मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते
त्याला तोड नसते...

कारण मुद्दाम लावलेल्या एअर
कंडीशन पेक्षा अचानक
अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते....
❤10👍3👌2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
❤4
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
नक्की वाचा 👍❤️
❤3
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
नक्की वाचा 🙏
👍1
Forwarded from Vinayak Bhise
नमस्कार
मी विनायक भिसे,
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ

आजच्या धावपळीच्या युगात 'मेंटल हेल्थ' किंवा 'मानसिक आरोग्य' हे शब्द आपण सोशल मीडियापासून चहाच्या टपरीवरील चर्चेपर्यंत सगळीकडे ऐकतो. मात्र, आजही समाजात एक मोठा गैरसमज आहे की, ज्याला काही मानसिक आजार आहे किंवा ज्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यालाच 'मानसिक आरोग्या'ची गरज आहे. पण एक मानसशास्त्रज्ञ म्हणून मला सांगावेसे वाटते की, मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसिक आजाराचा अभाव नव्हे, तर ती जगण्याची एक सकारात्मक पद्धत आहे.

मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येनुसार, मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेची जाणीव असते, ती जीवनातील सामान्य ताणतणावांचा सामना करू शकते, उत्पादक काम करू शकते आणि आपल्या समाजासाठी योगदान देऊ शकते.

सोप्या भाषेत सांगायचे तर, मानसिक आरोग्य हे तुमच्या 'विचार', 'भावना' आणि 'वर्तन' या तिन्ही गोष्टींचा मेळ आहे.

मानसिक आरोग्याचे तीन मुख्य स्तंभ -

१. भावनिक सुस्थिती (Emotional Well-being) - आपल्या भावना ओळखणे आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणे म्हणजे भावनिक आरोग्य. तुम्हाला राग आला, दुःख झाले किंवा आनंद झाला, तर त्या भावनांवर तुमचे नियंत्रण आहे का? की भावनाच तुम्हाला नियंत्रित करत आहेत? भावनांचे व्यवस्थापन जमत असेल, तर तुमचे मानसिक आरोग्य उत्तम आहे.

२. मनोवैज्ञानिक सुस्थिती (Psychological Well-being) - हे तुमच्या विचारांशी संबंधित आहे. संकटाच्या वेळी तुम्ही किती खंबीरपणे उभे राहता? तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे? जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक? कठीण काळातून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता (Resilience) म्हणजेच उत्तम मानसिक आरोग्य.

३. सामाजिक सुस्थिती (Social Well-being) - मानूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तुमचे इतरांशी संबंध कसे आहेत? तुम्ही संवाद कसा साधता? समाजात वावरताना तुम्हाला सुरक्षित आणि आनंदी वाटते का? निरोगी नातेसंबंध हे चांगल्या मानसिक आरोग्याचे लक्षण आहेत.

मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य - एकाच नाण्याच्या दोन बाजू

आपण शारीरिक व्याधींसाठी तातडीने उपचार घेतो, पण मनाकडे दुर्लक्ष करतो. लक्षात घ्या, 'मन' आणि 'शरीर' वेगळे नाहीत. जेव्हा मन अस्वस्थ असते, तेव्हा त्याचे परिणाम शरीरावर होतात (उदा. डोकेदुखी, अपचन, रक्तदाब वाढणे). यालाच आपण 'सायकोसोमॅटिक' लक्षणे म्हणतो. त्यामुळे शरीराची काळजी घेताना मनाची मशागत करणेही तितकेच गरजेचे आहे.

तुमचे मानसिक आरोग्य ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे. 'लोक काय म्हणतील' या भीतीपेक्षा 'मला कसं वाटतंय' याला महत्त्व द्या.
मदत मागण्यास संकोच करू नका जसं दात दुखल्यावर आपण डेंटिस्टकडे जातो, तसंच मन दुखावलेलं असताना मानसिक आरोग्य समुपदेशकाची मदत घेणे हे महत्त्वचं आहे.

✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143

#मानसिकआरोग्य
#MentalHealthAwareness
#मनाची_काळजी
#समुपदेशन
#मानसशास्त्र
#EmotionalHealth
#StressManagement
#MentalWellbeing
#TalkItOut
#BreakTheStigma
#VinayakBhise
#MentalHealthMatters
❤2
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
UPSC काय शिकवते..?
नक्की वाचा 🙏
❤2👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
'मोबाईल' नावाच्या जाळ्यात गुंतलेली लहान मुलं आणि समाज नक्की वाचा
❤3👍1
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नक्की पूर्ण वाचा....✍️
खरंच एवढ सोपे आहे का स्वतःच घर बनवण्यासाठी स्वतःचच घर सोडून बाहेर गावी उपाशी,कष्टात दिवस काढणे☹️?परिस्थितीनुसार घरापासून दूर राहणाऱ्या मंडळीला जीवनचा अर्थ लवकरच कळू लागतो म्हणूनच दहा रुपये खर्च करताना दहादा विचार करतात,फक्त काही दिवसाची भूक भागवण्यासाठी घरातून निघते वेळेस खायला लाडू,चिवडा इ दिले म्हणून जमत नाही कारण त्याने फक्त काही दिवसाचीच भूक भागवली जाते परंतु त्या विद्यार्थ्यला स्वतःच जीवनभराच्या रोटीची व्यवस्था करावी लागते..नाहीतर समाजातील काही लोक,मित्र,नातेवाईक कुठे कुणाला चांगले म्हणणार आहेत😒खऱ्या जीवनाचा अर्थ कळायला ह्या स्पर्धेच्या युगात किती मरावं लागते हे चव्हाट्यावर बसून डायलॉग मारणाऱ्या,टोमणे मारणाऱ्या लोकांना कधी समजेल?आणि हे एखाद्याला सहन झाले नाहीतर तो स्वतःला संपवतो मग त्याला जबाबदार कोण?🥹ज्याला दुधापासून तूप बनण्यासाठी,सोन्याला घडवण्यासाठी,  आधी स्वतःला गरम चटके सहन करावे लागतात हे ज्याला समजते तो कधीच खडतर परस्थितीला घाबरत नाही व इतरांनाही नाव ठेवत नाही..
...🦋🌺😇💞...
लेखन✍-B.S Kendre(Stu)
Cont-7218160575(Wh)
Tele id-
@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास शेअर करा
👌3❤2
वास्तव आणि भावना : जीवनाचा समतोल
मानवी जीवन म्हणजे वास्तव आणि भावना यांचा सतत चालणारा संघर्ष आणि संवाद आहे. वास्तव आपल्याला जग जसे आहे तसे स्वीकारायला शिकवते, तर भावना आपल्याला त्या जगात माणूस म्हणून जगण्याची ताकद देतात. यापैकी एकाचा अतिरेक झाला, तर जीवनाचा तोल बिघडतो.
वास्तव अनेकदा कठोर, अन्यायकारक आणि वेदनादायक असते. ते आपल्याला मर्यादा दाखवते—आपली क्षमता, परिस्थिती आणि समाजाची चौकट. अशा वेळी भावना आपल्याला आधार देतात. दुःखाच्या क्षणी अश्रू वाहणे ही कमजोरी नसून भावनांची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. भावना दडपल्या गेल्या तर त्या आतून माणसाला पोखरतात.
पण भावना आंधळ्या झाल्या तर त्या वास्तवाकडे दुर्लक्ष करायला लावतात. अती अपेक्षा, अतिप्रेम किंवा अती राग माणसाला चुकीच्या निर्णयांकडे घेऊन जातो. अनेक नाती, स्वप्ने आणि संधी भावनांच्या अतिरेकामुळे तुटतात. अशा वेळी वास्तवाची जाणीव आपल्याला थांबवते आणि विचार करायला भाग पाडते.
खरे शहाणपण म्हणजे वास्तव स्वीकारून भावनांना दिशा देणे. भावना पंख देतात, पण वास्तव जमीन दाखवते. जीवनाच्या प्रवासात दोन्ही आवश्यक आहेत. वास्तवाशिवाय भावना भ्रामक ठरतात आणि भावनांशिवाय वास्तव निर्जीव बनते.
म्हणूनच जो माणूस वास्तवाला सामोरे जातो आणि भावनांना समजून घेतो, तोच खऱ्या अर्थाने परिपक्व आणि संतुलित जीवन जगतो.
👌1
आयुष्य

आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू यांमधील प्रवास. हा प्रवास प्रत्येकासाठी वेगळा असतो—कोणासाठी सोपा, तर कोणासाठी संघर्षांनी भरलेला. आयुष्य आनंद, दुःख, यश, अपयश, नाती आणि अनुभव यांचे मिश्रण आहे.

आयुष्य आपल्याला सतत शिकवत असते. प्रत्येक अनुभव काही ना काही धडा देतो. अपयश आपल्याला संयम शिकवते, तर यश नम्रता शिकवते. दुःख माणसाला अंतर्मुख करते आणि आनंद जगण्याची ऊर्जा देतो. आयुष्य सरळ रेषेत चालत नाही; ते वळणावळणांचे असते.

आजच्या धावपळीच्या जगात माणूस आयुष्य जगण्यापेक्षा ते फक्त पार पाडत आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि स्पर्धा यामध्ये तो स्वतःला हरवतो. पण खरे आयुष्य छोट्या गोष्टींमध्ये दडलेले असते—हसण्यात, नात्यांमध्ये, समाधानात आणि शांततेत.

आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते पुन्हा मिळत नाही. म्हणून तक्रार करत बसण्यापेक्षा, मिळालेल्या क्षणांचे मोल जाणून सकारात्मक दृष्टीने जगणे गरजेचे आहे. आयुष्य जगण्याची कला शिकली, तरच आयुष्य सुंदर होते.
👌5❤1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
शिवरायांचे शिलेदार नरवीर 'तानाजी मालुसरे' यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...
# तानाजी मालुसरे
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना सखे,

मी बोलत नाही म्हणून
माझ्या मनात काहीच नाही
असं समजू नकोस…
शब्द शांत आहेत,
पण भावना गोंधळलेल्या

डोळ्यांत साठवलेली स्वप्नं
ओठांपर्यंत यायला घाबरतात,
कारण एकदा बोललो
तर परत आवरणार नाहीत

तू हसतेस तेव्हा
माझं आयुष्य थोडं हलकं होतं,
आणि तू गप्प असतेस तेव्हा
माझ्या मनात वादळ उठतं

मला मोठ्या वचनांची
सवय नाही सखे,
पण एवढंच सांगतो
तू सोबत असशील ना,
तर आयुष्याशी भांडायलाही
भीती वाटत नाही

ये ऐक ना सखे…
मी प्रेम करतो तुझ्यावर,
मनापासून जिवापाड गं

✍🏻विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤4
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
विद्यार्थ्यांसाठी माझा सुंदर संदेश... 🙏❤️नक्की वाचा
❤4👍1
नातं म्हणजे सुरक्षित वाटणारी जागा.
जिथे स्वतःला सिद्ध करावं लागत नाही,
जिथे “मजबूत” असल्याचं नाटक करावं लागत नाही.
जिथे थकलेलं मन ठेवून
नुसतं शांत बसता येतं—
आणि तरीही समोरच्याला सगळं कळतं.

खरं नातं ते,
जिथे प्रेम ओरडत नाही, दाखवावं लागत नाही,
ते हळूच रोजच्या सवयींत मिसळत जातं.
काळजी विचारून नाही,
तर आपोआप घेतली जाते.

इथे जखमा दाखवायला भीती वाटत नाही,
कारण त्या वापरून कुणी दुखावत नाही—
उलट त्या सांभाळून घेतल्या जातात.
जिथे रडणं कमजोरी नसतं,
आणि गप्प राहणं दुरावा नसतो.

खोल नात्यात “नेहमी आनंद” नसतो,
पण नेहमी सोबत असण्याची खात्री असते.
वाद होतात, शब्द बोचतात,
पण मनाच्या तळाशी एक शांत विश्वास असतो—
“काहीही झालं तरी, आपण एकमेकांचेच आहोत.”

असं नातं आयुष्य बदलत नाही,
ते आयुष्याला सहन करण्यासारखं बनवतं.
आणि कधी कधी—
जग जड वाटत असताना,
एकच नातं पुरेसं ठरतं…
श्वास घेण्यासाठी...🌙
❤6👌1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
नक्कीच वाचा
❤2👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
विनम्र
अभिवादन🙏🙏💙💙*
✍️"रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा,बाबासाहेब आंबेडकरांना विद्वत्तेच्या सर्वोच्च शिखरावर घेवून जाणारी एक दिव्य शक्ती. गौऱ्या शेणी थांबून एक एक रुपया जमवून तीने बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी पैसा दिला. म्हणून बाबासाहेब शिकले.आणि  भारताच्या घटनेच्या शिल्पकार झाले. आणि रमाई देशातील कोट्यावधी जनतेची आई झाली. हिच त्यांची महानता आहे.आज 7 फेब्रुवारी माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन..!"
🙏🙏🙏🙏💙💙💙
✍️ ABC'S Diaries 📚
💙💙💙💙💙
👏5
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
रमाबाई भीमराव आंबेडकर 💙
❤1