SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
*#June NET Exam 2025*

*● राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) कडून 'यूजीसी नेट' ही परीक्षा 21 ते 30 जून 2025 मध्ये ऑनलाइन होणार होणार, 7 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार ; जाणून घ्या नेट परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम व NET/SET पेपर 1 व 2 संदर्भ*

*▪️सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) आणि पीएच.डी. प्रवेश या अर्हतेसाठी नेट ही परीक्षा घेतली जाते.*

*▪️नेट परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) या पद्धतीने घेतली जाते.*

*■ परीक्षा अर्ज मुदत - 16 एप्रिल 2025 ते 7 मे 2025*

*■परीक्षा दिनांक* - *21 जून ते 30 जून 2025 दरम्यान ऑनलाइन होणार आहे.*

*▪️परीक्षा फिस*
General - 1150 रुपये
OBC NCL / General EWS - 600 रुपये
SC/ST/PWD/Transgender - 325 रुपये
*■ नेट परीक्षेचे स्वरूप*

■ नेट परीक्षा ३०० गुणांसाठी असते.
■ नेट परीक्षेत दोन प्रश्नपत्रिका असतात.
■ पहिली प्रश्नपत्रिका ५० प्रश्न १०० गुणांसाठी तर दुसरी प्रश्नपत्रिकेत १०० प्रश्न २०० गुणांसाठी असतात व दुसरा पेपर हा विषयाशी संबंधित असते.
▪️ परीक्षेचा अर्ज ऑनलाईन ugcnet.nta.ac.in / www.nta.ac.in या वेबसाईटवर भरता येतील.
▪️ परीक्षेत दोन्ही प्रश्नपत्रिका दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सहा टक्के उमेदवार पात्र ठरवले जातील
▪️ त्यानंतर दोन्ही प्रश्नपत्रिका मिळून किमान ४० टक्के (खुला प्रवर्ग) किंवा ३५ टक्के (आरक्षित प्रवर्ग) गुण मिळवलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार
▪️ त्यानुसार सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरवले जाईल.

*NET/SET पेपर 1 व 2 संदर्भ*

*नेट / सेट पेपर 1 उपयुक्त संदर्भ*
नेट सेट परीक्षेतील पेपर एक हा सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान असून या पेपरच्या अधिकाधिक गुणांवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबून आहे.नेट सेट परीक्षेच्या पॅटर्ननुसार पेपर एकसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.

(1)नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे ,11 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स *(मराठी माध्यमातील नेट, सेट, पेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ must Read book)*

(2.)युजीसी नेट अनिवार्य पेपर एक - के.व्ही.एस. मदान /अरिहंत पब्लिकेशन नेट पेपर एक पुस्तक (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध )

(3)पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET) "संशोधन पद्धती" परिक्षाभिमुख विवेचन व 500 महत्वाचे संशोधविषयक वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते (पाचवी आवृत्ती)

*नेट /सेट परीक्षा पेपर 2 उपयुक्त संदर्भ*
नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो.

*नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ*

(1) A glossary of literary terms- m.h. abrahms and harpham
(2) A history of english literature - e Albert
(3) English literature - R j Rees
(4) a background to the english literature - B Prasad
(5) English literature - Elizabeth drabble
(6) History of indian english literature - m k naik
(7) beginning theory - Peter Berry
(8)A critical history of english literature - David daiches

*नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ*
(1)प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास - ल रा नासिराबादकर
(2)आधुनिक भाषाविज्ञान - मिलिंद मालशे
(3)मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
(4)अनिवार्य मराठी - के सागर
(5)मराठी वाङमयाचा इतिहास - रा श्री जोग
(6)नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे

*मराठी विषयाच्या नेट, सेट पात्रतेसाठी बहुपयोगी संदर्भग्रंथ संच.*

१) लोकसाहित्याची रूपरेखा -
दुर्गा भागवत
२) साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह -
संपादक - शरणकुमार लिंबाळे
३) दलित साहित्य : वेदना आणि  विद्रोह -
भालचंद्र फडके
४) तौलनिक साहित्याभ्यास -
वसंत बापट
५) भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक -
डाॅ. मालशे, सोमण, इनामदार
६) समीक्षामीमांसा -
गंगाधर पाटील
७) आधुनिक समीक्षा - सिध्दांत -
मिलिंद मालशे, अशोक जोशी
८) साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या -
वसंत पाटणकर
९) प्रदक्षिणा खंड १,२ -
आर्वाचीन व स्वातंत्र्योत्तर वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा
१०) प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरुप -
ह. श्री. शेणोलीकर
११) मराठी समीक्षेची सद्य:स्थिती  - वसंत आबाजी डहाके
१२) मराठी भाषेचा इतिहास - ग. ना. जोगळेकर,
१३) काव्यशास्त्रप्रदीप - स. रा. गाडगीळ,