साप चावल्यास दिले जाणारे हे इंजेक्शन आहे. ती आता १०८ रुग्णवाहिकेतही उपलब्ध आहे.
जर कोणाला साप चावला असेल तर तुम्ही 108 वर कॉल करू शकता आणि रुग्णवाहिका त्या व्यक्तीच्या घराजवळ येईल आणि आवश्यक इंजेक्शन/प्रथमोपचार पुरवेल.
कृपया ही माहिती तुम्ही ज्या गटांचा भाग आहात त्यामध्ये शेअर करा. हे उपयुक्त असू शकते आणि आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याला मदत करू शकते... 🙏

👍3❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आम्ही 18-19 वर्षांचे असताना शाळेची फी मागायलाही वडिलांसमोर जायची भीती वाटायची...
आधी आईला सांगायची, मग आई वडिलांना.
आज समजतंय, तेव्हा फी मागताना वडिलांची भीती नव्हती... त्यांच्या कष्टांची जाणीव होती...

❤16
एका मित्राने दुसऱ्या मित्राला कोरा चेक दिला…“खात्यात १५ हजार रुपये आहेत… तुला जितके पाहिजेत तितके काढून घे!”
हा प्रसंग एखाद्या सिनेमातला नाही…ही गोष्ट आहे नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीची! आज नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे दोघेही अभिनयाच्या क्षेत्रात दिग्गज म्हणून ओळखले जातात. पण एक काळ असा होता, जेव्हा नाना पाटेकर संघर्ष करत होते.
पैशांची चणचण होती… काम होतं, पण हातात पैसा टिकत नव्हता… आणि अशाच काळात त्यांच्या आयुष्यात एक मित्र देवदूतासारखा उभा राहिला— अशोक सराफ!
‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या काळात दोघांची मैत्री घट्ट झाली. त्या वेळी नानांना प्रयोगाचे ५० रुपये, तर अशोक सराफांना २५० रुपये मिळायचे. नाटकाचे प्रयोग नसताना दोघे पत्ते खेळायचे. पण या खेळात एक वेगळाच खेळ चालायचा…
अशोक सराफ मुद्दाम हरायचे! पाच-दहा रुपये नानांच्या हातात जायचे. नानांना हे कळायचं की अशोक मुद्दाम हरतोय. पण नानांना पैशांची गरज होती… म्हणून तेही ते पैसे घ्यायचे. कारण काही माणसं मदत करताना समोरच्याचा स्वाभिमान जपत असतात. अशोक सराफही तसंच करत होते. पण एक दिवस अशी परिस्थिती आली की नानांना खरोखर पैशांची गरज पडली. गणपतीचे दिवस होते. घरात फुलांचा खर्च होता.
पण नानांच्या खिशात पैसे नव्हते. सकाळची वेळ… अशोक सराफ फिल्मसिटीला शूटिंगसाठी निघाले होते. जाताना ते नानांच्या माटुंग्यातल्या घरी आले. दारावर टकटक केली.
नानांनी दार उघडलं. अशोक सराफांनी हातात एक कोरा चेक ठेवला. आणि म्हणाले—“माझ्या खात्यात १५ हजार रुपये आहेत. तुला पाहिजे तेवढे काढून घे.”
ना कसलं स्पष्टीकरण… ना कसलं कर्जाचं बोलणं… ना सहीची हमी… ना परत कधी देणार याचा सवाल! फक्त मित्रावर विश्वास! नानांनी त्या चेकमधून ३ हजार रुपये काढले. आणि विशेष म्हणजे… अशोक सराफांनी नंतर कधीही त्या पैशांचा हिशोब मागितला नाही. काही दिवस नाही… काही महिने नाही… कित्येक वर्षं! काळ पुढे सरकत गेला. नाना पाटेकर मोठे होत गेले. काम मिळत गेलं. आर्थिक परिस्थिती सुधारली.
आणि एक दिवस नाना पाटेकरांनी अशोक सराफांचे ते ३ हजार रुपये त्यांच्या हातावर परत ठेवले. अशोक सराफांनी पैसे हातात घेतले… आणि नानांकडे पाहून मिश्कीलपणे म्हणाले— “काय पाटेकर… पैशेवाले झाले तुम्ही?” नानांनी दिलेलं उत्तर मात्र आजही या मैत्रीची खरी श्रीमंती सांगून जातं *“पैसेच परत करतोय… वेळ नाही परत करू शकत!”*
काय भन्नाट वाक्य आहे ना? *पैसे परत करता येतात… पण गरजेच्या वेळी एखाद्याने दिलेला आधार, विश्वास आणि साथ त्याची परतफेड करता येत नाही*. आणखी एक छोटासा किस्सा नाना पाटेकरांनी सांगितला होता. नाटकाच्या दौऱ्यावर असताना नाना अशोक सराफांचे पाय चेपायचे, डोक्याला तेल लावून द्यायचे. त्याबदल्यात अशोक सराफ त्यांना ५ रुपये द्यायचे. नानांच्या आयुष्यात त्या पाच रुपयांचीही किंमत होती.
म्हणूनच आज परिस्थिती बदलली, प्रसिद्धी आली, पैसा आला… तरी नाना त्या जुन्या दिवसांना विसरले नाहीत.
नाना म्हणतात की आजही अशोक सराफ भेटले की ते त्यांचे पाय चेपतात. आणि अशोक मामा त्यांना म्हणतात—
“ए नाना गाढवा, असं करू नकोस!” खरं तर ही गोष्ट ३ हजार रुपयांची नाही. ही गोष्ट आहे— मैत्रीची… विश्वासाची स्वाभिमानाची… आणि गरजेच्या वेळी न बोलावता मदतीला धावून जाण्याची! आजच्या काळात हजारो रुपयांची मदत करून त्याचा फोटो काढणारे अनेकजण भेटतील…
पण स्वतःच्या खात्यातील १५ हजार रुपयांचा कोरा चेक मित्राच्या हातात देऊन “तुला पाहिजे तेवढे काढून घे” म्हणणारा मित्र मिळणं हीच खरी श्रीमंती! आणि म्हणूनच नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांची मैत्री आजही इतकी खास वाटते.
कारण काही नाती पैशांनी श्रीमंत होत नाहीत…ती माणुसकीने श्रीमंत होतात! नाना आणि अशोक मामा — पडद्यावरचे दिग्गज, पण आयुष्यात एकमेकांचे खरे मित्र!

❤9
“अभिनेत्याने अभिनेता म्हणूनच मरावे… नट जातो विस्मरणामध्ये, पण त्याने केलेल्या भूमिका चिरंतन राहतात.” — नटसम्राट
❤3
To be or not to be, that is the question!!!
जगावं की मरावं
हा एकच सवाल आहे.
या दुनियेच्या उकिरड्यावर
खरकट्या पत्रावलीचा तुकडा होऊन
जगावं बेशरम लाचार आनंदानं
की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर
त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह
मृत्युच्या काळ्याशार डोहामध्ये?
आणि करावा सर्वांचा शेवट
एका प्रहाराने
माझा तुझा याचा आणि त्याचाही.
मृत्युच्या महासर्पाने
जीवनाला असा डंख मारावा
की नंतर येणाऱ्या निद्रेला
नसावा जागृतीचा किनारा
कधीही
पण त्या निद्रेलाही
पुन्हा स्वप्न पडू लागलं तर
तर-तर
इथचं मेख आहे.
नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात
प्रवेश करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन करतो
हे जुने जागेपण
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे बलात्कार
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्त्वाची
विटंबना
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेने
आमच्या मारेकऱ्याच्याच दाराशी.
विधात्या , तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला , आम्ही ज्यांना जन्म दिला
ते आम्हाला विसरतात
आणि दुसऱ्या बाजूला , ज्यानं आम्हाला जन्म दिला
तो तूही आम्हाला विसरतोस,
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन
हे करुणाकरा ,
आम्ही थेरड्यानी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायच!
कोणाच्या - पायावर- कोणाच्या-
---------------------- नटसम्राट

❤10
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रत्येकाच्या आयुष्यात सत्याचा विजय होवो, सुख-समृद्धी नांदो आणि नव्या स्वप्नांना पूर्तता लाभो.
सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही, पण नशिबानं तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं मला मिळाली. ती अनमोल आहेत सोन्यासारखे तुम्ही आहातच. सदैव आरोग्यसंपन्न राहा..
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

❤1
🪷
💔 हरवलेलं परत मिळत नाही…
माणसाचं आयुष्य किती विचित्र असतं ना! आपण बाहेरून हसत असतो, रोजची कामं करत असतो, जगासमोर अगदी व्यवस्थित असल्याचं दाखवत असतो; पण मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी कायमचं हरवलेलं असतं. कधी एखादी व्यक्ती, कधी एखादं नातं, कधी एखादं स्वप्न, तर कधी स्वतःचं पूर्वीसारखं आनंदी असणारं मन...
काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या जगण्याचा एक भाग बनून जातात. त्यांच्या एका मेसेजने चेहऱ्यावर हसू येतं, त्यांच्या दोन शब्दांनी मनाला आधार मिळतो आणि त्यांच्या सहवासात आयुष्य सुंदर वाटू लागतं. हळूहळू आपण त्यांच्यावर इतके अवलंबून होतो की, त्यांच्या अनुपस्थितीतही मन त्यांचीच वाट पाहत राहतं. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं घडत नाही. काही माणसं अचानक दूर जातात, काही परिस्थितीमुळे दुरावतात, तर काही जवळ असूनही मनापासून आपली राहत नाहीत.
सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहीत आहे? ज्या गोष्टीची आपल्याला सवय झालेली असते, तिच्याशिवाय जगण्याची वेळ येते तेव्हा! रोज बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकायला मिळत नाही, मनातलं सांगण्यासाठी आपलं माणूस जवळ नसतं आणि ज्याच्यासाठी आपण मनापासून वेळ काढलेला असतो, त्याच्याकडे आपल्यासाठी दोन क्षणही नसतात. तेव्हा मन अस्वस्थ होतं. आठवणींची गर्दी होते आणि डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनाही कधी कधी शब्द सापडत नाहीत.
माणूस हरवलेल्या गोष्टीपेक्षा ती परत मिळणार नाही, या जाणिवेने जास्त तुटतो. कारण मनाला शेवटपर्यंत एक छोटीशी आशा असते—कदाचित पुन्हा सगळं पूर्वीसारखं होईल, कदाचित ती व्यक्ती पुन्हा जवळ येईल, कदाचित पुन्हा एकदा मनापासून संवाद होईल! पण जेव्हा या आशेचं रूपांतर प्रतीक्षेत होतं आणि प्रतीक्षेचं रूपांतर सवयीत होतं, तेव्हा माणूस हळूहळू आतून शांत व्हायला शिकतो.
काही जखमा अशा असतात की त्यांच्यावर औषध लावता येत नाही. काळ त्यांची तीव्रता कमी करतो, पण त्यांचे व्रण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायम राहतात. एखादं गाणं, एखादा रस्ता, एखादी तारीख किंवा एखादा साधा शब्दसुद्धा जुन्या आठवणींना पुन्हा जागं करतो. आपण क्षणभर भूतकाळात जातो आणि मनाला जाणवतं की, ते दिवस आता फक्त आठवणीतच उरले आहेत.
पण मित्रांनो, आयुष्याचा अर्थ केवळ हरवलेल्या गोष्टींचा शोक करण्यात नाही. काही गोष्टी आपल्याला मिळतात, काही आपल्याकडून निघून जातात आणि काही गोष्टी आपल्याला आयुष्यभरासाठी शिकवण देऊन जातात. प्रत्येक दुरावलेलं नातं आपली चूक नसतं आणि प्रत्येक नातं वाचवण्याची जबाबदारी एकट्याची नसते. प्रेम करा, जिव्हाळा ठेवा, मनापासून नाती जपा; पण स्वतःला इतकं विसरू नका की दुसऱ्याच्या अनुपस्थितीत स्वतःचं अस्तित्वच हरवून बसेल.
ज्यांना तुमची किंमत आहे, त्यांच्यासाठी वेळ काढा. ज्यांना तुमच्या भावनांची जाणीव आहे, त्यांना मनात जागा द्या. पण जिथे सतत तुमच्याच मनाला समजावावं लागतं, जिथे तुमच्याच डोळ्यांत पाणी येतं आणि जिथे तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही, तिथे स्वतःच्या मनाची काळजी घ्यायला शिका.
कारण आयुष्यात काही माणसं पुन्हा भेटतील, काही नाती नव्याने जुळतील, काही स्वप्नं पुन्हा फुलतील; पण गेलेला काळ आणि त्या काळात जगलेले काही खास क्षण पुन्हा कधीच परत येणार नाहीत.
नाहीत.
म्हणून जे जवळ आहे त्याची किंमत ओळखा, जे दूर गेलं त्याला शांतपणे निरोप द्या आणि जे उरलं आहे त्यात जगण्याचा आनंद शोधा.
शेवटी एवढंच...
हरवलेलं परत मिळवण्याच्या नादात,
हातात उरलेलं गमावू नका...
आठवणी जपा, पण त्यात स्वतःला हरवू नका...
दुसऱ्यांवर प्रेम करा, पण स्वतःवरचं प्रेम कधीच कमी करू नका...
कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही आणि मन एकदा खूप थकलं की, त्याला पुन्हा हसवण्यासाठी कधी कधी संपूर्ण आयुष्य अपुरं पडतं...! 💐
क्रेडिट : सुजित गांवकर
😊

❤4
🪷
"कोजागिरीच्या रात्री आता
कुठल्या कविता,कुठले गीत
चंद्रभारले कविजन बसती
सोड्यासंगे काही पीत!"
आज कोजागिरी पौर्णिमा,पुर्वी कोजागिरीला सर्व जण एकत्र जमत गप्पा-गोष्टी,गाणी-कविता वाचन चाले,काळानूसार ते कमी झाले,आता बर्याचवेळा चंद्र ढगाआडच असतो!.यावर गदिमांची एक 'चंद्रग्रहण' नावाची कविता आठवली...त्यात यावरच भाष्य करताना ते म्हणतात..
चंद्रग्रहण
कुठे करितसे पारध मानव
कुठे पोचले त्याचे ज्ञान
चंद्रलोकिच्या हरिणामागे
धरणीवरचे धावे श्वान!
शारदियेच्या चंद्रकलेचा
पार उडुनिया गेला रंग
'चकोर तलगे' जळुन मेली
अणुशक्तीने भाजुन अंग!
चंद्रमुखी या विशेषणावर
ठिक्कर काळे पडले डाग
'चंद्रमुखी' ही हाक मारिता
सुमुखींना ये भलता राग!
आंग्ल कवीची मड्डम होती
परवा परवा 'लेडी मून'
मराठीतला जुना हाटही
तिला ठरवतो आता जून
कोजागिरीच्या रात्री आता
कुठल्या कविता,कुठले गीत
चंद्रभारले कविजन बसती
सोड्यासंगे काही पीत!
गीर्वाणातिल साहित्याचा
खलास झाला अर्धा भाग
विज्ञानाची व्रात्य वाळवी
'चांद्र' तयाचा मांडी याग!
चंद्रग्रहण हे सुटणे नाही
क्रोधी मंगळ झाला लाल
साहित्याच्या यात्रेमधुनी
नक्षत्रांचे उठले पाल.
- ग.दि.माडगूळकर